Skip to main content

एक भेट....

लेखक mohite jeevan
Published on गुरुवार, 03/10/2013
रस्त्यात सिंग़्नल पडला आणि मी ग़ाडी थांबवली, आज मी सुट्टी काढली कारण माझा मित्र उमेश कॅन्सरच्या शेवटच्या स्टेपला आहे,कालच त्याच्या भावाने मला सांग़ितले.लहानपणीचा जीवलग मित्र पण, तो राहीला अशिक्षीत आणि मी शाळा शिकून नोकरी. खुप दिवस त्याचा माझा सर्पंक नव्हता, मी नोकरीसाठी ग़ाव सोडले आणि त्याने ग़ावात राहुन शेती केली,ग़ावापासुन जवळच्याच शहरातील हॉस्पिटल मध्ये तो आहे, पण शेवटची घटका मोजत आहे,आसं मला कळाले. सिंग़्नल चालु झाला, मी ग़ाडी हाँस्पिटलच्या दिशेने वळवली,भव्य आशा हाँस्पिटलच्या आवारात मी ग़ाडी पार्कीग़ केली,आणि इकडे तिकडे नजर फिरवली,समोर हिरवळीवर रुग़्णाना त्याचे नातेवाईक खाऊ भरवत होते,तर काही व्हील चेअर वरून रुग़्णाना फिरवत होते,मग़ मी हाँस्पिटलच्या मुख्य दरवाज्याकडे निघालो,मुख्य दरवाजात प्रवेश करताच खुप नर्स,डॉक्टर,पेंशट दिसत होते.मी सरळ रिसेप्शनजवळ गेलो, तेथे चौकशी केल्यावर त्यानी मला आठव्या मजल्यावर जाण्यास सांग़ितले, मी तेथुनच जवळच्या लिफ्ट जवळ गेलो,तेथे खुप ग़र्दी होती, म्हणुन मीच घाई न करता थोडा वेळ बाजुला थांबलो,आनेक रुग़्ण व त्याचे नातेवाईक लिफ्टमधुन ये जा करत होते. आयुष्यात शरिर जो पर्यत निरोगी आहे, तो पर्यंत सर्व ठीक आसते,पण एकदा शरीराला आजारपणाची कीड लाग़ली की शरिर आधु होते, मग़ तेथुन पुर्ण आयुष्यच आधु होते. थोड्यावेळाने लिफ्टवर ग़र्दी कमी झाली, मी लिफ्टमध्ये आत ग़ेलो,आता माझ्याबरोबर लिप्टमध्ये एका लहान मुलाला दोन्ही हातात घेऊन त्या मुलाचा बाप आणि दोन वार्ड बाँय होते.मी त्या मुलांकडे तिरक्या नजरेने पाहीले,त्या मुलाने माझ्याकडे पाहीले आणि किंचीत हास्य केले,मी ही माझ्या चेहर्यावर त्या मुलाला हास्य दाखवले. मग़ त्या मुलाने त्याच्या पायातुन निसटत आसलेले ते वाजणारे चप्पल पाहीले,आणि त्याच्या पप्पाच्या ग़ालाल हात लावत म्हणाले, 'पप्पा माझ्या पायातील चप्पल पडत आहे ते निट बसवा,' आता त्याच्या वडीलानी त्याला घेतले होते म्हणुन मीच ते त्याच्या पायात चप्पल बसवले,पण बसवताना त्याला थोडेसे दुखल्यासारखे झाले, तो ' आ' करून आवाज काढला, म्हणुन मीच त्याला म्हणालो,'नाव काय तुझे?' तो मुलग़ा म्हणाला,' अमोल' पाचवा मजला आला आणि ते सर्व तेथुन उतरले, आजा लिफ्ट मध्ये मी एकटा होतो. मी आठ नंबरचे बटण दाबले आणि लिफ्ट चालु झाली, आज उमेश कँन्सरशी लढत आहे, माणसाला आयुष्यात कशाशी तोंड द्यावे लाग़ेल सांगता येत नाही, उद्या मी ही कोणत्या उबंरट्यावर आसेल सांगता येत नाही. आठवा मजला आला, तेथे चौकशी केली तर खोली नंबर बत्तीस मध्ये उमेश आसल्याच कळाले,मी खोली नंबर पाहत पाहत चाललो,सर्वत्र कँन्सर पिडीत लोक दिसत होते, मी खोली नंबर बत्त्ीस जवळ पोहचलो, एक दार उघडे होते,मी दारातून डोकावुन पाहीले तर उमेशची बायको व मुलग़ा जेवण करीत होते, मी दाराची कढी वाजवली,तशी उमेशची बायकोने मला पाहीले,आणि म्हणाली, 'या भाऊजी या,' तसा मी आत ग़ेलो,उमेशला पाहताच मला कळाले त्याला तंबाखू खाऊन कॅन्सर झालेला होता, कारण त्याच्या नाका व तोंडामध्ये नळ्या घातल्या होत्या, त्याच्या ग़ालाल टाके घातले होते,तो आर्धवट डोळे उघडलेल्या स्थितीत तो होता, त्याची बायको त्याच्या उशासी बसली व त्याच्या डोक्यावरुन हात ठेऊन,मी आल्याच सांग़ु लाग़ली.तसा तो हळुहळु पुर्ण डोळे उघडु लाग़ला,पण त्याला उघडता येत नव्हते, त्याने मान न हलवता तिरकी नजर माझ्याकडे टाकली, पण तो काही बोलु शकला नाही, मला त्याचे एवढे दु:ख वाटले की,मला पाहुन त्याला हासता सुद्धा येत नव्हते. मी हात हालवुन मी आल्याचं सांग़ितल पण त्याचा कोणताही प्रतीसाद नव्हता, मी म्हणालो,'मी तुझा जवळ आसताना तु एक शब्द ही बोलु शकत नाही याच मला लय दु:ख वाटते रे,' आसे म्हणुन माझ्या डोळ्यातुन नकळत आश्रु आले. मी त्याच्याशी आनेक ग़ोष्टी बोललो, तेथे मी जवळ जवळ दोन आडीच तास थांबलो, शेवटी 'वईनी काळजी घ्या' म्हणुन बाहेर पडलो. खुप दु:ख वाटले तेथुन बाहेर पडताना, मरण नको म्हटले तरी प्रत्येकाच्या आयुष्यात कोणाला चुकत नाही, तरी तो प्रेमापोटी तो जग़तो आणि दुसर्याना जगवतो, पण मेल्यावर मात्र सग़ळ्याना तो आठवतो,आयुष्य हे आसच आसत. मनाला आवरत मी लिफ्टमध्ये ग़ेलो ,माझ्याबरोबर लिफ्टमध्ये एक वार्ड बाँय व मी होतो, त्याने पाच नंबर दाबला, आणि पाचवा मजला येताच तो उतरला, आणि तेथील पाचव्या मजल्यावर एक व्हील बेडवर तो अमोल मुलग़ा त्याचा चेहरा घामाने भिजलेल्या बेशुद्ध आवस्थेत पडला होता, बेड ढकलणारा एक वार्ड बाँय, त्याच्या पाठोपाठ त्याचे वडील त्याच्या हातात ते चप्पल होते, ते लिफ्टमध्ये प्रवेश करायच्या आत त्यानी ते चप्पल एका कोपर्यात फेकुन लिफ्टमध्ये आले. मी त्या मुलाकडे पाहत होतो, मी त्या वार्ड बाँयला म्हणालो, 'काय झाले आहे या मुलाला?', त्यावर तो वार्ड बाँय म्हणाला,'याचे दोन्ही पाय काढले आहेत, त्याला एका ग़ाडीने धडक दिल्याच निमित्त झालं आणि माडीची हाडे खराब झालेत,' मला हे ऐकताच जबरदस्त धक्का बसला, लिफ्ट तळ मजल्यावर उतरली, ते वार्ड बाँय त्या मुलाला घेउन बाहेर आला, त्याच्या बरोबर त्याचे वडील ,शेवटी मी लिफ्ट मधुन बाहेर आलो , आणि त्या वेळी माझा मनात नकळत एक विचार आला, ' आपल्या चप्पलावर प्रेम करणारा तो मुलग़ा, सुद्धीवर आल्यावर खरचं तो प्रथम चप्पल माग़ेल की आपले पाय ?'. *
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 6353
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

चांगलं लिहिलं आहे. तुम्ही बर्‍याच प्रकारचं लिहू शकता!

In reply to by धन्या

हायला ! ही पाहुण्याकरवी विंचू मारायची.... आपलं पींक टाकायची आयड्या म्हंजे डब्बल बेनेफीट स्कीम झाली. पींकबी धाग्यावर आणि तंबाखूचा आजारबी मित्राला ;)

In reply to by धन्या

हायला ! ही पाहुण्याकरवी विंचू मारायची.... आपलं पींक टाकायची आयड्या म्हंजे डब्बल बेनेफीट स्कीम झाली. पींकबी धाग्यावर आणि तंबाखूचा आजारबी मित्राला ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आपलं पींक टाकायची आयड्या म्हंजे डब्बल बेनेफीट स्कीम झाली.
ह्ये आसं झालंय बगा. च्यामारी आमी कुटंबी कायबी लिवावं पब्लिकला पिचकारीच वाटतंय. आमच्याच तं वागन्यात गडबड नायी ना. कायी उमगना झालंय. :)

In reply to by धन्या

>>>त्याला या धाग्याचा दुवा दयायला हवा. तो दुवा देईल की बददुवा रे? का नुस्तंच दुदुदुदुदु....वा! - मीच तो प्या रे ;)

In reply to by प्यारे१

प्यारे काका, बद्दुवा कशी हो देणार!? मी आहेच तंबाखू चा व्यसनी! त्यामुळे कुणि काही बोल्लेलं मला लागू पडतच कि हो! :)

तुम्ही कुठल्या एडिटरमधे टंकन करता? त्या एडिटरला एक पुष्पचक्र अर्पण करण्याची इच्छा आहे. मिसळपाववर स्वागत. कंर्तृंत्वांचां नंगांरां अंसांचं गंगंनं चुंबींत जाऊ दे..

In reply to by गवि

गवि काका इत्का प्रयत्न करून ही तुम्हाला ग च्या खाली टींब द्यायला जमलं नाही ना?. खरं खरं सांगा...

खूपच सुंदर लेख हे वाचून नक्कीच ज्याला व्यसन आहे त्याचे व्यसन सुटण्यास मदत होईल

तम्बाखु पेक्षा चपलेचे वर्णन फारच जीव कासाविस करुन गेले.पु ले शु.

कहाणी सगळ्याच्या पार हृदयापर्यंत पोहोचली. लेखन चुका आडव्या आल्या नाहीत. काय बर वाचल आज? हं आठवल! भाषा ही सोयीची दासी असते.

मरे एक त्याचा दुजा भार वाहे | अकस्मात तो ही पुढे जात आहे ! बाकी लहान मुलांची दु:खे मनाला फार लागतात , बिच्यार्यांनी पुरते आयुष्यही पाहीलेले नसते !

लिहलय छान.

मुलांनो, वरचा धडा वाचलात ना ? आता खालील प्रश्नांची थोडक्यांत उत्तरे द्या. १. पार्किंग केलेली गाडी चारचाकी होती की दोन चाकी? २.हॉस्पिटलचे नांव काय होते ? ३. लिफ्टमधे लिफ्टमन का नव्हता ? लिफ्ट नवीन होती का जुनी? (संदर्भः आजा लिफ्ट) ४.अ‍ॅक्सिडेंट केसमधे जखमी झालेल्या मुलाच्या पायातून एक थेंबही रक्त का ठिपकत नव्हते ? ५. ऑपरेशन थिएटर कुठल्या मजल्यावर होते ? ६. बत्तीस नंबर रुमच्या दारात 'कढी' ठेवण्याचे प्रयोजन काय असावे ? ७. खालील शब्दांचा अर्थ सांगा आणि वाक्यांत उपयोग करुन दाखवा. सिंग़्नल, सर्पंक , हाँस्पिटल, शरिर ,आधु , कँन्सर, वार्ड बाँय, आजा लिफ्ट,कढी ,ग़ालाल, उशासी, वईनी, ८. 'आधुनिक' या शब्दाचा अर्थ, त्यातील आधु (मराठी)+ निक(इंग्रजी) या शब्दांच्या समासामुळे मॉडर्न या अर्थी झाला आहे का ?

खालील शब्दांचा अर्थ सांगा आणि वाक्यांत उपयोग करुन दाखवा. सिंग़्नल, सर्पंक , हाँस्पिटल, शरिर ,आधु , कँन्सर, वार्ड बाँय, आजा लिफ्ट,कढी ,ग़ालाल, उशासी, वईनी,
वईनी म्हणल्या सिंग्नल पडला म्हणून आधु लोकाशी सपर्क साधला तर ते हॉस्पिटल मध्ये शरिर घेवुन जात होते कोणी अ‍ॅडमिटच करेनात म्हणून वॉर्ड बॉय ला म्हंटलं "आजा" अन लिफ्ट मधे उशासी घेवून गालाल हात लावत कढी पाजली. तो म्हणाला कढी प्याल्याने कॅन्सर बरा होतो.

ती कोणी / कोणाला दिली हे कोणी सांगेल काय? मोहोतेभाउ.....अजुन अश्या कथा असल्या तर येउद्यात....आज मंदार कात्रे साहेबांची खुप आठवण येतेय.

सदरहू कथेतील त्रुटी व चुकांची यादी बघून लोकसत्तेत शनिवारी येणाऱ्या एका जुन्या सदराची आठवण झाली. त्यामध्ये सुद्धा चित्रपटातील विसंगती वर बोट ठेवले जायचे. उदा. सनी देओल ने उंचावलेला अंगठा jacky श्रोफ्फ्ला विमानातून दिसतो वगैरे ........

लिफ्ट जरा अजुन प्रत्येक मजल्यावर थांबवली असती तर प्रत्येक पेशंटची एक स्वतंत्र कथा झाली असती. असो आपली आपली ईच्छा!