Skip to main content

न्यायव्यवस्थेत लोकांचा सहभाग.

लेखक खटपट्या यांनी शुक्रवार, 18/10/2013 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
न्यायव्यवस्थेत लोकांचा सहभाग. अमेरिकेत काम करत असताना, माझा एक अमेरिकन सहकारी मला म्हणाला कि तो उद्या ज्युरी ड्युटीवर आहे. मी त्याला विचारले कि ज्युरी ड्युटी म्हणजे काय? तर त्याने सांगितलेली माहीती खालील प्रमाणे. अमेरिकेत प्रत्येक मतदात्यास तेथील न्यायव्यवस्थेत सहभागी होण्याची एक दिवस संधी मिळते, त्या दिवसाला ते ज्युरी ड्युटी असे म्हणतात. शासनाकडून प्रत्येकास एक पत्र येते कि तुमची निवड ज्युरी ड्युटी करता झाली आहे. आणि या या दिवशी अमुक न्यायालयात तुम्हाला हजर राहायचे आहे. सधारण ५० लोकांना एका दिवशी बोलावले जाते. मुख्य न्यायाधीश त्यातून १२ लोकांची ज्युरी म्हणून नीवड करतात. बाकीच्यांनी दुसरे न्यायाधीश आपली निवड करेपर्यंत वेटिंग रूम मध्ये थांबायचे असते. निवड केलेल्यासमोर नवीन केसेस ठेवल्या जातात व त्या केस बद्दल या एक दिवसीय ज्युरींची मते विचारली जातात. बर्याच वेळेला या एक दिवसीय ज्युरींची मते निर्णायक ठरतात. किती मतदार सरकारने पाठवलेल्या पत्रास उत्तर देतात माहित नाही. पण अमेरिकन प्रशासनाचा लोकांना न्यायव्यवस्थेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न प्रशन्सनिय आहे. आपल्याकडे असे काही असते तर….
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2441
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

खटपट्या साहेब हे ज्युरी लोक " फिर्यादी अन गुन्हेगारांना" अनरिचेबल असतात. म्हणजे त्यांच्यावर दबाव येउ शकत नाही. + त्यांच्या सुरक्षिततेची सुद्धा हमी असते. आपल्या येथे असे होउ शकते का?

In reply to by स्पंदना

त्यांच्यावर दबाव येउ शकत नाही हे बरोबर. पण जॉन ग्रिशम ची पुस्तके वाचल्यास वकील मंडळी ज्युरींचा अभ्यास करुन त्यांना कशा प्रकारे वळविता येऊ शकेल यासाठी कशा नाना क्लुप्त्या लढवितात ते वाचण्यासारखे आहे.

In reply to by खटपट्या

एक जबरा लेखक.... जमल्यास त्याची सगळी पुस्तके वाचा... पैकी.... "क्लायंट, रन अवे ज्युरी आणि द पेलीकन ब्रीफ " ही ३ तर नक्की वाचा.

In reply to by स्पंदना

खटपट्या साहेब हे ज्युरी लोक " फिर्यादी अन गुन्हेगारांना" अनरिचेबल असतात. म्हणजे त्यांच्यावर दबाव येउ शकत नाही. + त्यांच्या सुरक्षिततेची सुद्धा हमी असते. आपल्या येथे असे होउ शकते का?
रनवे ज्युरी चित्रपट आठवला...(Runaway Jury 2003) नक्कि बघा.

मिपाचे माननीय सदस्य पिडांकाका यानी लेख लिहिलेले आहेत. व माझ्या अर्धवट माहितीनुसार त्यांनी ते अपुरे ठेवलेले आहेत. या निमि त्तने त्यांनी ते पुर्ण कराअवेत याची मी विनंती करतो. शक्य असल्यास इथे कोणी त्या लेखांची लिंक देईल काय ?

PJ मोड ऑन भारतातील न्यायव्यवस्थेतदेखिल लोकांचा सहभाग असतो. अनुभव घ्यायचा असल्यास खालील प्रयोग स्वतःच्या जबाबदारीवर करून पहावा - रस्त्यावर वाहन चालवीत न्यावे. तुमचे वाहन चारचाकी असेल तर दुचाकी वाहनाला अथवा तुमचे वाहन दुचाकी असेल तर पादचार्‍याला किंचित (अक्षरशः किंचित) धक्का द्यावा. आणि - भारतातील न्यायव्यवस्थेतील लोकांच्या सहभागाचा आस्वाद घ्यावा ;) PJ मोड ऑफ असो - अमेरिकेत ज्युरी ड्युटीचे पत्र आल्यास जावेच लागते. नाकारता येत नाही. तसेच तो दिवस हा भरपगारी सुट्टीचा असतो. तुमच्या कंपनीला त्या दिवसाचा पगार तुम्हाला द्यावाच लागतो - काम न करता!

१. अमेरिकेत ज्युरी ड्यूटीसाठी अमेरिकन नागरिकांना जाणं हे ऐच्छिक नाही. कंपल्सरी जावंच लागतं नाहीतर तो गुन्हा ठरतो. हां, तुमची काही स्पेसिफिक अडचण असेल तर दिवस बदलून घेता येतो पण कधी ना कधी जावं हे लागतंच! २. सगळ्या कंपन्या ज्युरी ड्यूटीचे दिवस पगार देत नाहीत. बर्‍याच मोठ्या कंपन्या देतात. छोटे एम्प्लॉयर्स ते देऊ शकत नाहीत. अशा वेळी मी जर कामावर गेलो नाही तर मला त्या दिवसाचा पगार मिळणार नाही (इकॉनॉमिक डिस्ट्रेस) हे कारण देऊन तत्कालीन ज्यूरी ड्यूटी करण्यापासून मुक्तता मिळावी म्हणुन अर्जी करता येते. बहुतेक न्यायाधीश ती मान्य करतात. बाकी इरसाल भाऊंनी मेन्शन केलेल्या लेखनाची लिंक इथे आहे... http://www.misalpav.com/node/9612 त्यांचं बरोबर आहे, ही मालिका पूर्ण झाली नाही कारण ती केस नंतर पुढे अपील झाली. आणि न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे त्यावर अधिक काही लिहिता आलं नाही. आता कदाचित त्या केसचा पूर्ण निकाल लागला असेल पण आता इतक्या दिवसानंतर शिळ्या कढीला ऊत आणण्यात काय मतलब? म्हणून ती मालिका तशीच सोडली, झालं..... :)