Skip to main content

फुकाडे

फुकाडे

Published on 31/10/2013 - 12:30 प्रकाशित मुखपृष्ठ
ह्या पृथ्वीवर जितकी म्हणून जनता,स्त्री-पुरूष कोणीही जे बिडी, सिगारेट किंवा सिगार फुकतात ते सगळे फुकाडे! ही सगळी फुकाड्यांची जमात एकजात निर्बुध्द आहे! निसर्गाने दिलेली बुद्धी चालवायला ह्यांना असल्या फालतू गोष्टीची गरज पडते हे बघून खरंच कीव येते ह्या लोकांची आणि जिथे जागा मिळेल तिथे उभं राहून किंवा बसून किंवा कारमधे, रिक्षामधे किंवा वाट्टेल तिथे हे लोक फुकू शकतात हे बघून अगदी संताप होतो माझा!! आमच्या ऑफिसच्या बाहेर तर मोठा सिग्नल आहे त्यामुळे कायम रहदारी. त्यातच दाटीवाटीने 'दावणगिरी डोसा', 'शिव वडापाव' असल्या टप-या उभ्या असतात, तिथेही सदानकदा खाणा-यांनी ट्रॅफीक जॅम केलेला असतो आणि ह्यामधेच डझनावारी फुकाडे तिन्ही-त्रिकाळ 'फिक्र ला धुवे में उडवत' असतात. माझ्यासारखे 'नॉन स्मोकर्स' तिथून अगदी नाक मुठीत घेऊन जरी गेले तरी तो दुस-यांच्या 'फिक्र चा धुवा' कुठूनतरी नाकात शिरतोच आणि माझ्या मस्तकात तिडीक उठते. तुम्ही फुका हो पण तुमच्यामुळे आमच्यासारख्या निष्पाप लोकांना का म्हणून त्याची शिक्षा?? आता ह्यावर तुम्ही म्हणाल की तुमचा हात कोणी धरला आहे का, तुम्हीपण फुका ना! बरोबर आहे तुम्ही असंच म्हणणार, कारण स्वतःचं अधःपतन झालेलं आहेच आता दुस-याचं पण करा. तुमच्याकडून ह्याउपर अधिक काय अपेक्षा करणार! रस्त्यावरून चालत-चालत काही लोकांना फुकायची सवय असते. हे करत असतांना मागे-पुढे कोणी दुसरी व्यक्ती चालत आहे तिला तुमच्या हातातल्या शिलगावलेल्या सिगारेटचा चटका लागू शकतो हा विचार येतंच नाही का डोक्यात? सिग्नल ला गाडी उभी करून चालक सिगारेटचे झुरके घेतो आणि त्याशेजारी उभ्या असलेल्या आमच्यासारख्यांना ना पुढे जाता येते ना मागे! मग इतर वाहनांच्या धुरासोबत हाही आयता धूर प्यावाच लागतो. सगळ्यात घाणेरडा प्रकार काय असतो तर फुकणं झाल्यावर लोक 'मिन्टॉस' खातात आणि तो एकूणच सगळा सिगारेट + मिन्टॉस मिश्रीत वास अंगावर लेऊन लिफ्टमधे चढतात, आई गं!! असह्य असह्य होतं ते २ मिनीटंसुध्दा त्या लिफ्टमधे उभं राहणं! अशावेळेस वाटतं समोर उभ्या असलेल्या माणसाला चांगलं फोडून काढावं!! पण काय करणार आपल्या न्यायव्यवस्थेमधे असल्या प्रकारांसाठी कोणताही गुन्हा आणि त्यासाठीची कठोर अशी शिक्षा अजून तरी बनवली नाहीये त्यामुळे तक्रार करणार कोणाकडे?? मुळात काय आहे हे लोक निर्बुध्दच असल्यामुळे त्यांच्याकडून व्यवस्थित वागण्याची अपेक्षा करणार तरी कशी! पण असं आहे ना, त्रास होतो तो कुठेतरी बाहेर काढायला हवा डोक्यातून म्हणून हा लेखनप्रपंच बाकी काही नाही...
लेखनप्रकार

याद्या 17525
प्रतिक्रिया 81
सगळ्यात घाणेरडा प्रकार काय असतो तर फुकणं झाल्यावर लोक 'मिन्टॉस' खातात आणि तो एकूणच सगळा सिगारेट + मिन्टॉस मिश्रीत वास अंगावर लेऊन लिफ्टमधे चढतात, आई गं!! असह्य असह्य होतं ते २ मिनीटंसुध्दा त्या लिफ्टमधे उभं राहणं! अशावेळेस वाटतं समोर उभ्या असलेल्या माणसाला चांगलं फोडून काढावं!!
+१००००

वैताग असतो. माझ्यासारख्या धुराची अ‍ॅलर्जी असलेल्या जीवांची कंबक्तीच समोर एक्खादं धुराडं सुरू झालं तर!

In reply to by पैसा

पूर्ण सहमत! बाकी दारुड्यांचा त्रास किमान असा तरी नस्तो. फुकाडे मात्र लै तापदायक ब्वा. (पॅसिव्ह स्मोकिंगचा बळी) बळीचा बॅट.

लेखामध्ये व्यक्त केलेल्या भावनांशी सहमत !! सर्व गाड्यां मधून निघणार्‍या धुराचाही त्रास होतो का ? त्याही बंद केल्या पाहिजेत ..

In reply to by कपिलमुनी

गाड्यांमधून होणा-या प्रदूषणाबाबतही माझं असंच मत आहे त्यामुळे मी स्वतः दुचाकी/चारचाकीचा वापर न-करता 'बेस्ट' बसनेच प्रवास करते. बेस्ट इझ नो-डाऊट बेस्ट :)

पुर्ण्पणे सहमत. दुपारचा टपरीवरचा चहा बंद झाला फुकाड्यांच्या गर्दीमुळे. आता ऑफीसमधेच मशिनचा चहा पितो कधी कधी.

आता हा लेख वाचत असतानाच शेजारचा सहकारी फुकून परत आला. जाम डोकं उठतं त्या वासाने. इथे जर्मनीत तर मी प्रचंड विरोधाभास पाहिलाय या बाबतीत. लोक सायकल चालवतात याची काही प्रमुख कारणे म्हणजे तब्येतीला चांगले, पैशाची बचत आणि शिवाय पर्यावरणास हानिकारक नाही. परंतु सायकलवरून जातानासुद्धा पूर्णवेळ सिगारेट हातात. म्हणजे वरीलपैकी एकही हेतू पूर्ण साध्य होत नाही. तब्येतीस धोकादायक, सिगारेट चा खर्च आणि पर्यावरणास हानिकारक. असेही लोक पाहिलेत जे मग पैशांची बचत म्हणून जेवत नाहीत. गाडीचा धूर नसला तरीही वेगळ्या प्रकारे त्रास होतोच.

In reply to by मधुरा देशपांडे

@जर्मनी.. अजुन १ विरोधाभास तीथं पाह्यला.. इतर सर्व बाबतीत इतकी स्वच्छता पाळणारे हे लोक्स, सिगरेट पिऊन झाली की थोटके रस्त्यातच टाकुन जातात.. बस स्टॉप सारख्या सार्वजनीक ठिकाणी बड्सचा ढीग पडलेला असतो..

In reply to by यसवायजी

थोड्याफार फरकाने बहुतांश सगळ्याच वेस्टर्न देशात हेचं चित्र दिसते.

एक मात्र आहे या फुकाड्यांचे मित्र लवकर बनतात. याला कॉलेजमध्ये असताना सुटटा मित्र असे म्हणायचे.

सहमत. सेम भावना माझ्या पण. यू जस्ट कान्ट हेल्प इट... त्यांच्या समोरून मी मुद्दाम हात नाकसमोरून जोरात हलवत... शी-थू म्हणत जातो. मोठ्या आवाजात एखादा टोमणाही मारतो मूड असेल तर. तेवढीच त्यांची किक ची मजा घालवायची. बाकी काही करू शकत नाही. समजावण्याची वगैरे घोडचूक शहाण्याने करू नये.

In reply to by वेल्लाभट

माझा तरी अनुभव असा आहे की अशा लोकांना कितीही टोमणे मारले तरी त्यांच्यावर ढिम्म परिणाम होत नाही!

लाईफ लिबर्टी आणि पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस हे मुलभुत पेक्षाही जास्त महत्वाचे अधिकार आहेत , ज्याची त्याची लाईफी , जे करायचय ते करावे हे स्वातंत्र्य , अन मग सिगरेट पिवुन आनंद मिळत असत तर त्याचा आनंदाचा पाठलाग ! अर्थात तुम्हाला तुमचा राग व्यक्त करुन आनंद मिळणार असेल तर तुम्ही जरुर व्यक्त करावा ....पण उगाच सगळ्या फुकड्यांना शिव्यादेण्यात अर्थ नाही . (व्यसनहीन मित्रांपुढे स्मोकिंग न करणारा ) व्यसनमुक्त !!

In reply to by प्रसाद गोडबोले

लाईफ लिबर्टी आणि पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस हे मुलभुत पेक्षाही जास्त महत्वाचे अधिकार आहेत
सहमत... लेख वाचून नो स्मोकिंग नावचा पिच्चर आठवला.

In reply to by प्रसाद गोडबोले

मी लेखामधे सार्वजनिक ठिकाणी स्मोकर्समुळे होणा-या त्रासाबद्दल मत व्यक्त केलं आहे. हा लेख लिहायची वेळ आली कारण आजच सकाळी मला ऑफिसला येतांना सिगरेटचा चटका बसला जी एका चालणा-या व्यक्तीच्या हातामधे होती, मी जेंव्हा रागाने वळून त्याच्याकडे बघितलं तेंव्हा निर्लज्जपणे फक्त सॉरी म्हटला आणि झुरका मारत पुढे निघून गेला! भारतामधे सगळ्याच गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य आहे पण निदान तर्कबुद्धी गहान ठेवून वागू नका इतकंच लेखामधून मांडायचं होतं. बाकी आपण तारतम्य बाळगून सिगारेट पिता हे वाचून चांगलं वाटलं, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by क्रेझी

बापरे .... काहीतरीच too much ...मी असते नं तर दोन चार मुस्कटात मारल्या असत्या ... नाहीतर पोलिसाची भीती दाखवली असती ... गोष्ट वर वर साधी वाटली असली तरी चटका बसणार्याला माहित काय असते ते ...

In reply to by नित्य नुतन

मला चटका बसल्यानंतर फक्त त्याच्याकडे रागाने बघण्याइतपतच सुचलं :( अगदी निखारा ठेवला कोणीतरी हातावर असं वाटलं :(

In reply to by प्रसाद गोडबोले

@ ही सगळी फुकाड्यांची जमात एकजात निर्बुध्द आहे! याचा जोर्दार णीषेध.. ----- संक्षी, फुंक्यांच्या बाजुने बोलल्याबद्द्ल धन्स.. ----- आजचा सुविचारः- अद्र्कका स्वाद स्वतः घेतला असेल तरच तो चांगला का वाईट ते सांगता येते. ----- (पॅसिव्ह स्मोकर)

In reply to by यसवायजी

एसवायजी तुम्हाला 'पॅसिव्ह स्मोकर' असण्याचा अभिमान आहे असं दिसतं, आनंद वाटला हे जाणून :) कीप स्मोकिंग आय मीन पॅसिव्ह स्मोकिंग हो!

In reply to by क्रेझी

@ 'पॅसिव्ह स्मोकर' असण्याचा अभिमान आहे असं दिसतं >> अभिमान नाही. पण बरेच जवळचे मित्र फुंके असल्याने पॅसिव्ह स्मोकर व्हावं लागतं.. काय कर्णार? पण म्हणून ते सगळे निर्बुद्ध नाहीत हां..

In reply to by यसवायजी

सहज म्हणून सांगतो; मित्रांनाही जर तुम्ही हक्काने, आग्रहाने ही गोष्ट सांगू शकत नसाल, तर मग काय राहिलं! हं आणि तुम्हालाच स्मोकिंग हानिकारक नाही असं वाटत असेल तर मग नो कमेंट्स.

In reply to by वेल्लाभट

सहजच सांगतो.. 'मित्राने सांगीतलं' म्हणून कुणी सिग्रेट सोडली असं एकही उदा. नाही माझ्याजवळ. (अगदी रूममेटला सुद्धा सांगुन थकलो.. एवढच नव्हे गवींचा 'दमट पाकीट' हा धागा सुद्धा वाचायला दिला. पण शेवटी काय? धूर..) आज १ दिवस जेवण सोड असं सांगीतलं तर सोडतील पण सिगरेट सोडतील तर शप्पथ..

In reply to by यसवायजी

म्हणूनच निर्बुध्द ही उपमा वापरली मी लेखामधे! कारण ह्या लोकांना आपण व्यसनाधीन होत आहोत, झालो आहोत हेच कळत नाही मग त्या बुध्दीचा उपयोग काय??

In reply to by यसवायजी

२-३ मित्रांना सिगारेट सोड नाहीतर मैत्री तुटली अशी ताकीद देऊन, सिगारेट पूर्णपणे सोडण्यासाठी १-२ आठवड्यांची मुदत देऊन प्रवृत्त केलं आहे. येता-जाता सिगारेट ओढल्याबद्दल आधी सॉरी म्हणणा-या आणि नंतर एकदा "हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो" असं म्हणणा-या एका मुलीशी मैत्री तोडलीसुद्धा आहे. मित्रमंडळातील, कुतुहलापोटी 'एकदाच कधीतरी' स्मोकिंग आणि ड्रिंकींग 'ट्राय' करण्याची इच्छा असणा-यांना चांगलं खडसावून त्यापासून दूर ठेवण्यात यश मिळवलं आहे. एका मुलीच्या तर ६-७ महिने मागे लागलो होतो सिगरेट सोड म्हणून. शेवटी सोडली. हे सर्व मित्र-मैत्रीण प्रामाणिक आहेत, सिगरेट सोडण्याच्या प्रयत्नात जेव्हा जेव्हा मध्येच कधीतरी त्यांचा कंट्रोल सुटला तेव्हा त्यांनी स्वतःहून येऊन प्रांजळपणे कबूल करून सॉरी म्हटलं आहे. "सांगून थकलो" या निमित्ताला याठिकाणी यासाठी अर्थ नाही, कारण ज्या माणसाला आपल्या आयुष्यात आपण अतिमहत्त्वाचं स्थान दिलेलं असतं, त्याच्यापुढे थोटूक हे कधीही हरायलाच हवं. "जेव्हा कोणी नसतं तेव्हा माझी सिगरेट असते, ती मला आधार देते" असं म्हणणारे त्या थोटकाशी स्वतःच्या आप्तस्वकीयांची कळत-नकळतपणे तुलना करून त्यांचा अपमान करतात. कारण आपलं माणूस जेव्हा गरजेच्या वेळी आपल्याला आधार देतं, तेव्हा त्याच्या नखाचीही सर जगभरातल्या सगळ्या विड्या-सिगरेटी एकत्र घेऊन फुकल्या तरी त्यांना येणार नसते. जे मित्र-मैत्रीण विशेष जवळचे नाहीत, त्यांना "अरे सिगरेट पिणं वाईट" आणि "माझ्यासमोर फुकायचं नाही" एवढंच एकदा सांगून सोडून देतो. कारण त्यांनी ऐकलं तर त्यांना अति-जवळच्या माणसांचंच ऐकण्याची शक्यता जास्त असते. जे अतिजवळच्या माणसाचंही ऐकत नाहीत, ते त्यांच्याशी असलेल्या नात्याला नालायक ठरतात. सिगारेट पिणारे सगळे जण निर्बुद्ध असतात असं नाही, पण ते सिगारेट पिताना आपली बुद्धी बाजूला ठेवतात एवढं मात्र खरं.

