Skip to main content

लघुपाककृतीस्पर्धा

लेखक गणा मास्तर यांनी बुधवार, 17/09/2008 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नमस्कार, अनोख्या पाककृती ज्यांना करता येतात त्यांच्यासाठी ही लघुपाककृती स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहे. स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे १) पाककृती जास्तीत जास्त २० मिनिटांत करता येण्याजोगी हवी. २) घटक पदार्थांमध्ये साबुदाणा, कडीपत्ता, कोथिंबिर चिंच, गुळ, हिंग, सोडा, अंडी, कैरी यांचा समावेश नसावा. ३)खाद्यपदार्थ हा नाष्ट्यासाठीचा पदार्थ हवा. (भाजी नको :H ) ४)मिक्सर किंवा पाटा वरवंटा न वापरता तयार करता येण्याजोगा हवा (ओव्हन टोस्टर चालेल) ५) हिरवी मिरची आणि लिंबु न वापरता करता येण्याजोग्या पदार्थांना प्राधान्य मिळेल (अर्थात हिरवी मिरची आणि लिंबु प्रतिबंधीत नाही) आपापल्या पाककृती पाठवण्याची अंतीम मुदत २५ सप्टेंबर आहे. निकाल २७ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. स्पर्धा जिंकणार्‍याचे/जिंकणारीचे नाव इथे मोठ्या अक्षरांत प्रसिद्ध करण्यात येईल आणि आम्ही भारतात परतल्यावर जिंकणार्‍याला/जिंकणारीला एक मस्त पार्टी देउ. स्पर्धा परी़क्षक म्हणुन आम्ही स्वतः आणि आमचे मित्र फटुसाहेब काम पहातील. अवांतरः घरापासुन लांब रहात असल्याने बरेच दिवस काही चटपटीत खाल्लेल्ले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवेशिका पाठेवुन आम्हाला सहकार्य करावे. -गणा मास्तर (भोकरवाडी बुद्रुक) *सर्व वादविवाद भोकरवाडी न्यायालयाअंतर्गत

वाचने 30397
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

झानटामाटिक नुडल्स. साहित्य. १.मॅगि -२ मध्यम आकाराचे २. १ कांदा ३. १ बटाटा ४. १ सिमला मिर्ची ५. १ टोमॅटो. ६. तेल,मीठ,मोहरी,जिरे, तिखट, हळद (चवी नुसार व एका फोडणी साठि) ७.आले लसुण पेस्ट ८. बटर (२ मोठे चमचे) ९ .टोमॅटो सॉस (चवीनुसार) कृती : भाग १. एका जाड बुडाच्या पातेल्यात २.२५ ग्लास पाणि घालून उकळी फुटल्यावर त्यात मॅगी चे दोन तुकडे घाला व शिजवून घ्या.३ मिनीटे झाल्यावर एका ग्लासात हे पाणि गाळणिने वेगळे काढून घ्या व शिजलेली मॅगि एक वेगळ्या ताटलीत काढून घ्या. भाग २. प्रथम सर्व भाज्या धुवुन व चिरुन घ्या. कांदा व टोमॅटो बारिक चिरावेत. एका पॅन मध्ये २ च. तेल सोडा व त्यात मीठ,मोहरी,जिरे,तिखट्,हळद घालुन फोडणी करून घ्या. त्यात बारिक चिरलेला कांदा २-३ मि. परतुन घ्या. मग ह्यात आले लसुण पेस्ट घालावी व पुन्हा एकदा परतून घ्यावे. त्यातच बारिक चिरलेला टोमॅटो घालून एक वाफ येउ द्या. बटाटा व सिमला मिर्ची घालून थोडे परतवा. ग्लासातील पाण्यात मॅगी बरोबर आलेला नुडल्स मसाला (फक्त एकच पाकिट) घालून ते मिश्रण ह्या भा़जीत ओता. पाणि गरजेनुसार कमी जास्त करावे. व पॅनवर झाकण ठेवून बटाटा बर्‍यापैकी शिजे पर्यंत वाट पहावी. मग त्यात ताटात काढलेली मॅगी घालून मिश्रण नीट मिक्स करून हे २ मिनीटे शिजवून घ्यावे. शिजतानाच त्यात बटर व टोमॅटो सॉस घालावा. जेमतेम पाणी शिल्लक राहिल असे पहावे. हे सर्व झाल्यावर ह्या नुडल्स ताटलीत घेउन गिळाव्यात ह्या नुडल्स एकदम झानटामाटीक लागतात. (झानटामाटिक = लै भारी ?) अभिज्ञ.

एकसे एक पाकृ आहेत!! मस्त!!

