सकाळी सकाळी तिकडे जायची वेळ झाली, कि मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो , म्हणजे साला हे नाडी सोडण्याचं, बांधण्याचं सर्वात पहिले कधी समजल असेल मानवाला ? म्हणजे सगळ्यात पहिली नाडी कोणी वापरली असेल ? कधी वापरली असेल ?
आणि कशी बनवली असेल ? ... विशेषतः पायजम्याचं कौतुक वाटतं हो ,च्यायला कोणच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी कापडाच्या दोन भोंगळ्या करून त्या एकमेकांना शिवून टाकायच्या, त्यात तंगड्या घुसवून मग हे झुंबाड खाली सरकून जाऊ नये, पण योग्य वेळी पटकन सरकवताही यावे, म्हणून त्यात नाडी घालावी, बांधावी, सोडावी ?
मुख्य म्हणजे त्या एवढ्याश्या अरूंद भोकातून ही एवढी लांबलचक नाडी घुसवत जाऊन पुन्हा तिकडल्या भोकातून हुबेहुब तीच नाडी उदाहरणार्थ बाहेर काढणे, हा सर्व प्रकार म्हणजे "सृष्टीच्या सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना असलेल्या मानवाच्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची आणि काढ-घाल करण्याची आणि आपले चोचले पुरवण्याची हाईट " वाटते मला …
तसेच इतर अन्य पदार्थांतही नाडी वापरणे, उदाहरणार्थ परकर, सलवार, पट्या-पट्याची चड्डी, वगैरे तर थोरच.
आणि हो. याशिवाय दुसर्याही अनेक नाड्या आहेतच, अगस्त्य नाडि, पराशर नाडि, भृगु नाडि, आणि काय काय... हजारो वर्षांपासून या नाड्या बनवणे, आणि त्यात सगळ्यांचे भूत- भविष्य लिहून ठेवणे, आणि ती व्यक्ति त्या नाडीतच लिहून ठेवलेल्या नेमक्या वेळी समोर आली, की तिला ती वाचून दाखवणे, आणि त्या व्यक्तिने पूर्वजन्मात उदाहरणार्थ काय काय पापे केलीत, हे नेमके सांगून त्यावरील उपाय योजनाही सांगणे ... म्हणजे भारीच. कोणाला सुचलं असेल हे असं …
अर्थात हे सगळं एकाच दिवसात सुरु झालेलं नसावं असा माझा अंदाज … हे सर्व उत्क्रांत होत गेले असेल. या नाड्यांच्या जन्माची , उत्क्रांतिची काही कहाणी असेलच ना...
जाणकार मंडळींच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत …
वाचने
6872
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
जीवन त्याना ...
व्हू ईज धिस परागा?
In reply to जीवन त्याना ... by चौकटराजा
पराग म्हण्जे
In reply to व्हू ईज धिस परागा? by चित्रगुप्त
@हा एक राग असून त्यात एकच
In reply to पराग म्हण्जे by चौकटराजा
http://www.misalpav.com/node
आता हे पण.....
सुहासवदन अजून एक विषय घ्या
किंवा
In reply to सुहासवदन अजून एक विषय घ्या by विजुभाऊ
सं क्षी एक प्रष्ण
In reply to किंवा by संजय क्षीरसागर
या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत
In reply to सं क्षी एक प्रष्ण by अनिरुद्ध प
मग
In reply to या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत by संजय क्षीरसागर
ते वाढत जाईल
In reply to मग by अनिरुद्ध प
डू ते डी अर्थात 'ऊ' ते 'ई' हा
+१
In reply to डू ते डी अर्थात 'ऊ' ते 'ई' हा by पिशी अबोली
काही दिवसांनी मिपा हे मराठी
वा चकां'चि नाडि पकडणारे लेखन!
अरे देवा............ आता बस
पहिली नाडी-एकच व्यक्ती.
आणखी नाड्या
मुळात "अमुक एखाद्याला नाडणे"
सुश्रुत यांनी