णमस्कार लोक्स,
सध्या आपल्या 'अन्न हे पूर्णब्रम्ह' ह्या दालनात चालणार्या राजस्थानी पाकॄ विषेश मधे हा माझा खारीचा वाटा.
घीवर हा एक पारंपारीक राजस्थानी गोड पदार्थ आहे जो खास करुन लग्नात / सणासुदिला करतात. मी स्वःत अजुन घीवर प्रत्यक्षात कधी खाल्ले नव्हते पण जालावर रेसीपी पाहिल्यावर खायची तीव्र ईच्छा झाली त्यामुळे थोडेच का होईना पण करुन पाहिले.
तसे हे घीवर नुसते खायलाहि छान क्रिस्पी लागतात पण पारंपारीक पद्धतीत त्यावर प्लेन रबडि + ड्राय फ्रुट्स घालुन सर्व करतात. सानिकेने दिलेल्या ह्या पाकॄ प्रमाणे मी प्लेन रबडि बनवुन घेतली आणि फक्त एक छोटि अॅडिशन केली ती अशी अजुन आंब्याचा मौसम असल्यामुळे थंड रबडित ताजा मँगो पल्प अॅड केला.....झाली तयार मँगो रबडि.....अरे हाय काय नाय काय!
नुसते घीवरः
मँगो रबडि:
आणि फायनली घीवर विथ मँगो रबडि:
साहित्यः
१. मैदा - ५ मोठे चमचे
२. तुप - २.५ चमचे
३. तळण्यासाठि तेल किंवा तुप
४. खायचा आवडता रंग (एच्छिक)
५. साखर (पाकापुरती)
६. थंड दुध आणि पाणी - आवश्यकतेनुसार
७. सजावटि साठि ड्राय फ्रुट्स / सुका मेवा / चांदिचा वर्ख ई.
कॄती:
१. साखरेचा पाक करुन घ्यावा (अगदि घट्ट नको. गुलाबजामचा असतो त्या प्रमाणे)
२. मंद आचेवर एका कढईत/भांडयात तेल तापत ठेवावे. भांडयाचा आकार घीवर काय साईज मधे हवे आहेत त्या नुसार ठरवावे. कारण भांडे/कढई जेवढि पसरट तेवढं घिवर पसरट/पातळ लेयरच होतं. ह्या शिवाय भांडे/कढई खोलगट घ्या जेणेकरुन मिश्रण गरम तेलात घातल्यावर अंगावर उडणार नाहि.
३. आता एका भांड्यात मैदा आणि तुप एकत्र करुन हळुवार फेटा. आता खायचा रंग आणि आवश्यकतेनुसार दुध/पाणी घालुन हळुवार फेटत रहा. मिश्रणात एकहि गुठळि राहता कामा नये तसेच मिश्रण एकदम घट्ट अथवा खुप पातळ नको. साधारण फ्लोईंग कन्सीस्टन्सीचं हव म्हणजे डावेने/भांडयाने ते सोडल्यावर त्याची संततधार पडली पाहिजे. हे मिश्रण जेवढं जास्त फेटाल तेव्हढे घिवर हलके, जाळिदार आणि क्रिस्पी होतात.
४. आता खरं कसरितचं काम आहे.....पण घाबरु नका. जर मला जमलय तर तुम्हाला नक्किच जमेल हा आत्मविश्वास ठेवा :D
५. आता हे मिश्रण थोडया अंतरावरुन (तुमचा भांड धरलेला हात हा तुमच्या डोळ्याच्या रेषेत येईल ह्या अंतराने नाहितर मिश्रण घातल्यावर गरम तेलाच्या वाफेने हात पोळेल) संततधारेने गरम तेलाच्या बरोबर मधोमध सोडा. मिश्रण घातल्यावर लगेच ते तळाशी जाउन त्याचे छोटे छोटे भाग होतील व ते अलगद तरंगुन वर येऊन भांड्याच्या कडेने जमा होतील. धिवर जेवढा जाड हवा असेल त्या प्रमाणात भांडयाने/डावेने मिश्रण घाला पण दोन मिश्रणांमधे एक २-३ मिनटाचा गॅप ठेवा जेणेकरुन पहिल्या डावेने घातलेलं मिश्रण सेट होईल
६. घीवरच्या मधोमध जागा नसेल तर निमुळतं उलथणं घालुन जागा करा (डोनट असतात त्या प्रमाणे)
७. मंद आचेवर हलका ब्राऊन रंग येईस्तो घीवर तळुन घ्या. घीवर तयार झाल्यावर कडेने आपोआप सुटेल
८. तयार घीवर एका ताटलीत काढुन घ्या व ताटली थोडि तिरकि करा जेणेकरुन अतिरिक्त तेल/तुप खाली जमा होईल किंवा टिश्यु पेपेरवर काढा म्हणजे अतिरिक्त तेल/तुप शोषलं जाईल
९. घीवर पुर्ण थंड झाले कि वरुन साखरेचा पाक हलके शींपडा. ताटली परत थोडि तिरकि करा म्हणजे अतिरिक्त पाक निथळुन जाईल. साखरेचा पाक ह्या प्रमाणात शींपडा कि शेवटि रबडि घातल्यावर अती गोड होणार नाहि
१०. आता हे लगेच खाउ शकता किंवा एका हवाबंद डब्यात भरुन नंतर वापरु शकता
११. वरील घीवर थोडेच नमुन्यादाखल केल्यामुळे मी त्यावर मँगो रबडि + ड्राय फ्रुट्स घालुन फस्त केले :D

वाचने
21488
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम..... सुरेख........
मार डाला!!!!!
तुफान!
+१
In reply to तुफान! by पैसा
वाव.............. अप्रतिम
सलाम कुबुल करो...
जब्रा.
Great!
मस्त
अरेच्चा
रब डी ने, बढा दी गोडी ।
+१
In reply to रब डी ने, बढा दी गोडी । by अत्रुप्त आत्मा
वॉव
काय खतरनाक दिसतोय हा पदार्थ.
ऑस्सम!!!!
कुवेत चा व्हिसा मिळण्यासाठी
ओ....हो
आत्ताच्या आत्ता हवेत मला घिवर
धन्यवाद लोक्स
हुश्श....
मस्त रेसीपी आणि फोटोज :)
वा
तोंपासु!!
धागा क्र २५००० आणि
मस्त..
म्हणलं वीकांताला करुन पहावा..
अप्रतिम!
दृष्ट्वैव सर्वानपि
. अप्रतिम
़खल्लास!!!
तुमच्या रेसिपीचे फोटो लैच
ह्या स्नेहातैशी बाडिस!!
In reply to तुमच्या रेसिपीचे फोटो लैच by सस्नेह
किस्न्या...
In reply to ह्या स्नेहातैशी बाडिस!! by किसन शिंदे
व्हाट इज धीवर? आय थिंक इट्स अ
मस्त रेसिपी आणि फोटो.
एकदम मस्त रेसिपी .
अगदी अप्रतिम! दिपक, तुप
हो दीपा
Mast!!
Mast!!
भारीच हो दिकपराव.
अहाहा..! घीवर म्हणजे नुसते
-^-
धन्यवाद मंडळी
एकदम खतरा फोटू यार....... तू
घिवर
सुंदरच दिसतायत घीवर. अप्रतिम
http://www.misalpav.com/sites