आम्हाला ही माफक ठोकाठोकी आवडते,
पण दर वेळी नवीन कल्पना लागते.
कारण तीच तीच कल्पना वापरली तर प्रेरणा मिळत नाही.
काम आहे संशोधन आणि विकास मध्ये, आणि त्यात पुन्हा कन्या रास त्यामुळे सततकाम चालु असते.
प्रस्तरारोहण (रॉक क्लांयबिंग), रॅपलिंग, ट्रेकिंग करतो.
'फ्री' वे-वर भन्नाट वेगाने ड्रायविंगही करतो, पण एकटाचं असेन आणि गाडी भाड्याने (रेन्टल) घेतली असेल तरचं! :)
मुशाफिर.
शाखेत जाऊन उड्या मारल्या, दोन चार खेळ खेळले की आठवडाभर पुरेल येवढा ऍड्रिनलिन मिळतो. भारतात तर तो दररोज मिळवण्याची सोय आहे... पण येथे परदेशात सध्या आम्ही सप्ताहिक शाखेवरच भागवतोय!
आपला,
(ऍड्रिनलिन सप्लायर) भास्कर
आम्ही येथे वसतो.
आम्हास आमचं ऍड्रिनलिन मिळतो बाइक वर .... माझ्या सीबिझी वरून ताशी ११०किमी (जास्त नाही पळत .. आता पल्सर २२० नाही तर करिझ्मा घेतोय ..) वेगाने पळवताना .. तोंडात हवा जाउन तोंडाचा ऑटोमॅटीक चंबू होतो ... लॅप मारताना जेंव्हा शु टो रोडला टच होतो ... त्यावेळी एक रोमांच भेट्टो ... तो मला अजुन तरी आनिक कुठे मिळालेला नाही ...
एक स्वप्न आहे हायाबुसा किंवा यामाहा आर-१ चालवण्याचं ....
पॉवरबाज दुचाकीचा फॅन
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
ऍड्रिनलिन ऍड्रिनलिन ऍड्रिनलिन ऍड्रिनलिन ऍड्रिनलिन ऍड्रिनलिन .........
नाव आवडले एकदम. एखादी मनासारखी कविता किंवा लेख लेखणीतून उतरला की मला मिळते ते हेच असावे.
बर्याच वेळेला माझ्या लेकाशी थोडी मस्ती केली किंवा समुद्राकाठी जाऊन नुसत्या फेसाळणार्या लाटा पाहिल्या की मिळते ते हेच असावे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
स्टेजवर विनोदी वगैरे नाटकात ऍक्टिंग करताना भरलेल्या नाट्यगृहातून प्रचंड लाफ्टर मिळतो तेव्हा ऍड्रिनालिन वगैरे वाहत असे पूर्वी...मोरूच्या मावशीचे मी २२ प्रयोग केले ..एकदा खानदेशातल्या एका गावातल्या मैदानात आठ हजार लोक असतील..प्रचंड लाफ्टर यायचे...
( आता ऍक्टिंग करत नाही फारशी ,एकांकिका लिहितो अधून मधून)
... पण आपण लिहिलेले संवाद अभिनेते रंगमंचावर बोलताहेत आणि प्रेक्षकांमध्ये बसून आपण प्रेक्षकांचे प्रतिसाद, हशे ऐकत आहोत ही भावना अफलातून शब्दातीत असते....
स्वतःच्या प्रयोगाला प्रेक्षक फारसे लाभत नाहीत पण जेव्हा कधीतरी असतात, तेव्हा मात्र धमाल असते...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मला सातवी आठवीपर्यंत उंचावरून उड्या मारायला जाम आवडत असे....सज्जावरून जमिनीवर आणि वाळू असेल तर अजून अजून उंचावरून.... दीड मजल्यावरून वगैरे.... तो त्या त्या वयातला ऍड्रिनालिन पसरवून थरार अनुभवायचा प्रकार असावा...
अवांतर : आणि बिल्डिंगच्या बाहेरून ( चोराप्रमाणे) टेरेसपर्यंत जाता येईल काय, याचे मी सतत अवलोकन करत असे....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
आमच्या जुन्या वाड्यातल्या मधल्या चौकात मी वरुन बिनधास्त उड्या मारायचा, चोर पोलीस खेळताना फार फायदा व्हायचा! ;)
एके रात्री मामाच्या घरात गच्चीवरुन थेट खाली अंगणात उडी मारताना अंधारात एक मोठा दगड टाचेखाली आला आणि टाचेच्या हाडाला हेअरक्रॅक गेली, तेव्हापासून असल्या अघोरी उड्या मारणे थांबले!
(खुद के साथ बातां : रंग्या, ह्या मास्तरच्या आणि तुझ्या आवडी जुळतात असे वाटते. एकदा भेटायलाच हवे. त्याच्या घरी जाताना थेट पाईपवरुनच जावे का? एकदम धक्का! :O :? )
चतुरंग
एड्रिनलीन मिळवण्याचा प्रकार!
कधी मैत्रिणींशी गप्पा, तर कधी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जावून. नवर्याशी गप्पा मारल्या कि अनेक दिवस पुरेल इतकं एड्रिनलीन मिळतं.
मुलाशी रोजच खेळते पण एखाद्या दिवशी नाही खेळले तरी तो ब्रेक छान वाटतो व पुढे अनेक दिवस उत्साह टिकतो.
रेवती
गप्पा, तर कधी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जावून
उत्साह टिकवण्यासाठी आणि गेलेला पुन्हा मिळवण्यासाठी , स्वतःला रिजुविनेट करण्यासाठी वरच्या गोष्टी उपयोगी असतीलही....
पण एक क्षणिक थरार ज्यात ऍड्रिनालिन रश होतो ( बाकीची उदाहरणे पहावीत ... बाईक स्पीड, डायव्हिंग फ्रॉम हाईट्स, समुद्र प्रचंड लाटा अंगावर घेणे , रॉक क्लाईंब वगैरे वगैरे )....... या किंवा अशा क्षणिक थराराबद्दल चर्चा अपेक्षित असावी...
माफ करा पण गप्पा आणि कधी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जावून ऍड्रिनालिन रश म्हणजे अंमळ अवघड वाटत आहे बुवा... अर्थात तुमच्या वैयक्तिक अनुभवांबद्दल मला काही म्हणायचे नाही... फक्त चर्चेला अंमळ ( माझ्या दृष्टीने ) योग्य दिशा देण्यापुरताच हा प्रतिसाद...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
गुहागरच्या समुद्रात अंगावर तुमच्या पेक्षा तिप्पट उंचीची लाटेला सामोरे जाऊन ती छातीवर झेलण्यात जो थरार मिळतो तो कशातच नाही. ती लाट तुम्हाला तीनताड भिरकावुन देते आणि तुम्ही होलपटत तडमडत किनार्यावर उडवले जाता .
आणखी एक स्विमिन्ग पूलावरच्या सर्वात उंच ब्रीज वरुन खाली पहातउडी मारायच्या अगोदर पोटात मोट्ठा गोळा येतो. ती कीक कशातच नाही
तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
उतारावरून खाली येताना पेडल मारत सायकल आणखी वेगात खाली आणणे आणि तेवढीच मजा येते त्याच ठिकाणी सायकल खाली न उतरता वर चढवण्यात!
एकूणच 'आता यापुढे एक पाऊलही धावता येणार नाही' एवढा दम लागेपर्यंत धावणं, उड्या मारणं, खेळणं यात मला एकदोन दिवसांपुरतं ऍड्रिनलीन मिळतं!
नीलायम टॉकीज़मागल्या पुला*वरून (आहे का अजून तो?) सायकल खाली सुसाट सोडून बर्यापैकी शेवटापर्यंत आल्यावर काहीतरी आठवावे किंवा कशाचीतरी अचानक भीती वाटावी आणि करकचून ब्रेक आवळावा, आणि त्या धांदलीत तो नेमका पुढच्या चाकाचा ब्रेक निघावा, अशा वेळीस जो अनुभव येतो, त्यातून चढणार्या (आणि घटनोत्तर तितक्याच खाडकन उतरणार्या) ऍड्रिनलीनला तोड नाही!
(*गैरपुणेकरांनी या पुलाच्या ग्रेडियंटची कल्पना येण्यासाठी सॅनफ्रॅन्सिस्कोतले रस्ते आठवावे. किंवा तेही पाहिले नसल्यास समजावणे कठीण आहे.)
पभु देवा
एक रिक्वेस्ट आहे. डायरेक्ट प्रतिक्रिया न टाइपता, त्या प्रतिक्रियेला आपल्याला प्रति -प्रतिक्रिया द्यायची आहे, त्याला 'उत्तर द्या" या लिंक वर क्लिकवावे. आपण डायरेक्ट धाग्यालाच प्रतिक्रिया देतात .. यामुळे आमचे ऍड्रिनलीन प्रमाणापेक्षा वाढत :)
कळावे , लोभ पण असावा..
आज्जे.... दोन दोन दिवस पुरणारं ऍड्रिनलीन ? सोसल का सोसल ?
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
माझी १०० सीसीच आहे बाइक. पण उजवीकडची मुठ जमल तेवढी पिरगाळायची (गाडीवर एकटा असतानाच ) आणि मस्त गाडी कशी पळते बघायची. मजा येते.
साली माझी गरीब दुचाकी ८० म्हणजे डोक्यावरुन पाणी.
पण एकदा हातात पल्सर गावली होती तेव्हा १०० ला जावुन बघितल होत. :)
अहाहा! काय वर्णावी त्या क्षणाचे महती! स्वानुभव घ्याच. पोटात ५-६ किलो ऍद्रिनलीन जमा झाल्यासारख वाटत.
