✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

म्हणी रिमिक्स! :)

भ
भाग्यश्री यांनी
Sat, 09/20/2008 - 05:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7821 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

अ
अनामिक Sat, 09/20/2008 - 05:57 नवीन

एक आठवलं...

एक आठवलं... हे रिमिक्स नाहिये, पण माझा एक मित्र म्हणायचा... गाढवापूढे वाचली गीता... अन वाचनाराच गाढव होता!!
  • Log in or register to post comments
अ
अथांग सागर Sat, 09/20/2008 - 06:20 नवीन

अति शहाणा

अति शहाणा त्याच्या काखेत कळसा गावाला वळसा,तरीपण त्याचा बैल रिकामाचं.. काट्याने काटा काढायचा असेल तर चमच्याचा काय उपयोग.. --अथांग सागर
  • Log in or register to post comments
अ
अमृता_जोशी Mon, 04/04/2016 - 23:20 नवीन

भारीच्च :-D

भारीच्च :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग सागर
प
प्राजु Sat, 09/20/2008 - 06:27 नवीन

हातच्या

हातच्या कंकणाला हाती कथिलाचा वाळा.. कुर्‍हाडीचा दांडा आरसा कशाला?? बैल गेला आणि चांदण्यात कापूस काती तेल गेले तूप गेले त्याला देव देणार.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sat, 09/20/2008 - 06:44 नवीन

ज्या

ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या मातीच्या चुली चोराच्या मनात कुत्रा पीठ खातो
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 09/20/2008 - 06:52 नवीन

भटाला दिली

भटाला दिली ओसरी मागे विहिर आपल्या गावात बळी अन भट हात पाय पसरी - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sat, 09/20/2008 - 09:56 नवीन

भटाला दिली

भटाला दिली ओसरी मागे विहिर थ्यांक्यू थ्यांक्यू!!!! :) --आपलेच (आणि ओसरीवरचे) भट...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सुनील Fri, 02/13/2009 - 19:26 नवीन

व्वा!

भट मागतो ओसरी, देव देतो ओसरी आणि विहिर! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
भ
भाग्यश्री Sat, 09/20/2008 - 08:17 नवीन

हेहे सही

हेहे सही चाललंय.. येऊदे अजुन.. मीही आठवते तोपर्यंत!
  • Log in or register to post comments
द
दिपोटी Sat, 09/20/2008 - 08:18 नवीन

थोडीशी गंमत

भटाला दिली ओसरी, भट भटणीला मारी बाजारात तुरी, भट हातपाय पसरी नाव सोनूबाई, हाती आलं धुपाटणं तेल गेलं, तूप गेलं, हाती कथलाचा वाळा असेल हरी, तर जमतील भुते (ईति भाग्यश्री) असतील शिते, तर देईल खाटल्यावरी बुडत्याला सत्राशे विघ्ने नकटीच्या लग्नाला काडीचा आधार ता. क. : मंडळी, आजच सभासद झालोय, सांभाळून घ्या ! - दिपोटी
  • Log in or register to post comments
र
राहूल Sat, 09/20/2008 - 08:56 नवीन

गाढव मेलं

गाढव मेलं ओझ्यानं अन् गंगेत घोडं न्हालं. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे अंगण वाकडे. नाचता येईना, गुडघ्याला बाशिंग. गाढवाच्या लग्नाला, उतावळा नवरा. राहूल सॉफ्टवेअर नको पण व्हायरस आवर!
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sat, 09/20/2008 - 09:04 नवीन

>>सॉफ्टवेअर

>>सॉफ्टवेअर नको पण व्हायरस आवर! सह्ही आहे! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राहूल
ख
खादाड_बोका Mon, 09/22/2008 - 08:53 नवीन

मी पण वाईरस झोडपणारा....

मला तर स्वप्नातही भुक लागते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राहूल
Y
yogeshpatil Sat, 09/20/2008 - 08:59 नवीन

घरचं झालं

घरचं झालं थोडं, कडी लावा आतली मी नाही त्यातली, व्याह्यानं धाडलं घोडं चोराच्या मनात मोर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/20/2008 - 09:20 नवीन

म्हणींचं

म्हणींचं रिमिक्स? हम्म! अंमळ मजेशीरच आहे हा धागा! चालू द्या, रिमिक्स्ड म्हणी वाचतो आहे... :) स्वगत - ही भाग्यश्रीदेखील अंमळ व्रात्यच दिसते! :) तात्या.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 09/20/2008 - 12:52 नवीन

तात्या

तात्या तुम्ही पण बनवा की रिमिक्स! :) मी आहेच व्रात्य! :) इतके दिवस शांत बसले होते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
य
यशोधरा Sat, 09/20/2008 - 16:44 नवीन

धमाल

=)) धमाल चाललीय की!!
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 09/20/2008 - 17:54 नवीन

मस्त

रिमिक्स म्हणी वाचुन मजा आली. :)
  • Log in or register to post comments
द
दिपोटी Sun, 09/21/2008 - 08:05 नवीन

आणखी थोडी गंमत

देव तारी त्याला देव देणार साखरेचे खाणार त्याला कोण मारी महापुरे झाडे जाती तेथे तू माझा सांगाती जेथे जातो तेथे लव्हाळे वाचती चोराच्या हातात कोलीत माकडाच्या हातात जामदारखान्याच्या किल्ल्या खाईन तर तुपाशी, नाहीतर मोडून खाल्ली गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर उपाशी उद्योगाचे घरी मातीच्या चुली घरोघरी ॠध्दी सिध्दी पाणी भरी पालथ्या घड्यावर मोर चोरावर पाणी कानामागून आला आणि झोपा केला बैल गेला आणि तिखट झाला - दिपोटी
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sun, 09/21/2008 - 10:00 नवीन

) दिपोटी

:)) दिपोटी मस्तच लिहीताय.. येऊदेत अजुन!
  • Log in or register to post comments
द
दिपोटी Mon, 09/22/2008 - 04:54 नवीन

गंमतच गंमत

गरज सरो, मावशी जगो माय मरो, वैद्य मरो ऐकावे जनाचे, चार दिवस सुनेचे चार दिवस सासूचे, करावे मनाचे चोर सोडून संन्याशाला द्राक्षे आंबट कोल्ह्याला डर कशाला कर नाही त्याला फाशी (... अवांतर : हा नियम अंमलात आणायला हवा) आईजीच्या जीवावर नागोबा हलवायाच्या घरावर बाईजी उदार आयत्या बिळावर तुळशीपत्र गाढवाला द्राक्षे आंबट कोल्ह्याला गुळाची चव काय ? दगडापेक्षा मोती जड नाकापेक्षा वीट मऊ जो दुसर्‍यावरी विसंबला त्याचा बैल रिकामा अति शहाणा त्याचा कार्यभाग बुडाला सुंभ जळाला पण वेळ आली नव्हती काळ आला होता पण पीळ जळत नाही वाणी गायीची, अवलाद भडभुंज्याची ऐट बादशहाची, करणी कसायाची गर्जेल तो कान पिळी बळी तो पडेल काय पुराणातील वांगी, खाणारा म्हणतो वातड - दिपोटी
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 09/22/2008 - 07:56 नवीन

सही

सही ~~~~~~ हसून हसून दमलो !!! दीपोटी लै भारी !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Tue, 09/23/2008 - 10:58 नवीन

करमणूकप्रधान कल्पना आणि त्याला नं १ चा प्रतिसाद

लईच भारी. दिपोटी म्हंजे हाशिवनारा बभ्या हाये
  • Log in or register to post comments
द
दिपोटी Fri, 02/13/2009 - 18:28 नवीन

शिळ्या कढीला ऊत !

काळ आला होता पण तिथी नाही भट आहे पण वेळ आली नव्हती भित्यापाठी अंधार दिव्याखाली ब्रम्हराक्षस तेरड्याचा रंग काळा तो काळा कितीही उगाळा, कोळश्याचा रंग तीन दिवस कुर्‍हाडीचा दांडा निजेला धोंडा भुकेला कोंडा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा गोतास काळ कसायाला करणी कसायाची वाणी गायीची, गाय धार्जिणी भरल्या ब्राम्हणाला चिपाडाचे काय ओझे ? भरल्या गाडीला दही करकरीत आपलेच दात, बोलाचाच भात बोलाचीच कढी, आपलेच ओठ सरड्याची धाव मशिदीत चुकला फकीर कुंपणापर्यंत उथळ पाण्याला काडीचा आधार बुडत्याला खळखळाट फार साखरेचे खाणार त्याला खवखवे खाई त्याला देव देणार नकटीच्या लग्नाला आरसा कशाला ? हातच्या कांकणाला सत्राशे विघ्ने दोन्ही घरचा पाहुणा, ना इकडचा ना तिकडचा धोब्याचा कुत्रा उपाशी प्राण जाये और लाठी भी ना टूटे सांप मरे पर वचन ना जाये - दिपोटी
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 02/13/2009 - 19:28 नवीन

सलाम दिपोटी!!

मस्त सुचतयं तुम्हाला... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
वडापाव Fri, 02/13/2009 - 21:11 नवीन

अजून काही

उंच वाढला एरंड त्याला पावट्याचे निमित्त आणि पाद्र्याला इकडून तिकडून गेले वारे नळी फुंकिली सोनारे तरी होईल का तो इक्षुदंड वडापाव
  • Log in or register to post comments
स
समिधा Fri, 02/13/2009 - 22:45 नवीन

मजा

हे माझी मैत्रिण तिच्या लहान भावाबरोबर भांडताना सतत म्हणत असते सत्य कटु असते नेहमी गोड बोलावे. :) आळस हा माणसाचा शत्रू असतो पण बाईमाणसाचा कधी कधी मित्र असतो. ( हे त्याच्या कडुन एखादे काम करुन घ्यायचे असले की म्हणते ) ;)
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर Fri, 02/13/2009 - 22:57 नवीन

हे एक

प्रेम लाभे प्रेमळाला का अशी फिर्याद खोटी प्रेम कोणीही करेना त्याग ही त्याची कसोटी! नेमके रिमिक्स तर नाही, पण अम्मळ विडंबन.
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 02/14/2009 - 04:23 नवीन

एक नविन म्हण

नाचता येईना ढुंगण वाकडे
  • Log in or register to post comments
ह
हर्षद Sat, 02/14/2009 - 08:13 नवीन

ट्रिपल रिमिक्स

आंधळं द्ळतं, कुत्रा उपाशी, धोबी ना इकडचा ना तिकडचा, दोन्ही घरचा पाहुणा पीठ खातो
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Sat, 02/14/2009 - 08:24 नवीन

नक्को तिथे

नक्को तिथे बोटं घालु नये, आणि घातली तर , वास घेउ नये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद
अ
अमृता_जोशी Mon, 04/04/2016 - 23:20 नवीन

हाहाहा.. :-)

हाहाहा.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद
अ
अमृता_जोशी Mon, 04/04/2016 - 23:19 नवीन

लोल धागा..

लोल धागा..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा