✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दिवाळी अंक २०१३

स
संपादक मंडळ यांनी
Fri, 10/04/2013 - 17:22  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकर हो, कळविण्यास आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २३/१०/२०१३ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे. अन्यथा जणू धागाच प्रकाशित करतो आहोत अशा रितीने मिपा एडिटरमधे (इमेज टॅग्जसकट) लिहीलेली पोस्ट तशीच्यातशी एचटीएमएल टॅग्जसहित चोप्य पस्ते करुन टेक्स्ट फाईल (नोटपॅड) जीमेलवर अटॅच करुन पाठवली तरी दिवाळी अंक संपादकांचे काम सोपे होईल. १. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे. कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, कादंबरी इ. प्रकारचे साहित्य पाठवावे. अंक पीडीएफ स्वरूपातही काढायचा आहे त्यामुळे मल्टिमिडिया फाईल्स असतील तर त्या पीडीएफ अंकात फक्त लिंक या स्वरूपात येतील, तरी दिवाळीच्या निमित्ताने स्वतंत्रपणे प्रकाशित करायला हरकत नाही. २. कोणत्या प्रकारचे साहित्य स्वीकारता येणार नाही (बंधने -विषय, आकार इत्यादिबाबतची) नेहमीचे म्हणजे अगदी एकोळी दोनोळी साहित्य पाठवू नये, तसेच उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे. ३. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : २३/१०/२०१३ ४. इतर अटी: साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत दिवाळी अंक संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. दिवाळी अंकात समाविष्ट न होऊ शकलेलं साहित्य तुम्ही नेहमीप्रमाणे मुख्य बोर्डावर प्रसिद्ध करू शकताच! ५. साहित्य पाठवण्याचा ऑप्शन. वर लिहिल्याप्रमाणे mipa.sampadak@gmail.com या जीमेल आयडीला पाठवल्यास उपकृत राहू. पण काही कारणाने ते शक्य नसेल तर दिवाळी अंक आयडीला मिपावर व्यनि करावा. तुमचे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अजून साधारण १९ दिवस आहेत. तरी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती! धन्यवाद!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
300682 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

नक्की ना ? मग हरकत नाही !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 10/19/2013 - 10:19 नवीन
नक्की ना ? मग हरकत नाही ! :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

दिवाळी अंकाला शुभेच्छा

भ ट क्या खे ड वा ला
Mon, 10/14/2013 - 10:24 नवीन
दिवाळी अंकाची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

फॉन्टचा प्रॉब्लेम नाही ना ?

चौकटराजा
Sun, 10/20/2013 - 10:14 नवीन
लेख वर्ड मधे देताना arial unicode ms या फॉन्टचा वापर करावा लागत आहे. यामुळे आपल्याकडे संपादनात काही अडचण येणार नाही ना ?
  • Log in or register to post comments

णो प्रॉब्ळम

पैसा
Sun, 10/20/2013 - 10:44 नवीन
युनिकोड कम्प्लायंट काय पण चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

विनंती.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/24/2013 - 12:04 नवीन
दुर्दैवाने, दिवाळी अंकासाठी लेखन देण्यासाठीची तारीख, व्यवसाय व्यस्ततेत, उलटून गेली. मस्कत लेखमालीकेतील पहिला लेख लिहून तयार आहे. तसेच एखाद दूसरी पाककृतीही देण्याचा मानस आहे. २ दिवस वाढवून मिळतील का?
  • Log in or register to post comments

+१

नगरीनिरंजन
गुरुवार, 10/24/2013 - 13:36 नवीन
शनिवार संध्याकाळ्पर्यंत मुदत वाढवून मिळावी ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+ २

माझीही शॅम्पेन
गुरुवार, 10/24/2013 - 14:57 नवीन
+ २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

पेठकर काका, ननि अन माशॅ चालेल

स्पंदना
गुरुवार, 10/24/2013 - 15:12 नवीन
पेठकर काका, ननि अन माशॅ चालेल जरा दोन दिवसांनी दिला तर, पण फक्त जरा व्याकरण व्यवस्थीत करुन अन मग फाईल न पाठवता डायरेक्ट जीमेल मध्ये चोप्य पेस्त करा. काही फोटोज असतील तर प्लिज त्यांच्या लिक्स पण द्या.सगळेच फोटोज जरा त्रास देताहेत. या मुळे लेख ताबडतोब अपलोड करता येइल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/24/2013 - 20:44 नवीन
सहमत आणि धन्यवाद. व्याकरण तपासून आणि लेखातच छायाचित्रांच्या पुढे जोडण्या (लिंक्स) देतो. आज रात्री लेख पाठवतो. उद्या पाककृती देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

कब है , कब है , कब है,,,,

मुक्त विहारि
गुरुवार, 10/24/2013 - 16:31 नवीन
वो मिपा का दिवाली अंक का प्रकाशन?
  • Log in or register to post comments

धन्यवाद. लेख तयार आहे.

विजुभाऊ
गुरुवार, 10/24/2013 - 16:49 नवीन
धन्यवाद. लेख तयार आहे. शनिवारी सम्ध्याकाळ पर्यन्त टंकुन देतो
  • Log in or register to post comments

तातडीचा निरोप.

प्रभाकर पेठकर
Tue, 10/29/2013 - 15:28 नवीन
दिवाळी अंकाचे दरवाजे बंद झाले का? जरा किलकिले करून एक लेख घेता येईल का? संध्याकाळपर्यंत तयार होईल.
  • Log in or register to post comments

द्या लौकर!

पैसा
Tue, 10/29/2013 - 15:59 नवीन
द्या लौकर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पाठवला आहे.

प्रभाकर पेठकर
Tue, 10/29/2013 - 21:14 नवीन
लेख जिमेल पत्यावर, नोटपॅड फाईल जोडून, पाठवला आहे. मिळाला असल्यास कळवावे. कांही समस्या येत असल्यास तसे कळवावे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मिळाला.

पैसा
Tue, 10/29/2013 - 21:18 नवीन
धन्यवाद! काही समस्या नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

दिवाळीच्या शुभेच्छा

सॅगी
Tue, 10/29/2013 - 22:53 नवीन
दिवाळीनिमीत्त व दिवाळी अंकानिमीत्त सर्व मिपाकरांना शुभेच्छा!!! (अंकाची आतुरतेने वाट पाहणारा)सागर
  • Log in or register to post comments

शुभेच्छा ,

राजु भारतीय
Tue, 10/29/2013 - 22:59 नवीन
दिवाळी अंकाला शुभेछा !
  • Log in or register to post comments

कधी

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 10/30/2013 - 11:25 नवीन
कधी येतोय?
  • Log in or register to post comments

दिवाळी २००१३.

प्रभाकर पेठकर
Wed, 10/30/2013 - 14:12 नवीन
दिवाळी २०१३त..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

काका

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 10/30/2013 - 14:37 नवीन
साधारणपणे कुठल्या तारखेला मिळेल असे विचारायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हलके घ्या.

प्रभाकर पेठकर
Wed, 10/30/2013 - 15:59 नवीन
गम्मत केली हो..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

दिवाळी अंकासाठी शुभेच्छा!

पियुशा
Wed, 10/30/2013 - 14:51 नवीन
दिवाळी अंकासाठी शुभेच्छा! पण मला मागच्या दिवाळी अंकाची लिंक देता का कुणी प्लिझ :) खुप शोधतेय सापड्त नाहिये :(
  • Log in or register to post comments

ही घ्या गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकाची लिंक

भाते
Wed, 10/30/2013 - 15:51 नवीन
http://www.misalpav.com/diwali2012/diwalianka
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

याची पीडीएफ प्रतही मिळते का?

वेल्लाभट
Fri, 11/01/2013 - 13:57 नवीन
याची पीडीएफ प्रतही मिळते का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा