गूढ धीर गंभीर मेघदळ स्तब्ध अचल का वारा ?
चंचल मन बेभान चिंतनी पहाटेस पट कोरा
रुधिराचे घर विषम स्वरांचे हृदयी अलख चकोरा
अंतर्यामी कल्लोळांचा सागर उसळे खारा
नकोच वाटे पण ना त्यजवे कर्तव्याचा तोरा
आस आंसवे अभिलाषेची गोचिड सम अंगारा
पंख निखळले मिटले डोळे अंध दिशा धांडोळा
ना कळते आकळते मग हा जन्म कसा वानोळा ?
........................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4023
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
वानोळा म्हणजे काय ?
मलाही वानोळा म्हणजे काय ते माहीत नाही
In reply to वानोळा म्हणजे काय ? by धर्मराजमुटके
आपल्या प्रतिसादाबद्दल
In reply to मलाही वानोळा म्हणजे काय ते माहीत नाही by सुधीर
मस्त. वाचताना नकळत ताल येतो.
झकास!
सर्वांचे मनापासून आभार