लाडली लाडली ,सांवरीया,बिंदी असे हिंदी स्पीड ब्रेकर चुकवत कविता / (अगदीच स्वैर) अनुवाद वाचत होतो आणि तेव्हड्यात पालखीच्या गादीवर , पापण्याच्या पालखीत आणि राखीच्या सणाला चे हिंदाळलेले (इंग्रजाळलेले चे तेजस्वी भावंड) खड्डे लागले आणि जोरदार गचके बसले. एकंदर ही कविता वाचताना यष्टी च्या लाल डब्यात बसून आनेवाडी ते रेठरे (बु.) असा प्रवास केल्या सारखे वाटले.
जाता जाता :ओवाळून जवळ घेईल तिचा भाऊराया यात कोण कोणाला ओवाळणार आहे?
प्रयत्न चांगला आहे तरिहि अनुवाद ब-याच ठिकाणी फसल्या सारखा वाटतो.
शब्द रचना बर्याच जागी खटकते.
बसलेली,फासलेली,बसवूया,भाऊराया वगैरे अजिबात पटत नाहित.
अभिज्ञ.
कवटीजी, अभिज्ञजी,
तुमच्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
तुमची टिका वाचून तसा काय मी मनाक लाऊन घेवचंय नाय.नायतर तुमका खंय खटकतां ,खंय पटना नाय,खंय खड्डे लागले,खंय जोरदार गचके बसले तां माकां कसां कळताला?
खयचीपण कविता मराठीत अनुवाद करूची असली तर सगळेच शुद्ध मराठीतले शब्द असूकच होये ह्या काय माका पटना नाय.मी आपला माझा मत दितय.काय समजल्यात.
आता लाडली,बिंदी हे शब्द आजकाल आपल्या मराठी घरात सुद्धा प्रचलीत आसत. सावरिया हो शब्द मात्र थोडो भायरचो आसा.पण असां बघा प्रचलीत असलेले भायेरचे शब्द, आणि प्रचलीत करून घेवचे म्हणून भायेरचे शब्द, मग "हिंदाळलेले" का असेनात? भाषेची समृद्धी नाय तर कशी होतली? अशी माझी बाबा धारणां आसा.
आता बघा फिल्मी हिंदी गाण्यात पण आपण बरेच मराठी शब्द ऐकतोच नाय काय. उदा.
"गोविंदा आला रे आला
जरा मटकी संभाल ब्रिजबाला"
"आला रे आला" ह्या लिहिण्या ऐवजी काय हिंदी शब्द कवीक आठवले नाय! पण कधीकधी यमक साधूक तसा करुचा लागता.
तसो सांवरीया हो शब्द मी वापरलंय.
तसो एखादो शब्द दुसर्या भाषेतलो असलो आणि कविता अनुवाद करताना इलो तर काय इतक्या मनाक लावून घेवक नको असा माका वाटतां.
मराठी भाषेत शुद्धलेखनावर किती कटाक्ष होतो आता आता पर्यंत?पण आताच्या लेखनात कोण विचारता. "इ" कार "उ" कार हवे तसे लिहीतत वाचतत मां सगळे?तसाच हळू हळू कवितेच्या अनुवादाचा होताला.मी तरी माझ्या कवितेत करतंय.अनुवाद म्हणजे काय कवितेचा "उज्जू" मराठीत भाषांतर नाय, अशी माझी तरी समजूत आसा.मुळ कवितेचो आशय जरी टिकवून ठेवलो तरी फत्ते.
बसलेली,हळद फासलेली,बसवूया,भाऊराया हे शब्द मी आठवले तसे यमक साधूक लिवले.माका सुचला तसा मी केलंय.
आता ह्याच बघा,
"बुगडी माझी सांडली ग
जाता सातारला बाई सातारला"
हेंचा,
"झुमका गिरा रे
बरेली के बाजार मे"
असो अनुवाद केलो म्हणून एका प्रसिद्ध कवयत्रीचा म्हणणा आसा.
ही दोन गाणी प्रसिद्ध असली तरी दोन मोठ्या काव्य करणार्यानी लिहीली आसत.
एकान दुसर्याचो अनुवाद केलो तो काय शब्दशः करूक होयो असा नाय.
कविता अनुवादीत झाली की ती तिच्या पुरती स्वतंत्र होता.मुळ कवितेशी तीचो संबंध रव्हणां नाय असा माका वाटता.
मी अनुवाद केलेलां, कवी.इंदिवरचा, ह्यां मुळ गाणा तुमका माहित आसा काय? सांगा बघूया.
मालवणीत मी एव्हड्यासाठीच लिहिलंय की पुढे मागे मी कवितेत मालवणी शब्द वापरीन कदाचीत तुमका एकदम आश्चर्य वाटू नये म्हणून लिहीलंय.
नायतर म्हणशात "मालवणलेले" खड्डे आणि गचके लागतत म्हणून आणि तसली कविता वाचताना वेंगुर्ल्यासून मालवणाक-हय बुद्रुक मात्र नाय- प्रवास केल्या सारखो वाटता.म्हणून
सगळा कसा गमतीदार वाटूचा म्हणून लिहीलय़.
तसा काय मनाक लावून घेऊ नकात.काय समजल्यात?
तुम्ही माझे वाचक मायबाप तेव्हा तुमच्या प्रतिक्रियेचो आदर ठेवून मी आपला माझा म्हणणा लिहिलंय.एव्हडांच
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
लाडली
अनुवाद.
अनुवाद झाल्यावर ती अनुवादीत कवितास्वतंत्र होता,असा माका वाटतां.