अजुन एक प्रकार म्हणजे भटकंतीला गेल की धोपट मार्ग सोडुन उगाचच किरकोळ पायवाट किंवा जरा वाकडी वाट करुन वर कठीण मार्गाने जायला बघणे. त्यात पाउस असला तर अजुन मज्जाच की. अर्थात ह्या प्रयत्नात पडल तरी ऍड्रिनलीनमुळे काय वाटत नाही :)
मस्कत मध्ये असताना एकदाच ...फक्त एकदाच होन्डा ४०० वर स्पिडोमीटरच्या सूईने १४० आकडा टच केला पण तरीही थ्रोटल पुर्ण ओपन नाही करू शकलो.
विरुद्ध दिशेने एक कंटेनर गेला (स्पीड १२० असावा) आणि माझी बाईक किंचित हलली. ** कपाळात. लगेच वेग आटोक्यात आणला. मागे बसलेला माझा मित्र १० मिनिटांनी म्हणाला, 'कुठे तरी पाणी प्यायला थांबू या का?'
त्यानंतर 'ते' धाडस पुन्हा कधी केले नाही. कदाचित, म्हणूनच हा प्रतिसाद इथे टाकू शकलो.
- राहुल देशपांडे यांचे गायन मैफलीत ऐकणे. बस्स. एकेक ताना, सट्टे ... वसंतरावांची नाट्यगीते, बेगम अख्तरच्या गजला, कुमारांची भजने. "घेता किती घेशील दोहो कराने" अशी गत... देहभान विसरवणारा प्रकार.
- एक काळ असा होता की बाळासाहेब मंगेशकर यांच्या मैफली ऐकल्या. सुमारे पन्नास ! आम्हीही तरुण होतो, बाळासाहेबांचा ताराही अस्मानी चमकत होता. त्यांच्या संगतीत शेकडो तास अशा अवस्थेत गेले की दुसर्या दुनियेत आहोत.
- जी ए कुलकर्णींच्या कथा. काळ : कॉलेजच्या दिवसांमधला. जी एंची पहिली वाचलेली गोष्ट सुद्धा लख्ख आठवते : "प्रदक्षिणा". लाईट गेले होते घरातले. त्यांच्या कथेची नशा रात्रभर उतरली नाही. पुढे वर्षानुवर्षे जी ए मानगुटीवरून उतरले नाहीत. तो काळ आठवतो. विलक्षण "चार्ज्ड" होतो तेव्हा.
- आमच्या शहरातल्या जगप्रसिद्ध आर्ट ग्यालरी मधे गेलो होतो. इंप्रेशनिस्ट भागात गेलो होतो. माने, मोने आदिंची चित्रे होती. त्यातले एक चित्र समोर आले : "नावेतले प्रवासी" . बस्स. तो क्षण आठवतो.
स.प.महाविद्यालयासमोरील गतिरोधकापाशी उभे राहणे...
हा कधीकाळी आमचे ऍड्रिनलीन वाढवून घेण्याचा छंद होता...
समजेल त्याने हसून घ्यावे बाकीच्यांनी वेग कमी न करता निघून जावे...
सध्या ... झी मराठी सा रे ग म प ...
ग्रीनवर पडतो तेव्हा...आहाहा काय सही वाटतं.. असे अनुभव फार थोड्यावेळा येतात..
पण त्या उत्साहात बर्डीचा चान्स जावून बोगी होते..दैव देतं आणि कर्म नेतं..
(भावी टायगर वूड्स)
म्हणूनच लिहिलं.
टायगर वूड्स वरून तरी क्लु लागला हे ऐकून बरं वाटलं. नाहीतर मला गोल्फ (एक छोटा चेंडू आणि अनेक काठ्या यांचा एक खेळ) आणि त्याचे नियमपण समजावून सांगावे लागले असते :)
एकदाच होन्डा ४०० वर स्पिडोमीटरच्या सूईने १४० आकडा टच केला पण तरीही थ्रोटल पुर्ण ओपन नाही करू शकलो.
विरुद्ध दिशेने एक कंटेनर गेला (स्पीड १२० असावा) आणि माझी बाईक किंचित हलली.>>>>>>>>
अग्गाबाबौ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
१४०!!!!!!!!!!!
हे "किंचित" जे असत ना ह्या वेगाला ते "ह्या" दुनियेतुन "त्या" दुनियेत नेवु शकत हे मात्र खर हां.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
प्रतिक्रिया
ऍड्रिनलिन जंकी....
माझा
आम्हाला
जेव्हा काहीतरी सुसाट करावसं वाटतं तेव्हा.......
संघ शाखेत
ऍम द बाइकर
ऍड्रिनलिन ........
ट्रेकिन्ग
थोडा वेगळा अनुभव....ऍड्रिनालिन वाला
मला सातवी
मास्तुरे, अहो मलाही जाम आवडायचे उंचावरुन उड्या मारायला!
१००००% सहमत मास्तर..
बदलत असतो
क्षणिक थरार ?
एक्टर
थरार आणि कीक
अगदी
मला ....
नीलायम...
नवरा
इनंती
मैफिल..
माझी १००
एकदाच....
आमची अड्रानेलिन-पूरके
आमचा रश..
टी वरून मारलेला पहिलाच ड्राईव्ह जेव्हा
बरं झालं
मला त्याची कल्पना होती..
एकदाच