Skip to main content

अविचल

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 08/10/2013 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुसू पहातो पुसू शके ना अवकाशातिल मेघ दळे उचंबळे तळ लाटेवरती अस्पर्शच पण चंद्र खळे फुटे किनारा व्रण काठावर कातळ अविचल स्वर आदळे घोंघावे वारा माडातुन वय झालेले गोत गळे .................... अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1758
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

इतक्या कमी शब्दात इतकी अर्थपूर्ण रचना!! __/\__!!

अतिशय सुरेख

वरीगिनल कविता आवडली आणि अगदी रहावले नाहि म्हणुन लावतो आहे. पुसू पाहतो पुसू शके ना गालावरचे चुंबन खास उचंबळे मन आठवणींने तव स्पर्शाचा होई भास फुटे बिंग सापडती हीस माझ्या शर्टावरती केस पटवा पटवी घरात चाले, दिवस चार जाणार उदास

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

काय ओ काका? आज गाडी एकदम जोरात आहे...