येत्या १७ नोव्हेंबरला दिवाळी कट्टा आयोजीत करण्यात आला आहे.
साधारण पणे दर ३/४ महिन्यांतून एकदा तरी एकत्र येण्याचा मानस आहे.
बर्याच जणांची कट्ट्याला हजेरी लावायची इच्छा असते पण वेळेवर निरोप न मिळाल्यामुळे, इच्छा आणि वेळ असून देखील, प्रत्येकवेळी ते शक्य होतेच असे नाही.
त्यामुळे मला असे वाटते, की आपण एक डाटाबेस तयार केला तर?
त्यात मोबाईल नं. आणि इमेल आय.डी. असेल तर प्रत्येक वेळी त्यांना निरोप हमखास मिळेल.
त्याची एक एक्सेल शीट तयार करू आणि मग ती वेळोवेळी अपडेट करून ग्रुप मधल्या सगळ्यांना पाठवु.
सध्या सोयीसाठी म्हणून फेसबूकवर मिपा डोंबिवलीकर कट्टा बनवला आहे.
लिंक देत आहे. (https://www.facebook.com/groups/719013774795228/)
क्रुपया आपले मोबाईल नं. किंवा मेल आय. डी इथे किंवा फेसबूक वर टाकू नका, ही विनंती आहे.
वाचने
10015
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली कल्पना आहे .डाटाबेस
चांगली कल्पना आहे .डाटाबेस फक्त डोंबिवली ?का कर्जत ते ठाणे ,मुलुंड ते दादर ,मुंबई ,कांदिवली ते दादर,बोरिवली ते विरार असे कटट्यासाठी भाग करणार आहे ?
माझ्या मता प्रमाणे...
महानगर पालिकेच्या हद्दी प्रमाणे केलेला उत्तम...
म्हणजे,
मुंबई महानगर पालिका
ठाणे महानगर पालिका
कल्याण-डोंबिवली महानगर पालिका.
वगैरे वगैरे
अजुन काही मत-मतांतरे आली तर उत्तम...
शुभेच्छा
चान्गला उपक्रम आहे व्यवस्थित पणे राबवुन तडीस नेला तर उत्तमच.
व्यवस्थित पणे राबवुन तडीस नेण्याचाच,,,,,
In reply to शुभेच्छा by अनिरुद्ध प
मानस आहे...
आयड्या चांगली हाय!
आयड्या चांगली हाय! :)
एफ. वाय. आय.
sorry, this page isn't available
The link you followed may be broken, or the page may have been removed.
आणी त्याखाली ठेंगा दिसतोय..
तो सिक्रेट ग्रुप असल्याने....
In reply to एफ. वाय. आय. by यसवायजी
तुम्हाला ठेंगा दिसत आहे.
असो तुम्हाला व्य.नि. केला आहे.
वोक्के. व्यनी ला उत्तर दिले
In reply to तो सिक्रेट ग्रुप असल्याने.... by मुक्त विहारि
वोक्के. व्यनी ला उत्तर दिले आहे.
मी तसा सिग्रेटपासुन दुरच राहतो. ;)
मी तसा सिग्रेटपासुन दुरच राहतो.
In reply to वोक्के. व्यनी ला उत्तर दिले by यसवायजी
मी पण आज-काल सुपारी पासून दूरच राहतो.
(आयला आमचा भंकस करायचा स्वभाव काही जात नाही.)
@आयला आमचा भंकस करायचा स्वभाव
In reply to मी तसा सिग्रेटपासुन दुरच राहतो. by मुक्त विहारि
@आयला आमचा भंकस करायचा स्वभाव काही जात नाही >>
चांगलं आहे.. पागलपंती भी जरुरी है.. :D
उत्तम कल्पना !
उत्तम कल्पना !
मात्र फक्त एका किंवा काही विभागांकरिता डेटाबेस बनविण्याऐवजी सगळ्या कट्टोत्सुक मिपाकरांचा एकच डेटाबेस बनवला तर जास्त उपयोगी ठरेल.
एक्सेल शीटवर असल्याने तो सॉर्ट करून विभागवारही वापरता येईल. शिवाय काही कट्ट्यांना आजूबाजूच्या विभागातले सदस्यही येतात असे कट्टावृत्तांतावरून दिसते (उदा. मुंबई कट्ट्याला ठाण्याचेच नव्हे तर पुण्याचे सदस्य येतात, इ.), ते वगळले जाणार नाहीत. परदेशी सदस्यांचीही सोय होईल... त्यांच्या सुट्टीच्या दरम्यान असलेल्या जवळपासच्या (अगदी त्यांच्या मूळ गावातिल नसला तरी) कट्ट्यांना त्यांना हजेरी लावता येईल. मध्ये एकदा मिपासंमेलनाची कल्पनाही आली होती... त्यालातर हा डेटाबेस आवश्यकच आहे.
माझे मत....
In reply to उत्तम कल्पना ! by डॉ सुहास म्हात्रे
दर ३/४ महिन्यातून एकदा तरी कट्टा करावा असे आमचे (डोंबिवली करांचे) ठरत आहे.रीतसर आम्ही त्याचा धागा काढूच.पण दर वेळी कट्टा झाला की हमखास एक्/दोन जण विचारतात, आम्हाला का नाही बोलावले?
आम्हाला उगाच कानकोंडे होते.बरे त्यांचे काहीही चुकत नाही.
म्हणून मग आम्ही हा डाटाबेस बनवायचे ठरवले.
इति डोंबिवलीकरांचे म्हणणे समाप्त.
=============================================
सगळ्या मिपाकरांचा डाटाबेस पण हवा का?
हो, हवाच.
१. जर कुणाला काही सामाजिक काम करायचे असेल, तर त्याला हा डाटा उपयोगी पडू शकतो.
२. हा डाटा फक्त अॅडमिन कडेच असावा.(कुणाचे डो़के कुठे चालेल काही सांगता येत नाही.)
==================================================================
नमस्कार
"नमस्कार,
अतिशय योग्य कल्पना!
मी डोंबिवली पश्र्चिमेला राहतो. बाकी माझा ईमेल नि भ्र.क्र. तुम्हाला व्यनि केलाच आहे!
( खास पुणेरी कट्ट्याच्या
( खास पुणेरी कट्ट्याच्या प्रतीक्षेत ) :(
अरे व्वा!!!
In reply to ( खास पुणेरी कट्ट्याच्या by गजानन५९
तुम्ही पण पुणेकर वाटते.
खूप पुणेकर आहेत इथे.
अभिमान मोड ओन
तुम्ही पण पुणेकर वाटते. >>>>>>>>>>>
हो मी पुणेकरच आहे.
खूप पुणेकर आहेत इथे. >>>>>>>>>>
अभिमान मोड ओन { पुणेकर थोडे असले तरी खूप असल्यासारखे वाटतात बर्याचदा :) } अभिमान मोड ऑफ
पुणेकर थोडे असले तरी खूप असल्यासारखे वाटतात
In reply to अभिमान मोड ओन by गजानन५९
इथे पण तसेच आहे.होईल हळूहळू एकेकाशी ओळख....
जमल्यास (https://www.misalpav.com/node/25828) हा धागा बघा....
(स्वगत : काडी टाकून झाली.)
(स्वगत : काडी टाकून झाली.) >>
(स्वगत : काडी टाकून झाली.)
>>>>>>>>>>
बरे झाले तुम्ही काडी टाकली
म्हंजी आता म्या काड्या साराया मोकला :)
@म्हंजी आता म्या काड्या
In reply to (स्वगत : काडी टाकून झाली.) >> by गजानन५९
@म्हंजी आता म्या काड्या साराया मोकला>>> :D
गजा ननं =))
मी पण येइन म्हणतो "फू...क" मारायला! ;)
अट्टल पुणेरी- आत्मू! :D
@ अ.आ.
In reply to @म्हंजी आता म्या काड्या by अत्रुप्त आत्मा
आपण आलात...
बरे झाले.
आता पुण्या कट्ट्याचा पण मुहुर्त काढा.
@आता पुण्या कट्ट्याचा पण
In reply to @ अ.आ. by मुक्त विहारि
@आता पुण्या कट्ट्याचा पण
मुहुर्त काढा.>>> :D calling खादाड कंपू! P.M.P~पुणे मिपाज् पार्टी. ;)
अगदीच काही नाही तर निदान....
In reply to @आता पुण्या कट्ट्याचा पण by अत्रुप्त आत्मा
गजाभावूंना "बादशाही"त जेवायला न्या.
मी आणि कुंदनने दुबई-मिपा कट्टा दोघांत साजरा केला होता.
बाकी पुणे कट्टे दर विकांताला
In reply to अगदीच काही नाही तर निदान.... by मुक्त विहारि
बाकी पुणे कट्टे दर विकांताला साजरे होतातच.
मस्कत कट्टा डाटाबेस.
मस्कत महानगरपालीकेच्या क्षेत्रातील 'मस्कत कट्टा डाटाबेस' माझ्या जवळ तयार आहे. तो खालील प्रमाणे:
अनु. क्र. १
सदस्य नांव प्रभाकर पेठकर.
भ्रमणध्वनी क्रमांक ( +९६८)९९३६५७६९
खाद्यआवड काहीही चालतं.
