Skip to main content

मोदींच्या स्तुतीची किंमत?

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 10/11/2013 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
भारतरत्न लता मंगेशकरांनी मोदींचे जाहीर कौतुक केले आणि त्यांनी पंतप्रधान व्हावे अशी सगळ्यांची इच्छा असल्याचे वक्तव्य केल्यापासून सरकारी वक्रदृष्टी त्यांच्याकडे वळली आहे की काय असे वाटते. ही बातमी पहा http://maharashtratimes.indiatimes.com/nation/VIPs-named-kin-for-Padma-… पद्म पुरस्कारासाठी लताबाईंनी उषा मंगेशकराच्या नावाकरता वशिला लावल्याचा आरोप आहे. आता ह्या पुरस्काराकरता लोक आपले वजन वापरतात हे एक उघड गुपित आहे. नाहीतर सैफ अली खान ह्याला पद्मश्री मिळण्याचे काय कारण? आणि कोणी किती वजन वापरले तरी निर्णय सरकारचाच असतो ना? अचानक लताबाईंवर असले किटाळ यावे हा योगायोग वाटत नाही.

वाचने 16603
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

जर सैफ अली खान ला पद्मश्री मिळते तर सौ उषा मंगेशकराना मिळायला काहीच हरकत नाही. त्यांचा गाण्यांनी मराठीला कितीतरी समृद्ध केले आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. अन्यथा पद्मश्री मिळण्यासाठी तीन खासदारांची शिफारस लागते आणि अशी शिफारस मिळवून पद्मश्री मिळवलेले डॉक्टर माझ्या पाहण्यात आहेत.

In reply to by सुबोध खरे

माझ्या माहितीप्रमाणे उषा मंगेशकर ह्या अविवाहित आहेत. त्यांना सौ कशाला? उषा मंगेशकरांनीही काही उत्तम अजरामर गाणी गायलेली आहेत. पिंजरा सिनेमातील लावण्या एक उदाहरण. लता वा आशा ह्यांच्यासमवेत गायलेली काही गाणीही अविस्मरणीय आहेत. मला वाटते त्यांना पद्मश्री मिळायला काही हरकत नाही.

In reply to by हुप्प्या

धागाकर्त्याला असे म्हणायचेय का कि लता दीदींच्या मागे मोदी नामक एक बलवान ग्रह लागला असून जे काही किटाळ आलेय ते ह्या मोदी नामक ग्रहा मुळेच आलेय? असे असेल तर चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्या सारखे होईल

बाकीचें हि आहेत ज्याच्यावर स्वत:च्या मित्रांची अथवा नातेवाईकांची पद्मपुरस्कारांसाठी शिफारस केल्याचा आरोप आहे . हि माहिती RTI ACT मुळे बाहेर आली आहे .

नावे आहेत . लताबाईंनी उषा , सुरेश वाडकर , राजमल पारेख यांची शिफारस केली आहे . सरोजवादक उस्ताद अमजद अली खान यांनी 6 जणांची शिफारस केली आहे ज्यात त्यांचे दोन मुलांचे नाव आहे .

ते काहिही असो. पण पुरस्कारांसाठी स्वतःच्या नातेवाईकांची शिफारस करणे अयोग्यच आहे. मग ते लताबाईंनी केलेली असली तरीही

In reply to by मृत्युन्जय

असहमत. म्हणजे कसे आहे कदाचित बाप से बेटा सवाई असेल आणि बापच सर्वेसर्वा असेल तर सवाई बेट्याला पुढे आणल्याबद्दल घराणेशाहीचा आरोप त्या बापावर होणारच. त्या न्यायाने लताबाई उत्तम गायिका होत्या, सध्या खासदार आहेत (आहेत ना?), उषाबाई देखील उत्तम गातात मग शिफारस केली तर नातेवाईकाची शिफारस केली हा न्याय लावणे चूक वाटते. मग उर्मिला धनगरचे शिफारसपत्र द्यायला हवे होते का? नक्कीच नाही. ते ही देता येईल पण काही वर्षानी उर्मिलाचे कर्तृत्व सिद्ध झाले की मगच. आणि लताबाईंनी अन्यही अनेक शिफारसी केल्या आहेतच की. असो.

