Skip to main content

नको

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 26/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
एक व्हावी भरारी ही भिन्न आसमंत नको माझ्या आणि माझ्यामधे आरशाची भिंत नको नीज यावी शांत रोज कशाचीही भ्रांत नको असे त्याचा गर्व नको नसे त्याची खंत नको परा कामी येत जावे; स्वत:प्रत निश्चिन्त नको सूज्ञ व्हावी मने मात्र जगाला या संत नको ठेवुनी जावे स्वत:ला घेवुनी जावे जरी भुवनी इथल्या अपूर्व, अस्त व्हावा अंत नको ११-७-१२ अपूर्व ओक
दिवाळी अंक वर्ष

वाचने 3371
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

छानच..

माझ्या आणि माझ्यामधे आरशाची भिंत नको __//\\__ भुवनी इथल्या अपूर्व, अस्त व्हावा अंत नको __//\\__