चिकन पकोडा बोनलेस चिकन चे तुकडे करून घ्यावेत. साधारण दीड दोन इंच लांब. १ कप बेसन, २ चमचे लाल मिरची पावडर (तिखट), पावचमचा हळद, असल्यास १ चमचा आले लसूण पेस्ट आणि १ चमचा गरम मसाला पावडर , चवीनुसार मीठ हे सर्व पदार्थ एकत्र करून थोडे पाणी घालून भज्याच्या पिठासारखे पीठ बनवून घ्यावे. पीठ खूप पातळ ही नको आणि अतिघट्ट ही नको. कढईत तेल गरम करावे. चिकनचे तुकडे पीठात बुडवून लालसर रंगावर तळावेत. टोमॅटो केचप बरोबर गरमागरम पकोड्यांचा आस्वाद घ्यावा. अगदी झटपट होणारी पाककृती आणि तितकीच स्वादिष्ट. (बोनलेस चिकन पाव ते अर्धा किलो घ्यावे. पीठ कमी पडल्यास लगेचच पटकन परत तयार करता येते. ) पनीर बुर्जी २५० ग्रॅम पनीर चे अगदी बारिक तुकडे करून घ्यावे. १ छोटा कांदा बारीक चिरून घ्यावा. १ टोमॅटो बारिक चिरून घ्यावा. पातेलीत २-३ चमचे तेल गरम करावे. त्यात कांदा परतून घ्यावा. चविनुसार मीठ घाला. ( कांदा परतानाच मीठ घातले तर कांदा पटकन शिजला जातो कारण मीठाने कांद्याला पाणी सुटते आणि विस्तवामुळे पाण्याची वाफ होऊन कांद्यातील पाणी पटकन उडून जाते.). त्यात टोमॅटो घालून तो पण परतून घ्यावा. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, १ चमचा गरम मसाला पावडर , चिमूट्भर हिंग घाला. सर्व व्यवस्थित मिक्स करा. पनीर चे तुकडे घाला . चांगले हलवून घ्या. मंद गॅस वर अर्धा एक मिनिट ठेवा. मधून मधून हलवत रहा म्हणजे भांड्याला चिकटणार नाही. गरम असतानाच ब्रेड बरोबर आस्वाद घ्या. (अमेरिकेत असाल तर भारतीय दुकानात फ्रोजन सेक्शन मध्ये पनीर मिळेल.) ईश्वरी

In reply to by ईश्वरी

चिकन पकोडा सकाळी ८ वाजता? हा रात्री ८ वाजता चांगला राहिल, आंबट द्रव्यासोबत.... - (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)

In reply to by शिवा जमदाडे

>>चिकन पकोडा सकाळी ८ वाजता? हा रात्री ८ वाजता चांगला राहिल, आंबट द्रव्यासोबत.... खाद्यपदार्थ हा नाष्ट्यासाठीचा पदार्थ हवा. (भाजी नको ) असे म्हटले आहे. नाष्टा जसा सकाळचा तसा संध्याकाळचा ही असू शकतो...थोडक्यात मधल्या वेळचे खाणे. स्नॅक्स म्हणा हवंतर. खाद्यपदार्थ 'सकाळच्याच' नाष्ट्यासाठीचा हवा असे म्हटलेले नाही. ईश्वरी

लई भारी दोस्त लोक.... आम्हाला तर वाटल होत अमेरीकेतुन परत जाईपर्यंत काहि चांगल चुन्गल खायलाच मिलनार नाहि.... पण या सगल्या पाकक्रुति बघुन थोड बर वाट्तय....

टोस्ट पोटॅटो ब्रेड ला बटर लावुन घेणे. व थोडे तव्यावर टोस्ट करुन घेणे उकडलेला बटाटा सोलुन व किसुन घेणे. त्यात चवी नुसार तिखट्,मीठ आअमचुर व गरम मसाला पावडर ,बारिक चिरलेली कोथिंबीर एकत्र करणे व ब्रेड ला लावुन घेणे. मग त्यावर चीझ किसुन घालणे व २ मि. Microwave करणे. एकदम चटकमटक लागते हे...!!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

In reply to by गणा मास्तर

काय???? समजल नाही मला???? :B घालु नका कोथिंबीर्....हा हा हा सोप्प आहे.....!!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

साहित्य :-2 वाटी बारीक़ चिरलेले टमाटर २ वाटी बेसन १ चमच हिरवी मिर्ची, आले , लसून पेस्ट (दुकनातुन तयार घ्या) २ चमच ओवा मीठ चवीपुरते हळद कृति : वरील सर्वे साहित्य एकत्र करा व भज्याच्या पीठ सारखे पीठ भिजवा .आता तव्यावर तेल घालून त्यावर चमच्याने पीठ सोडा व पसरून घ्या ,दोन्ही बाजूने खरपूस परतवून घ्या व गरम गरम आमलेट सौसे /लोणचे बरोबर सर्वे करा . लागनारा वेळ - १५ मि. पुनम....

