॥ प्राजक्त ॥
माझ्या पोरकेपणाचा हा एकंच साथीदार ! त्यामुळे प्राजक्ता बद्दल लिहिण मी कायम टाळत आले. कारण? माझ्यासाठी तो एव्हढा मोठ्ठा आधार होता; की माझ्या शब्दात तो कधीच मावेल असा विश्वास मनी नव्हता. आज मी लिहितेय कारण असं वाटत की ते त्याच देण आहे जे मी कुठतरी व्यक्त केल पाहिजे .
प्राजक्ताची कथा तुम्हाला माहित आहे का? नाही ... ते समुद्र मंथन वगैरे सोडून आणि एक आख्यायिका सांगितली जाते.
ही एक राजकुमारी ! तेजोमय सूर्यावर आसक्त ! राजकुमारी ती; तिचा हट्ट राजान पुरवला. सूर्य देवाला साकड घातल गेल, अन भूलोकीच ते अनोख मागण सूर्य देवान स्वीकारलं.
त्याच्या होकाराला धरून लग्न ठरलं. पण लग्न घटिकेला सूर्य देव फिरकलेच नाहीत. विवाह वेदीवर अपमानित ती बालिका स्व अग्नीत जळून खाक झाली. अन तेथ उमटलं हे स्वर्गीय अद्भुत रोपट .
सुर्यावरील रागाने ती बाकीच्या फुलांसारखी सूर्योदयाला नाही उमलत. ना ही तिची फुल कधी उमलून डोलतात. बस उमललेलं प्रत्येक फुल मूक अश्रु सारख टप , टप गळत!!
कविता या कहाणीवर नाही आहे. पण एक संदर्भ !! हे फक्त त्या सुगन्धी प्राजक्ताच वर्णन.
प्राजक्त
पाच पाकळ्या प्राजक्ताच्या ;
सान चिमुकल्या ; फक्त पांढऱ्या.
देठ ही इवला; संथ केशरी,
देह हलका हवेहूनही ॥
उठण्या आधी भ्रमर पाखरे,
फुलण्या आधी प्रफ्फुल्ल किरणे,
लपून कोपरी फुलूनी गेला
लाजरा प्राजक्त केंव्हाचा ॥
नाही मादक; ना माळण्या,
स्पर्श कुणाचा कधी न भावला,
धरला हाती; त्वरित मळला,
सुकुमार प्राजक्त हा ॥
उपमा याला कवी मनाची,
आणिक कोवळ्या बाल प्रीतीची,
नाजूक हळू गुणगुणण्याची ,
नि:शब्द चांदण्या रातीची ॥
फुलण्यासाठी, फुलून गेला
लकेर मनीची खुलवीत गेला,
तरंग सुगंधी उठवीत गेला,
एकला प्राजक्त हा ॥
वर्गीकरण
कथा माहित
In reply to कथा माहित by आवशीचो घोव्
प्राजक्ताचा उल्लेख "तो" का "ती"
In reply to कथा माहित by आवशीचो घोव्
पारिजात / पारिजातक/ प्राजक्त हे पुल्लिंगी उल्लेख
प्राजक्त
कदाचित
क्या बात है.... बहोत अच्छे...!!
शेफ़ालिका
In reply to शेफ़ालिका by मीनल
मीनल, खूप
सुंदर
सुंदर
प्राजक्ता
अरे
नाते जन्मभराचे
In reply to नाते जन्मभराचे by बेसनलाडू
वरचा फोटु
सुंदर आहे
छान
देठ
In reply to देठ by मीनल
+१
In reply to देठ by मीनल
केशर म्हणून वापरतात देठ!
मस्त कविता, अपर्णा तै, खरच
मस्तच.
ही वाचलीच नव्हती. खूपच छान.
सुंदर
अतिशय सुंदर कविता...
सुंदर.....!