अभिप्राय पाहिजे
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
काही दिवसांपूर्वी मित्राकडून समजले कि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने तेथील रहिवास्यांसाठी हेल्प लाईन चालू केली आहे. तेथील ऑपरेटर तुम्ही ८ ८ ८ ८ ० ० ६ ६ ६ ६ वर फोन केला असता महानगर पालिकेच्या कामासंदर्भात माहिती हवी असेल तर देतो. तुमची काही तक्रार असेल तर ती नोंदवून घेतली जाते. तसेच त्या तक्रारीचा क्रमांक तुमच्या सेल फोन वर येतो. तसेच त्या तक्रारीचे त्वरित निवारण केले जाते.
उदा.
तुमच्या घरासमोर कचरा पडला आहे तर तुम्ही काय कराल? नगरसेवकाला फोन कराल मग त्याने काही केले तर ठीक नाही तर परत त्याला फोन कराल. त्या पेक्षा हेल्प लाईनला फोन करा ते त्वरित कारवाई करून घरासमोरून कचरा उचलून नेतील.
तुमच्या घरी पाहुणे आले आहे त्यांना जवळच्या बागेत फिरायला न्यायचे आहे. पण तुम्हाला माहित नाही कि ती उघडी असेल कि नाही. हेल्प लाईनला फोने करा ते तुमच्या भागामध्ये किती उद्याने, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे आहेत ह्याची माहिती, भेट देण्याच्या वेळा, प्रवेश फी असेल तर सांगतील.
घरात साप शिरला आहे काय करणार, त्वरित हेल्प लाईनला फोने करा, तुम्हाला सर्पोद्यानाचा तसेच पिंपरी चिंचवड मधील सर्प मित्रांचे सेल फोन मिलतिल.
घरात नवीन नळ connection घ्यायचे आहे? कोणती कागद पत्रे लागतात, ती कुठून मिळवावीत? कोठे submit करावीत ह्याची माहिती मिळेल. तुमचा वेळ वाचेल.
तुम्हाला marriage certificate पाहिजे. कुठे मिळेल, काय कागदपत्रे लागतात, appointment कशी घ्यावी? सगळी माहिती एका फोन call वर मिळेल.
घरा समोरचे झाड तोडायचे आहे त्या साठी काय करावे?
२ ४ तास औषधे शहरामध्ये कुठे मिळतील?
water tanker कुठे आणि किती रुपयामध्ये मिळेल?
माझ्या घराजवळ किती हॉस्पिटल आहेत? ते कोणी सुविधा देतात?
शवागृह कुठे आहे? त्याची फी किती आहे? विद्युत दाहिनी कुठे आहे?
अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला महानगर पालिकेकडून देत्यात येतील
महानगरपालिकेने आत्ता पर्यंत २८ department चे frequently asked questions ची यादी त्यांच्या वेब साईट वर प्रसिध्य केली आहे. ज्यांना इंटरनेटचा access नाही ते फोन करून माहिती मिळवू शकतात. महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे कि सर्व नागरिकांना लागणारे फॉर्म फुकट देण्यात यावेत. ते तुम्ही महानगरपालिकेच्या साईट वरून download करून शकता.
www.pcmcindia.gov.in
हेल्प लाईन www.pcmchelpline.in
ह्या उपक्रमाबद्दल तुमचे काय मत आहे?
प्रतिक्रिया
चौरा इज द बेस्ट पर्सन टू आस्क!
स्तुत्य उपक्रम!!
+१
तुमचा आयडी भारी आहे
हे
खरेच कि..
?
तुला नाही, मला विचारतायंत
माझं कुणाकडे काही काम नसतं. मी निष्काम कर्मयोगी आहे.
काय करणार
चांगला उपक्रम !
पोलिस खाते महाराष्ट्र शासन चालवते
मदनबाण पोलिस खाते महाराष्ट्र
आर आर आबा
तुमचा निरोप देतो आबांना.
आमचा अनुभव
चिंचवड रॉक्स
अनुभव
चांगली सुविधा