✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुबई सफरनामा - भाग 5 व 6

श
शशिकांत ओक यांनी
Tue, 10/15/2013 - 20:28  ·  लेख
लेख
दुबई सफरनामा - भाग 5 हरवले ते गवसले का? 1 ‘अटलांटिस’ची आठवण हॉटेल अटलांटिस पाम प्राचीन ग्रीक पुराणात अटलांटिस नावाचे एक संपन्न समाजव्यवस्था असलेले बेट समुद्रात बुडाल्याचा उल्लेख पाश्चात्य लोकांचा एक विरंगुळ्याचा विषय आहे. ते बेट जसेच्या तसे समुद्रातून परत अवतीर्ण झाल्याचा भास निर्माण करायचा प्रचंड खटाटोप शेखदुबईकरांनी केला नाही तरच नवल! आमच्य़ा सफरीतील ते बेट आता हॉटेलच्या रुपात पहायला निघालो. राजू गाईडने अटलांटिसची माहिती नेहमीच्या झोकात सांगितली. कोणा सिनेनटाचा बंगला कुठे आहे याची बितंबातमी ऐकायला उत्सुक आमच्यापैकी काही शौकी होते, त्यांच्या चेहऱ्यावर त्या प्रभृतींना प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान मिळाले असावे. असो. हॉटेलच्या भिंती समुद्राच्या पाण्यातून वर आल्याचा भास निर्माण व्हावा म्हणून शंख-शिंपल्यांच्या कोरलचे खवले त्यात दर्शवले आहेत. 2 छतावरील चित्रकला आमच्या तिकिटात फक्त अटलांटिसचे बाह्यदर्शन होते. जणू चित्रपटगृहाच्या आत डोअरकीपरपर्यंत जाऊन फक्त सिनेमाच्या पोस्टरचा आनंद घ्यावा असे झाले! 3 अटलांटिसचे भव्य आवार पृथु नितंबिनी – 4 विशाल...? कसे नसावे याचे प्रात्यक्षिक द्यायला या महिलेचे आगमन अटलांटिसमधे झाले. पामचे झाड उगवले समुद्रात - 5 समुद्रात उगवले खजूराचा वृक्ष या सर्वाचा अनुभव घ्यावा लागतो. शब्दाने त्याची लज्जत बिघडते... भाग 5 समाप्त पुढे चालू... दुबई सफरनामा - भाग 6 बुर्ज ख़लीफा - दुबईची शान 1 मान वर करून उत्तुंग इमारतीचे कुतुहलाने दर्शन घेताना मान दुखून यायला लागते असे अलकाचे म्हणणे पडले. 164 मजली इमारतीच्या 126व्या मजल्यावर झपाझप जाऊन लगबगीने दुबईचे नयनरम्य दर्शन घ्यायला आम्ही निघालो. त्याआधी मॉलच्या झगमगाटातील विविध ब्रँडच्या मालाच्या दुकानांचा दुरून कानोसा घेत घेत आम्ही वर जायच्य़ा लिफ्ट पाशी जमलो. 3 828 मीटर उंच मनोरा अबुधाबीच्या खलीफांना समर्पित दुबईचे विहंगम दृष्य 2 रात का समा... मन मोरा माचे रे ... 126 व्यामजल्यावर वर शेकड्यांनी लोकांची ही भाऊ गर्दी होती. विविध कोनातून दुबईचे अलौकिक दर्शन घेता घेता दिवेलागणी झाली व सर्वत्र दिवाळीची रोषणाई अवतरली. काहींनी तिथे लावलेल्या दुर्बिणींच्या ताबा घेतला. त्याच्या हँडलला धरून हव्या त्या ठिकाणावर नेम लाऊन एका एका बटनासरशी कळत होते की त्याठिकाणी ती इमारत निर्माण व्हायच्या आधी जागा कशी ओसाड होती, तीच इमारत दिवसा कशी दिसते. वगैरे... काहींनी खाली रंगित फवाऱ्याला पहायसाठी योग्य ती जागा पकडली. तर काहींना ‘चला लवकर, फार गर्दी आहे खाली जायला फार वेळ लागेल’ अशी फुकाची धास्ती वाटून समोर दिसणाऱ्या मनोरम देखाव्याची मजा किरकिरी करण्यात सुख वाटत होते. मनसोक्त देखावा पाहून झाल्यावर आम्ही लिफ्टपाशी आलो व पहात पहाता तळमजल्यावर आलो. काही चाऊम्याऊ चघळत असता उंच उधळलेल्या नीराचे तुषारकण वाकुल्या दाखवून आम्हाला खुणावत होते. नाचऱ्या फवाऱ्याच्या म्युझिकची वाट पहात आम्ही उभे होतो. अचानक संगीताच्या तालावर व स्वरांच्या आरोहा-अवरोहावर रोषणाईचे सुंदर रंग-बिरंगी सहस्र जलधारांचे इंद्रधनु क्षणात अवतरे व दुसऱ्या क्षणी अनोख्या आकृतीत प्रकटे. लहान मोठ्या पाण्याच्या पिचकाऱ्या उत्तुंग होत होत विरत आणि पुढील आकृती बंधाला वाट करून देत टाळ्यांची सलामी घेत. अव्यक्तातून व्यक्त होत त्या रसधारा पुन्हा सरोवराच्या पायाशी लीन होताना, मानवी जीवनाच्या याच अदभूत लीलेचा तो कलाविष्कार असावा असे वाटून एक अध्यात्मिक अनुभूति देऊन गेला. मग भान विसरायला झाले.... शब्द खोळंबले.... नाचरा फव्वारा -
Dubai Fountain Show Burj Khalifa DubaiBurj... by Reisebuero शब्दावाचून नकळत घडले। कौतुकाचे हुंकार आले।। ते जलशिल्प... पाहिले । मनोमनी रोमांच झंकारले ।। भाग 6 समाप्त. पुढे चालू.. मी काढलेल्या कमी प्रतीच्या फोटोंऐवजी वरील भागात काही फोटो व फव्वारा पहायला कॉपी राईटची अडकाठी नसावी तरीही मिपा संचालकांना ते अयोग्य वाटले तर ते कमी केले तरी हरकत नाही. जेथून घेतले त्य़ाठिकाणी काय म्हटले आहे ते सोईसाठी डकवले आहे. (Dailymotion does not own Your Content. By making Your Content accessible to other users (as individuals and/or as a group), you agree to allow any users of the Website - free of charge and for personal use only - to view and transmit Your Content on or through the Website and any other electronic communication media or technology, now known or later developed,)

Book traversal links for दुबई सफरनामा - भाग 5 व 6

  • ‹ दुबई सफरनामा - भाग 3 व 4
  • Up
  • दुबई सफरनामा भाग - 7 शेख झाएद - ग्रेट ग्रँड मॉस्क ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
3505 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

मस्त झक्कास...

मुक्त विहारि
Tue, 10/15/2013 - 21:05 नवीन
थोडे अजून लिहीले असते तरी चालले असते.(असे माझे मत आहे.आग्रह नाही.)
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
Tue, 10/15/2013 - 21:25 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+१

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/16/2013 - 16:51 नवीन
+१ त्या बुर्ज खलिफाच्या शेजारच्या नाचणार्‍या कारंज्यांना मुख्यतः हिंदी गीतांचे पार्श्वसंगीत असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+१

अनिरुद्ध प
गुरुवार, 10/17/2013 - 19:27 नवीन
+१ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

खजूराचे झाड आवडले .

कंजूस
Wed, 10/16/2013 - 15:56 नवीन
खजूराचे झाड आवडले .
  • Log in or register to post comments

विशाल ...?

शशिकांत ओक
Sat, 10/19/2013 - 00:13 नवीन
मित्रांनो,
थोडे अजून लिहीले असते तरी
आता बास म्हणायची वेळ आणणारी काही लेखने आठवून कदाचित त्या मानाने ही स्फूटे फारच आखूड व लांडी वाटतात, असा आपली होरा असावा. ज्या गोष्टींचा आवाका टिचभर त्याला मिठमिरचीची फोडणी देऊन मिया मुठभर दाढी हातभर असा प्रकार व्हायचा. थोडक्यात गोडी राहाते म्हणतात.
नाचणार्‍या कारंज्यांना मुख्यतः हिंदी गीतांचा साज
असेलही, आम्ही तेथे काही मिनिटांचे नृत्य पाहिले कदाचित त्यावेळी हिन्दी संगीताची वेळ नसावी. शिवाय परदेशात गेल्यावर तेथील संस्कृतीची ओळख झालेली मला व्यक्तिशः आवडते. भारतात आले की भारतीय गीत - संगीताचा मारा चालू असतोच, असो. विशाल...? ... वर काही वात्रट प्रतिसाद आला नाही?... बुर्ज खलिफाचा व एक फोटो फव्वारा पाहतानाचा टाकावासा वाटतो. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

फरारी वर्ल्ड राहिलेच की

शशिकांत ओक
Wed, 10/23/2013 - 00:20 नवीन
लाल लाल भडक फरारीच्या प्रचंड जालात आम्ही फोटो काढण्यात रंगलो होतो तोवर राहूल मुत्थांनी पटकन तेथील पुढच्या दिवसाची शो व अन्य थरारक खेळाची तिकिटे काढून घरच्यांना खूश करून टाकले. दुसऱ्या दिवशी आम्ही रेंगाळत काही बाही खरेदीचा बहाणा करून झाल्यावर जवळच्या पुरणमल हॉटेलात भोजनाचा स्वाद घेता घेता, राहूलच्या घरच्यांनी फरारी वर्डच्या वेगवेगळ्या खेळातील चित्तवेधक थरार अनुभवून त्या कहाण्या सांगताना राहूलजींपाशी गराडा पडला... Image removed.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा