आपल्याला आजवरच्या आयुष्यात अनेक विविध प्रसंगांत वेळोवेळी कधी न कधी तरी "नाही" म्हणण्याचे राहून गेले असे झाले असेल. आपले नातेवाईक, शेजार पाजारी समाज काय म्हणेल या भीतीने वेळोवेळी आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागत असतील.
तसे बघा यला गेले तर त्याची सुरुवात आपल्या घरातल्या माणसांपासूनच होते असे म्हटले तरी चालेल.
पालक आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादतो. मुलगा/ मुलगी १ ० पास झाली कि कला, वाणिज्य आणि शास्त्र यापैकी शास्त्र हा विषय घेवून त्याने डॉक्टर किवा इंजिनियर व्हावे असे वाटते. भले मग तो विषय त्याला आवडो अगर न आवडो किवा त्याला अभ्यास झेपेल/ नाही झेपेल या विषयी त्याचे मत विचारात घेतले जात नाही.जर तो मुलगा/ मुलगी ठामपणे वेळीच नकार देवू शकला, तर आपल्या हव्या त्या विषयात निपुण होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो.--break--> आज अशी बरीच उदाहरणे आपल्याला अभिनय क्षेत्रात दिसतील कि जे पेशाने डॉक्टर/इंजिनियर असून सुद्धा अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. उदा. डॉक्टर काशिनाथ घाणेकर , डॉक्टर सलिल कुलकर्णी, डॉक्टर गिरीश ओक तर मेडिसीन मध्ये उच्च शिक्षण घेता घेता ते अर्धवट सोडून समाजकारणात शिरलेल्या मृणाल गोरे हे एक वेगळे उदाहरण.
जे गोष्ट शिक्षणाची तीच लग्नाची. मुले उपवर झाली कि त्यांचे लग्न ठरवताना कित्येकदा पालक मुलांच्या मनाचा विचारच करीत नाही. काही वेळा धाकाने तर काही वेळा कौटुंबिक परिस्थिती जाण असल्याने मुले/मुली लग्न उरकून घेतात पण मग पुढे संसारात त्यांना त्याचे परिणाम भोगायला लागतात. काही जण मग मन मारून नमते घेतात आणि आलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेतात हे जुळवून घेणे म्हणजे काय तर पुढे आयुष्य भर ते "नाही" हा शब्दच कधी उच्चारात नाहीत. तर काहींनी नंतर नाही म्हटल्या मुळे त्यांचा संसार सुखाचा होत नाही. हे सर्व वेळीच "नाही" म्हटले असते तर टाळता आले असते.
--break-->
या गोष्टीत तर मुलीना तर ती फक्त मुलगी आहे हे मनावर बिंबवून "तू हे करू नको, ते करु नको"असे वारंवार बजावले जाते. आणि मग ती मुलगी पुढे कुठल्याच गोष्टीला विरोध करित नाही.
हिच गोष्ट आपल्या शेजारीपाजारी, नातेवाईक यांच्या विषयी बोलता येईल. आमच्या बिल्डींग मध्ये शेजारी म्हणजे एकास एक नग होते. संध्या. ७ च्या नंतर कोणी दही (विराजाणकरिता ), सुई, तस्तम वस्तू मागायला आले कि आईला नाही म्हणायला जीवावर यायचे, आणि जर आपण तसे बोलून दाखवलेच तर, " अहो एवढे कुठे रीतीरिवाज पाळताय आपण आता शहरात राहतो." अशी आमचीच समजूत घालत असत.--break-->
आमच्या समोरील दुसरे एक शेजारी यांनी तर एक कुत्रा पाळला होता. एके दिवशी दु. ३ वाजत आम्ही झोपले असताना त्यांच्या धाकट्या मुलाने घराची बेल वाजवली व दुध पाहिजे होते म्हणून पेला पुढे केला. आम्हाला वाटले कि त्यांचे दुध संपले असेल व दुपारचा चहा करायचा असेल म्हणून मागितले असेल. मी त्यांना दुध दिले पण मागाहून समजले त्यांनी ते दुध त्यांच्या कुत्र्यासाठी नेले होते.
या आणि अशा अनेक लहानसहान गोष्टीना आपण नाही म्हणायला आपण संकोच करतो.
१)बँकेत गेलो कि हमखास कोणीतरी पेन आणायला विसरलेला असतो आणि आपण रांगेत उभे असताना "पेन प्लीज " असे म्हणून एक उपटसुम्भ नेमके आपल्याकडूनच पेन घेतो. मग आपले काम झाले कि गडबडीत ते त्याच्या कडून घ्यायचे राहून जाते किंवा तो तरी आपल्या खिशाला अडकवून लवकर निघून जातो.
२)आपले मित्र आपली बाईक किवा कार हक्काने "जरा महत्वाचे काम आहे १ तासात येतो सांगून घेवून जातात" ते तासभर उलटून गेला तरी येत नाही आणि आपला खोळंबा करतात. बरे गाडी सही सलामत परत आपल्या ताब्यात आली म्हणजे मिळवलं नाही तर तोंड फाकवत "हेSSSSSSहीSSSSSSहीSSSSSS अरे तुला सांगतो काय झाले मी असा जात असताना नां वाटेत....... झाले रामायण/ महाभारत सांगायला सुरवात.
आपले पुस्तक, शेजार्यांनी नेलेला पेपर गेला बाजार आपले भारीतले कपडे,बूट त्याहुन काही जण तर कहर करतात सोन्याचे दागिने मागायला पण त्यांना काहीच वाटत नहि.
वरिल अनुभव तुम्हाला आले असतील किवा यायचे असतील आणि या पेक्षा काही वेगळे असतील तर जरूर प्रतिक्रिया लिहा.
ता.क- पण माझ्या जुन्या धाग्याला "मि.पा.च्या संमेलनाच्या आवाहनाच्या" मात्र "नाही" म्हणू नका आणि सर्वांनी होकर देवुन उपस्थित रहायचय बरं (जर ते भरले तर)."
वाचने
7485
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे नाही म्हणणं जमण्यासाठी या
अश्याच विषयाशी संबंधित
In reply to हे नाही म्हणणं जमण्यासाठी या by नानबा
मी माझ्या शेजारणीला नाही
नाही म्हणताना नम्रपणे म्हणताय
+१ सहमत.
In reply to नाही म्हणताना नम्रपणे म्हणताय by प्रकाश घाटपांडे
हे नाही जमलेलं अजुन पर्यंत
हेहे. नाही म्हणायला जमणं
.
****
माफ करा; 'तो' पेन नाही तर 'ते
In reply to **** by जेपी
सहजलिंग
In reply to माफ करा; 'तो' पेन नाही तर 'ते by वेल्लाभट
पण आपण मागणारेही असतो ना काहीवेळा !!
हाहाहाहाहाहाअह!
In reply to पण आपण मागणारेही असतो ना काहीवेळा !! by मराठी कथालेखक
मी लहान असतांना आमच्या
नाही...
अगदी!
नाही म्हणायला शिका.
छान लेखन !
लेख अर्धा आहे.
एकदा एक शेजारीण सोन्याचा
पूर्ण वाचली नाही…पण केट
आय माय स्वारी
In reply to पूर्ण वाचली नाही…पण केट by मालोजीराव
नाही आणि हो
आम्हाला ते जमत नाहि.