२००३ मधली ब्रिस्बेन कसोटी. भारताचा स्कोर ऑस्ट्रेलियाच्या स्कोरच्या पुढे नेऊन व स्वतः शतक मारून दादा नुकताच आउट झालेला. आगरकर खेळायला आला. मग एक दोन बॉल्स नंतर एक रन काढला आणि जणू शतक मारल्यासारखे बॅट उंचावून सर्वांना दाखवली. स्वतःच्याच अपयशाबद्दल इतक्या सहजतेने सेन्स ऑफ ह्यूमर दाखवणारा खेळाडू क्वचितच कोणी असेल. येथे बॅट दाखवण्याचे कारण म्हणजे त्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौर्यात अजित आगरकर त्यांच्या विरूद्ध सलग ७ वेळा शून्यावर आउट झाला होता. त्यातील चार वेळा 'गोल्डन डक' म्हणजे पहिल्याच बॉलवर! तेथेच त्याला 'बॉम्बे डक' नाव पडले. त्यामुळे मग जेव्हा त्याने त्यानंतर पहिल्यांदा तेथे रन काढला तेव्हा मोठीच कामगिरी होती ती!
पण त्याला 'डक' समजण्यातला धोका कांगारूंना पुढच्याच अॅडलेड कसोटीत दिसला. पहिल्या डावांत साधारण बरोबरी झालेली असताना दुसर्या डावात त्यांचे सहा लोक उडवून आगरकरने मॅच ओपन केली. मग द्रविड ने दुसर्या डावातही शेवटपर्यंत राहून ती जिंकून दिली. पण चौथ्या दिवशी आगरकरने त्या विकेट्स काढल्या नसत्या तर भारताला संधीच मिळाली नसती.
अमेरिकेतील वर्ल्ड सिरीज किंवा इंग्लंड मधली काउंटीची चॅम्पियनशिप आधीच्या सीझन मधे जिंकून देणारा कप्तान जेव्हा निवृत्त होतो तेव्हा मीडियामधले रकाने च्या रकाने त्याला वाहिले जातात. अमेरिकेत पुढे त्यांच्यावर चित्रपट निघतात. आपल्या रणजी ला तेवढी किंमत दिली जात नाही. पूर्वी तेथे धावांचा पाऊस पाडणारे लोक आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकत नसत तेव्हा ठीक होते. पण आता तसे नाही. नाहीतर मागच्या वर्षी अंतिम सामन्यात महत्त्वाच्या वेळेस जबरी बोलिंग करून मुंबईला करंडक जिंकून देणारा खेळाडू इतका दुर्लक्षित राहिला नसता.
मागच्या सीझन च्या आधी आगरकरचे मुंबई व्यवस्थापनाबरोबर काहीतरी वाजले, व तो अचानक संघ सोडून निघून गेला. मग त्याला पटवल्यावर आला, कप्तान झाला व रणजी करंडकच जिंकून दिला. ही खास पाकिस्तानी स्टाईल - आज सर्वसाधारण खेळाडू, उद्या संघाबाहेर्/निवृत्त/बंदी, तर परवा विजयी कप्तान!
आगरकर बद्दल एकदम चपखल कॉमेण्ट एक क्रिकइन्फो वर परवा वाचायला मिळाली - "He would have been the best bowler if an over had only five balls!" :) ओव्हर मधे चार-पाच जबरी भेदक बॉल टाकायचे व त्यातून वाचल्याबद्दल बॅट्समनला बक्षिस दिल्यासारखा एक बॉल द्यायचा ही आगरकरची खासियत. त्यामुळेच तो कधी प्रचंड आवडायचा तर कधी त्याचा प्रचंड राग यायचा.
कौशल्याबद्दल बोलायचे तर फास्ट बोलर चे 'फिजिक' अजिबात नसूनही बर्यापैकी चांगला वेग (आणि ९८ साली तो आला तेव्हा असलेल्या आपल्या बोलर्सच्या मानाने तर खूपच चांगला), खतरनाक स्विंग, चांगला यॉर्कर या जमेच्या बाजू. ओव्हर मधे एक 'हिट मी' बॉल देणे हा मेन प्रॉब्लेम. मात्र इतर सर्व बोलर्सच्या तुलनेत अत्यंत चांगली फिल्डिंग, आणि 'ऑल राउंडर' मधे गणना होण्याएवढी नाही, पण अचानक चमक दाखवणारी बॅटिंग. लॉर्ड्स च्या ड्रेसिंग रूम मधे तेथे कसोटी शतके मारणार्यांची नावे लिहीलेली आहेत तेथे असलेले त्याचे नाव तेथील टूर गाईड आवर्जून दाखवतो.
त्याच्या स्विंगचे एक खतरनाक उदाहरण. रिप्ले मधे लक्ष देऊन बघितलेत तर अफाट स्विंग लक्षात येइल. कालिसचा ऑफ स्टंप उडवणे इतके सोपे नाही.
http://www.youtube.com/watch?v=010HkflyuI4
स्टीव वॉ ने त्याच्या आत्मचरित्रात लिहीले आहे की त्याच्या करीयर च्या सुरूवातीला रिचर्ड्स ला बोलिंग करताना मुद्दाम खुन्नस उकरायला त्याने त्याला बाउन्सर टाकला होता. ही त्याचीच मात्रा वॉ विरूद्ध, त्याच्याच सेलेब्रेटरी शेवटच्या सिरीज मधे
http://www.youtube.com/watch?v=l4v1e_WgYh4
जयसूर्या ९६-९७ मधे पाटा विकेट्स वर व्यंकटेश प्रसाद ई ना ठोक ठोक ठोकायचा (अर्थात प्रसादही आपण हेडिंग्ले च्या स्विंग वाल्या किंवा पर्थच्या बाउन्स वाल्या पिचवर बोलिंग करत आहोत अशा भ्रमात मुंबई व कोलंबोत त्या लाईन-लेन्थ वर जयसूर्याला बोलिंग करायचा). मात्र माझ्या आठवणीत आगरकरने त्याला कधीच जास्त खेळू दिला नाही.
http://www.youtube.com/watch?v=U6GJjE1a6Tw
भारताकडे 'बोल्ड' घेणारे बोलर्स फारसे नव्हते तेव्हा. त्यामुळे याचा यॉर्कर व त्याने उडवलेले बोल्ड व एलबीडब्ल्यूज उठून दिसत. मग नंतर झहीर, इरफान, आरपी सिंग ई. आले.
आगरकरला मॅन ऑफ द मॅच न दिल्याचे मला सर्वात वाईट वाटले होते ते १९९८ च्या श्री लंकेतील 'इंडिपेण्डन्स कप फायनल' ला. याची थोडी पार्श्वभूमी म्हणजे १९९६ मधे वर्ल्ड कप जिंकल्यावर पुढे दोन वर्षे वन डेज मधे लंका सर्वांनाच भारी पडत होते. जुलै १९९८ मधे तेथे ही एक 'इंडिपेण्डन्स कप' स्पर्धा झाली. त्याच्या फायनलला सचिन व दादा दोघांनीही शतके ठोकून भारताला ३०० च्या पुढे नेऊन ठेवले होते. पण लंकेकडे अजूनही फॉर्मात असलेले वर्ल्ड कपचे हीरो होते. त्यांना घरच्या पिच वर ३०० बनवणे तेवढे अवघड नव्हते. पण गोलंदाजीला इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आगरकरने जयसूर्या, कालुवितरणा, रणतुंगा व अरविंदा डीसिल्वा या चार सर्वात महत्त्वाच्या विकेट्स प्रत्येक मोक्याच्या वेळी उडवल्या. त्यामुळेच भारत जिंकला. 'मॅन ऑफ द मॅच' नक्कीच आगरकरला मिळायला हवे होते. प्रत्यक्षात सचिनला दिले गेले. तो चांगला खेळला होताच, पण शतके तर गांगुली व डीसिल्वाने ही मारली होती. हे स्कोरकार्ड बघितल्यावर अंदाज येइल.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/66157.html
याखेरीज आगरकरच्या बर्याच बोलिंग व बॅटिंग मधल्या खेळी लक्षात आहेत. तुमच्याही असतील. अझर, सचिन, गांगुली व द्रविड या चार कप्तानांच्या कारकीर्दीत अनेक वेळा तो संघात आला ते प्रत्येक वेळेस काहीतरी पोटेन्शियल दिसल्यानेच. बर्याच संघनिवडींनंतर "अब ये कहाँसे आ गया?" हा माझ्या एका मित्राचा पेटंट प्रश्न असे. सध्याच्या बोलर्स चा फिटनेस पाहता अजूनही कदाचित आला असता. खरे म्हणजे यावर्षीही त्यालाच मुंबईचा कप्तान करणार होते असे वाचले. रणजीची पहिली मॅच सचिनही खेळणार आहे, तर आगरकरलाही का आग्रह केला नाही कळत नाही. त्याने आधीच निवृत्ती जाहीर केल्याने बॉम्बे डक चे स्वॅन साँग आपल्याला बघायला मिळाले नाही.
एकूण एक बर्याच वेळा डोक्याला ताप देणारा पण तितक्याच वेळा थक्क करणारा खेळाडू. अजित - आम्हा फॅन्स तर्फे धन्यवाद व शुभेच्छा!
वाचने
13743
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
आँ?
In reply to मस्त by प्रचेतस
मस्त आढावा अमोल केळकर
त्याची ही अविस्मरणीय इनिंग विसरणे अशक्य...
स्वतःकडे असलेल्या प्रचंड
सुरेख लेख
हेच..
In reply to सुरेख लेख by बेकार तरुण
मस्त लेख.
आगरकर म्हणजे कधी कधी प्रचंड
+ १
In reply to आगरकर म्हणजे कधी कधी प्रचंड by गणपा
+१११११११
In reply to + १ by मेघवेडा
काटकुळ्या बॉडीतुन आणि
सर्वात बेभरवश्याचा खेळाडु!
घोट्याची दुखापत
इशांत शर्मापेक्षा चांगला हा
In reply to घोट्याची दुखापत by कपिलमुनी
सहमत...
In reply to इशांत शर्मापेक्षा चांगला हा by मृत्युन्जय
+++१११
In reply to सहमत... by नानबा
एक्दम परफेक्ट टिपलेले डीटेल्स
लेखन आवडले,हल्ली क्रिकेट
लेख
अगदी
In reply to लेख by तिमा
टॅलेन्ट वेस्टेड....
अजित आगरकर तसा क्वचितच चांगला
सुरेख लेख!
अजित आगरकर...
गोलंदाजीला इतक्या प्रतिकूल
डावर्या बॅट्समनचा कर्दनकाळ
In reply to गोलंदाजीला इतक्या प्रतिकूल by निनाद मुक्काम …
वाह!
In reply to डावर्या बॅट्समनचा कर्दनकाळ by पैसा
ठांकू!
In reply to वाह! by बॅटमॅन
अर्थातच. सगळे बोलत नाहीत. या
In reply to ठांकू! by पैसा
पण जसं काही पुरुष लोकांना
In reply to अर्थातच. सगळे बोलत नाहीत. या by बॅटमॅन
ऐला जब्रीच की. अशा आया
In reply to पण जसं काही पुरुष लोकांना by गणपा
अर्थातच. सगळे बोलत नाहीत. या
In reply to ठांकू! by पैसा
गुणी खेळाडू खरेच..
लेख आवडला!
माझी एक बालमयत्रीण ऑफ स्पीन
पूर्व जन्मात
In reply to माझी एक बालमयत्रीण ऑफ स्पीन by विजुभाऊ
खल्लास....
In reply to पूर्व जन्मात by चौकटराजा
खल्लास....
In reply to पूर्व जन्मात by चौकटराजा
और ये लगा चौका!!!!!!!
In reply to पूर्व जन्मात by चौकटराजा
एक किस्सा
उत्तम
थोडीफार नशीबानेसुध्धा साथ
२००७
त्या अॅडलेड कसोटीतही आगरकर
>>> त्या अॅडलेड कसोटीतही
जे तेंडुलकर करू शकला नाही.
लॉर्ड्स शतक करण्यात असे काय
सहमत
In reply to लॉर्ड्स शतक करण्यात असे काय by श्रीगुरुजी
बरोबर आहे. उगाच स्टॅटगुरू
In reply to सहमत by बॅटमॅन
>>> वाका वर सेंचुरी मारणारे
सुंदर आढावा... :)