Skip to main content

डोंबिवली डाटाबेस.....

शनिवार, 26/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या १७ नोव्हेंबरला दिवाळी कट्टा आयोजीत करण्यात आला आहे. साधारण पणे दर ३/४ महिन्यांतून एकदा तरी एकत्र येण्याचा मानस आहे. बर्‍याच जणांची कट्ट्याला हजेरी लावायची इच्छा असते पण वेळेवर निरोप न मिळाल्यामुळे, इच्छा आणि वेळ असून देखील, प्रत्येकवेळी ते शक्य होतेच असे नाही. त्यामुळे मला असे वाटते, की आपण एक डाटाबेस तयार केला तर? त्यात मोबाईल नं. आणि इमेल आय.डी. असेल तर प्रत्येक वेळी त्यांना निरोप हमखास मिळेल. त्याची एक एक्सेल शीट तयार करू आणि मग ती वेळोवेळी अपडेट करून ग्रुप मधल्या सगळ्यांना पाठवु. सध्या सोयीसाठी म्हणून फेसबूकवर मिपा डोंबिवलीकर कट्टा बनवला आहे. लिंक देत आहे. (https://www.facebook.com/groups/719013774795228/) क्रुपया आपले मोबाईल नं. किंवा मेल आय. डी इथे किंवा फेसबूक वर टाकू नका, ही विनंती आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9932
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

चांगली कल्पना आहे .डाटाबेस फक्त डोंबिवली ?का कर्जत ते ठाणे ,मुलुंड ते दादर ,मुंबई ,कांदिवली ते दादर,बोरिवली ते विरार असे कटट्यासाठी भाग करणार आहे ?

महानगर पालिकेच्या हद्दी प्रमाणे केलेला उत्तम... म्हणजे, मुंबई महानगर पालिका ठाणे महानगर पालिका कल्याण-डोंबिवली महानगर पालिका. वगैरे वगैरे अजुन काही मत-मतांतरे आली तर उत्तम...

चान्गला उपक्रम आहे व्यवस्थित पणे राबवुन तडीस नेला तर उत्तमच.

sorry, this page isn't available The link you followed may be broken, or the page may have been removed. आणी त्याखाली ठेंगा दिसतोय..

In reply to by यसवायजी

मी पण आज-काल सुपारी पासून दूरच राहतो. (आयला आमचा भंकस करायचा स्वभाव काही जात नाही.)

In reply to by मुक्त विहारि

@आयला आमचा भंकस करायचा स्वभाव काही जात नाही >> चांगलं आहे.. पागलपंती भी जरुरी है.. :D

उत्तम कल्पना ! मात्र फक्त एका किंवा काही विभागांकरिता डेटाबेस बनविण्याऐवजी सगळ्या कट्टोत्सुक मिपाकरांचा एकच डेटाबेस बनवला तर जास्त उपयोगी ठरेल. एक्सेल शीटवर असल्याने तो सॉर्ट करून विभागवारही वापरता येईल. शिवाय काही कट्ट्यांना आजूबाजूच्या विभागातले सदस्यही येतात असे कट्टावृत्तांतावरून दिसते (उदा. मुंबई कट्ट्याला ठाण्याचेच नव्हे तर पुण्याचे सदस्य येतात, इ.), ते वगळले जाणार नाहीत. परदेशी सदस्यांचीही सोय होईल... त्यांच्या सुट्टीच्या दरम्यान असलेल्या जवळपासच्या (अगदी त्यांच्या मूळ गावातिल नसला तरी) कट्ट्यांना त्यांना हजेरी लावता येईल. मध्ये एकदा मिपासंमेलनाची कल्पनाही आली होती... त्यालातर हा डेटाबेस आवश्यकच आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दर ३/४ महिन्यातून एकदा तरी कट्टा करावा असे आमचे (डोंबिवली करांचे) ठरत आहे.रीतसर आम्ही त्याचा धागा काढूच.पण दर वेळी कट्टा झाला की हमखास एक्/दोन जण विचारतात, आम्हाला का नाही बोलावले? आम्हाला उगाच कानकोंडे होते.बरे त्यांचे काहीही चुकत नाही. म्हणून मग आम्ही हा डाटाबेस बनवायचे ठरवले. इति डोंबिवलीकरांचे म्हणणे समाप्त. ============================================= सगळ्या मिपाकरांचा डाटाबेस पण हवा का? हो, हवाच. १. जर कुणाला काही सामाजिक काम करायचे असेल, तर त्याला हा डाटा उपयोगी पडू शकतो. २. हा डाटा फक्त अ‍ॅडमिन कडेच असावा.(कुणाचे डो़के कुठे चालेल काही सांगता येत नाही.) ==================================================================

"नमस्कार, अतिशय योग्य कल्पना! मी डोंबिवली पश्र्चिमेला राहतो. बाकी माझा ईमेल नि भ्र.क्र. तुम्हाला व्यनि केलाच आहे!

तुम्ही पण पुणेकर वाटते. >>>>>>>>>>> हो मी पुणेकरच आहे. खूप पुणेकर आहेत इथे. >>>>>>>>>> अभिमान मोड ओन { पुणेकर थोडे असले तरी खूप असल्यासारखे वाटतात बर्याचदा :) } अभिमान मोड ऑफ

In reply to by गजानन५९

इथे पण तसेच आहे.होईल हळूहळू एकेकाशी ओळख.... जमल्यास (http://www.misalpav.com/node/25828) हा धागा बघा.... (स्वगत : काडी टाकून झाली.)

(स्वगत : काडी टाकून झाली.) >>>>>>>>>> बरे झाले तुम्ही काडी टाकली म्हंजी आता म्या काड्या साराया मोकला :)

In reply to by गजानन५९

@म्हंजी आता म्या काड्या साराया मोकला>>> :D गजा ननं =)) मी पण येइन म्हणतो "फू...क" मारायला! ;) अट्टल पुणेरी- आत्मू! :D

In reply to by मुक्त विहारि

@आता पुण्या कट्ट्याचा पण मुहुर्त काढा.>>> :D calling खादाड कंपू! P.M.P~पुणे मिपाज् पार्टी. ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

गजाभावूंना "बादशाही"त जेवायला न्या. मी आणि कुंदनने दुबई-मिपा कट्टा दोघांत साजरा केला होता.

मस्कत महानगरपालीकेच्या क्षेत्रातील 'मस्कत कट्टा डाटाबेस' माझ्या जवळ तयार आहे. तो खालील प्रमाणे: अनु. क्र. सदस्य नांव प्रभाकर पेठकर. भ्रमणध्वनी क्रमांक ( +९६८)९९३६५७६९ खाद्यआवड काहीही चालतं. दारू आवडीने ढोसतो. विनोद शाकाहारी/मांसाहारी दोन्ही आवडतात.

आम्ही पावणे म्हणून येउ का? डोंबिवलीत कुठे ? कंच्या हाटिलात? किती वेळ ?

In reply to by उद्दाम

माझ्या आणि आपल्या विचारांचा ताळ-मेळ जुळत नाही. तस्मात, बोलावल्या शिवाय कुठे जावू नये...

आमच्या भागातल कुणी दिसत नाय . लातुरकर

सगळ्यांचे मोबाईल क्रमांक, आणि इ तुमच्याकडे व्यनित घेऊन तुमच्याकडे डेटाबेस तयार करा. नंतर उपयोगी पडेल...

In reply to by नानबा

पुढच्या शनिवारी माझ्या कडे बसू या, भेळ-पुरी खावुया, जमले तर फराळ करु या. आणि अगदीच काही वाटले तर काम करू या. (आळशी) मुवि

In reply to by प्रचेतस

यायचे आहेच आणि सवडीने येणार. अ.आ. कडून मुहुर्त काढणार, त्यांच्या बरोबर रविवार साजरा करणार.सकाळी मिसळ, मग जुना बाजार, मग बादशाहीत जेवण. जेडी बरोबर साप पकडायला जाणार. तुमच्या बरोबर मनसोक्त भटकणार. आणि चौरांकडे हादडत बसणार.

In reply to by मुक्त विहारि

हाहा. बाकी बादशाहीपेक्षा अजून लै भारी ठिकाणं आहेत की. चौराकाकांकडे मी पण येणारच ते तर घराजवळच राहतात.

In reply to by धन्या

धन्या, पुणे ३० चे अन्न खावे लागेल. अन्नास नावे ठेवायची असल्यास बेसीनचा रस्ता ही पाटी लावण्यात येईल. लसणीच्या चटणीतही साखर टाकण्याची आमच्याकडे पद्धत आहे. पांचट जोक मारायचे असतील तर आगाउ कळवावे. साउंड प्रूफ खोलीची सोय करण्यात येईल. पण आमचा खर्च फक्त अन्नाचा असल्याने या यांत्रिक करामतीचे पैसे अभ्यागताना द्यावे लागतील. आमचे कडे शाकाहारच दिला जातो. माउसा हारासाठी गळ घालू नये. ज्याना चपटी शिवाय जमतच नाही. त्यांचे साठी ग्लासभर पाण्यात थेंब भर बीअर ओतायची सोय करू. ( हे जरी अन्नात येत नसले तरी बिअरचे पैसे लाजेकाजेस्तव लावणार नाही ) आपला खवचट राजा - ( आजोबा, काका, साडू मेहुणा ई नात्यांची अवगुंठित )

In reply to by चौकटराजा

माउसा हारासाठी गळ घालू नये.
उंदीर पकडायला लोक गळ टाकून बसलेत हिकडंतिकडं असे चित्र डोळ्यांसमोर तरळल्या गेले आहे.

In reply to by प्रचेतस

औंध म्हणू नका, हडपसर म्ह्णू नका, कोथरूड ,विबवेवाडी म्ह्णू नका, आणि सदाशिव पेठ तर अजिबात म्हणू नका. नुसता वारावर जरी जेवलो तरी महिना आरामात जातोय बघा.आजोबांची पुण्याई....

बाकी कुठल्याही कट्ट्य़ास देतो त्या प्रमाणे ह्याही कट्ट्यास शुभेच्छा , १७ ला जमणे अशक्य मागे भर दिवाळीत ठाणे कट्टा झाला होता तसा झाल्यास नक्कीच हजेरी लावण्यात येईल

कट्ट्याला यायला आवडेल. पण ऐन कट्ट्याच्या आदल्या दिअवसापर्यंत काहीही कन्फर्म करु शकत नाही.

कट्ट्याचे वर्गीकरण कसे करावे याविषयी मिपाकर मार्गदर्शन करत आहेतच पण डेटाबेस व्यवस्थापनासाठी काही टिप्स… मिपाकरांची माहिती व्यनि / चेपू मार्फत गोळा करण्यापेक्षा google forms वापरून गोळा केल्यास वाचकांना होणारे इतर त्रास (ठेंगा दिसणे) वाचतील. तसेच google forms हे google excel सोबत synchronize करता येत असल्याने बाकीच्या कटकटी वाचतील( माहितीचे वर्गीकरण / विशिष्ठ नावांचा शोध घेणे) , दुसरं असा कि सर्व माहिती मेघावर साठवली असल्याने संपादक मंडळ वा इतर कट्ट्याच्या आयोजाकांसोबत माहितीची देवाण - घेवाणसुद्धा सोप्पी होईल .

मुक्त विहारि या धाग्याच्या नावात "कट्टा" शब्द असायाला हवा होता. म्हणजे काहि लोकांना लगेच कळले असते. माझ्या स्नेहसंमेलनाच्या धाग्याल्या ज्या लोकांनी प्रतिसाद दिलाय ते लोक पण कट्याल्या यायाला उत्सुक आहेत याची नोंद घ्यावी.

In reply to by प्रमोद देर्देकर

डोंबिवलीकर मिपाकरां पुरताच सीमीत ठेवणार आहोत. जेणेकरून आम्हाला दसरा/दिवाळी/कोजागिरी निमीत्ताने एकमेकांना भेटता येईल.जे परदेशी असतील त्यांना , ते जेंव्हा इथे येतील तेंव्हा भेटता येईल, ह्या साठी हा डाटा बनवायचा आहे.

In reply to by मुक्त विहारि

आमच्या दृष्टीने आता ( हं ) उशीर झाला नाहीतर आणखी एक वेगळाच डोंबिवलीचा डेटाबेस मागून घेतला असता तुमच्याकडून ! फडके रोड वरून बर्‍याच वेळा गेलेला - चौ रा .

आम्ही अनिवासी असलो तरी भारतात आल्यावर बर्याचदा डोंबिवलीत पडीक असतो कारण माझा व माझ्या मातोश्रीचा जन्म डोंबिवली चा आहे , तेव्हा ह्या डेटाबेस मध्ये आमची वर्णी लागली तर आम्ही उपकृत होऊ , जेव्हा कधी भारतात येणे होईल तेव्हा डोंबिवलकर ,थाकुर्लीकार मिपाकरांना भेटायचे आहे. अवांतर आपली डोंबिवली ची अस्मिता जपणारी डोंबिवली वर आधारित एक कविता आंजा वर फिरत आहे , ती येथे कुणी अडकवली तर ह्या धाग्याला चार चांद लागतील.