Skip to main content

राजस्थानी घीवर विथ मँगो रबडि

लेखक दिपक.कुवेत यांनी शनिवार, 15/06/2013 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार लोक्स, सध्या आपल्या 'अन्न हे पूर्णब्रम्ह' ह्या दालनात चालणार्‍या राजस्थानी पाकॄ विषेश मधे हा माझा खारीचा वाटा. घीवर हा एक पारंपारीक राजस्थानी गोड पदार्थ आहे जो खास करुन लग्नात / सणासुदिला करतात. मी स्वःत अजुन घीवर प्रत्यक्षात कधी खाल्ले नव्हते पण जालावर रेसीपी पाहिल्यावर खायची तीव्र ईच्छा झाली त्यामुळे थोडेच का होईना पण करुन पाहिले. तसे हे घीवर नुसते खायलाहि छान क्रिस्पी लागतात पण पारंपारीक पद्धतीत त्यावर प्लेन रबडि + ड्राय फ्रुट्स घालुन सर्व करतात. सानिकेने दिलेल्या ह्या पाकॄ प्रमाणे मी प्लेन रबडि बनवुन घेतली आणि फक्त एक छोटि अ‍ॅडिशन केली ती अशी अजुन आंब्याचा मौसम असल्यामुळे थंड रबडित ताजा मँगो पल्प अ‍ॅड केला.....झाली तयार मँगो रबडि.....अरे हाय काय नाय काय! नुसते घीवरः Ghevar मँगो रबडि: Mango Rabdi आणि फायनली घीवर विथ मँगो रबडि: Ghevar with Mango Rabdi साहित्यः १. मैदा - ५ मोठे चमचे २. तुप - २.५ चमचे ३. तळण्यासाठि तेल किंवा तुप ४. खायचा आवडता रंग (एच्छिक) ५. साखर (पाकापुरती) ६. थंड दुध आणि पाणी - आवश्यकतेनुसार ७. सजावटि साठि ड्राय फ्रुट्स / सुका मेवा / चांदिचा वर्ख ई. कॄती: १. साखरेचा पाक करुन घ्यावा (अगदि घट्ट नको. गुलाबजामचा असतो त्या प्रमाणे) २. मंद आचेवर एका कढईत/भांडयात तेल तापत ठेवावे. भांडयाचा आकार घीवर काय साईज मधे हवे आहेत त्या नुसार ठरवावे. कारण भांडे/कढई जेवढि पसरट तेवढं घिवर पसरट/पातळ लेयरच होतं. ह्या शिवाय भांडे/कढई खोलगट घ्या जेणेकरुन मिश्रण गरम तेलात घातल्यावर अंगावर उडणार नाहि. ३. आता एका भांड्यात मैदा आणि तुप एकत्र करुन हळुवार फेटा. आता खायचा रंग आणि आवश्यकतेनुसार दुध/पाणी घालुन हळुवार फेटत रहा. मिश्रणात एकहि गुठळि राहता कामा नये तसेच मिश्रण एकदम घट्ट अथवा खुप पातळ नको. साधारण फ्लोईंग कन्सीस्टन्सीचं हव म्हणजे डावेने/भांडयाने ते सोडल्यावर त्याची संततधार पडली पाहिजे. हे मिश्रण जेवढं जास्त फेटाल तेव्हढे घिवर हलके, जाळिदार आणि क्रिस्पी होतात. ४. आता खरं कसरितचं काम आहे.....पण घाबरु नका. जर मला जमलय तर तुम्हाला नक्किच जमेल हा आत्मविश्वास ठेवा :D ५. आता हे मिश्रण थोडया अंतरावरुन (तुमचा भांड धरलेला हात हा तुमच्या डोळ्याच्या रेषेत येईल ह्या अंतराने नाहितर मिश्रण घातल्यावर गरम तेलाच्या वाफेने हात पोळेल) संततधारेने गरम तेलाच्या बरोबर मधोमध सोडा. मिश्रण घातल्यावर लगेच ते तळाशी जाउन त्याचे छोटे छोटे भाग होतील व ते अलगद तरंगुन वर येऊन भांड्याच्या कडेने जमा होतील. धिवर जेवढा जाड हवा असेल त्या प्रमाणात भांडयाने/डावेने मिश्रण घाला पण दोन मिश्रणांमधे एक २-३ मिनटाचा गॅप ठेवा जेणेकरुन पहिल्या डावेने घातलेलं मिश्रण सेट होईल ६. घीवरच्या मधोमध जागा नसेल तर निमुळतं उलथणं घालुन जागा करा (डोनट असतात त्या प्रमाणे) ७. मंद आचेवर हलका ब्राऊन रंग येईस्तो घीवर तळुन घ्या. घीवर तयार झाल्यावर कडेने आपोआप सुटेल ८. तयार घीवर एका ताटलीत काढुन घ्या व ताटली थोडि तिरकि करा जेणेकरुन अतिरिक्त तेल/तुप खाली जमा होईल किंवा टिश्यु पेपेरवर काढा म्हणजे अतिरिक्त तेल/तुप शोषलं जाईल ९. घीवर पुर्ण थंड झाले कि वरुन साखरेचा पाक हलके शींपडा. ताटली परत थोडि तिरकि करा म्हणजे अतिरिक्त पाक निथळुन जाईल. साखरेचा पाक ह्या प्रमाणात शींपडा कि शेवटि रबडि घातल्यावर अती गोड होणार नाहि १०. आता हे लगेच खाउ शकता किंवा एका हवाबंद डब्यात भरुन नंतर वापरु शकता ११. वरील घीवर थोडेच नमुन्यादाखल केल्यामुळे मी त्यावर मँगो रबडि + ड्राय फ्रुट्स घालुन फस्त केले :D