दारू आवडीने ढोसतो.
विनोद शाकाहारी/मांसाहारी दोन्ही आवडतात.
...
आम्ही पावणे म्हणून येउ का?
डोंबिवलीत कुठे ? कंच्या हाटिलात? किती वेळ ?
आपण अजिबात येवू नका....
In reply to ... by उद्दाम
माझ्या आणि आपल्या विचारांचा ताळ-मेळ जुळत नाही.
तस्मात, बोलावल्या शिवाय कुठे जावू नये...
*****
आमच्या भागातल कुणी दिसत नाय .
लातुरकर
मु.वि.
सगळ्यांचे मोबाईल क्रमांक, आणि इ तुमच्याकडे व्यनित घेऊन तुमच्याकडे डेटाबेस तयार करा. नंतर उपयोगी पडेल...
२/३ जणांचे आले आहेत....
In reply to मु.वि. by नानबा
पुढच्या शनिवारी माझ्या कडे बसू या,
भेळ-पुरी खावुया,
जमले तर फराळ करु या.
आणि अगदीच काही वाटले तर काम करू या.
(आळशी) मुवि
मुवि,
In reply to २/३ जणांचे आले आहेत.... by मुक्त विहारि
मुवि,
पुण्यात कधी येताय कट्ट्याला?
पुण्यात...
In reply to मुवि, by प्रचेतस
यायचे आहेच आणि सवडीने येणार.
अ.आ. कडून मुहुर्त काढणार, त्यांच्या बरोबर रविवार साजरा करणार.सकाळी मिसळ, मग जुना बाजार, मग बादशाहीत जेवण.
जेडी बरोबर साप पकडायला जाणार.
तुमच्या बरोबर मनसोक्त भटकणार.
आणि
चौरांकडे हादडत बसणार.
हाहा.
In reply to पुण्यात... by मुक्त विहारि
हाहा.
बाकी बादशाहीपेक्षा अजून लै भारी ठिकाणं आहेत की.
चौराकाकांकडे मी पण येणारच ते तर घराजवळच राहतात.
हायला... आम्ही काय गाढवं
In reply to हाहा. by प्रचेतस
हायला... आम्ही काय गाढवं मारलीत? आम्हीही येणार चौराकाकांकडे. अर्थात त्यांची हरकत नसेल तर. ;)
पुणे ३० चे अन्न
In reply to हायला... आम्ही काय गाढवं by धन्या
धन्या, पुणे ३० चे अन्न खावे लागेल.
अन्नास नावे ठेवायची असल्यास बेसीनचा रस्ता ही पाटी लावण्यात येईल.
लसणीच्या चटणीतही साखर टाकण्याची आमच्याकडे पद्धत आहे.
पांचट जोक मारायचे असतील तर आगाउ कळवावे. साउंड प्रूफ खोलीची सोय करण्यात येईल. पण आमचा खर्च फक्त
अन्नाचा असल्याने या यांत्रिक करामतीचे पैसे अभ्यागताना द्यावे लागतील.
आमचे कडे शाकाहारच दिला जातो. माउसा हारासाठी गळ घालू नये.
ज्याना चपटी शिवाय जमतच नाही. त्यांचे साठी ग्लासभर पाण्यात थेंब भर बीअर ओतायची सोय करू. ( हे जरी अन्नात येत नसले तरी बिअरचे पैसे लाजेकाजेस्तव लावणार नाही )
आपला खवचट राजा - ( आजोबा, काका, साडू मेहुणा ई नात्यांची अवगुंठित )
माउसा हारासाठी गळ घालू नये.
In reply to पुणे ३० चे अन्न by चौकटराजा
उंदीर पकडायला लोक गळ टाकून बसलेत हिकडंतिकडं असे चित्र डोळ्यांसमोर तरळल्या गेले आहे.
तशी माझी पुण्यात बरीच ठिकाणे आहेत...
In reply to हाहा. by प्रचेतस
औंध म्हणू नका, हडपसर म्ह्णू नका, कोथरूड ,विबवेवाडी म्ह्णू नका,
आणि सदाशिव पेठ तर अजिबात म्हणू नका.
नुसता वारावर जरी जेवलो तरी महिना आरामात जातोय बघा.आजोबांची पुण्याई....
बाकी आमचे पण एक ठिकाण आहेच
In reply to तशी माझी पुण्यात बरीच ठिकाणे आहेत... by मुक्त विहारि
=))
बाकी आमचे पण एक ठिकाण आहेच चिंचवडला. :)
नक्की येणार.....
In reply to बाकी आमचे पण एक ठिकाण आहेच by प्रचेतस
चिंचवडला.
