Skip to main content

अशीच आजची रात्र

अशीच आजची रात्र

Published on 20/09/2013 - 01:39 प्रकाशित मुखपृष्ठ
गर्भपात होतोय तुझ्या आठवणीचा २-३ रात्रीची अखंड भेट आपली, आज मात्र आठवणींचा गर्भ धरतो न् धरतो तोच पडतो.. अशा या उघड्या डोळ्यांनी भोसकलेल्या रात्री.. मी टक्क जागा कोण कुठली तू कानी किणकिणतेय तुझी गझल... 'कसली आहेस ग तू' नुसती गझल.. आलीस कधी गेलीस कधी कळलचं नाही गेलीस??? नाहीच तू येतेस आणि भोसकून जातेस या रंगेल रात्रीला... आरपार ...
लेखनविषय:

याद्या 4145
प्रतिक्रिया 21

ह्म्म ! समजली नाहि माफ करा ! थोडा सारांश साण्गाना फुंटी काकु

In reply to by जेनी...

फुंटी, सदस्यकाळ 3 days 21 hours
>२-३ रात्रीची अखंड भेट आपली, आज मात्र आठवणींचा गर्भ धरतो न् धरतो तोच पडतो.. = गर्भात गडबड दिसते. >अशा या उघड्या डोळ्यांनी भोसकलेल्या रात्री.. मी टक्क जागा = गर्भलींग निदान आवश्यक! (कवितेच्या भूमिकेचे) >कोण कुठली तू कानी किणकिणतेय तुझी गझल... 'कसली आहेस ग तू' नुसती गझल.. = मायला! गझलेचा गर्भपात आहे होय! >आलीस कधी गेलीस कधी कळलचं नाही गेलीस??? नाहीच = म्हणजे नक्की काय? गर्भपात होतोयं का नाही? >तू येतेस आणि भोसकून जातेस या रंगेल रात्रीला... आरपार ... = धिस इज नॉट अलाऊड. गर्भपाताच्या ऐवजी भोसकाभोसकी? बरं एवढं करून कविता कशी बाळंत झाली? हा प्रश्न उरलाच!

In reply to by फुंटी

एकतर नांव इकारांत त्यामुळे पूजाचा गैरसमज. `पुरुषाचा गर्भपात' हा त्याहून मोठा झोल. आणि गर्भपात होऊन कविता बाळंत झाली हा पुन्हा क्लायमॅक्स!

संजय, जे न् देखे रवी..मध्ये जगतो तेच लिहायचं म्हटल्यावर असे गोंधळ होणारच..असो..आपल्या बहुमुल्य गर्भलिंग निदानाबद्दल धन्यवाद.

बिभत्सरसातले प्रेमकाव्य.. पहील्या ओळीतच हादरलो..

गर्भपात होतोय तुझ्या आठवणीचा
हम्म आठवण बाळसं धरते हिच एक अल्हाददायक भावना आहे अन तिची अशि कृ विटंबना घडते ? क्या बात है पहिल्या ओळित फिदा.
२-३ रात्रीची अखंड भेट आपली,
दॅट्स वे बिगर दॅन मिअर वन नाइट स्टँड
आज मात्र आठवणींचा गर्भ धरतो न् धरतो तोच पडतो..
शरिर असो वा मन थकवा येणारच इलाज नाही.
अशा या उघड्या डोळ्यांनी भोसकलेल्या रात्री.. मी टक्क जागा कोण कुठली तू कानी किणकिणतेय तुझी गझल... 'कसली आहेस ग तू' नुसती गझल.. आलीस कधी गेलीस कधी कळलचं नाही गेलीस??? नाहीच तू येतेस आणि भोसकून जातेस या रंगेल रात्रीला... आरपार ...
पुन्हा पुन्हा वाचावे अशिच रचना. इथेच थांबु नका लिहीत रहा.

प्रेमकाव्य? कविता चांगली आहे पण भयानक प्रेमकाव्य वगैरे काहीतरी क्याटेगरी पायजे होती.

सर्वांच्या बऱ्यावाईट प्रतिसादाबद्दल धन्यवाद..._/\_...माझ्या चुका नक्कीच काढा...टीकाही करा....सुधारणा सुचवा...पुन्हा एकदा धन्यवाद.

lahanapani ek kavita mhanayacho amhi.."kona aal? koNa aal? ghaaTaavarachee jaakhiNa aalee, piMpaLaavarchaa muMjaa aalaa.." tyaachee aaThavaN aalee. kavitaa Chaan aahe. baakichyaa kavitaapaN vaachaayalaa aavaDateel.

In reply to by सस्नेह

यालाच गर्भपात सुद्धा म्हणु शकते स्नेहांकिता. असो. कविता ही आशयाला धरुन वाचतात. अन तो उलगडणे मह्त्वाचे. शब्दाला शब्द धरुन वाचली तर ती कविता कसली?