✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

"लर्न मराठी फ्रॉम इंग्लीश, हिन्दी ! ऑनलाईन अ‍ॅंड फ्री !!" माझा उपक्रम

क
कौशिक लेले यांनी
Fri, 10/04/2013 - 12:22  ·  लेख
लेख
नमस्कार. मी कौशिक लेले, मी २ वेबसाईट (ब्लॉग) तयार केल्या आहेत - एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी आणि दुसरा हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी. http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/ http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.in/ या ब्लॉग मध्ये देवनागरी लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात मराठी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी 'one-stop-shop' असा हा ब्लॉग आहे. Learn Marathi from English मध्ये ११८ धडे आहेत. Learn Marathi from Hindi मध्ये ९१ धडे आहेत. मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या १५ ० च्या आसपास साउन्ड क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना मराठी उच्चार लवकर आत्मसात करता येतील. YouTube Channel Kaushik Lele मी स्वतः माझा छंद म्हणून तमिळ आणि गुजराती पुस्तकावरून शिकलो. त्यावेळी इतरांना मराठी शिकण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत हे तपासायचा मी प्रयत्न केला. काही पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत पण मला ती समाधानकारक वाटली नाहीत. इंटरनेट वर मराठी शिकण्यासाठीचे पर्याय फारच तुटपुंजे आणि अर्धवट सोडलेले दिसले. त्या तुलनेत परकीय भाषा शिकण्यासाठी खूपच पर्याय उपलब्ध आहेत. या वस्तुस्थितीमुळे मी अस्वस्थ झालो. मराठी भाषेचा आग्रह आपण धरतो, अमराठी लोकांनी मराठी शिकलंच पाहिजे असं आपण म्हणतो पण मराठी शिकण्यासाठीचे पुरेसे पर्याय आपण तयार केलेले नाहीत हे मला जाणवलं. इंटरनेटच्या जमान्यात प्रत्येक गोष्ट नेट वरच शोधली जाते. त्यामुळे नेटवरच अशा प्रकारचे साहित्य असले पाहिजे आणि तेही मोफत असावे असे मला वाटले. मला स्वतःला भाषा शिकणे-शिकवणे आवडते आणि मी सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याने स्वतः हे काम करायचं ठरवलं. मी ज्या पद्धतीने तमिळ आणि गुजराती शिकलो त्या पद्धतीने इतरांना मराठी शिकवायचं ठरवलं. त्याप्रमाणे मागच्या वर्षी Learn Marathi from English ब्लॉग ची सुरुवात झाली. एका महिन्यातच ३० च्या वर लेसन्स लिहिले. फेसबुकवर याबद्दल लोकांना कळवले. अपेक्षेप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला. काही जणांनी मेल पाठवून ब्लॉग उपयुक्त वाटतोय हे सांगितल्यावर हुरूप आणखी वाढला. आणि गेल्या दीड वर्षात खूपच प्रगती झाली. Learn Marathi from English/hindi ब्लॉग वापरून काही भारतीय तर काही परदेशीय व्यक्तीही मराठी शिकत आहेत. परंतु या उपक्रमाची माहिती अजून मोठया प्रमाणावर मराठी शिकू इच्छिणार्यंपर्यंत पोचणे गरजेचे आहे. अधिकाधिक मराठी व्यक्तींना या बाबत समजले तर ते इतर अमराठी आणि मराठी शिकू इच्छिणाऱ्यांना हा ब्लॉग वाचण्याबद्दल सांगू शकतात. तरी माझा अल्पसा प्रयत्न आपल्यासमोर मी मांडला. आपण दोन्ही ब्लॉगना भेट देऊन आपल्या प्रतिक्रिया/सूचना कळवाव्यात ही नम्र विनंती. धन्यवाद. कौशिक लेले
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
72768 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

उत्तम उपक्रम. आपल्या

गवि
Fri, 10/04/2013 - 12:27 नवीन
उत्तम उपक्रम. आपल्या कष्टांचे कौतुक आहे. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:03 नवीन
धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अतिशय उत्तम पध्दतीने तुम्ही

क्रेझी
Fri, 10/04/2013 - 12:30 नवीन
*clapping* अतिशय उत्तम पध्दतीने तुम्ही दोन्ही ब्लॉग्सवर मराठी शिकवणी सुरू केली आहे. मी नक्कीच माझ्या फेबुवर ह्या लिंक्स देईन. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:04 नवीन
धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल. --कौशिक लेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेझी

उत्तम उपक्रम

अनिरुद्ध प
Fri, 10/04/2013 - 13:18 नवीन
माझ्या मते हा ब्लोग ईतर भाषिकान्व्यतिरिक्त मराठी भाषिकान्साठी सुद्धा उपयुक्त ठरावा,कारण आताची नवी पिढी ही बहुतेक आन्तरराष्ट्रीय भाषात शिकते आहे. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:06 नवीन
धन्यवाद. हो. आपण म्हणता त्यात तथ्य आहे. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

स्त्युत्य उपक्रम....

नन्दादीप
Fri, 10/04/2013 - 14:51 नवीन
स्त्युत्य उपक्रम....
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:34 नवीन
धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

छान आहे उपक्रम. जमेल तशी

अभ्या..
Fri, 10/04/2013 - 14:52 नवीन
छान आहे उपक्रम. जमेल तशी प्रसिध्दी आणि वापर पण केला जाईल. शुभेच्छा आणि धन्यवाद आहेतच शिवाय आपल्या कष्टांचे कौतुक पण. :)
  • Log in or register to post comments

आणि ब्लॉगवरचा पहिलाच धडा लै

अभ्या..
Fri, 10/04/2013 - 14:53 नवीन
आणि ब्लॉगवरचा पहिलाच धडा लै म्हन्जे लैच आवडण्यात आलेला आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आय लव यू इन मराठी

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:18 नवीन
माझा ब्लॉग वापरून मराठी शिकणऱ्यांना मी मराठी शिकण्याचं कारण विचारायचो. अनेकांचं कारण होतं की त्यांचे प्रियकर/प्रेयसी मराठी आहेत. यात काही परदेशी व्यक्ती ही आहेत. त्यामुळे हे ब्लॉग संपवताना शेवटचा पाठ म्हणून हा विषय घेतला. ब्लॉगभर असलेल्या रूक्ष व्यकरण चर्चेवर हा गोड उतारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

दोन्ही ब्लॉग पाहिले. जबराट

बॅटमॅन
Fri, 10/04/2013 - 17:47 नवीन
दोन्ही ब्लॉग पाहिले. जबराट आवडले. काही उत्साही अन्यभाषिक लोकांना हे फॉर्वर्डण्यात येत आहे होऽऽऽ!!!!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:20 नवीन
धन्यवाद. आपली "दोन्ही ब्लॉग पाहिले. जबराट आवडले" ही प्रतिक्रिया ही जबराट आवडली आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अभिनंदन!

पैसा
Fri, 10/04/2013 - 17:57 नवीन
अभिनंदन आणि असेच मराठीच्या प्रसारासाठी उत्तमोत्तम प्रकल्प तुम्हाला सुचू देत ही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:21 नवीन
धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

छान उपक्रम. धडे अगदी

धन्या
Fri, 10/04/2013 - 18:48 नवीन
छान उपक्रम. धडे अगदी "रीयालिस्टीक" आहेत. :)
  • Log in or register to post comments

एकदम एकदम. पोलीस ५० रूपयात अ

पाषाणभेद
Sat, 10/05/2013 - 01:52 नवीन
एकदम एकदम. पोलीस ५० रूपयात अ‍ॅडजेस्टही करतो आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हा हा हा हा

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:23 नवीन
हा हा हा हा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

धन्यवाद

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:22 नवीन
धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/04/2013 - 19:32 नवीन
चांगला उपक्रम शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:23 नवीन
धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय उत्तम उपक्रम

सव्यसाची
Fri, 10/04/2013 - 19:43 नवीन
अतिशय उत्तम उपक्रम..
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:34 नवीन
धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची

छान उपक्रम आहे..

