कॅसलिंग.......
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मित्रानो इथे मिपावर चतुरंग काकांची भन्नाट कॉमेन्ट्री वाचून बुद्धीबळातील एका खेळी बद्दल लहानपणापासून असलेले कुतुहल पुन्हा जागे झाले. तसे आमच्या ग्यांगचे बुद्धीबळाचे ज्ञान तोकडेच. राजा कुठे फक्त एक घर चालु शकतो. उंट तिरका जातो. घोडा अडीच घरे जातो. हत्ती उभ्या आडव्या रेषेत फिरतो. प्यादे सरळ एकच घर फक्त सुरवातीला दोन घरे फक्त मारायला सरळ न जाता तिरके एक घर इतके नियम माहीत असले की झाले . आले बुद्धीबळ. उन्हाळ्यात पत्ते खेळताना विशेषतः गड्ड्या झब्बु च्यालेन्ज किंवा नाटेकाटेठोम खेळताना भरपूर आरडा ओरडा व्हायचा. च्यालेन्ज मधला च्यालेन्ज उचलेन्ज तर फार प्रिय.
त्यामानाने बुद्धीबळ फार शांतपणे व्हायचे. निदान एक दहा मिनेटे तरी शांतता नांदायची. आम्ही बुद्धीबळात "डबल्स" प्रकार शोधुन काढला होता. पण त्याला फारसे पाठबळ लाभले नाही.क्यारम खेळताना तर "ए गोलावर हात नाही. रेषेवरची सोंगटी तू सरकवली" असे करत त्याचे पर्यवसन क्यारम उधळून आवराआवर करायच्या फन्दात न पडता सगळी टीम उधळून बाहेर पडण्यात व्हायचे.पण क्यारम मधे फक्त पैशे आणि गेम हे दोनच प्रकार असायचे. ते सुद्धा सोंगट्या उभ्या मांडणे आणि आडव्या गोलाकार माडणे हेच त्यातले मुख्य फरक . आम्ही सोंगट्या उभा मांडून स्ट्रायकरने त्या उडवून समोरच्याचा गेम करण्याचे एक्स्पर्टी मिळवली होती.
घरात शांतता नांदावी हा घरच्यांचा उद्देश म्हणून त्यानी चेस बोर्ड आणि सोंगट्यांचा सेट आणुन दिला. शेजारच्य कोणीतरी नियम समजावून दिले. नियम आले की चेस आले हे आमचे गणीत. प्याद्यांची कापाकाप करताना चुकून समोरच्याचा उंट किंवा हत्ती मेला की एकदम प्रतापगड मिळवल्याचा आनंद यायचा. वजीर मिळाला की अगदी सिंहगडचे युद्ध जिंकल्या सारखे वाटायचे. तोंडाने तोफाअंचे आवाजदेखील काढायचो. घरात शांतता नांदवायच्या कटाला एकदम उडवून लावायचो..
मग एक दिवस असाच शाळेत चेस च्या युद्ध भाग घेतला. नशीब आमच्या दामले मास्तरानी चेस खेळताना चिलखत तलवार घालून यायचे कम्पल्शन केले नाही. कधी काय सांगतील हे त्यांच्याबाबत काही सांगता यायचे नाही. त्या स्पर्धेचे वातावरन काही एकदम भारीच होते. स्पर्धेचे नियम साम्गुन झाले. पण त्यात गुण कसे मोजतात. याचा आम्हाला काहीच पत्ता नव्हता. मी शेजारच्या विन्याला साम्गितले की नक्की नियम विचारुन ये. म्याच किती गुणांची असते वगैरे वगैरे. पण विन्या लाजाळू जो गेला तो परत आलाच नाही.
स्पर्धा सुरू झाली. मी तुफ्फान हाणामारी करत होतो. समोरच्या पेकात मोडावे तसे त्याचे दोन उंट, एक घोडा चार प्यादी अगदी एकद म्जोशात घेतली. माझाही एक हत्ती ,उंट, चार प्यादी गारद झाली. युद्ध म्हंटल्यावर हे होणारच की. पण या खेळाचे एक गम्मत आहे. खेळ सुरु असताना एकमेकांशे इरीशीरीने लढणारी प्यादी , वजीर हत्ती हे औट झाल्यावर मात्र एकदम डॉर्मेटरीत झोपल्यासारखे एकमेकाम्च्या ग़ळ्यात गळे घालून झोपी जातात.
आमच्या खेळ एकदम रंगात आला होता. घोडा उंट आनि हत्ती यांच्या कचाट्यात समोरच्याला एकदम पुरता प्याक केला होता. काय झाले कोण जाणे तो अचानक क्यासलिंग असे माही तरी म्हणाला आनो त्याने हत्ती आणि राजाच्या जागा बदलल्या. हे म्हणजे माझ्यासाठी बॉलरने बॉल टाकण्यासाठी धावत यावे आणि ब्याट्समनने ट्याम्प्लीज म्हणत रस्त्याच्या कडेला तोंड फिरवुन उभे रहावे तसे काहीसे झाले. हा असा काही नियम असतो हेच मला माहीत नव्हते.असायचे ही कारन्नव्हते. ऐन धुमश्चक्रीच्या मारामारीत ट्याम्प्लीज घ्यावी तसा हा क्यासलिंगचा प्रकार मला एकदम बुचकळ्यात टाकून गेला. मी देखील पुढच्या खेळीत क्यासलिंग म्हणत माझा उंट आणि वजीर बदलला. दामले मास्तराना त्याचा काय राग आला कोण जाणे त्यानी माझ्यकडे एकदम रागाने पाहिले आणि डाव बंद करायला लावला.
त्या दिवसापासून मला क्यासलिंग या शब्दाबद्दल कुतुहल निर्माण झाले. मी शेजारच्या विन्याला विचारले तर तो म्हणाला तो शब्द क्यासलिंग नै कै. क्यान्सलिंग असा आहे. तेंव्हा पासून मी लोकाना क्य्न्सलिंग म्हणजे काय असे विचारायला सुरवात केली. तीन बिर्हाडे सोडून चौथ्या खोलीत रहाणार्या शकु परांजपेला सुद्धा विचारले. तिने मला पाठीत धपाटा तर घातलाच वर पुन्हा चालता होत म्हणून साम्गितले. मला काय माहीत की तीचे लग्न क्यान्सल झाले होते म्हणून.
त्यामुळे की काय क्यासलिंग या शब्दाचे कुतुहल वाढतच गेले. क्यासलिंगचा अर्थ कोणीतरी "अदलाबदल" असा सांगितला. मराठीत त्याला कोणीतरी" कोट करणे" असाही अर्थ सांगितला. याने अर्थातच कुतुहल शमले नाही.
क्यासलिंग म्हणजे नक्की काय? ते कशासाठी करतात? कधी करतात. ते फक्त बुद्धीबळातच असते की अन्यखेळात देखील असते. उदा वेंकटेश प्रसाद ब्याटिंगला आला की क्यासलिंग करून सचिन तेंडुलकरला आणायचे. किंवा नेहरा फिल्डिंगला आला की क्यासलिंग करून त्याच्या ऐवजी जॉन्टी र्होडस ला आणायचा.
किंवा लंगडीत ऐनवेळेस खेळाडू औट व्हायच्या वेळेस म्हणजे पाठलगाकरणार्या खेळाडुचा हात समोरच्या भिडूच्या पाठीला लागायला अवघा अर्धा इंच उरला आहे त्या वेळेस एकदम क्यासलिंग म्हणायचे आणि नवा गडी मैदानात आणायचा.असे काही नियम आहेत का?
मनात सदोदित क्यासलिंगचेच विचार यायला लागाले. भुगोलात खारे वारे मतलई वारे हे समुद्राच्या पाण्यातील आणि जमिनीच्या तापमानातील फरकामुळे क्यासलिंग होउन वेगवेगळ्या दिशेने वहातात असे लिहीले होते. मास्तरानी मार्कांचे क्यासलिंग करुन ६१ ऐवजी ६१ दिले होते ती गोष्ट निराळी.
शाळेतील इयत्ता वाढत गेली तसे क्यासलिंग चा विसर पडला. जॉबमधे अप्रेजल च्या वेळेस नॉर्मलायझेशन नामक क्यासलिंगचा फटका बसल्यावर कधितरी तो शब्द आठवतो. कुठल्यातरी अपघातात बस चुकली म्हणून मागे राहिला आणि वाचला म्हणुन कोणीतरी देवाचे आभार मानत असतो तेंव्हा क्यासलिंग ची आठवण होते. सागर चित्रपटात डिंपल ने ऋषीकपूर आणि कमलहसनचे क्यासलिंगच केले होते.
