Skip to main content

नवा करार

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 08/11/2013 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
परिस्थिती गंभीर होती विद्रोहाच्या ज्वाळा भडकल्या होत्या बंडखोरांच्या फौजा वेशीवर येउन थडकल्या होत्या आटपाट नगरातील राजघराणे अंतीम घटका मोजत होते पुनरुत्थानाच्या सर्व शक्यता अखेरच्या ते शोधत होते एक गट वेगळा निघाला विद्रोह्यांना जाउन मिळाला बंडखोरांच्या मदतीने सत्तेवर प्रस्थापित झाला बेदखल गटाने विजनवासात प्रतिज्ञा बदल्याची केली असंतुष्ट प्रजेच्या मदतीने पुनश्च सत्ता काबीज केली लढाई सतत सुरूच होती आज विजयश्री ह्याची उद्या सरशी त्याची सत्ता डगले बदलत होती रक्तपात नित्याचा झाला प्रजा विटली संहाराला ओळखून प्रजेच्या रोषाला दोन्ही गट बसले वार्तेला घमासान वाटाघाटीं नंतर सर्वमान्य तोडगा निघाला शिरकाणा ऐवजी शिरगणतीचा त्यांनी नवीन करार केला प्रजेने सोडले श्वास मोकळे स्वागत नव्या युगाचे केले होती जरी जुनीच मदिरा ओठास लागले नवीन प्याले राजघराण्यातील गट तट आता प्रेमाने फुगडी खेळू लागले लोकही त्याला राजीखुशीने लोकशाही' असे म्हणू लागले
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2351
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

अगदी असच झालं असावं :)

***

मुक्तक आवडलं. हे आपलं उगीचः पण हा कुठला 'नवा' करार? हा तर पुन्हा पुन्हा नव्याने केला जाणारा 'जुना'च करार वाटतोय.

प्रतीसादा साठी सर्वांना धन्यवाद.