"बहर" डॉक्टर श्रीश क्षीरसागर
१००/१२५ वृक्षांची ओघवत्या शैलीत, सचित्र ओळख करून देणारे एक बहारदार पुस्तक.
श्री ज्ञानदेवांच्या समाधीवर सावली धरणाऱ्या "अजान" वृक्षा पासून संपूर्ण भारत भरातल्या गोड्या पाण्यावर तरंगणार्या "जलकुंभी" पर्यंत अनेक वृक्ष ,त्यांचे मूलस्थान, पर्यावर्णातील त्यांचे महत्व, महती आणि माहिती सांगणारे हे पुस्तक हातात घेतले कि ठेववत नाही. अत्यंत सुंदर अशी छायाचित्रे हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिठ्य आहे.
नाशिकच्या दैनिक "गावकरी" मध्ये "बहर' याच नावाने यातील काही लेख डॉक्टरांनी प्रकाशित केले होते. वाचकांचा प्रतिसाद पाहून हे सर्व लेख पुस्तक रुपात प्रसिद्ध झाले आहेत. (प्रकाशन वर्ष २००२)
शहरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या अनेक वृक्षांकडे अनेक वेळेला आपले दुर्लक्ष होते. जसे रस्त्यावरील गर्दीत आपले कोणी असतेच असे नाही, पण एखादी ओळखीची व्यक्ती दिसली तर जसा आनंद होतो, तसा आनंद हे पुस्तक वाचून त्या वृक्षाची ओळख झाल्यामुळे होतो.
उदाहरण म्हणून आजकाल रत्याच्या कडेला विशेषता: नवी मुंबई ,ठाणे, या ठिकाणी पुढच्या १०/१५ दिवसात बहरू लागणाऱ्या (सप्टेंबर/ऑक्टोबर) सप्तपर्णी या वृक्षाचे देता येईल. आपली सातवीन म्हणजे हि सप्तपर्णी हिचे वानस शास्त्रीय नाव "ALSTONIA SCHOLARIS " या नावातील scholaris का आले ते सांगताना डॉक्टर म्हणतात "पूर्वीच्या काळी सप्त पर्णीच्या नरम लाकडाचा शाळेतले फळे तयार करण्यासाठी वापर केला जात असे म्हणून हिच्या नावात स्कॉलर घुसला" अशा प्रकारची मनोरंजनात्मक माहिती मिळवण्यासाठी आणि वृक्ष प्रेम वाढवण्या साठी हा "बहर" एकदा अनुभवायलाच हवा.
वर्गीकरण
पुस्तक ओळख आवडली.
छान ओळख
In reply to छान ओळख by पैसा
आता अशी कित्येक झाडे बघायला मिळत नाहीत
सरळ, सोपे तरिही व्यासंगिक
पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद
In reply to पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद by एस
आंतरजालावर कुठे उपलब्ध आहे का?
In reply to आंतरजालावर कुठे उपलब्ध आहे का? by भ ट क्या खे ड वा ला
नक्कीच.
डॉक्टर श्रीश क्षीरसागर यांनी
छान ओळख...