आपल्याला आवडणारी पिंगट टप्पोरे डोळे महिरपी केस असलेली स्मिता प्रधान आपल्याकडे बघु हसते. तेंव्हा जीव अक्षरशः वरखाली होत असतो. हाय म्हणत हात उंचावून थांबण्याची खूण करत ती आपल्याकडेच येत असलेली दिसते तेंव्हा तर आपण साले एकदम राजा असल्याचीच जाणीव होते घशाला कोरड पडते. र्हदयात नाशीकढोल वाजायला लागतो. ती आपल्या समोर येवून थांबते. आणि तिच्या त्या माधुरी दिक्षीत स्टाईलच्या स्माईलने आपल्याशी बोलायला सुरवात करे. काय कसा आहेस. तुला एक काम सांगितले तर करशील? नाही नाही म्हणणार ना? बघ तुला माझी शप्पथ.....
असे काहीसे मान तिरपी करत बोलायला लागते. आपली पार शोएबाख्तरने यष्टी पार थर्डमॅन पर्यन्त लांब उडवावी तशी विकेट उडालेली असते पुढच्याच क्षणी ती म्हणते. शशी तुझा मित्र आहे ना? त्याला माझा एक निरोप सांगशील......
आयला तिने हे सांगेपर्यन्त आपले क्यासलिंग झालेय हे लक्षातच येत नाही.
प्रत्येकवेळी आपल्यालाच एस्केलेटेड प्रोजेक्टवर जावे लागते तेंव्हा क्यासलिंगची प्रकर्शनाने आठवण होते. वाटते की कोणीतरी राजा वाचावा म्हणून आपल्याला हत्ती करुन क्यासलिंग केले जाते.
हे सगळे आठवताना माझा मूळ प्रश्न कायमच आहे. क्यासलिंग म्हणजे काय? आंतर्जालावर शोध घेतला तर कैच्या कै वेगळेच वाचायला मिळते. काय तर म्हणे आपण ज्याला वजीर म्हणतो त्याचे नाव क्वीन. आणि राजा म्हणतो तो बिशप. बहुधा चतुरंगाचा हा देशी खेळ इंग्रजी भाषेत नेताना राणी राजा वजीर बिशप यांचे क्यासलिंग करुन नेला
हे असले वाचल्यावर मनाचा गोंधळ अणखीनच वाढतो. मनात विचारांचे क्यासलिंग जोरात होत रहाते.
पण प्रश्न कायमच रहातो. क्यासलिंग म्हणजे काय?
प्रतिक्रिया
पुढच्या लेखासाठी कच्चा माल
कॅसलिंग म्हणजे राजाला/किंगला
एक प्रश्न..
खरंय.
आधी मेलेले असायलाच
राजा सोडुन
चेकमेट !
कॅसलिंगनंतर राजासमोरची तीन
कॅसलिंगनंतर राजासमोरची तीन प्यादी जर जागची हलली नसतील, तर प्रतिस्पर्ध्याने त्याचा हत्ती किंवा वजीर १ क्रमांकाच्या रांगेत नुसता राजासमोर ठेवल्यानेही आपण चेकमेट होऊ शकतो.पण वाटेत आपला हत्ती असतो ना !हॅ हॅ हॅ... हत्ती किंवा वजीर
माझ्या बुद्धीचे बळ
अजुन एक
थोडी चूक आहे.
राजाचे संरक्षण.
कॅसल म्हणजे 'किल्ला'.>> आणि
हो बरोबर.
कॅसलिंग.
मस्तच
अशीच एक टर्म "ड्यूस" त्याचा
ते टेनिस मध्ये
लई भारी की हो इजूभाऊ
मस्त लेख हो इजुभौ!
अगदी हाच अनुभव मी "एन पेसांट" नियमाबाबत घेतला
प्रधानताई आणि शशीचा डाव तरी
का बरं?
बारीकसा घोळ.
बरोबर ते ६१ ऐवजी १६ असे हवे
अवांतर काही शंका:
वेगळे नियम होते का, आणि असल्यास ते कधी बदलले, ते माहीत नाही
कण्फर्मेषणसाठी बहुत धन्यवाद!
क्यॅसलिंग
****
कासलिंग, कॅसलिंग नव्हे
होय हो तेच ते
कॅसलिंग
वजीर जोवंत असेल तर?
नो प्रोब्लेमो
लेख आवडला.