स्प्लेंडर : शतशब्द-सत्यकथा
लेखनप्रकार (Writing Type)
माझी स्प्लेंडर होती. कोरी करकरीत होती. बरीच वर्षे गावात वापरली.
मग अखेर एक दिवस मुंबई गाठली. तिथेही छान करियर मिळाले. पण मुंबईची लोकल, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी , वेळोवेळी कंपनीने घडवलेल्या विमानयात्रा .... यात स्प्लेंडर घरीच धूळ खात बसली. चार पावसाळेही पाहिले तिने -- माझ्याशिवाय.
आणि एक दिवस मग ठरवलं.
"आता मला स्प्लेंडरची अजिबात गरज नाही. "
होना! लोकल, ट्याक्सी, विमान .... आता स्प्लेंडर कशाला हवी?
.. स्प्लेंडर विकली.
त्यानंतर चारच दिवसात अपघात झाला. माझा डावा पाय चार ठिकाणी फ्रॅक्चर झाला. कोणतीही दुचाकी चालवायला आता मी असमर्थ आहे.
आता मला स्प्लेंडरची अजिबात गरज नाही.
माझ्या त्या 'वाक्याचा' नियतीनं 'हा' अर्थ लावला होता, हे आठवून आजही अस्वस्थ होतं.
प्रतिक्रिया
जमली!
गुड!
जमलीय..
हायकु या काव्य प्रकाराची आठवण
उंहु !!!
(No subject)
प्रेमाचा सल्ला
प्लुस १
नावाचा आणि पापपुण्याचा संबंध नसतो असे वाटते.
मस्त..
चच्।हन सुन्दर् !
छान