परिस्थिती गंभीर होती
विद्रोहाच्या ज्वाळा भडकल्या होत्या
बंडखोरांच्या फौजा
वेशीवर येउन थडकल्या होत्या
आटपाट नगरातील राजघराणे
अंतीम घटका मोजत होते
पुनरुत्थानाच्या सर्व शक्यता
अखेरच्या ते शोधत होते
एक गट वेगळा निघाला
विद्रोह्यांना जाउन मिळाला
बंडखोरांच्या मदतीने
सत्तेवर प्रस्थापित झाला
बेदखल गटाने विजनवासात
प्रतिज्ञा बदल्याची केली
असंतुष्ट प्रजेच्या मदतीने
पुनश्च सत्ता काबीज केली
लढाई सतत सुरूच होती
आज विजयश्री ह्याची
उद्या सरशी त्याची
सत्ता डगले बदलत होती
रक्तपात नित्याचा झाला
प्रजा विटली संहाराला
ओळखून प्रजेच्या रोषाला
दोन्ही गट बसले वार्तेला
घमासान वाटाघाटीं नंतर
सर्वमान्य तोडगा निघाला
शिरकाणा ऐवजी शिरगणतीचा
त्यांनी नवीन करार केला
प्रजेने सोडले श्वास मोकळे
स्वागत नव्या युगाचे केले
होती जरी जुनीच मदिरा
ओठास लागले नवीन प्याले
राजघराण्यातील गट तट आता
प्रेमाने फुगडी खेळू लागले
लोकही त्याला राजीखुशीने
लोकशाही' असे म्हणू लागले
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर.
अगदी असच झालं असावं :)
***
***
व्वा...! सुंदर.
व्वा...! सुंदर. :)
कल्पनाविलास
आवडला
व्वा
खासच.
मुक्तक आवडलं.
मुक्तक आवडलं.
हे आपलं उगीचः पण हा कुठला 'नवा' करार? हा तर पुन्हा पुन्हा नव्याने केला जाणारा 'जुना'च करार वाटतोय.
तेच तर! पण नवीन म्हणुन खपत ना?
In reply to मुक्तक आवडलं. by आतिवास
होती जरी जुनीच मदिरा
ओठास लागले नवीन प्याले...
.
नेमकं हेच लिहायचं आज डोक्यात होतं.
https://www.misalpav.com/node/26095
धन्यवाद
प्रतीसादा साठी सर्वांना धन्यवाद.