✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक चविसंदर्भात प्रश्न

श
शिल्पा ब यांनी
Sun, 09/01/2013 - 08:43  ·  लेख
लेख
तुम्हा सगळ्यांना शेंगदाण्याची चटणी चवीला कशी असते हे माहिती असेलच. मला तुमची मतं हवी आहेत. समजा तुम्हाला कोणि छान चमचमीत शेंगदाणा चटणी दिली तर तुम्ही कशी खाल? परंपरागतपणे नाही तर तुमची कल्पनाशक्ती पणाला लाऊन सांगा. काही सजेशन खालीलप्रमाणे : sandwich + चटणी olive oil +चटणी रोटी लवाश /पिटा चिप्स क्रिमी चीज - फ़ोण्टिना वगैरे सगळयांना आगावू धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
लेखनप्रकार (Writing Type)
मत
मदत

प्रतिक्रिया द्या
5616 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

सोलापुरी चटणी

अत्रन्गि पाउस
Sun, 09/01/2013 - 09:05 नवीन
असेल तर उत्तमपैकी दहीदूध भात साय घालून ...३ चमचे तूप आणि अर्धी मूठ चटणी .... कशाला आठवण करून दिलीत....
  • Log in or register to post comments

मी तेल आणी चटणी गरमागरम

निवेदिता-ताई
Sun, 09/01/2013 - 09:25 नवीन
मी तेल आणी चटणी गरमागरम भाकरीवर लावुन खाईन
  • Log in or register to post comments

जिलबि सोबत

स्पा
Sun, 09/01/2013 - 10:24 नवीन
जिलबि सोबत ;-)
  • Log in or register to post comments

सॅण्डविच, रोटी ऑलिव्ह ऑइल

नितिन थत्ते
Sun, 09/01/2013 - 10:30 नवीन
सॅण्डविच, रोटी ऑलिव्ह ऑइल सोडून बाकीच्या पदार्थांची नावे प्रथमच ऐकली त्यामुळे पास.
  • Log in or register to post comments

हरकत नाही. तुम्ही एखादी

शिल्पा ब
Sun, 09/01/2013 - 10:40 नवीन
हरकत नाही. तुम्ही एखादी चमचमीत चटणी कशी खाल? एक सर्वे म्हणुन प्रश्न विचारलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

पीनट

तिमा
Sun, 09/01/2013 - 10:45 नवीन
पीनट बटर मधे कालवून शिंगाड्याच्या थालिपीठाशी खाईन म्हणतो.
  • Log in or register to post comments

.

आशु जोग
Sun, 09/01/2013 - 12:29 नवीन
कांदापोह्याऐवजी शेंगदाण्याची चटणी. काळ कित्ती बदललाय नाही ! पूर्वीचं पुणं आता राहीलं नाही.
  • Log in or register to post comments

हा धागा सिरेस आहे का

पाषाणभेद
Sun, 09/01/2013 - 13:01 नवीन
हा धागा सिरेस आहे का मौजमजेसाठी?
  • Log in or register to post comments

प्रतिसाद बघता..

विनटूविन
Wed, 09/04/2013 - 15:32 नवीन
प्रतिसाद बघता.. मधुमेहींसाठी नक्कीच नाही... :), काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

-साबुदाणा खिचडीत कुटाऐवजी

गवि
Sun, 09/01/2013 - 13:03 नवीन
-साबुदाणा खिचडीत कुटाऐवजी -वरील सायीच्या दहीभाताशी अत्यंत सहमत -दहीपोह्यांना फोडणी देऊन त्यासोबत दाण्याची चटणी. -चिंचगुळाच्या चटणीसोबत पावाला लावून त्यात बटाटावडा घालून वडापाव. -अत्यंत बारीक पूडस्वरुपाची असेल (तशी करणं तेल सुटल्याशिवाय कठीणच आहे.. पण पाहिली आहे तशीही.) तर तेलात मिसळून पेस्ट करुन कि़ंचित जाड डोश्यावर मैसूर मसाल्याचा मसाला लावतात तशी.
  • Log in or register to post comments

तुम्ही कधी ज्वारीचे कणीस

विजुभाऊ
Sun, 09/01/2013 - 13:15 नवीन
तुम्ही कधी ज्वारीचे कणीस भाजून खाल्लय का? दही , भाजलेला हुरडा त्यात झक्कास लसूण शेंगदाण्याची चटणी . हे एकत्र कालवलेले. सोबत चमचा म्हणून कणसातलाच एक तुरा. ........ सोबत थोडासा गूळ बाजूला........ आहाहाहाहाहाहाह.......
  • Log in or register to post comments

