मी ऍड्रिनलीन जंकी आहे. क्रिप्टिक चा आरोप येण्याच्या आधीच स्पष्ट करतो हा काय प्रकार आहे तो. शेवट्च्या चेंडूवर विजयी धाव घेउन भारताचा विजय होतो तेंव्हा हे केमिकल रक्तात धावत असते. ऑस्ट्रेलियात ब्रेट ली १५० + च्या चेंडुला सचिनने जो स्ट्रेट ड्राइव मारला तो आठवा म्हणजे नक्की कळेल. मी फक्त सोपे होण्याकरिता क्रिकेट चे उदाहरण दिले. ह्या केमिकल च्या शोधात आपण सर्व जण असतो. पोटापाण्याच्या उद्योगात सर्वच गुंतलेले असतात. त्या कामाच्या रुटिन चा कंटाळा आला की वेगळ करावसे वाट्ते. नेहेमीच्या कामातला ऍड्रीनलीन चा पुरवठा संपलेला असतो.
माझ्या ओळ्खीचे एक प्रोफेसर आहेत. मध्यम वर्गिय. ह्यांच्याकडे २२ लाखाचा कॅमेरा आहे. जमेल तेंव्हा सुट्टी घेउन हिमालयात जातात. स्टील फोटोग्राफी करतात. तो त्यांचा छंद आहे. त्यांचा संग्रह बघितला की आश्चर्य वाटते. त्यांच्या मास्टर पीस बद्दल त्यांना बोलताना ऐकत रहावेसे वाटते. नंतर लक्षात येते हा छंदापेक्षा ऍड्रिनलीन पाठ्लाग आहे. वर वर बघताना सामान्य दिसणारा माणुस, हिमालयातल्या फोटोग्राफी ची रिस्क घेतो ते सुद्धा कसलाही ग्रुप नसताना. पैसा किती खर्च होतो त्याची पर्वा नाही. इतर वेळी मात्र ५ रुपयाचा पक्का हिशोब.
माझ्याबद्दल म्हणाल तर माझा ऍड्रिनलीन पुरवठा सध्या मि.पा. देते. जिवंत आहोत ह्याची जाणिव देते. मि.पा सद्स्यानी प्रतिक्रियेतुन ठोकले तरी हे मिळ्ते. अर्धवट चालणार्या वॅक्युम क्लिनर प्रमाणे कुठले तरी १ वाक्य घेउन झोड्ल जाते तेव्हासुद्धा . आज काल १.५ तासाचे ६ प्रयोग असतात माझ्या नेहमीच्या तमाशाचे.
सतत बोलत राहुन सुद्धा काहीही थकवा नाही. वर्गपाठाबरोबर ग्रुह्पाठ पण खणखणीत. जोडीला समुपेदशनाची स्व माज सेवा असतेच की. असो मि.पा सोडून तुम्ही तुमचे ऍड्रिनलीन कशात शोधता.
जाता जाता: हा लेख तमाशाच्या मध्यंतरात लिहिला आहे. प्रथमच क्रिप्टीक न लिहिल्याबद्द्ल झेंडा ऊंचा रहे हमारा.
वाचन संख्या
7880
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऍड्रिनलिन जंकी....
माझा
आम्हाला
जेव्हा काहीतरी सुसाट करावसं वाटतं तेव्हा.......
संघ शाखेत
ऍम द बाइकर
ऍड्रिनलिन ........
ट्रेकिन्ग
थोडा वेगळा अनुभव....ऍड्रिनालिन वाला
मला सातवी
In reply to थोडा वेगळा अनुभव....ऍड्रिनालिन वाला by भडकमकर मास्तर
मास्तुरे, अहो मलाही जाम आवडायचे उंचावरुन उड्या मारायला!
In reply to मला सातवी by भडकमकर मास्तर
१००००% सहमत मास्तर..
In reply to थोडा वेगळा अनुभव....ऍड्रिनालिन वाला by भडकमकर मास्तर
बदलत असतो
क्षणिक थरार ?
In reply to बदलत असतो by रेवती
एक्टर
थरार आणि कीक
अगदी
In reply to थरार आणि कीक by विजुभाऊ
मला ....
नीलायम...
In reply to मला .... by ३_१४ विक्षिप्त अदिती
नवरा
इनंती
In reply to नवरा by विनायक प्रभू
मैफिल..
माझी १००
एकदाच....
In reply to माझी १०० by झकासराव
आमची अड्रानेलिन-पूरके
आमचा रश..
टी वरून मारलेला पहिलाच ड्राईव्ह जेव्हा
बरं झालं
In reply to टी वरून मारलेला पहिलाच ड्राईव्ह जेव्हा by एक
मला त्याची कल्पना होती..
In reply to बरं झालं by ३_१४ विक्षिप्त अदिती
एकदाच