In reply to by यसवायजी

अद्र्कका स्वाद स्वतः घेतला असेल तरच तो चांगला का वाईट ते सांगता येते.
पण आम्हाला अद्रकच्या वासाचा त्रास होत असेल तर आम्ही अद्रक चांगले कशाला म्हणू/खायला जाऊ? ते खाल्ल्याने काय होतं शरीरात हा भाग वेगळा पण आम्हाला त्रास होतो हे तरी खरंच नैका?

In reply to by बॅटमॅन

मी कुणालाच 'सिग्रेटी प्या' नाही म्हणणार. (आणी अद्रक खा असेही ;) ) पण हा सुविचार क्रेझी यांच्या खालील मतासाठी होता
निसर्गाने दिलेली बुद्धी चालवायला ह्यांना असल्या फालतू गोष्टीची गरज पडते हे बघून खरंच कीव येते ह्या लोकांची
कीव यायला हरकत नाही. पण फालतू गोष्ट हे कसं ठरलं? ऑं? (टिप: statutory warning मी थेटरात पाहतो)

In reply to by प्रसाद गोडबोले

अहो तुम्ही तुमच्या घरात बसून सिगरेटी फुकल्यात की अजून काय केलत तरी हरकत नाही ना भौ.. तुमची लिबर्टी आणि हॅप्पीनेस दुसर्‍यांना त्रास देऊन होतो तेव्हा बोलायची वेळ येते.. इतकी हौस आहे तर स्मोकर्स सगळा धूर आत घेऊन पचवायची हिम्मत का नाही करत.. एकही फुकड्या माझा तो केवळ फुकतो म्हणून मित्र होऊ शकत नाही.. एखादा चांगला मित्र फुकत असेल तर सांगितल्यावाचून राहावत नाही.. लेख मस्तच.. (एकेकाळी भकाभका सिगरेटी फुंकणार्‍या बॉसचा प्रचंड मनस्ताप झेलणारा) उपास-

In reply to by प्रसाद गोडबोले

लाईफ लिबर्टी आणि पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस हे मुलभुत पेक्षाही जास्त महत्वाचे अधिकार आहेत. परन्तु आपले हे अधिकार दुसर्याच्या मुलभूत हक्कावर गदा आणत असतील तर ते रद्दबातल ठरतात. Overall increased risk of death in both adults, where it is estimated to kill 53,000 nonsmokers per year, making it the 3rd leading cause of preventable death in the U.S. Another research financed by the Swedish National Board of Health and Welfare and Bloomberg Philanthropies found that passive smoking causes about 603,000 death a year, which represents 1% of the world's death . Recent studies comparing women exposed to Environmental Tobacco Smoke and non-exposed women, demonstrate that women exposed while pregnant have higher risks of delivering a child with congenital abnormalities, longer lengths, smaller head circumferences, and low birth weight संदर्भ विकिपीडिया

कार्यालयात , बस स्टोप, रेल्वे स्टेशन, होटेल असं सगळीकडेच स्मोकिंग वर बंदी आहे. फक्त घरी आणि रस्त्यावरच करता येतं. त्यात पण कुणी विनंती केली की धूराचा त्रास होतो तर स्मोकर्स बहूधा लगेच थोडे बाजूला जातात. असं असून स्मोकर्स वर राग का ? मला वाटतं बहूतेक स्मोकर्स सहकार्य करण्यास तयार असतात, त्यामुळे त्यांचा अपमान न करता समन्वयाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. (मी कार्यालयात असताना, अनेकदा कुणाच्या खाकरण्याचा, पाणी पितानाच्या विचित्र आवाजाचा मला त्रास होतो. पण काय करणार ?)

In reply to by मराठी कथालेखक

(मी कार्यालयात असताना, अनेकदा कुणाच्या खाकरण्याचा, पाणी पितानाच्या विचित्र आवाजाचा मला त्रास होतो. पण काय करणार ?)
यांपैकी कशानेही तुमच्या शरीराला त्रास होतो का? तुलना खटकली.

In reply to by बॅटमॅन

मन हा शरीराचाच भाग नाही काय ? मनाला होणारा त्रास हा देखील शरीराला होणारा त्रासच आहे ! तसे नसेल तर सगळ्याच मनो रुग्णांना निरोगी म्हणुन डीक्लीयर करावे लागेल जेवताना लोकं दोन्ही हातांनी जेवतात मला ते बघुन फार त्रास होतो (म्हणजे काटा चमचा असेल तर एकवेळ ठीक आहे हे पण दोन हातांनी पोळी फाडुन खाताना बघवत नाही )

In reply to by प्रसाद गोडबोले

जेवताना लोकं दोन्ही हातांनी जेवतात मला ते बघुन फार त्रास होतो मला देखील ते ऑड वाटायचे. हे चित्र बहुतेक पंजाबी /हिमाचली लोकाम्त जास्त दिसते. एका सरदारजीने सांगितले की त्यांच्याकडे देवाने दोन हात दिले आहेत. जेवणाला दोन्ही हातांचा स्पर्ष व्हावा. ( हे मी एका गुरुद्वारात देखील पाहिले. लंगर मधे जेवताना एका हातात पोळी देत नाहीत. ओंजळीतच देतात) एका हाताने अन्न घेणे हा अन्नाचा अपमान असे ते मानतात. अवांतर : पंजाबी खेड्यात जिथे जाड जाड रोट्या असतात तिथे एका हाताने तुकडा मोडणे अशक्य असते. तीच सवय नम्तर कायम रहाते.

In reply to by मराठी कथालेखक

मराठी कथालेखक साहेब तुम्ही जर मुंबईकर असाल तर माझ्या ऑफिसबाहेर येऊन बघा, पत्ता - गोदरेज कंपाउंड, विक्रोळी वेस्ट. वेळ सकाळी ९ ते रात्री ८ ह्यावेळेमधे निदान १०० माणसे तरी उभी दिसतील तुम्हांला गेटबाहेर. आता सांगा कोणाकोणाला तुम्ही विनंती करणार की थोडं बाजूला होऊन फुका?? आणि फुकाड्यांनी सार्वजनिक ठिकाणी दुस-यांना त्रास होणार नाही असं बघून फुकावं इतकंच म्हणू शकते.

In reply to by सूड

अहो सूड, दुर्दैवाने माझ्या ऑफिसमधे जाण्याला तोच एक मार्ग वापरावा लागतो आणि मी अशावेळेस कायमच रूमाल लावते पण धूर इतका जास्त असतो की रूमालही त्याला थोपवू शकत नाही :(

In reply to by मालोजीराव

कितीला मिळतं हो ते मास्क? आणि भारतात मिळतं की भारताबाहेरून मागवावं लागतं? पण किती विचित्रपणा आहे हा! म्हणजे फुकतात साले ते लोक आणि त्यांच्यामुळे आपण खर्च करून असले मास्क-बिस्क वापरायचे त्यापेक्षा सरकार सिगारेटवर कायमची बंदी का नाही आणत!! मला माहिती आहे हा खूप जुना मुद्दा आहे पण देशाची तरूण पिढी ह्या सिगारेटमुळे कॅन्सरच्या विळख्यात किंवा अजून दुर्धर रोगांना बळी पडत असेल तर काय उपयोग आहे तो फायदा कमावून?? सिनेमा सुरू होण्याआधी किळसवाण्या जाहीराती दाखवून सिगारेट सोडण्याइतपत दुधखुळी नाहीत ही लोकं!! काहितरी जालीम उपायच करायला हवा.

In reply to by क्रेझी

मीही दीड वर्ष तुम्ही म्हणताय त्याच पत्त्यावर असलेल्या हापिसात ये जा केली आहे. तेव्हाही फुंके होतेच पण आम्हाला कधी त्रास झाला नाही. सकाळी धूप घालावा तसा धूर तर नक्कीच होत नसेल आणि हापिसात चालत जाण्यापर्यंतची पाचेक मिनीटं नक्कीच म्यानेज होऊ शकतात. हां सिग्रेटीचा चटका लागणं हे जरा चूकीचं आहे पण बर्‍याचदा कसं असतं ना, मुली मैत्रिणीशी फोनवर चकाट्या पिटत चाललेल्या असतात. आपल्या आजूबाजूला कोणी चालतंय याचं भान नसतंच मग!! अशा प्रसंगी त्यांचा कोणाला धक्का लागला तरी तो धक्का समोरच्याने 'मारलाय' असं समजून खाऊ का गिळू या नजरेनं त्या व्यक्तीकडे पाहतात. कसंय ना, लोकांना समोरच्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.

In reply to by सूड

सिग्रेटीचा चटका लागणं हे जरा चूकीचं आहे जरा? धक्का लागणे आणि इजा होणे यातला फरक तो काय? फोनवर बोलत जाताना मुलींचं दुर्लक्ष होतं आणि धक्का लागल्यावर खाऊ की गिळू या नजरेनं बघितलं जातं. मान्य. होत असेल असं. पण माझ्यासारख्या काकवांनाही धक्के मारून जाताना भोळेपणाचा आव आणाणारे बघितले की काय करावं कळत नाही. समोरचा असतो विशितला माणूस म्हणजे यांचे धाकटी मावशी, काकू आमच्या वयाची असणार. मग सरसकटपणे नियम लावला जातो. धक्का मारल्यानंतर जे शब्द समोरच्या मनुष्यानं वापरलेत ते सांगितलं तर मला जे वाटलं ते वाटलच पण तुलाही त्याचा खून करावासा वाटेल.

In reply to by सूड

आज सकाळी मी तरी नक्कीच कोण मैत्रिणीसोबत फोनवर चकाट्या पिटत नव्हते उलटपक्षी तोच निर्बुध्द माणूस एका हातात सिगारेट आणि दुस-या हातात फोन धरून चालत होता!

In reply to by क्रेझी

हे असं असेल तर शब्द मागे घेतलेत. पेट्रोलपंपाकडच्या गेटमधून आत शिरताना WNS चं ऑफिस (अजूनही ते तिथं आहे की नाही ते माहित नाही) ओलांडलं की त्या येवढ्याश्या फूटपाथवरनं दाटीवाटीनं मागनं कोणी येतंय की नाही याची छटाकभर तमा न बाळगता मुलींना चालताना पाह्यलंय. मग आम्ही 'एक्स्क्युज मी' करत वाट काढून जायचो. भरीस भर त्या कैलासपतीच्या झाडावर बसलेले कावळे शर्टाचा, ब्यागचा वेध घेऊन कधी त्यावर चित्रकलेचा नमुना पेश करतायेत हे आणखी एक टेंशन असायचं.

In reply to by सूड

हां सिग्रेटीचा चटका लागणं हे जरा चूकीचं आहे पण बर्‍याचदा कसं असतं ना, मुली मैत्रिणीशी फोनवर चकाट्या पिटत चाललेल्या असतात. आपल्या आजूबाजूला कोणी चालतंय याचं भान नसतंच मग!! अशा प्रसंगी त्यांचा कोणाला धक्का लागला तरी तो धक्का समोरच्याने 'मारलाय' असं समजून खाऊ का गिळू या नजरेनं त्या व्यक्तीकडे पाहतात. कसंय ना, लोकांना समोरच्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.
खरंय. जणू समस्त पुरुषजात आपल्याला धक्का मारण्यासाठी टपलेली असते असा आविर्भाव असतो खरा.

In reply to by क्रेझी

गोदरेज च्या सिक्यूरिटी वा तुमच्या कंपनीच्या HR शी बोलून बघा. नक्की काहीतरी मार्ग निघेल. निदान स्मोकर्स चा अड्डा १०-१५ फूट जरी दूर सरकला तरी तुमचा त्रास खूप कमी होईल. टीप १: बाकी मी ही कधी काळी ब-यापैकी स्मोक करायचो पण दुस-यांना सहकार्य करुनच (म्हणजे त्रास होवू न देता) टीप २: मी मुंबईकर नाही.

In reply to by मराठी कथालेखक

दुसर्याच्या खाकरण्याचा किंवा पाणी पितानाचा आवाज हा दुसर्याच्या आरोग्यावर किती परिणाम करतो हा संशोधनाचा विषय आहे. पण दुसर्याच्या तंबाखूच्या धुराचा परिणाम मी वर लिहिलेला आहे. आपलि तुलना अनाठायी आहे असे वाटते

लेखनाशी अगदी सहमत. त्या वासानेच पोटात ढ्वळून येते. एका महामुर्खाने जळती सिगारेट रस्त्यावर टाकली होती मी चपल्या घातलेल्या असूनही नेमका त्याठीकाणी चपलेतून पाय थोडा बाहेर आला आणि अनपेक्षितपणे पायाच्या अंगठ्याला चटका बसला. फुल्या फुल्या त्या मेल्याच्या नावाने.

In reply to by रेवती

Every year, almost 1,000 smokers and non-smokers are killed in home fires caused by cigarettes and other smoking materials. The U.S. Fire Administration is working to help prevent home fire deaths and injuries caused by smoking materials. Fires caused by cigarettes and other smoking materials are preventable. सन्दर्भhttp://www.usfa.fema.gov/campaigns/smoking/

अनेक फुकाडे असेही असतात की त्यांना सिगारेट सोडायची इच्छा असते पण ती सुटत नाही. व्यसनाने मेंदुचा ताबा घेतलेला असतो त्यामुळे तारतम्य हरवले असते. छातीच खोक झाल तरी शिग्रेटी फुकत असतात. हिंदी पिक्चर ने या सिगारेटला ग्लॅमर दिल. सिगारेट हे पौरुषाचे प्रतिक म्हणुन बिंबवण्यास ते यशस्वी झाले. स्त्रिया ही आपण कुठे पुरुषांपेक्षा कमी नाही हे दाखवण्यासाठी सिग्रेटी फुकु लागल्या. कष्टकरी माणसाला बिडी चा आधार असतो. तो त्याचा विरंगुळा असतो.कामाचा नवा उत्साह त्याला बिडीचे झुरके घेतल्यावर येतो. सार्वजनिक ठिकाणी आपल्या व्यसनाचे भान राखावे. पण ती प्रगल्भता अजुन पुरेशी आलेली नाही. चालायचच. समाज हळू हळू प्रगत होत जातो आहे.

In reply to by मराठी कथालेखक

फुकाड्यांना तुम्ही कसलीही भिती घातली तरी ते कशालाही भीक घालत नाहीत!

हल्ली ई-बुकिंग, ई-मेल, ई-लर्निंग वगैरे असते, तसे तशी ई-सिगारेट उपलब्ध झालेली असून काही लोक्स वापरताना दिसतात. आदतसे मजबूर लोकांनी या पर्यायाचाही विचार करावा. . .

In reply to by विजुभाऊ

सार्वजनिक ठिकाणी नाईलाजास्त्व किंवा मुद्दामून(असते काहीजणांच्या अंगात खाज) ढुंगणातून पादणा-यांना (तिथूनच पादणं अपेक्षित असतं) आपण हसतो, त्यांची इज्जत काढतो. पण नाका तोंडातून त्याहूनही घाणेरडा वास (स्वतःहून) सोडणा-यांना (थोडक्यात खायच्या प्यायच्या आणि श्वास घ्यायच्या जागेतून पादणा-यां शेकचिल्ली लोकांना) आपण करायला हवा तेवढा विरोध करत नाही.

हे वाचल्यानंतर लगेचच विक्रोळी पश्चिमेला एक रस्ता हिरानंदानीकडे जातो त्या सिग्नलच्या बाजूला असलेला गोदरेज कंपाऊंडचा गेट, त्याबाजूचे सीसीडी, कंपाऊंडच्या भिंतीला चिटकूनच असणार्या चहा, वडापाव, साऊथ इंडियन पदार्थ, पान-सिगरेटच्या एकाला एक खेटून फुटपाथवरच उभ्या असणार्या टपर्या आणि त्या टपर्यांभोवती गळ्यात वेगवेगळ्या कंपन्याची रंगीबेरंगी लॅनयार्ड घातलेली शेकड्याने उभी असलेली माणसे हेच चित्र चटकन डोळ्यासमोर आले. कंपन्यांची नो स्मोकींग पाॅलिसी असल्यामुळे कंपाऊंडच्या आत सिगरेट फुकायला मनाई असते, मग लोकं त्या छोट्याश्या रस्त्यावर, फुटपाथवर दाटीवाटीने उभे राहत सिगरेट फुकताना दिसतात. आता तिथे पर्यायी जागाच नसल्यामुळे त्यांच्याकडेही पर्याय नसावा.

एकेकाळी ऑफिसेसमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढायला परवानगी होती. म्हणजे थिएटरमध्ये, एअरपोर्टवर धूम्रपान अव्याहतपणे चालू असायचं. गेल्या पंधरा एक वर्षांत यामध्ये प्रचंड बदल झालेला मला दिसून आलेला आहे. बंद खोल्यांमध्ये सिगरेटी ओढू नये ही रास्त तक्रार होऊन तिच्यावर अंमलबजावणी झालेली दिसते. आता प्रश्न असा आहे की ज्यांना सिगरेट ओढावीशी वाटते त्यांच्यासाठी वेगळ्या काढलेल्या जागा आहेत का? याचं उत्तर सरळसरळ नाही असं आहे. म्हणजे एके काळी जे ऑफिसात करता यायचं ते करण्यासाठी एकतर बाहेर जावं लागतं, पण त्यासाठी आखीव भाग नाही. जाण्यायेण्याच्या रस्त्यातच वडापाववाल्यांना टपऱ्या टाकायला बंदी नाही. मग काही प्रमाणात हा त्रास होणारच. तसा प्रत्येकाच्याच अस्तित्वाचा काही ना काही प्रमाणात इतरांना त्रास होतो. मला फक्त म्हणायचं आहे की एकदोन वाईट अनुभवांमुळे'निर्बुद्ध' वगैरे लेबलं सरसकट जमातीला लावू नयेत.

http://movies.ndtv.com/bollywood/ajay-devgn-fined-rs-100-for-smoking-in-public-in-goa-48862 ही बातमी बघा. गोव्यात कोणाला सूट नाही. फक्त तुम्ही तक्रार केली पाहिजे. असे धुरांडे गोव्यात सार्वजनिक जागी फारसे दिसणार नाहीत. रस्ता ही सार्वजनिक जागा नाही का?

In reply to by पैसा

माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही. सार्वजनिक जागा म्हणजे - थिएटर, होटेल, बस आणि रेल्वे स्टेशन ई. "रस्ता" हा सार्वजनिक आहे पण "सार्वजनिक जागा" नाही. कायदेतज्ञ अधिक मार्गदर्शन करु शकतील. दुसरा मुद्दा हा की : मी रस्त्यावरुन चालताना जर मला एखाद्या दुचाकीचा धक्का लागला तर लोकांनी दुचाकी चालविणेच गैर आहे असा प्रचार चालू करणं अयोग्य ठरेल. चुकून लागलेला सिगारेटचा चटका हा "एक अपघात" आहे.

धागाकर्त्याचा फुकाड्यांना निर्बुद्ध म्हणण्याचा हेतु हा त्या लोकांचा अपमान होउन कदाचित ते आत्मपरिक्षणाला प्रवृत्त होतील हा असावा.

लेखामागची चीड आणि कळकळ पोहोचली. पण सरसकट 'निर्बुद्ध' हे विषेशण / टोमणा / ग्रुपीकरण अजिबात आवडले नाही. - (फुकाड्या) सोकाजी

अम्मा शिग्रीटा? क्या शिग्रीटा शिग्रीटा कर्ते रे तुमे? वो साथियाँ देखे क्या? उस्मे वो हिरो का बावा बोल्ता ना, फेफ्डे तेरे आऊर पैसे भी तेरेच्च. आपुन थोडा बाजूमेंच जाने का जी. ये लोगांकु मालूम होता की कर रे वो गलत कर रे फिर भी करे तो हमें क्या बोलना? आपुन हाथा में शिग्रीटा दिके तो उसका बाजूसे जाताच नै . वो इन्ड्या में क्या कैते, वो लोगोंका राज है ना? तो हम कुछ बोल नै सकते ना! अब्बी इधर बोल्कु तुमे हल्का लगता तो हो लियो मियाँ ... हल्का! ए सलिम माचिस तो दे दियो रे, बिडी होना! ;)

In reply to by प्यारे१

कैकू होना रे तुमकू बीडी इस्माईलभाय ;) रुक्साना परसों बोल रही थी आजकल इस्माइलभाय भौत बीडी पीरे करके, उसकू बोलूं क्या ;) (इस्माईलभाईंचा चारमिनारातला ५ वर फिरणारा पंखा) बॅटीम फेकू.

सलामवलेकुम इस्माइल भाय सलामवालेकुम मयने सुना वो अन्ग्रेजा तुमकु खंदल खुंदले मारे ? कौन बताया तुमकु पुरा मुहल्ला जानता इस्माइल्भाय. किदर हैरे वो सलीम किदर आं ?

In reply to by इरसाल

कौन बताया तुमकु नंतर पुरा मुहल्ला जानता इस्माइल्भाय. हे नसून तो प्रसङ्ग असा आहे. चूडीबाजारवाली रुक्साना इस्माइलभायला भेटते. "आउर इस्मायलभाय सलामालेकुम". "वालेकुमस्सलाम!" "क्या रे परसो लोगां मारे थे ना तुमकु?" "कौन बोले आपकु?" "अपना सलीम बोलरा था परसो गोश्त के दुकानपे, परसो खुंदल खुंदल के दिये कते" "सलीम फेकू(दातोठ खात)!" रुक्साना परत "भौत मारे कते" =))

श्या कायच्या काय लिहिले आहे क्रेझी … लेख वाचून मनस्ताप झाला… जातो सिगारेट मारायला. तुम्ही मंगळावर घर घेवून राहा.

सिगरेट कोणाला सोडायची आहे का? काही श्वसनाचे व्यायाम आनी एन एल पी यांच्या सहाय्याने सिगरेट सोडत येते. मी काहीजणाना यात मदत केली आहे. सहा ते दहा जणांचा गट मिळाल्यास असा एखादा चार दिवसांचा कार्यक्रम करू शकतो. ( शनी रवी + शनी रवी) डिसेंबर चौथा आठवडा जानेवारी पहिला आठवडा भारतात असेन.

सहा ते दहा जणांचा गट मिळाल्यास
... तीन फुकाडे तर आहेत. अजून चार-पाच जणांना आधी शिग्रेटीचे व्यसन लावावे लागेल डिसेंबर अखेर पर्यंत. करतो प्रयत्न, मग कळवतो. :)

मी स्वतः खूप प्रयत्नाने सिग्रेटचे व्यसन सोडले आहे. हे व्यसन मला मुळात लागलंच कसं याविषयी आता गिल्टी वाटतं. सिग्रेट ओढणारे कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात हे आत्मपरीक्षणावरून लक्षात येतंय. सिग्रेटने रिफ्लेक्सेस कमी होतात असा अनुभव आहे, (हे फॉल्स स्टॅटॅस्टिक्स सुद्धा असू शकेल, खात्री केली नाही)