बाकी कुठल्याही कट्ट्य़ास देतो
बाकी कुठल्याही कट्ट्य़ास देतो त्या प्रमाणे ह्याही कट्ट्यास शुभेच्छा , १७ ला जमणे अशक्य
मागे भर दिवाळीत ठाणे कट्टा झाला होता तसा झाल्यास नक्कीच हजेरी लावण्यात येईल
कट्ट्याला यायला आवडेल
कट्ट्याला यायला आवडेल.
पण ऐन कट्ट्याच्या आदल्या दिअवसापर्यंत काहीही कन्फर्म करु शकत नाही.
मना मना तू ऐन पुण्यातल्या
In reply to कट्ट्याला यायला आवडेल by मन१
मना मना तू ऐन पुण्यातल्या कट्ट्यांनाही ऐन वेळ कल्टी मारतोस.
आगोबाशी सहमत आहे.
In reply to मना मना तू ऐन पुण्यातल्या by प्रचेतस
आगोबाशी सहमत आहे.
कट्ट्याचे वर्गीकरण कसे करावे
कट्ट्याचे वर्गीकरण कसे करावे याविषयी मिपाकर मार्गदर्शन करत आहेतच पण डेटाबेस व्यवस्थापनासाठी काही टिप्स…
मिपाकरांची माहिती व्यनि / चेपू मार्फत गोळा करण्यापेक्षा google forms वापरून गोळा केल्यास वाचकांना होणारे इतर त्रास (ठेंगा दिसणे) वाचतील.
तसेच google forms हे google excel सोबत synchronize करता येत असल्याने बाकीच्या कटकटी वाचतील( माहितीचे वर्गीकरण / विशिष्ठ नावांचा शोध घेणे) , दुसरं असा कि सर्व माहिती मेघावर साठवली असल्याने संपादक मंडळ वा इतर कट्ट्याच्या आयोजाकांसोबत माहितीची देवाण - घेवाणसुद्धा सोप्पी होईल .
पॉईंट नोटेड....
In reply to कट्ट्याचे वर्गीकरण कसे करावे by निम (verified= न पडताळणी केलेला)
सुचना योग्य वाटली तर जरूर आचरणांत आणू.
मुक्त विहारि
मुक्त विहारि
या धाग्याच्या नावात "कट्टा" शब्द असायाला हवा होता. म्हणजे काहि लोकांना लगेच कळले असते. माझ्या स्नेहसंमेलनाच्या धाग्याल्या ज्या लोकांनी प्रतिसाद दिलाय ते लोक पण कट्याल्या यायाला उत्सुक आहेत याची नोंद घ्यावी.
हा डाटाबेस सध्यातरी फक्त...
In reply to मुक्त विहारि by प्रमोद देर्देकर
डोंबिवलीकर मिपाकरां पुरताच सीमीत ठेवणार आहोत.
जेणेकरून आम्हाला दसरा/दिवाळी/कोजागिरी निमीत्ताने एकमेकांना भेटता येईल.जे परदेशी असतील त्यांना , ते जेंव्हा इथे येतील तेंव्हा भेटता येईल, ह्या साठी हा डाटा बनवायचा आहे.
आता उशीर झाला...
In reply to हा डाटाबेस सध्यातरी फक्त... by मुक्त विहारि
आमच्या दृष्टीने आता ( हं ) उशीर झाला नाहीतर आणखी एक वेगळाच डोंबिवलीचा डेटाबेस मागून घेतला असता तुमच्याकडून !
फडके रोड वरून बर्याच वेळा गेलेला - चौ रा .
फडके रोड , डाटाबेस...
In reply to आता उशीर झाला... by चौकटराजा
हे एक वेगळे प्रकरण आहे.
आम्ही अनिवासी असलो तरी भारतात
आम्ही अनिवासी असलो तरी भारतात आल्यावर बर्याचदा
डोंबिवलीत पडीक असतो कारण माझा व माझ्या मातोश्रीचा जन्म डोंबिवली चा आहे ,
तेव्हा ह्या डेटाबेस मध्ये आमची वर्णी लागली तर आम्ही उपकृत होऊ ,
जेव्हा कधी भारतात येणे होईल तेव्हा डोंबिवलकर ,थाकुर्लीकार मिपाकरांना भेटायचे आहे.
अवांतर
आपली डोंबिवली ची अस्मिता जपणारी डोंबिवली वर आधारित एक कविता आंजा वर फिरत आहे , ती येथे कुणी अडकवली तर ह्या धाग्याला चार चांद लागतील.
पुण्यातसुद्धा असा कट्टा व्हावा
आम्ही उपस्तीत राहू