भांडणानंतर...
खोटेच आहे रागावणे, तुझेही अन् माझेही
तोंड फिरवून झोपणे, तुझेही अन् माझेही
अबोला जरी धरून, आसमंत आज सारा
अस्वस्थ मनाशी बोलणे, तुझेही अन् माझेही
कोण चुकले कोठे, जाणतो मनी दोघेही
माघार परी न घेणे, तुझेही अन् माझेही
घन बरसत आला होता, त्या कोणी ना पाहीले
सांग कसे हे वागणे, तुझेही अन् माझेही
अंगार निवता जरा, स्वत:शीच हासून मग
ते विषय बोलण्या शोधणे, तुझेही अन् माझेही
- चाणक्य
२०/१०/२०१३
वा... सुरेख !
मस्त!
क्या बात...! क्या बात...!
सुरेख
जबरा....
फारच छान.
आवडली कविता
रचना खूप आवडली.
सुंदर.
+१ मोजकेच शब्द परंतु
हा हा हा
अहाहा
सुंदर रचना खुप आवडली
व्वा! क्या बात है!!
ज्जे बात!!
सुंदर
छान..!
सुरेख
भन्नाटच.
आहाहाहाहाहा!
सुरेख कविता...
झकास
(No subject)