✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सगळ्यात पहिली नाडी कोणी वापरली असेल?

च
चित्रगुप्त यांनी
गुरुवार, 10/31/2013 - 06:16  ·  लेख
लेख
सकाळी सकाळी तिकडे जायची वेळ झाली, कि मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो , म्हणजे साला हे नाडी सोडण्याचं, बांधण्याचं सर्वात पहिले कधी समजल असेल मानवाला ? म्हणजे सगळ्यात पहिली नाडी कोणी वापरली असेल ? कधी वापरली असेल ? आणि कशी बनवली असेल ? ... विशेषतः पायजम्याचं कौतुक वाटतं हो ,च्यायला कोणच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी कापडाच्या दोन भोंगळ्या करून त्या एकमेकांना शिवून टाकायच्या, त्यात तंगड्या घुसवून मग हे झुंबाड खाली सरकून जाऊ नये, पण योग्य वेळी पटकन सरकवताही यावे, म्हणून त्यात नाडी घालावी, बांधावी, सोडावी ? मुख्य म्हणजे त्या एवढ्याश्या अरूंद भोकातून ही एवढी लांबलचक नाडी घुसवत जाऊन पुन्हा तिकडल्या भोकातून हुबेहुब तीच नाडी उदाहरणार्थ बाहेर काढणे, हा सर्व प्रकार म्हणजे "सृष्टीच्या सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना असलेल्या मानवाच्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची आणि काढ-घाल करण्याची आणि आपले चोचले पुरवण्याची हाईट " वाटते मला … तसेच इतर अन्य पदार्थांतही नाडी वापरणे, उदाहरणार्थ परकर, सलवार, पट्या-पट्याची चड्डी, वगैरे तर थोरच. आणि हो. याशिवाय दुसर्‍याही अनेक नाड्या आहेतच, अगस्त्य नाडि, पराशर नाडि, भृगु नाडि, आणि काय काय... हजारो वर्षांपासून या नाड्या बनवणे, आणि त्यात सगळ्यांचे भूत- भविष्य लिहून ठेवणे, आणि ती व्यक्ति त्या नाडीतच लिहून ठेवलेल्या नेमक्या वेळी समोर आली, की तिला ती वाचून दाखवणे, आणि त्या व्यक्तिने पूर्वजन्मात उदाहरणार्थ काय काय पापे केलीत, हे नेमके सांगून त्यावरील उपाय योजनाही सांगणे ... म्हणजे भारीच. कोणाला सुचलं असेल हे असं … अर्थात हे सगळं एकाच दिवसात सुरु झालेलं नसावं असा माझा अंदाज … हे सर्व उत्क्रांत होत गेले असेल. या नाड्यांच्या जन्माची , उत्क्रांतिची काही कहाणी असेलच ना... जाणकार मंडळींच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत …
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6839 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

जीवन त्याना ...

चौकटराजा
गुरुवार, 10/31/2013 - 07:12 नवीन
जीवन त्याना कळले हो इथे खोंडांबरोबर म्हातारे ही चळले हो ! नाडीत नाडी पायजम्याची नाडी गाडीत गाडी पराग ची गाडी ..... आगाउपणे जमलेला उखाणा ! " पराग" म्हणजे कोण ? ही चम्मत ग आहे !
  • Log in or register to post comments

व्हू ईज धिस परागा?

चित्रगुप्त
गुरुवार, 10/31/2013 - 17:36 नवीन
" पराग" म्हणजे कोण ? ही चम्मत ग आहे !
हा पराग कोण बुवा ? कोण हा पराग? कोण ग बाई हा पराग? अय्या पराग? कोणता? व्हू ईज धिस परागा? इश्श्श्श, पराग? च्यामायचा, कोन ह्यो पराग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

पराग म्हण्जे

चौकटराजा
Fri, 11/01/2013 - 05:33 नवीन
हा एक राग असून त्यात एकच स्वर लागतो तो म्हणजे पंचम " प". यात आपण दुसर्‍याची रेव्डी उडवायची पण दुसर्‍याने आपली उडवली की दू दू .......असे लिहित सुटायचे अशी ख्यालाची रचना असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

@हा एक राग असून त्यात एकच

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/01/2013 - 15:45 नवीन
@हा एक राग असून त्यात एकच स्वर लागतो तो म्हणजे पंचम " प">>> =)) @यात आपण दुसर्‍याची रेव्डी उडवायची पण दुसर्‍याने आपली उडवली की दू दू ..>>> आंssssss :-\ नेमकं उलटं लिहीलत ! :-\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

http://www.misalpav.com/node

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 10/31/2013 - 08:29 नवीन
http://www.misalpav.com/node/11452
  • Log in or register to post comments

आता हे पण.....

सुहासदवन
गुरुवार, 10/31/2013 - 08:58 नवीन
गेल्या काही दिवसात येणारे विषय पाहून लवकरच हे पण वाचायला मिळेल..... सगळ्यात पहिली गाडी कोणी वापरली असेल? सगळ्यात पहिली साडी कोणी वापरली असेल? सगळ्यात पहिली माडी कोणी बांधली असेल?(कोणी "वापरली" असेल?हे आले तरी चालेल)
  • Log in or register to post comments

सुहासवदन अजून एक विषय घ्या

विजुभाऊ
गुरुवार, 10/31/2013 - 14:37 नवीन
सुहासवदन अजून एक विषय घ्या सगळ्यात पहिली ताडी कोणी बनवली असेल?
  • Log in or register to post comments

किंवा

संजय क्षीरसागर
गुरुवार, 10/31/2013 - 15:14 नवीन
सगळ्यात पहिली नाडी कुणी सोडली असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

सं क्षी एक प्रष्ण

अनिरुद्ध प
गुरुवार, 10/31/2013 - 16:01 नवीन
ईथे आपल्याला 'पूडी' असे अभिप्रेत होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत

संजय क्षीरसागर
गुरुवार, 10/31/2013 - 17:49 नवीन
आणि लेखाचं शीर्षक पाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

मग

अनिरुद्ध प
गुरुवार, 10/31/2013 - 18:47 नवीन
ठीक आहे,म्हणजे मी पूड्या आपलं पूडी सोडायला,आपलं पहिली पूडी कोणी सोडली असेल? हे विचारायला मोकळा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ते वाढत जाईल

संजय क्षीरसागर
गुरुवार, 10/31/2013 - 18:56 नवीन
पहिली उडी कुणी (आणि कशावर) मारली? असा ही एक प्रश्न येऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

डू ते डी अर्थात 'ऊ' ते 'ई' हा

पिशी अबोली
गुरुवार, 10/31/2013 - 15:20 नवीन
डू ते डी अर्थात 'ऊ' ते 'ई' हा प्रवास भाषाशास्त्रीयदृष्ट्या रोचक आहे... ;)
  • Log in or register to post comments

+१

रमेश आठवले
Wed, 11/06/2013 - 11:10 नवीन
+१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

काही दिवसांनी मिपा हे मराठी

मोहनराव
गुरुवार, 10/31/2013 - 15:30 नवीन
काही दिवसांनी मिपा हे मराठी भाषेतले विकीपीडीया होतय की काय असा वाटायला लागले आहे.
  • Log in or register to post comments

वा चकां'चि नाडि पकडणारे लेखन!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/31/2013 - 15:57 नवीन
वा चकां'चि नाडि पकडणारे लेखन! ;-)
  • Log in or register to post comments

अरे देवा............ आता बस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/31/2013 - 18:50 नवीन
अरे देवा............ आता बस करा रे.... :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पहिली नाडी-एकच व्यक्ती.

बाबा पाटील
गुरुवार, 10/31/2013 - 19:04 नवीन
विंग कमांडर(माजी) शशिकांत ओक. दुसरा नाडी विषयी अधिकाराने बोलु शकत नाही.
  • Log in or register to post comments

आणखी नाड्या

चित्रगुप्त
गुरुवार, 10/31/2013 - 19:17 नवीन
याशिवाय मनगटावर बोटं टेकवून, 'नाडीपरिक्षा' करून वात-पित्त-कफादि दोषांचा मागोवा घेऊन त्यावर औषध, पथ्य वगैरेंचे उपाय सर्वात आधी कोणी शोधून काढले असतील? तसेच पत्रिकेतील आद्यनाडी, मध्यनाडी वा अन्त्यनाडी पैकी कोणती आहे, हे बघून वधु-वरांची 'एकनाड' तर येत नाहीना, हे सर्वात आधी कोणी बघितले असेल?
  • Log in or register to post comments

मुळात "अमुक एखाद्याला नाडणे"

बॅटमॅन
Fri, 11/01/2013 - 15:09 नवीन
मुळात "अमुक एखाद्याला नाडणे" हा शब्दप्रयोग नाडीवरूनच आला असेल काय?
  • Log in or register to post comments

सुश्रुत यांनी

रमेश आठवले
Wed, 11/06/2013 - 22:59 नवीन
आलेल्या पहिल्या रुग्णाच्या हाताची नाडी सुश्रुत या आयुर्वेदाचार्यांनी तपासली असणार .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा