✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुबई सफरनामा भाग - 7 शेख झाएद - ग्रेट ग्रँड मॉस्क

श
शशिकांत ओक यांनी
Wed, 10/23/2013 - 00:04  ·  लेख
लेख
दुबई सफरनामा भाग - 7 शेख झाएद - ग्रेट ग्रँड मॉस्क 1 Figure 1 Late President of the United Arab Emirates (UAE), HH Sheikh Zayed bin Sultan Al Nahyan’s Mosque अबुधाबीच्या आमच्या ट्रिपचे महत्वाचे हे आकर्षण होते. ही जगातील सर्वोत्तम प्रचंड म्हणून गाजलेली मशीद. या मशीदीत महिलांना व अन्य धर्मियांना प्रवेश हे ही या मशीदीचे आणखी वैशिष्ठ्य म्हणता येईल. त्यासाठी आमच्यातील स्त्रियांनी काळे बुरखे चढवले व त्या सिद्ध झाल्या. 2 Figure 2 परदे में रहने दो... पुरूषांना प्रसाधनाकडे जरूर जा म्हणून सांगण्यात आले म्हणून आम्ही तळघरातील प्रचंड प्रसाधनगृहाला भेट दिली त्यावेळी हात कोपराकडून पंजाकडे बसून धुवायला सोईचे व्हावे म्हणून केलेली जलनिस्सारणाची सोय भावली. शिवाय अनेक अंशातील आरशांनी सजलेला एक भाग आपल्या शरीरयष्टीला विविधांगानी न्याहाळायला सोईचा वाटला. अल्लाहची 99 नावे कोरलेली पाहिली. 9 टनी झुंबराने लक्ष वेधले. भिंतीवरील नक्षीकामाचा अद्वितीय नमुना न्याहाळला. संपूर्ण जागेला आच्छादणारे कालीन (कार्पेट) पायाला मऊ मऊ लागते होते. ताजमहालाची आठवण करून देणारे मॉन्यूमेंट पाहून आनंद झाला. मानवी हातांतून किती व काय काय कलाकारी निर्माण होऊ शकते याचे उदाहरण म्हणून याकडे पहाताना, त्या सौदर्याचा आस्वाद निरपेक्ष बुद्धीने घेताना, काही अतिताई मुर्ख माझ्या धर्मांच्या प्रतिकांशिवाय जगात काही ठेवायचे नाही अशा कोत्या अविचाराने प्रेरित होऊन हातोडीने ते नष्ट करू पाहतात या विरोधाभासाची प्रकर्षाने आठवण झाली. एक गोष्ट जरा आखरली. प्रवेशद्वाराशी घामाने व वापरून खराब दिसणारी चित्रविचित्र पादत्राणे ठेवायचे स्टँड, जणू मोहक बाळाला नजर न लागावी म्हणून काजळाची तीट लावून काहीसे वैगुण्य दर्शवत होते की काय़? 3 Figure 3 प्रवेशद्वारातील पादत्राणांचे कप्पेदार स्टँड 4 Figure 4 पायधुणी 5 Figure 5 आरसेमहालाचे प्रसाधन 6 Figure 6 99 नावे अल्लाची 7 Figure 7 स्तंभावरील कोरीव काम 8 Figure 8 उंच मिनार 9 Figure 9 गोलघुमट 10 Figure 10 हजार खांबी चौसोपा 11 Figure 11 भिंतीवरील नक्काशी 12 Figure 12 रत्न मढित 9 टनी शँडेलियर असे करता करता आमचा परतीचा दिवस उजाडला. दुपारी 12 पर्यंत खोल्या मोकळ्याकरून दिल्याने काही काळ खरेदीत व काही वेळ लॉबीत रेंगाळत काढून मग आम्ही विमानतळावर पोहोचलो. 13 Figure 3 अलकासह चाललो परतून व्हिसा व पासपोर्टवर ठप्पेठुप्पे मारायचे काम उरकून विमानाची वाट पाहेतोवर अनुभवलेली एक एक दृष्ये मनात तरळली. सुखद सफरीचा परतीचा प्रवास आटोपल्यावर मुंबईतील भुरभुरणारे हवामान व चिकचिकणारा घाम भारताची आठवण देऊन गेला. विस्कळीत वाहनांच्या गर्दीमधून वाट काढत टॅक्सी पुण्याला परतली तोवर झुंजुमंजु 5.30 झाले होते. मग लागलेल्या झोपेत मी अरबींवेषात पुन्हा दुबईला विहार करून आलो, तेंव्हा पुढील सफरनामा लिहायला सुरसुरी आली. मित्रांनो, आपल्याला कसा वाटला सफरनामा सवडीने पण जरूर कळवावा. शशिकांत ओक. मो.- 9881901049. shashioak@gmail.com

Book traversal links for दुबई सफरनामा भाग - 7 शेख झाएद - ग्रेट ग्रँड मॉस्क

  • ‹ दुबई सफरनामा - भाग 5 व 6
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
4234 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

वाव!!! एक नंबर आवडल्या गेली

बॅटमॅन
Wed, 10/23/2013 - 03:42 नवीन
वाव!!! एक नंबर आवडल्या गेली आहे ही मशीद.
  • Log in or register to post comments

मस्त...

मुक्त विहारि
Wed, 10/23/2013 - 08:20 नवीन
झक्कास...
  • Log in or register to post comments

.

उद्दाम
Wed, 10/23/2013 - 11:13 नवीन
छान
  • Log in or register to post comments

सुन्दर

अनिरुद्ध प
Wed, 10/23/2013 - 12:22 नवीन
लेख आणि प्रकाशचित्रे उत्तम आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त जमलाय सफरनामा

कुसुमावती
Wed, 10/23/2013 - 12:44 नवीन
प्रकाशचित्रे अणि लेख दोन्ही उत्तम
  • Log in or register to post comments

छान छान

बापु देवकर
Wed, 10/23/2013 - 12:51 नवीन
छान छान
  • Log in or register to post comments

ऑसम!

अग्निकोल्हा
Wed, 10/23/2013 - 14:27 नवीन
.
  • Log in or register to post comments

छान...

मदनबाण
Wed, 10/23/2013 - 16:20 नवीन
छान...
  • Log in or register to post comments

मस्त.

प्रचेतस
Wed, 10/23/2013 - 16:41 नवीन
मस्त. पण फोटो जरा मोठे टाका की.
  • Log in or register to post comments

आपली फरमाईश बरोबर आहे.

शशिकांत ओक
Wed, 10/23/2013 - 19:36 नवीन
वल्ली व अन्य मित्रांनो, काही फोटो उदा 6,7,8,9 कॅमेरा उभा धरून काढलेले आहेत ते मोठे केले तर ब्लर होतात. असे जाणवते. मला या मधील खास ज्ञात नाही. चुकत माकत जे जमेल तसे सादर करतो. आपण व अन अन्य मित्रांनी फोटो आकार कसा बदलावा ते सांगून जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

यासाठी आपले मार्गदर्शन हवे...

शशिकांत ओक
Wed, 10/23/2013 - 19:49 नवीन
वल्ली अन्य मित्रांनो, उभ्या कॅमेऱयाने काढलेले फोटो क्र 6,7,8,9 आता मोठ्ठे करायला काय करावे लागेल याचे मार्गदर्शन केलेत तर पुढील वेळी ते अमलात आणता येईल. मी त्यांचा साईझ वाढवला तर ते ब्लर होतात असे दिसते. मला याबाबतचे शिक्षण नसल्याने काही काळ बटणांशी चाळेकरून जे पदरात पडेल ते प्रस्तूत करायला मिळते तंसे टाकावे लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

झकास!

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/26/2013 - 06:08 नवीन
झकास! :)
  • Log in or register to post comments

मस्तच

अमेय६३७७
Sat, 10/26/2013 - 07:54 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा