Skip to main content

दोष

लेखक सार्थबोध यांनी शुक्रवार, 04/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळलो त्यांच्यात ना मी, पाडले एकटे मला पाहून संधी; काढून वेळ, दोष लावला मला ll १ ll दिवसातले डावपेच रात्री, टाकायचे ठरवले तयांनी रात्र त्यांची चोरली मी, हा दोष लावला मला ll २ ll सभ्य कृतीत चौर्य, काय लागावी झोप तयांना स्वप्ने तयांची चोरिली मी, हा दोष लावला मला ll ३ ll फेडले वागलेले त्यांनी, सोने-पैसा लुप्त झाला परीस त्यांचा चोरला मी, हा दोष लावला मला ll ४ ll सजा तयांना द्याया ईश्वरे, योजून धाडिले संकटाला कृपा ईश्वराची चोरली मी, हा दोष लावला मला ll ५ ll झाले रिक्त कर्माने ते, परी मुळी ना पीळ गेला चोरले मी पुण्य त्यांचे, हा दोष लावला मला ll ६ ll पितळ झाले उघडे तयांचे, वाचा फुटेना बोलायला शब्द त्यांचे चोरले मी, हा दोष लावला मला ll ७ ll -सार्थबोध
लेखनविषय:

वाचने 908
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

छान रचना.