त्या इवलुश्या पानावरती
शब्द चिमुकले सांडत होते
फुलपाखरापरी फडफडणारे
कवितेचे मन भासत होते
अलगद कागद हातावरती
हाताच्याही बोटावरती
मन बोटासंगे बोलत होते
शब्द चिमुकले सांडत होते
बरेच काहि अवती भवती
भोवतालीच्या ओठावरती
सार तयाचे मांडत होते
शब्द चिमुकले सांडत होते
मी न माझी, माझे न काहि
माझ्यासाठी मीपण नाहि
नाहि नाहि म्हणता म्हणता
कवितेला मी सांगत होते
ओळी ओळीवर अक्षरांचे
पुंजकेच जणु साठत होते
शब्द म्हणुनी शब्दासंगे
कवितेचे मन डोलत होते
शब्द चिमुकले सांडत होते
शब्द चिमुकले सांडत होते...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4777
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही समजली नाही....
धन्यवाद !
In reply to काही समजली नाही.... by मुक्त विहारि
तुम्ही आणि नविन(?)
In reply to धन्यवाद ! by जेनी...
शब्द चिमुकले सांडत होते
In reply to तुम्ही आणि नविन(?) by मुक्त विहारि
मी इथे नविन आहे , कवितेत काहि
@मी न माझी , माझे न काहि
'त्या एव्ढ्याश्या जालावारती
क्या बात!
ओ नव्या पूजाबै! तुमच नव्यान
@हे म्हणजे कस? प्रेयसीची
In reply to ओ नव्या पूजाबै! तुमच नव्यान by स्पंदना
ईईई
In reply to ओ नव्या पूजाबै! तुमच नव्यान by स्पंदना
कविता कळली...चांगल लिहिता...
कविता जमलिये पण शुद्धलेखनाचं
शुद्धलेखनाचं तेवढं बघा ना...
In reply to कविता जमलिये पण शुद्धलेखनाचं by आनन्दिता
अरे वा!
घुसलीस का? घुसलीस का तिच्या
In reply to अरे वा! by पैसा
थँक्स हं सासुबै !
In reply to अरे वा! by पैसा
(No subject)
पूजा चे हे नवीन रूप चं अहे…
संपूर्ण
आवडली
सगळ्यांचे आभार !
खूप आवडली कविता. अजून एक कर.
बरी आहेस ना पूजा ??
चित्रपटात दाखवतात तसं वार्
इ लिकेद थिस पोएम वेर्य मुच.
(No subject)
खूप छान
उत्तम लिखाण
सुंदर....
छान
चिमुकले वरून आठवलं. नेटवर एक