तेच म्हणतो हे काय मोदिस्तुतीमुळे नाहि घडल . उगीच काहि लोक लताबाईबद्दल सहानुभुती दाखवत आहेत .

उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश मंगेशकर हे दोन्ही बांडगुळे आहेत केवळ लता मंगेशकर मुळे अवास्तव महत्व प्राप्त झालेले आहे . बाकी राष्ट्रीय पुरस्कारांबद्दल (खुद्द भारतरत्न ) म्हणाल तर पिपाणी वाजवणाऱ्या व मिसाईल उडवणाऱ्या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना मिळतो . बाकी राष्ट्रीय पुरस्कार हे फक्त आणि फक्त तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकानंच द्यावे असे ठाम मत आहे . पेटी वाजवून , तंबोऱ्याच्या तारा खाजवून, शंभर शतके ठोकून किंवा गाणी म्हणून थोडीच देशाचे भले होणार आहे ?

In reply to by चेतनकुलकर्णी_85

बाकी राष्ट्रीय पुरस्कारांबद्दल .......... पेटी वाजवून , तंबोऱ्याच्या तारा खाजवून, शंभर शतके ठोकून किंवा गाणी म्हणून थोडीच देशाचे भले होणार आहे ?
हे अगदीच अत्यंतीक बोलणं नाही वाटत का?

In reply to by चेतनकुलकर्णी_85

बॅट फिरवणार्याने आजपर्यंत एकहि छदाम समाजसेवेसाठी दिलेला नाही, उलट कस्टम ड्युटी माफ करा ,एफेसाय वाढवुन द्या वगैरे मागण्या करुन देशाचेच उत्पन बुडवतो... त्याला कशाला द्यायचा भारतरत्न???....यांना नवरत्न तेलाची बाटलीही फूकटात देऊ नका..

In reply to by ग्रेटथिन्कर

हे विधान उपरोध होता अशी आशा आहे. स्मायल्या टाका हो. नाहितर काही विधाने खुप हास्यास्पद वाटतात. यनावाला व्हायचा तुमचा

In reply to by ग्रेटथिन्कर

बाकी कै असो पण सचिनला भारतरत्न देणे म्हणजे मूर्खपणा आहे असे माझेही मत आहे. जर सचिनला द्यायचे तर विश्वनाथन आनंदला का नै द्यायचे? आपल्या हॉकीवीरांना का नै द्यायचे? क्रिकेट हा एकच खेळ मानला जाणार्‍या देशात सचिन मूळचा मोठा असला तरी जास्तच मोठा मानला गेलाय.

In reply to by ग्रेटथिन्कर

मी सचिनला बोललोय ह्या दिवाळीभेटीत, की बाबारे यापुढे समाजकार्यासाठी कुठे काही छदाम खर्च केलास ना की श्री श्री ग्रेट्थिंकरसाई यांना आधी कळव बरं. हे म्हंजे असं झाल मी जपान बघितला नाही म्हणजे जपान देशच नाही या भुतलवर.

In reply to by इरसाल

त्यानी छदाम खर्च केले आणि २४ वर्षांमध्ये मिडीयाला याची एकहि बातमी मिळू नये?.... एफेसायची बातमी मिळते ,पण याच्या छदामाची मिळत नाही ,बहुदा तो जपानमध्ये समाजकार्य करत असावा....

In reply to by ग्रेटथिन्कर

तुम्हाला एवढ्या वर्षात एकही बातमी दिसली नसेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. सचिनचा नाही. शिवाय सचिन त्याच्या समाजकार्याचा गवगवा करत नाही हा त्याचा मोठेपणा. जरा गुगलुन पाहिलेत तर ढीगभर लिंका मिळतील. बोलण्याआधी आधी थोडातरी अभ्यास करत जा की. उगाच उचलली जीभ की लावली टाळ्याला.

In reply to by मृत्युन्जय

येस! सचिन अजिबात गवगवा करत नाही. मुंबईत असाल तर जरा अनाथाश्रम आणि अश्याच संस्थांना भेट देउन या. मी होते तोवर तरी शाळेच्या बॅग्स, अन वह्या पुस्तक सचिन कडुन मिळालेली ऐकली आहेत. बाकी सुद्धा बरेच काही करत असेल् पण क्रिकेटमध्ये एव्हढी प्रसिद्धी मिळत असताना बाकी कोणत्याही प्रसिद्धीची हाव दिसत नाही सचिन मधे. जाऊ दे संस्कार असतात ते. त्यांना नाही उमगायचे.

In reply to by मृत्युन्जय

शिवाय सचिन त्याच्या समाजकार्याचा गवगवा करत नाही हा त्याचा मोठेपणा. परंतु गेले काही दिवस ह्या क्रिकेट मधील देवाचा इतका अनावश्यक गव गवा नव्हे दाजीपुर च्या जंगलातील गवा रेडा झाला आहे ! अशी काही वातावरण निर्मिती झालीय कि जणू काही २ ० ० वी टेस्ट खेळल्यावर वानखेडे वर वैकुंठातून विमानच सचिन ला घ्यायला येणार आहे .

In reply to by चेतनकुलकर्णी_85

@अशी काही वातावरण निर्मिती झालीय कि जणू काही २ ० ० वी टेस्ट खेळल्यावर वानखेडे वर वैकुंठातून विमानच सचिन ला घ्यायला येणार आहे.>>> तो प्र सार माध्यमांचा अचरटपणा आहे. त्यात तेंडल्याचा काय दोष???

In reply to by चेतनकुलकर्णी_85

पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे नावही नीट आठवत नसणार्‍या लोकांना त्यांच्याबद्दल इतकी गरळ ओकताना पाहिले नव्हते. सरकारच्या सुदैवाने हृदयनाथ मंगेशकरांना पद्मश्री पूर्वीच मिळालेली आहे. लताबाई आणि आशाबाई अशांसारख्या कसलेल्या गायिकांच्या आवाजाचे सोने होईल अशा अनेक महान रचना ह्या संगीतकाराने रचलेल्या आहेत. एक विचारी, बुद्धीमान, अभ्यासू व्यक्तिमत्व असेच आजवर मी ह्या कलाकाराला मानतो. अशा स्वयंभू कलाकाराला बांडगूळ म्हणून लेखकाने आपली पातळी सोडली आहे असे वाटते. साहित्य संगीत कला विहीना साक्षात पशु पुच्छ विषाणहीना असे (बहुधा) भर्तृहरी म्हणून गेला आहे त्याची आठवण झाली. साहित्य, संगीत, कला ह्यापैकी कशातही गती नसणारे शेपूट व शिंग नसणारे पशुच आहेत. असे पशु गवत खात नाहीत हे पशुंचे भाग्यच म्हणायचे! वरील संगीतावरील हिणकस शेरेबाजी वाचून हा श्लोक आठवला, नव्हे त्याची प्रचिती आली.

In reply to by हुप्प्या

साहित्य, संगीत, कला ह्यापैकी कशातही गती नसणारे शेपूट व शिंग नसणारे पशुच आहेत. जर एखादी व्यक्ती एका कलाकालावर टीका करत असेल तर त्या व्यक्तीला कला साहित्य इत्यादी क्षेत्रा मधील अजिबात माहिती नसते हे तुमचे अजब गजब तर्कट शास्त्र ऐकून अंमळ मजा आली !

In reply to by चेतनकुलकर्णी_85

उषा मंगेशकरांना बांडगुळ म्हणन अतिशय चुकीचे आहे. खरतर अतिशय सुरेल गातात त्या. अन हृदयनाथांबदल काय सांगाव? एकच चाल जी त्यांनी बांधली आहे ती देते. माझ्या मते तरी या चालीसारखी चाल नाही इतर कोणत्याही गाण्याला. आणि हो! मला कलेच्या क्षेत्रात राजकारण करणार्‍या लोकांचा अतिशय तिरस्कार आहे, तरीही कला ही कलाच अन तीची दाद दिली पाहिजेच. तुम्ही ज्याला तारा खाजवुन म्हणता ती खाजवण्याची क्षमता यायला अख्खी जिंदगी खर्ची पडते.

In reply to by स्पंदना

'गाढवाला गुळाची चव काय' अशी एक मराठीतली म्हण आठवली. दुसरी गाढवाबद्दलचीच म्हण म्हणजे 'गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता'. छान म्हणी आहेत मराठीत. आपातै तुला आणखी कुठली म्हण माहिती आहे? :)

In reply to by प्यारे१

हो तर भरपूर म्हणी आहेत जश्या गाढवावर आहेत तश्या अयातोबांवर देखील आहेत "आयजीच्या जीवावर बायजी" किंवा "आयत्या बिळात नागोबा" इत्यादी इत्यादी मराठी खूपच समृध्द आहे !

In reply to by चेतनकुलकर्णी_85

म्हणी राहू देत, पण पु.लं. च्या "रावसाहेब" मधल एक वाक्य आठवल, "त्यांच्यासारखी एक तान घेउन दाव रे! मुळव्याध होते का नाही बघ तुला" अस काहीस वाक्य आहे ते. ती परवा अतिवास ताईंची आंजी बोलली होती शतशब्दकथेत "काहीही म्हनल तरी चालत, फक्त हळु म्हनायच" तस जे काही अस उगा उचलली जीभ असेल ते मनातच बोलत जा. पब्लिकमध्ये बसुन काहीही बोलता येत म्हणुन फारच बेताल बोलु नये.

In reply to by स्पंदना

मला पण पु . ल . च्याच "असा मी …" मधील एक वाक्य आठवले …. " सतार काय आणि तंबोरा काय तुम्ही शेवटी ताराच खाजवता ना ?"

In reply to by चेतनकुलकर्णी_85

चेतन कुलकर्णी आगे बढो! एकच फाईट वातावरण टाईट. चेतनचा नाही करायचा नाद, बाकीच्यांना घालू दे वाद. बाकी आपल्या उदात्त विचारांनी आम्ही सद्गदित झालो आहोत. असो. जमल्यास... मोठे व्हा.

In reply to by चेतनकुलकर्णी_85

पेटी वाजवून , तंबोऱ्याच्या तारा खाजवून, शंभर शतके ठोकून किंवा गाणी म्हणून थोडीच देशाचे भले होणार आहे ? मिसळपावावर जास्तीत जास्त उंडगे प्रतिसाद देणार्‍यालाही पद्मश्री मिळायला हवी. कारण हीही एक कलाच आहे. :)

In reply to by लॉरी टांगटूंगकर

अहो रूपमहो ध्वनि:

In reply to by चेतनकुलकर्णी_85

उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश मंगेशकर हे दोन्ही बांडगुळे आहेत केवळ लता मंगेशकर मुळे अवास्तव महत्व प्राप्त झालेले आहे .
एकदम सहमत.. आणि ह्या बांडगुळांची गाणी इथे सापडतील.. http://www.aathavanitli-gani.com/Sangeetkar/Hridaynath_Mangeshkar http://www.aathavanitli-gani.com/Swar/Usha_Mangeshkar पण लिस्ट बघायला गेलात आणि बांडगुळांची म्हणुन ऐकायची नाही असं ठरवलत तर पंचाईतच होईल हो तुमची.. म्हणजे बघा काय काय ऐकता येणार नाहीये तुम्हाला.. असा बेभान हा वारा पासुन ते इंद्र जिभी जंभ पर.. मग कशी काळ नागिणी ते वार्‍याने हलते रान.. परत गझला म्हणाल तर केव्हा तरी पहाटे ते मालवुन टाक दीप.. (अरेरे.. अचानक खुपच सहानभुती वाटली हो तुमच्या बद्दल) अभंग म्हणाल तर ओम नमोजी पासुन ते रुणुझुणु पर्यंत्..(अगं आई ग.. नशिबाचे भोग) आणि हो ते काय बाई सांगु पासुन लाजरा न साजरा मुखडा वगरे बरीच गाणी येतील हं लिस्ट मध्ये.. पण शेवटी बांडगुळच ती.. त्यांच्या गळ्यात सुर असले म्हणुन काय झालं? त्यांची गाणी वेड लावणारी असली म्हणुन काय झालं? त्यांनी केलेली गाणी गुण्गुणताही येणार नाहीत इतकी अवघड असली म्हणुन काय झालं?? ती दोघे एका मोठ्या गायिकेची भावंडे आहेत ना.. संपला विषय..

पद्म पुरस्कारासाठी लताबाईंनी उषा मंगेशकराच्या नावाकरता वशिला लावल्याचा आरोप आहे. कुणी पुरस्कार दिल्याने मंगेशकर भावंडे मोठी झालेली नाहीत. पुरस्कार देऊन उपकार केल्याची भावना ठेवणार्‍यांनी आपली लायकी दाखवून देवू नये.

In reply to by आशु जोग

पुरस्कार देणारे सगळेच आपण उपकार केल्यागत वागतात... पुलं देशपाडेंचं लोकशाही - ठोकशाही प्रकरण आठवतं का?

ह्रीशिकेश नव्हे हृदयनाथ (नशीब कानिटकर नाही म्हटले) एखाद्या कलाकाराबद्दल बद्दल काही माहिती नसेल तर निदान गप्प राहणे हा पहिला आणि ते वयाने मोठे असतील तर आदर देणे हा दुसरा नियम पाळावा. ह्या दोन दिग्गजांनी जे सुमधुर संगीत कण आपल्याला दिले आहे त्याच्याबद्दल काहीच वाद नसावा.

In reply to by सुहासदवन

अनावधानाने झालेल्या चुकी दुरुस्ती बद्दल धन्यवाद ! ओके तुम्ही तुमच्या चष्म्यातून बघा मी माझ्या ! तरीही हे गृहस्थ पंढरपूर प्यासेंजर मध्येही गाणे म्हणायच्या लायकीचे नाहीत अश्या पुरस्कारांनी असल्या "हव्वा " बनवलेल्या लोकांचे महत्व तर वाढतच नाही पण त्या पुरस्काराचे मात्र घटते .

In reply to by चेतनकुलकर्णी_85

हे गृहस्थ पंढरपूर प्यासेंजर मध्येही गाणे म्हणायच्या लायकीचे नाही
मध्यानीच्या सूर्यावर थुंकणार्‍या माणसाच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर जे वाटते तसेच काहीसे ही प्रतिक्रीया वाचल्यावर वाटले

In reply to by चेतनकुलकर्णी_85

उषा मंगेशकर आणि ह्रीशिकेश मंगेशकर हे दोन्ही बांडगुळे आहेत केवळ लता मंगेशकर मुळे अवास्तव महत्व प्राप्त झालेले आहे . तरीही हे गृहस्थ पंढरपूर प्यासेंजर मध्येही गाणे म्हणायच्या लायकीचे नाहीत यात काहितरी वेगळा छुपा अविर्भाव स्पष्ट दिसतोय. कदाचित काही वैयक्तीक कारण असू शकते. नाहीतर या दोन अत्यंत गुणी कलाकारांचे संगीत ऐकलेल्या, अगदी फक्त कानसेन असलेल्या माणसालासुद्धा, इतक्या खालच्या पातळीवर येवून मिपासारख्या खुल्या मंचावर असे काही म्हणवले नसते. अवांतरः मी तर या त्यांच्या गुणांच्या मानाने फार कमी प्रसिद्धी मिळालेल्या दोघांही कलाकारांचा चाहता आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यात काहितरी वेगळा छुपा अविर्भाव स्पष्ट दिसतोय. कदाचित काही वैयक्तीक कारण असू शकते =)) सुतावरून(चुकीचा ) स्वर्ग गाठता तुम्ही बुवा !

In reply to by चेतनकुलकर्णी_85

केवळ सूत नाही हो... या द्वयिंचे संगीत ऐकलेत तर योग्य मार्गाने नेणारा मोठ्ठा दोरखंड सापडेल. मी कोणी संगीतज्ञ नाही, पण त्यांच्या संगितातले भले बुरे समजण्याएवढे कान पुरे आहेत इतके नक्की. शिवाय तुम्ही तुमचा निषेध दर्शवायला जे शब्द वापरलेले आहेत ते परत वाचलेत तर तुम्हाला दोरखंडही दिसेल.

In reply to by चेतनकुलकर्णी_85

चेतन कुलकर्णी अहो ठीक आहे तुम्हाला नाही आवडत या दोघांची गाणी ( आता असतात काही माणसे कर्मदळीद्री त्याला कोण काय करेल ) पण म्हणून इतक्या खालच्या पातळीला येऊन बोलायचे ? अहो ते हृदयनाथ मंगेशकर तुमच्या आमच्या आजोबांच्या वयाचे असतील किमान तेव्हढा तरी आदर दाखवा. तुमच्या सारख्या आत्ताच्या पिढीच्या(?) शिकलेल्या माणसांकडून अशा प्रकारची वक्तव्ये खूप वेदना देणारी वाटतात हो.

In reply to by गजानन५९

बरोबर.. बाकी काही नाही पण वयाचा आदर व्हायलाच हवा. त्यांना एवढे पुरस्कार मिळालेत, पंडित अशी पदवी मिळाली आहे. त्यांनी अत्यंत प्रसिद्ध मराठी गाण्यांना चाली लावल्या आहेत.. काही गाणी स्वतः गायली आहेत.. तसेच उषा मंगेशकरांचेही, त्यांची गाण्याची लिस्ट पहा. आणि मग मत बनवा.. उगाच सारेगमप मध्ये परीक्षक म्हणुन आले तेव्हा त्यांच बोलणं आवडलं नाही, दिसायलाच आवडले नाहीत..वागणंच आवडलं नाही.. एखाद्या कार्यक्रमात शिष्ट्च वागले असल्या फडतुस कारणांसाठी जर इतकी टोकाची मत बनवली असतील तर मात्र तुमच्या बुद्धीला सलाम.. मी ग्रस आणि हृदयनाथ मंगेशकरांचा एक कार्यक्रम पाहिला होता. त्यात पंडितजिंचा आवाज काही फार्सा चांगला येते नव्हता, लोकांना ग्रेस ह्यांच बोलणं ऐकण्यात जास्त रस होता, तबलावादक खुप भाव खाऊन गेला वगैरे कारणांमुळे पंडितजी वैतागले होते. ते जाणवत होतं.. पण म्हणुन ते रेल्वे मध्ये गाण्याच्या लायकीचे आहेत असं होत नाही. वय माणसाला बदलतं.. पण म्ह्णुन त्यांची आयुष्यभाराची मेहनत पाण्यात जात नसते. शिवाय एखाद्या बद्दल इतकं वाईट बोलताना आपला त्या क्षेत्रातला अनुभव काय? समज किती? ह्याचा तरी किमान विचार करावा.

In reply to by पिलीयन रायडर

बोलताना आपला त्या क्षेत्रातला अनुभव काय? समज किती? ह्याचा तरी किमान विचार करावा. नाही हो. इथे हा नियम पाळायचा नसतो. ( हा नियम काटेकोर पाळला तर ९० % धागे, ९० % प्रतिसाद बाद धरावे लागतील. ) :)

In reply to by उद्दाम

तरीच!