एस
Sat, 10/05/2013 - 01:53 नवीन
मनापासून शुभेच्छा.
मराठी भाषेचा आग्रह आपण धरतो, अमराठी लोकांनी मराठी शिकलंच पाहिजे असं आपण म्हणतो पण मराठी शिकण्यासाठीचे पुरेसे पर्याय आपण तयार केलेले नाहीत हे मला जाणवलं.
हे मला व माझ्या मित्राला जेव्हा आम्ही एका बदनाम वस्तीतील अभागी 'माणसां'ना शिकवायला जायचो तेव्हा खूपच प्रकर्षाने जाणवले होते. पण इथेच थांबू नका. मुद्रित माध्यमातही हे जरूर आणा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:33 नवीन
धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल. एकदा हे ब्लॉग्स परिपूर्ण आणि निर्दोष असल्याची खात्री पटली की मुद्रित माध्यमात आणता येईल. थोडा काळ गेला आणि अनेकांकडून वापर झाला की या बद्दल खात्री होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

स्त्युत्य उपक्रम

किलमाऊस्की
Sat, 10/05/2013 - 06:41 नवीन
दोन्ही ब्लॉग आवडले. मनःपूर्वक शुभेच्छा! चेपुवर शेअर करत आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:30 नवीन
धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल. चेपु काय प्रकार आहे ? मि.पा. वर नविन असल्याने इथल्या विशेष बोलीची अजून ओळख व्ह्यायची आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किलमाऊस्की

:-)

किलमाऊस्की
Sun, 10/06/2013 - 07:54 नवीन
चेपु - चेहरा पुस्तिका - फेसबुक :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौशिक लेले

अतिशय छान उपक्रम..

मुक्त विहारि
Sat, 10/05/2013 - 06:57 नवीन
अतिशय छान उपक्रम..
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:29 नवीन
धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अरे वा!! माझ्या मुलाला आता

रेवती
Sat, 10/05/2013 - 07:32 नवीन
अरे वा!! माझ्या मुलाला आता तुमच्या ब्लॉगवरून मराठी शिकवत जाईन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:28 नवीन
आपण तर मराठी असणार नं ? मग आपल्याला मराठी शिकवण्यासाठी ब्लॉग का बरं उपयोगी वाटतोय ? Just curios :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आभार ...

चौकटराजा
Sat, 10/05/2013 - 08:47 नवीन
आपल्या या उपक्रमाबद्द्ल आभारी आहे. आपल्याला काही विद्यार्थी मराठी शिकण्यासाठी सुचवीत आहे. माधुरी दीक्षित सचिन तेंडूलकर महेश कोठारे मिलिंद सोमण
  • Log in or register to post comments

खानविलकरांची राहिली की...

एस
Sat, 10/05/2013 - 15:09 नवीन
रच्याकने, संमंचे ह्या उपक्रमाची दखल विभागात नोंद घेतल्याबद्दल अनेक आभार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

हा हा हा हा

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:25 नवीन
हा हा हा हा. आपल्याला त्यांचे ई-पत्ते महिती असल्यास त्यांना जरूर कळवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

धन्यवाद

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:09 नवीन
ज्या ज्या सदस्यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल. आपल्याला शक्य असेल आणि योग्य वाटेल त्या मर्गाने या ब्लॉग्स बद्दल संगावे. ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

विशेष दखल घेतल्याबद्दल धन्यवाद

कौशिक लेले
Sat, 10/05/2013 - 22:12 नवीन
मि.पा. ने या उपक्रमाची विशेष दखल घेतल्याबद्दल मनापसून आभारी आहे
  • Log in or register to post comments

कौशिकचे अमराठींना मराठी

प्यारे१
Sat, 10/05/2013 - 23:59 नवीन
कौशिकचे अमराठींना मराठी शिकवण्याबद्दल कौतुक!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Sun, 10/06/2013 - 11:25 नवीन
धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

स्तुत्य उपक्रम

सर्वसाक्षी
Sun, 10/06/2013 - 08:51 नवीन
मराठी बोलु पाहणार्‍या माझ्या सर्व अमराठी सहकार्‍यांना हे दुवे अवश्य पाठवतो. धन्यवाद
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Sun, 10/06/2013 - 11:27 नवीन
अरे वा अशाच सहकार्याची गरज आहे. मनापासून धन्यवाद. आणि आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

अतिशत स्तुत्य उपक्रम !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 10/06/2013 - 11:37 नवीन
अतिशत स्तुत्य उपक्रम ! मराठी शिकू इच्छिणार्‍या ओळखीच्या सर्व लोकांपर्यंत हे दुवे जरूर पोचविले जातील. तुम्ही मराठी भाषेची खरंच खास सेवा केली आहे.... अनेक धन्यवाद !
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Sun, 10/06/2013 - 13:14 नवीन
अरे वा अशाच सहकार्याची गरज आहे. मनापासून धन्यवाद. आणि आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अतिशत स्तुत्य उपक्रम !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 10/06/2013 - 11:37 नवीन
अतिशत स्तुत्य उपक्रम ! मराठी शिकू इच्छिणार्‍या ओळखीच्या सर्व लोकांपर्यंत हे दुवे जरूर पोचविले जातील. तुम्ही मराठी भाषेची खरंच खास सेवा केली आहे.... अनेक धन्यवाद !
  • Log in or register to post comments

दोन्ही ब्लॉग्स च्या पाठांचं लेखन आणि ध्वनिमुद्रण पूर्ण झाले

कौशिक लेले
Sun, 10/06/2013 - 13:20 नवीन
आज १४ ऑडियो-व्हिडियो क्लिप्स यूट्यूब वर अपलोड केल्या. आता क्लिप्स ची संख्या १५५ झाली आहे. आता इंग्रजी आणि हिन्दी ब्लॉग वरील Glossary type पाठ वगळता प्रत्येक पाठासाठी एकेक ऑडियो-व्हिडियो क्लिप आहे. या बरोबर दोन्ही ब्लॉग्स च्या पाठांचं लेखन आणि ध्वनिमुद्रण पूर्ण झाले.
  • Log in or register to post comments

वेळेचा आणी ज्ञानाचा छान

कंजूस
Mon, 10/07/2013 - 06:04 नवीन
वेळेचा आणी ज्ञानाचा छान सदुपयोग करत आहात गुरुजी .मराठीमध्ये बोलले पाहिजे असे सांगणाऱ्यांनी मात्र आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत धाडणाऱ्यांनी यातून धडा घ्यावा .
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कौशिक लेले
Mon, 10/07/2013 - 13:35 नवीन
आपलं बोलणं खरं आहे. धन्यवाद. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वेळेचा आणी ज्ञानाचा छान

कंजूस
Mon, 10/07/2013 - 06:07 नवीन
वेळेचा आणी ज्ञानाचा छान सदुपयोग करत आहात गुरुजी .मराठीमध्ये बोलले पाहिजे असे सांगणाऱ्यांनी मात्र आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत धाडणाऱ्यांनी यातून धडा घ्यावा .
  • Log in or register to post comments

सुंदर उपक्रम ! अभिनंदन आणि

मदनबाण
Mon, 10/07/2013 - 09:29 नवीन
सुंदर उपक्रम ! अभिनंदन आणि भरपुर शुभेच्छा ! :)
  • Log in or register to post comments

+१

सुधीर
Mon, 10/07/2013 - 11:59 नवीन
अगदी असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा