Skip to main content

सुखाच्या शोधात.....

लेखक गजानन५९ यांनी शनिवार, 26/10/2013 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाच्या शोधात..... चालताना वाटेत लागतो विसावा आयुष्याच्या संघर्षातही लागतो ओलावा, नात्यांच्या या गर्दीत कोण आपला नि कोण परका मुखवट्या मागील जेव्हा कळतो खरा चेहरा, स्वतःचा शोध घेताना संपते आयुष्यही जगायचेच राहून जाते सुखाच्या शोधापरी
लेखनविषय:

वाचने 1799
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

स्वतःचा शोध घेताना संपते आयुष्यही जगायचेच राहून जाते सुखाच्या शोधापरी झक्कास....

लयी हाभारी हाये. :) खरे तर थोडे पाल्हाळीक होईल पण मनातले विचार सांगूनच टाकतो मी काही कोणी लेखक वगेरे नाहीये खरे तर, पण आयुष्यात बर्याचदा कठीण प्रसंग आले त्यातून जाताना आलेले अनुभव असे नकळत शब्द बध्ह करताना खरेच खूप मोकळे मोकळे वाटते. त्याच प्रमाणे हे आपले अनुभव तुम्हा सर्वांसमोर मांडताना तितकाच आनंदही होतो.

स्वतःचा शोध घेताना संपते आयुष्यही जगायचेच राहून जाते सुखाच्या शोधापरी
या कडव्याच्या प्रथमार्धात 'शोध' हा 'स्वतःचा घेण्याबद्दल म्हटले आहे, तर उत्तरार्धात 'सुखाच्या शोधापरी' म्हटले आहे. हे दोन्ही शोध एकच की वेगवेगळे आहेत असे म्हणायचे आहे? सुखाच्या मागे लागण्यात स्वतःचा शोध घेणे राहून गेले म्हणायचे आहे का? जगायचे राहून गेले, म्हणजे नेमके काय राहून गेले?
मुखवट्या मागील जेव्हा कळतो खरा चेहरा,
हे अपूर्ण वाटते. मुखवट्या मागील खरा चेहरा जेव्हा कळतो, तेंव्हा काय होते, हे सांगितलेले नाही.

In reply to by चित्रगुप्त

ते सांगायला काही शिल्लकच रहात नाही...

चित्रगुप्तजी बरोबर आहात आपण थोडी अपूर्ण वाटते खरी, पण मी सुद्धा वाट पाहत आहे कि माझी हि कविता कधी पूर्ण होते आहे याची.

अपूर्ण कसे काय ? नात्यांच्या या गर्दीत कोण आपला नि कोण परका मुखवट्या मागील जेव्हा कळतो खरा चेहरा, मुखवट्या मागील खरा चेहरा जेव्हा कळतो तेव्हा या नात्यांच्या गर्दीत कोण आपला नी कोण परका हे समजते / जाणवते/ कळते असा अर्थ मी घेतला....