एक स्वप्न प्रवास (१२)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मागील दुवा http://misalpav.com/node/18224
प्रिय अॅन
बरेच दिवस. खरेतर बरेच महिने झाले तुला काही लिहीले नाही. पण तुला चॅटवर दिलेले प्रॉमिस मात्र मी अजून विसरलेलो नाहीय्ये. तुला स्वप्नात येवून भेटायचे दिलेले प्रॉमिस पूर्ण करणे हा माझे जन्मदत्त कर्म आहे. ते मी पूर्ण करणारच. ही वाक्ये ऐकून तुला लोकमान्य टिळकांची आठवण झाली असेल. कदाचित नसेल ही. तू लोकमान्य टिळकाना ओळखत नसशील. मलेशियात शाळेत ती शेंगा खाल्याची गोष्ट शिकवतात की नाही ते माहीत नाही अन्यथा टिळकांची आठवण झाली असती. असो.
मागच्या प्रोजेक्ट ने माझी झोप पार उडवून टाकली होती. त्यामुळे स्वप्न वगैरे बघायची चैन परवडणारी नव्हते. अन्यथा मी स्वप्नात मलेशियात येवुन गेलो असतो. दिवास्वप्ने वगैरे अजून बघतो. पण त्यात प्रोजेक्ट मिटींग्ज्चा व्यत्यय येतो. उगाच प्रवास मधल्यामधेच खंडीत व्हायचा.
क्लायन्ट पन ना असा. जर्रा स्वप्न बघायला लागलो की इमेल पाठवून काही शंका विचारतो ( गेल्या जन्मी बहुतेक शंकासूर असावा).असो. दुर्घटना से देर भली.
या प्रोजेक्ट मध्ये झोपायला वेळ मिळेल्.असे अजुनतरी वाटतय. क्लायन्ट जरा बरा आहे. उगाच एस्केलेशन वगैरे मारामार्या नाहिय्येत. मात्र या वेळी तुला कसे भेटायचे तोच विचार करतोय.
अगदी सुरवातीला विमानाने आलो नन्तर पाणबुडीत बसून नम्तर ईमेल मधून त्या नंतर तर आजोबांच्या जादूच्या पिशवीतून आता कसे यायचे तो विचार करतोय.
सध्या मी इकडे अफ्रिकेत आहे. त्यामुळे केप ऑफ गुड होप अर्था केपटाऊन ला वळसा घालून यायचे की सरळ गल्फ एअर ने दुबईवरून उडत जायचे असे पर्याय तपासतोय.
केप ऑफ गुड होप अर्थात केपटाऊन वरुन वळसा घालून जायचे तर चुकून कोलम्बसच्या मार्गाने गेलो आणि थेट अमेरीकेत पोहोचलो तर पंचाईत व्हायची . तिकडून अर्जन्टिना फॉकलंड आयलंड्स करून दक्षीणे कडून मलेशियाला यावे लागेल किंवा मग लिबीया-स्रइएर लेओनी करत गंबिया- दकार - केप व्हार्दे मार्गे प्युरिटो रिको - आरुबा करात पनामा कॅनाल मार्गे हवाई बेटांना भेट देत फिजी वानुवाटू- पोर्ट आयलंड्स - फिलीपाइन्स वरुन ब्रुनेई मार्गे मलेशोयाला तुझ्या कडे यावे असाही एक विचार आहे. हे अंतर अर्थात फार लांब आहे. पण अर्थात स्वप्नात लाम्ब काय आणि जवळ काय्.फारसा फरक पडत नाही. झोप जरा जास्त वेळ व्हायला हवी एवढेच. अर हो. यात एक प्रॉब्लेम दिसतोय. फिजीवरून जाताना मध्ये आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडावी लागते. म्हणजे मी आज तुझ्या स्वप्नात यायला निघालो तर आजच्या ऐवजी एक दिवस अगोदर म्हणजे कालच स्वप्नात येईन . म्हणजे मी आज यायचे म्हणतोय आणि ते स्वप्न तू कालच पहिलेले असेल हा एक तिढाच आहे की. त्यामुळे तो मार्ग नकोच. त्यापेक्षा केप टाऊन ला वळसा घालत मादागास्कर - रीयुनिअन - मॉरीशियस- मालदीव करत थेट पेडांग पेकानबारु - क्वालालंपूर मलेशिया सोपे पडेल. अर्थात इथेही एक आहे की पेडांगवरून मला समुद्री वाहन जमिनीवरून न्यावे लागेल. हे माझेच स्वप्न आहे त्यामुळे मला बोटीला रेल्वे ट्रॅक्स वरुन नेता येईल. कदाचित त्यामुळे न जाणो एखाद्या नव्या वाहनाचा शोध लागू शकेल.
माझ्या शाळेतला गण्या एकबोटे एकदा शाळेत सातवी ब मधे असताना गणीताचा तास चालु असताना वर्गात झोपला होता
दामले मास्तरानी त्याला तो झोपेत असतानाच कानाखाली लावली आणि का झोपला विचारले. गण्याने केक्युले प्रमाणे रसायनशास्त्रातील एका समस्येवर झोपेत उपाय शोधतोय म्हनून सांगितले. दामले मास्तर बहुतेक ऑर्ग्यानिक केमिस्ट्री शिकले नसावेत. गण्याच्या उआ उत्तरावर त्यानी गण्याला अक्षरशः झोडपून काढले. आणि गण्याचे रसायनशास्त्रातील संशोधन कायमचे बंद करून टाकले. भारत संशोधनात या अशा अशा गोष्टींमुळे मागे पडतो. इथे संशोधनाला वावच देत नाहीत मुळी. भारतातील शिक्षण पद्धति मुळापासून बदलायला हवी असे मला तेंव्हापासून वाटत आलेय.
असो. तर आपले ठरले. की मी उद्या म्हणजे आज रात्री म्हणजे मी आज झोपायला जाईन व उद्या जागा होईन त्या दरम्यानच्या काळात तुला भेटायला येईन.
प्रोजेक्ट कम्प्लीशन , प्रोजेक्ट रीयलायझेशन फेज , कट ओव्हर वगैरे भानगडी लावून घेवु नकोस. हवे तर मस्त फ्रेंच लीव्ह टाक. म्हणजे नीट झोप घेता येईल.आणि आपल्या भेटता येईल.
चल मी आत्ताच तयारी करतोय. दुपारीच हापिसात दांडी टाकतो. आणि झोपेची तयारी करतोय.
अरे हो...... क्वालालंपूर ची वेळ इथल्या पेक्षा सहा तासानी पुढे आहे. त्यामुळे मला आत्ताच झोपायला हवे. दुपारी दोन वाजता तिथले रात्रीचे आठ वाजतात. म्हणजे मी मी इथल्या संध्याकाळी सहा ते रात्रीचे बारा यी वेळेत तुला भेटेन.
चल. बी रेडी......... झोपायच्या अगोदर नेटवर केपटाऊन ला ट्रेन रेन्टवर मिळतेय का बघतो.
तुझाच
विजुभाऊ व्हिक्टर.
( क्रमशः)
प्रतिक्रिया
अरे वा!
wa wa
स्वप्नसफर येऊ द्या...
ड्रीम मशीन...
मात्र नव्या मंडळींना आधीच्या
ओ विजूभौ आपल्या आपल्यात
हा हा हा
ऑ