साहित्य:पालक (बारीक़ चिरलेला ) १ वाटी,कांदा (बारीक़ चिरलेला ) १ बेसन 2 वाटी,हिरवी मिर्ची २,मीठ,ओवा १ चामच कृति: पालक धुवून बारीक़ चिरून घ्या ,तयार बेसन ,बारीक़ चिरलेला कांदा,हिरवी मिर्ची,मीठ ,ओवा,मिक्स करा थोड़े पानी घालून भज्याचे पीठ भिजवा. आता कढईमधे तेल तापवून त्यात लहान लहान भजी सोडा व दोनही बाजुनी छान खरपूस तळुन घ्या ।

मस्त मस्त पाककृती येत आहेत. :)

  1. कालच्या पोळ्यांचा कुस्करा करा.
  2. पॅन मध्ये मस्त साजुक तुप टाका, आणि पोळ्यांचा कुस्करा टाकून परता.
  3. त्यात किसलेला गुळ टाकून एकत्र करा.
  4. झकास गोड गोड कुस्करा स्वतः खा आणि बच्चे कंपनी ला द्या.
टीपः तुप, कुस्करा आणि गुळ यातील कोण कोणाच्या नंतर टाकायचे, किती प्रमाणात टाकायचे हे काही आम्हाला माहीत नाही बुवा. ती माहिती आमच्या अन्नपुर्णेला विचारून सांगता येईल..... - (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)

In reply to by शिवा जमदाडे

आवडली - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

•रवा पाव वाटी •आंबट ताक एक वाटी •गाजर , ढब्बू मिरची प्रत्येकी एक, कोबीची चार पाच पाने •एखादी मिरची बारीक चिरुन, थोडं आलं किसून, चवीपुरते मीठ •पावाचे स्लाइस पाच सहा •अमूल बटर / लोणी, चीज रवा ताकात १५ मिनिटे भिजवून ठेवावा. सर्व भाज्या बारीक चिरून त्या भिजवलेल्या रव्यात एकत्र कराव्या. आलं, मिरची, मीठ घालून मिश्रण परत नीट एकत्र करून घ्यावे. पावाच्या एका बाजूला अमूल बटर किंवा लोणी व दुसऱ्या बाजूला ह्या मिश्रणाचा जाड थर द्यावा. ५ मिनिटे स्लाइस तसेच ठेवून द्यावेत. तवा मध्यम आचेवर ठेवावा. तवा तापल्यावर पावाची अमूल लावलेली बाजू आधी भाजून घ्यावी व नंतर दुसरी बाजू भाजून घ्यावी. ताटलीत ठेवून वरून चीज किसून घालावे. गरम गरम वाढावे

ज्वारीच्या पाण्यात धूवून त्यात दही, मीठ, साखर व थोडं कैरीचं लोणचं घालावं. थोडावेळ भिजू द्यावं (दोन मिनिटं). घट्ट वाटल्यास थोडं दूध घाला. रेवती

हिरवे मुग चमचाभर मीठ टाकुन कुकर मधे शिजवुन घ्यावेत. साधरण ३-४ शिट्या पुरेश्या होतात. मुग एका मोठ्या वटित काढुन त्यात दही, टोमॅटो सॉस, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टमाटे, गरजे पुरते लाल तिखट टाकुन एकत्र करावे व वरुन शेव टाकावी. गरम-गरम मुग चाट तयार.

साहित्य : चांगल्या प्रकारच्या ब्रेडचे तुकडे (स्लाइसेस), लाल टोमॅटो, बटर, चिझ, मिरी पावडर, मीठ. कृती : १. टोमाटोच्या चकत्या (स्लाईस) कराव्यात २.ब्रेडचे कडा काढुन टाकावित. ३. चीझचे बारीक पातळ पिस करावेत किंवा किसुन घ्यावा. ४. ब्रेडला बटर लावावे. त्यावर मिरी पावडर टाकावी. मिठ टाकावे. ५. टोमाटोचे स्लाईस त्यावर ठेवावे. त्यावर चिझ चा किस टाकावा. ६. वरुन परत थोडी मिरी पावडर भुरभुरावी. ७. वरती दुसरा ब्रेड स्लाईस बटर लावुन त्यावर ठेवावा. टोमॅटो चिझ सँडविच तयार. टोमॅटो सॉस बरोबर नाही खाल्लेत तरी चालेल. असेही छान लागते. परीसा

In reply to by परीसा

सदर पाककृती धनंजयच्या ओपन फेस टोस्टेड सँडविच (किंवा क्लोज फेस पानीनि)सारखीच आहे. सबब एकच पाककृती दोन स्पर्धकांकडुन स्वीकारता येत नसल्यामेळे आपली प्रवेशिका बाद करण्यात येत आहे. :H स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद. नवीन पाककृती पाठवल्यास नक्की विचार करण्यात येईल. *सर्व वादविवाद भोकरवाडी न्यायालयाअंतर्गत - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

नाचणीचे पीठ २चमचे घेऊन त्यात २ वाट्या पाणी घालून शिजवावे. नंतर त्यात २चमचे दही,चिमूटभर मीठ,थोडे जिरे टाकावे.साधारण १ बाऊल भरून मिश्रण होईल.हा अत्यंत पौष्टिक नाश्ता लहानापासून थोरापर्यंत उपयोगी आहे.'रागी पावडर'म्हणून सर्व देशांत,सर्व मॉल्समध्ये मिळ्ते तेच आपली नाचणी पीठ.दररोज घेतल्यास कॅल्शियमची कमतरता जाणवणार नाही.