Skip to main content

गुन्हा

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 08/10/2013 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
चल एक गुन्हा, दोघे मिळून करूया आणि मग परत, आपापलं जगूया पाऊस पडला नाही तरी आपण मात्र भिजूया पावसात कोरडे राहण्यापेक्षा नभालाच फितवूया .....चल एक गुन्हा, दोघे मिळून करूया परीघ आहे तुलाही परीघ आहे मलाही परीघातच राहून आपापल्या त्रिज्या थोड्या वाढवूया .....चल एक गुन्हा दोघे मिळून करूया किंवा शहारलेल्या चांदण्यात कधी नुसते बोलत राहूया खूप वेळ......रात्रभर.... नुसते बोलतंच राहूया .....चल एक 'सभ्य' गुन्हा, दोघे मिळून करूया आणि नाहीच जमलं काही तर नजरेनेच सांगूया अनाहूत या 'वाटण्याचा' सोहळा साजरा करूया .....चल एक गुन्हा, आवर्जून करूया आणि मग परत आपापलं जगूया
लेखनविषय:

वाचने 2562
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by चाणक्य

@नम्रता पाहून डोळे पाणावले हो.> =)) नम्रता नव्हे, नरमता आहे ही! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

अंतु बर्वा मोड ऑन- व्वाह, अहो पुण्याचे तुम्ही. बोलण्यात ऎकणार काय आम्हाला- अंतु बर्वा मोड ऑफ :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

परीघातच राहून आपापल्या त्रिज्या थोड्या वाढवूया परीघातच राहून आपल्या त्रिज्यांचा व्यास करु या

शहारलेल्या चांदण्यात कधी नुसते बोलत राहूया खूप वेळ......रात्रभर.... नुसते बोलतंच राहूया
व्वाह यासारखे दुसरे सुख कुठले? चाण्क्य.. सुंदर रचना, पुन्हा पुन्हा वाचावी अशी झालीये...