Skip to main content

ख्यातनाम आणि सुप्रसिद्ध मन्ना डे अर्थात मन्नादा कालवश !

लेखक psajid यांनी गुरुवार, 24/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
ख्यातनाम आणि सुप्रसिद्ध गायक मन्ना डे अर्थात मन्नादा यांनी आज पहाटे बंगळूरू येथे अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी त्यांचे वय ९४ होते. शास्त्रीय बाजातील गीत गायन ही त्यांच्या गायकीचे वैशिष्ट होते. हिन्दी, भोजपुरी, मल्याळम, मराठी इत्यादी भाषांमध्ये त्यांनी जवळपास साडे तीन ते चार हजार गीत गायली आहेत. मुकेश, मो. रफी किशोरकुमार यांच्या काळात ही आपली वेगळी गायकी त्यांनी रसिकप्रिय केली. त्यांची जिंदगी कैसी है पहेली हाय (आनंद), लागा चुनरी में दाग (दिल ही तो है), कौन आया मेरे मन के द्वारे (देख कबीरा रोया), तू प्यार का सागर है (सीमा), झनक झनक तोरी बाजे पायलिया (मेरे हुजूर), ऐ मेरी जोहर-ए-जबीं (वक्त), ये रात भीगी-भीगी (चोरी-चोरी), आजा सनम मधुर चांदनी में हम (चोरी-चोरी), जहां मैं जाती हूं वहीं चले आते हो (चोरी-चोरी), बाबू समझो इशारे (चलती का नाम गाड़ी), ना तो कारवां की तलाश है (बरसात की एक रात), दिल का हाल सुने दिल वाला (श्री 420), ऐ मेरे प्यारे वतन (काबुलीवाला), प्यार हुआ इकरार हुआ (श्री 420), मुड़ मुड़ के ना देख (श्री 420), मैं तेरे प्यार में क्या क्या ना बना (जिद्दी), झूमता मौसम मस्त महीना (उजाला), ये हवा ये नदी का किनारा (घर संसार), कस्मे वादे प्यार वफा, सब बातें हैं (उपकार), नदिया चले, चले रे धारा (सफर), जिंदगी है खेल, कोई पास कोई फेल (सीता और गीता), ये दोस्ती हम नही (शोले), पूछो ना कैसे मैंने रैन बिताई (मेरी सूरत तेरी आंखें), आयो कहां से घनश्याम (बुढ्ढा मिल गया) इत्यादी गीते आजही कर्णमधुर वाटतात. हिंदी गीतांबरोबरच त्यांनी मराठी मध्ये सुद्धा पार्श्वगायन केले आहे. त्यांनी अ आ आई, म म मका (एक धागा सुखाचा), गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला (देवकीनंदन गोपाला), धुंद आज डोळे हवा धुंद झाली (दाम करी काम), घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा (वरदक्षिणा) हे मल्हार रागातील गीत अशी विविध गीते मराठीमध्ये गायली होती. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि चित्रपट क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार(सन-२००७ चा) दिला गेला होता. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली - साजीद पठाण .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1388
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

हृदयातून निघणारे सोनेरी सूर हरपले...