माणसाचा स्वभावाच आहे तो...
माणसाचा स्वभावाच आहे तो...
माणसाचा स्वभावच आहे तो
कुनि कामाला पुढे ढकलतो,
बॉस अप्रेजल पुढे ढकलतो,
तर एखादा गरीब मरणाला पुढे ढकलतो
मरणाला कवटाळणारा क्वचितच जन्माला येतो,
न मागता सगळे देणारा देवत्वाला पोहोचतो.
तरीही मरणाच्या बाजारातली तेजी काही सरत न्हाई,
काही जन मात्र चंदनाच्या लाकडाशिवाय सरणावर चढत न्हाई
असच चालत हल्ली अस म्हणून भागणार न्हाई
दुसर्याच पांघरून आपल्याकड वढून चालणार न्हाई
न्हायतर एक दिवशी वढलेल्या पांघरुणाखाली गुदमरला जाशील.
पन माणसाचा स्वभावच तो आक्षी म्हणूनशान भागणार न्हाई...
---------------------------------------------------------------------------
एक विनंती :-
हे जे काही मी वरती लिहिलेले आहे ते उत्स्फूर्त पणे जे माझ्यातून आले त्याला अनुसरून लिहिलेले आहे कदाचित लौकिक अर्थाने हे साहित्याच्या कुठल्याच बंधनात बसणारे नसेलही कदाचित पण हो या ज्या काही भावना मी इथे उतरवल्या आहेत त्या नक्कीच मनापासून आलेल्या आहेत याची सर्वना मी खात्री देतो.
नुसत्या प्रतिसादाने भागायचं
बास!!! खाटिक बाबा तुम्हीच
टाइपताना जरा गंडला कि बोर्ड