वाचने 21488
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

काय फोटू आहेत ते ... गोड म्हणजे जीव कि प्राण !!!! त्यात असला खतरनाक कोम्बो म्हणजे लिट्रली वारलो !!! इकडे आला कि किडन्याप झालासच.

काय भन्नाट पाकृ आणि फोटो आहेत! शिवाय हा मिपाचा धागा क्र. २५०००. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि इतकी सुंदर पाकृ देणार्‍या दिपकला धन्यवाद!

In reply to by पैसा

+१

लैच जीवघेणा फोटो आला राव. -दिलीप बिरुटे

Great!

नुसता घीवर सुद्धा खायला छानच लागतो... त्याबर रबडी - ती सुद्धा आंबा घालून-- अहाहा... कल्पनेनेच तोंपासू .

फोटो जीवघेणे आहेत, हे वर सगळ्यांनी म्हटलय.. तरी मला पण तसंच वाटलं हे वरच्या प्रतिसादात लिहायच राहिलच की..

जबर्दस्त. बादवे : सध्या टारझणचे धागे वाचत आहात काय ?

जबरदस्त रबडी व घेवर दोन्ही ही :)

ओ दिपकजी.....वन रिक्वेश्ट..... तुमच्या रेसिपीज खूप छानच असतात पण प्राब्लेम हा आहे की आमच्या सारख्या नवशिक्याना जरा समजून घ्याल का त्या सनिकाताईं सारख एक एक स्टेप दाखवाल का प्लीज.....................

स्मिता: स्टेप बाय स्टेप फोटोसकट पाकॄ दाखवायचा प्रयत्न केला जाईल अपर्णा: होय तूप मैद्याच्या निम्मे घायचे :)

झाली बाबा एकदाची कमेंट पोस्ट :D

एकदम अप्रतिम. मी हा प्रकार कधी पाहीला किंवा खाला नाही, पण आता करावेच लागेल :-)

धागा क्र २५००० आणि 'आंबेरबडीतलेघिवर' फोटोसकट २५०००+ .रबडीतला मोतिचूर ,मलाई बर्फि खाल्ली आहे छान लागते .हे पण झकास असणार .देवा मला पाव बटर नको रबडी घिवर हवे .लंडन नको कुवेत चालेल .

झक्कास..

म्हणलं वीकांताला करुन पहावा.. म्हणुन या वेळेस फक्त फोटो पाहुन बंद न करता पा.क्रु वाचली सुद्धा.. अर्ध्यातच नैराश्य आले... तुम्हाला दंडवत घालुन ही मी निघाले हिमालयात...

दृष्ट्वैव सर्वानपि मिष्टघीवरान् ; स्वर्गीयमेतं रबडीद्रवं च | लालाप्रवाहा: हि मुखे स्रवन्ति जिह्वाऽपि उत्तेजिता सा अकस्मात् || स्वर्गो स्यात् यदि लोकेऽस्मिन् अत्रैव स्यान्न संशयः | जीवनार्थे नास्ति खाद्यं खाद्यार्थे जीवनं खलु ||

खूप मस्त रेसिपी.. फोटो तर जबरी आहेत.

एकदम मस्त रेसिपी . मी... शेफ कुणाल कपूरने दाखवलेलि "ट्रोपिकल फ्रुट घिवर " हि रेसिपी केली होती. मुलिच्या वाढ दिवसाला . तीन लेअरच्या केक सारखे केले होते. पण त्याचा फोटो नाहि काढला त्यामुळे येथे टाकता नाहि येणार..मस्त लागतो हा प्रकार .क्रिम त्यावर फळान्चा थर आणि घिवर.

साजूक तुप घ्यायचं. खुप छान लागतात हे घिवर विथ रबडि....एकदा नक्कि करुन बघ!

Jabardast

Jabardast

अहाहा..! घीवर म्हणजे नुसते 'घी वर'च नाही तर वर, खाली, आजूबाजूला भरून आहे. घीवर ब्येष्टं त्यानंतर मँगो रबडी अत्युत्तम आणि शेवटी कहर म्हणजे घीवर वुईथ मँगो रबडी म्हणजे पार देहान्त शासनच.

जबरी

ए अरे दीपक ...अस नुस्त पाहुन नाही चालणार .......क्लास काढ आम्ही येतो सगळ्या जणी ....भारी आहे तु ...