In reply to by उद्दाम

९० % धागे, ९० % प्रतिसाद बाद धरावे लागतील तुम्ही न्यायमूर्ती काटजू यांच्या पायाचे तीर्थ पिता का? नाही मी फक्त अक्वागार्ड चेच पाणी पितो (तुमच्या संभावित प्रश्नांचे उत्तर !) बाकी राष्ट्रीय पुरस्कारात पण "घराणेशाही " बाळसे धरू लागली कि काय?

हे आपले वैयक्तिक मत आहे याचा मी आदर करतो पण ते सार्वजनिक ठिकाणी व्यक्त केलेच पाहिजे असे नाही असे मला वाटते. त्यांना पंडित हि पदवी भारतरत्न भीमसेन जोशी आणि पंडित जसराज यांच्या हस्ते दिली गेली. हि दोन माणसे दिग्गज आहेत असे महाराष्ट्राची जनता मानते. आणि त्यानी श्री हृदयनाथ मंगेशकर यांना पंडित पदवी देणे हे मान्य केले याचा अर्थ त्यांची(हृदयनाथांची ) काहीतरी लायकी असावी. "निदान पंढरपूर प्यासेंजर मध्ये गाणे" म्हणायच्या लायकीचे असावेत असे मला वाटते. निवडुंग, जैत रे जैत असे चित्रपट किंवा सागर प्राण तळमळला, मोगरा फुलला इ गाण्यांना संगीत देणे हे सर्व सामान्य माणसाचे काम नाही. असो आपले मत आपल्यापाशी.

In reply to by सुबोध खरे

सहमत...
निवडुंग, जैत रे जैत असे चित्रपट किंवा सागर प्राण तळमळला, मोगरा फुलला इ गाण्यांना संगीत देणे हे सर्व सामान्य माणसाचे काम नाही.

In reply to by सुबोध खरे

जाऊ द्या डॉक... संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. त्याचा अर्थ असा की गरज पडल्यास तोडफोड करावी, स्वतःचे कपडे फाडावेत, गाढवासारखे ओरडत गावभर फिरावे, पण काहीही करून प्रसिद्धी मिळवावी. आता ती मिळवण्यासाठी काही जण या धाग्यावर धिंगाणा घालत आहेत.मला मज्जा वाटली, अंतस्थ हेतू कळला की तुम्हालाही वाटेल :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

घटं भिंद्यात् पटं छिंद्यात् कुर्यात् रासभरोहणम् | येनकेनप्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् || शेवटच्या ठिकाणी 'प्रसिद्धा महिला भवेत्" असेही टाकता येईल. वृत्तात तर बसतेच, शिवाय स्त्रीद्वेष्टेपणाचा आरोपही दूर करता येईल =))

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

काहीही करून प्रसिद्धी मिळवावी कंच्या प्रसिद्धी ची गोष्ट करताय तुम्ही?

In reply to by चेतनकुलकर्णी_85

तुम्ही मिपावर मिळवताय ती. एका धाग्यात आणि ५-६ प्रतिसादात तुमचे नाव अर्ध्या मिपाला कळले की नाही !!!

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

ऑं प्रतिसाद संपादित? का म्हणे ? विमेंनीच केला की अजुन कोणी? मला तरी त्यात काहिच वावगे दिसत नव्हते. असे प्रतिसाद मिपावर साधारणपणे आढळतातच. काही शब्द गाळाल्याने हा प्रतिसाद म्हणजे दात काढलेल्या सापासारखा वाटतो आहे. आधीच्या प्रतिस्सादात मस्त धग होती. आमच्या विमेंचा अस्सल प्रतिसाद वाटत होता. हा म्हणजे रॉबर्ट लुडलुमची कादंबरी चंपा कान्हेरेंनी पुर्ण केल्यासारखी वाटते आहे.

In reply to by मृत्युन्जय

हा म्हणजे रॉबर्ट लुडलुमची कादंबरी चंपा कान्हेरेंनी पुर्ण केल्यासारखी वाटते आहे.
ठ्ठो!!!!!!!! फुटून वारल्या गेले आहे =)) _/\_ =))

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

संपादक विनंती न करता पण प्रतिसाद संपादित करतात तर ! @विश्वनाथ मेहेंदळे…. हे पहा , मला जे वाटले ते मी म्हटले , जर तुम्हाला पटल नसेल तर ठीक आहे असते प्रत्येकाचे मत पण दुसऱ्याला गाढव ठरवताना स्वतः त्याच स्वरात केकाटणे योग्य आहे का? बाकी राहिला प्रसिद्धीचा प्रश्न तर इथे खोट्या( पण मजेशीर ) नावाने वावरणाऱ्या बहुतांशी लोकांमध्ये कसली आलेय डोंबलाची प्रसिद्धी ?

काही आठवड्यांपूर्वी एक पाकिस्तानी मला बोलताना म्हणाला, "नूरजहाँ हिंदूस्थानातून निघून गेल्यामुळे लताला वाव मिळाला, अन्यथा नूरजहाँपुढे लता काहीच नाही" यावर काय उत्तर देणार ! चेकु यांची विचारखाज त्याच प्रकारची आहे...

In reply to by आशु जोग

+११११

In reply to by आशु जोग

"नूरजहाँ हिंदूस्थानातून निघून गेल्यामुळे लताला वाव मिळाला, अन्यथा नूरजहाँपुढे लता काहीच नाही"
ह्यावर गावसकरांचा एक किस्सा प्रसिध्द आहे. ८० च्या दशकाच्या आरंभी जेव्हा भारताचा संघ पाकिस्तान दौर्यावर गेला होता तेव्हा तिथल्या भारतीय वकिलाततीने दोन्ही संघासाठी सहभोजनाची व्यवस्था केली होती व त्यात पाकिस्तानातील काही प्रसिध्द व्यक्तींना आमंत्रित केले होते ज्यात नूरजहाँ ह्या ही होत्या. भारतीय संघाची ओळख करुन घेताना नूरजहां जेव्हा सुनिल समोर आल्या तेव्हा ओळख करुन देणार्याने त्यांना सांगितले " ये तो मशहूर बल्लेबाज सुनिल गावसकर है. आप तो इन्हे जानतेही होंगे" त्यावर नूरजहांबाई उत्तरल्या " नही जानते! हम तो सिर्फ इम्रान खान को जानते है!". पुढे तो ओळख करुन देणार्याने सुनिलला विचारले " ये पाकिस्तान कि मशहूर सिंगर नूरजहां है! आपने तो इनके गाने सुने होंगे!" त्यावर हजरजबाबी सुनील उत्तरला " नही. जिसने एक बार लता मंगेशकरजीका गाना सुना है उसे किसी और के गाने सुनने कि इच्छा ही नही होती"

In reply to by कानडाऊ योगेशु

गावास्कारांचाच किस्सा आहे सायबाच्या लॉर्डस वर कोट घातल्याशिवाय आत सोडत नाही, खेळाडूंना सुद्धा येताना कोटातच यावे लागते,मग सायबाची हि प्रोटोकॉल ची खुमखुमी जिरवायला गावस्कर लॉर्डस वर लुंगी घालून फिरले होते असे ऐकून आहे,जाणकारांनी प्रकाश टाकावा.

सचिन मैदानावर इशांत शर्माला पाणी पोचवतोय... दिग्विजय खाकी चड्डी, पांढरा शर्ट, काळी टोपी आणि हातात दंड घेऊन संध्याकाळी शाखेत चाललाय आणि दाऊद इब्राहिम बायकोबरोबर मंडईमधे कोथिंबीर विकत घेतोय....हृदयनाथ पंढरपूर एक्स्प्रेसमधे गाताहेत... अशी दृष्ये उभी राह्यली डोळ्यासमोर...