दुबईचा सफरनामा भाग १ व २
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मित्रांनो, विजयादशमीच्या सर्व मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा...
नुकतीच दुबई व आबुधाबीची सपत्निक सफर घडली. त्याच्या संबंधी काही प्रवासवर्णनात्मक ललितलेखन झाले ते 1 ते २ सादर करतो. आवडले तर पुढील धाग्यातून भाग ७ पर्यंत सादर करेन.
दुबई सफरनामा भाग – 1
साईदत्त टुरिझमचे देखणे आयोजन – दुबईची सैर
साईदत्त टुरिझम कडून 'दुबई व अबूधाबी सहलीसाठी फक्त ६जागा शिल्लक!' असा मेसेज आला. त्याच्याकडे मी दुर्लक्ष केले. पण नेमका तो मेसेज अलकाच्या मोबाईलवर देखील आला. सायंकाळी मी घरी आलो तोवर नेहा, चिन्मय, वरदा समावेत अलकाचे दुबईस काय काय खरेदी करायचे बेतही तयार होते! त्याला तसे कारणही होते. १८५०० रुपयात ४ रात्री? शिवाय अबूधाबी सफर! अविश्वसनीय भाड्याने डोळे विस्फारले गेले नाहीत तरच नवल! शिवाय नुकताच निवृतीवेतनातील फरक मिळवून चार पैसे खिशात खुळखुळत होते.
झाले, अलका व मी जाऊन भेटून खरे की काय याची चाचपणी करायला साईदत्तच्या ऑफिसात पोहोचलो. तिथे एक एक बिंगे बाहेर पकडायला लागली! १८५०० रुपयांशिवाय ४५०डॉलरचा चढावा द्यायला लागणार हे कळताच मी मनातल्या मनात गणित करून ५०, ०००च्या आता मामला फिट होतोय असा कयास केला. अलकाच्या मनात लाखात ५ दिवसीय दुबई यात्रा साईदत्त तर्फे करायचे होतेच. मग काय आम्ही पैसे भरून परतलो. हे घडले ३-४ सप्टेंबरला. आणि आज दि. २० सप्टेंबरला विमानात बसून प्रवासात विरंगुळा म्हणून हे लेखन करत आहे.

दुबईचा देखणा विमानतळ पुढील दिवसात भव्य नेत्रदीपक स्थळांची झलक दाखवत असावा...
बोलक्या अलका व अंजली बहिणीद्वय दोन्ही बाजूला व मधे शांत शांत त्यांच्या मावशी, सोबत पत्नी अलका.
--------
दुबई सफरनामा भाग 2
दुबईचे म्युझियम
विमान दुबईस उतरले तेव्हा तिथले सकाळचे ९.३० झाले होते. आम्ही ३५ जण होतो. त्यातील १२ जाणार मारवाड़ी समाजाच्या होते. पुढे परते पर्यंत त्यांच्या व्यापारी नजरेतून जग पहायच्या भूमिकेचे कौतुक व हेवा वाटला. असो.
उत्तुंग इमारती, नवनव्या मॉडेल्सच्या कार्सची गर्दी, मेट्रो लाइन व स्टेशन पहात पहात हॉटेल अँबॅसेडोर कधी आले कळले नाही. बाहेर सणाणून गर्मी वाढवायचा आता आमची वाट पहातात असलेल्या बसमधून आम्ही जवळच्या म्युझियम पहायला निघालो.
सर्वांचे पासपोर्ट हॉटेलवाल्यांच्या स्वाधीन करून झाल्याने ते झंझट संपले होते.
एका गढीवजा मातीच्या भिंतीवरती लिंपण लावलेले होते. मधल्या बखळीसारख्या जागेत एक बिनपाण्याची रहाट- विहीर, जुनाट दोरखंड, एक ब्रिटिश ब्रिटिश कालीन लाकडी नाव, तोफ...मडक्यांच्या विखुरलेल्या खापऱ्या वगैरे माल पाहून ज्यांना 'इतिहास' नाही त्यांना असे काही तरी ठेवून वेळ व जागा भरून काढायला लागते असे वाटले.
सहलीवरून परतताना विमानात बसून दुबईतील थक्क करणारे अनेक प्रकल्प आठवून नवा इतिहास रचण्याची त्यांची जिगर पाहून प्राचीन भारताचा इतिहास पाठीवर ओझ्याप्रमाणे बाळगणाऱ्या आम्हाला नवा इतिहास घडवण्याचा संदेश दुबई देते आहे याची जाणीव झाली.
असाच नौकेतून अरबांचे इतर देशांशी संपर्क होत असत.
ऐतिहासिक तोफा व मातीने लिंपलेल्या धाब्याच्या गढ्या"
नवनिर्माणाचा नवा इतिहास "
गगनचुंबी इमारतीतून ओसंडणारा संपत्तीचा झरा"
भाग 2 समाप्त पुढे चालू...
प्रतिक्रिया
वा काका.
छान आहे.
मोबाईल कॅमेऱ्याच्या सीमित शक्तिनुसार पोटोंची पखरण....
छान सुरुवात.
हे मोबाइल वरुन पोस्टले असल्यास
व्यापारी नजर
सगळे भाग लवकारत लवकर टाका..
मुवि
@ इरसाल....
हो कां....
व्यापारी नजरेतून...
सुन्दर
छान सुरुवात!
वाचतोय, फोटु जरा मोठे टाका की
फोटू...
फोटू...
असं नाही होत. प्रवासवर्णन
'व्यापारी नजर' ही एक धिक्कारणीय बाब आहे - चित्रगुप्त
देशांतरी
अहोभाग्य
नजरे नजरेतला फरक !