चटणी कशी खाल

भ ट क्या खे ड वा ला
Sun, 09/01/2013 - 13:20 नवीन
एखाद्या डोंगर पठारावर , चुलीवर केलेल्या नाचणी च्या गरमागरम भाकरी वर थोडे तिळाचे तेल आणि "चटणी" सोबत, हातानेच नुकताच फोडलेला कांदा अशी खायला आवडेल.
  • Log in or register to post comments

तेल + चटणी + बाजरीची शिळी

त्रिवेणी
Sun, 09/01/2013 - 14:54 नवीन
तेल + चटणी + बाजरीची शिळी भाकरी + फोडलेला कांदा +ज्वारीचा चुलीवर भाजलेला पापड किवा बिबड्या+ फोडलेला कांदा माझे खुप खुप आवडते.
  • Log in or register to post comments

परोठ्यामध्ये स्टफ करुन चटणी

अजया
Sun, 09/01/2013 - 16:51 नवीन
परोठ्यामध्ये स्टफ करुन चटणी पराठा! तो पराठा मंद आचेवर शेकुन खुसखुशीत करायचा. फक्त चटणी बारीक करुन घ्यावी लागेल.
  • Log in or register to post comments

अर्थातच

अग्निकोल्हा
Mon, 09/02/2013 - 00:59 नवीन
वरणभातामधे कालवुन खाइन.
  • Log in or register to post comments

तेल नैतर दह्यासोबत लैच जब्री

बॅटमॅन
Wed, 09/04/2013 - 12:31 नवीन
तेल नैतर दह्यासोबत लैच जब्री लागते कुठलीही ड्राय चटणी. बाकी उल्लेखिलेल्यांपैकी सँडविच+चटणी हे काँबो लैच जबरी लागते असा स्वानुभव आहे.
  • Log in or register to post comments

हि जर शेंगदाणा ठेचून केलेली

दत्ता काळे
Wed, 09/04/2013 - 13:36 नवीन
हि जर शेंगदाणा ठेचून केलेली सोलापुरी तिखट चटणी ( हिला आमच्या गावंच्या भाषेत 'आगलावू' चटणी म्हणतात ) असेल तर मला, ज्वारी-बाजरी मिक्स करून केलेली खुटखुटीत भाकरी, कढीगोळ्याची दाट कढी, सोबत बोंडाची भजी आणि हि आगलावू चटणी.. तेल घालून. असा बेत आवडेल.
  • Log in or register to post comments

हुम्म्म

इरसाल
Wed, 09/04/2013 - 13:40 नवीन
कळण्याची भाकर (पोपडा आलेली- टम्म फुगलेली) शेंगदाण्याच्या चटणीमधे वरुन शेंगदाणातेल(कोरडी असल्यास) ओली असल्यास डायरेक (म्हणजे जर तिळ आणी शेंगदाणे एकत्र वाटले असतील तर.) कच्चा कांदा, मेथीची पाने खुडुन त्यात थोडे तिखट-तेल-मीठ (मेथीचा खुडा), खार्‍यातलं लोणचं हे बरोबर असणे मस्ट्चं बर कां !
  • Log in or register to post comments

नरसोबावाडी

अनिरुद्ध प
Wed, 09/04/2013 - 13:45 नवीन
येथे सोमण यान्च्याकडील शेन्गदाण्याची चटणी,अप्रतिम्,नुसतिच भाकरी, पोळी,किवा भाताबरोबर किन्वा तेल/दही यासोबत उत्तम लागते.
  • Log in or register to post comments

चकणा

कपिलमुनी
Wed, 09/04/2013 - 14:20 नवीन
कोणत्याही मदीराक्षीसोबत चकणा म्हणून ट्राय करावी म्हणतो
  • Log in or register to post comments

ऑ ऑ

पैसा
Wed, 09/04/2013 - 14:22 नवीन
बाब्बौ!! मदिरेसोबत म्हटलं तर ठीके. मदिराक्षीसोबत? नेमका काय पिल्यान आहे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

शेंगदाणा चटणी (शक्यतो

मोदक
Wed, 09/04/2013 - 14:47 नवीन
शेंगदाणा चटणी (शक्यतो सोलापूरवाल्या नसलेंची किंवा घरी केली असेल तर तिखटाचे प्रमाण वाढवून त्यात मूठभर काजू घालायचे) आपापल्या मगदुराप्रंमाणे ही चटणी खाकर्‍यावर घ्यायची त्यावर दणदणीत प्रमाणात (गरम केलेले) तूप व ते खाकर्‍यावरच कालवून. (ही स्किलची गोष्ट असते - खाकरा न मोडता चटणी समान पसरली पाहिजे) सोबत गरमागरम कॉफी. चटणीच्या तिखटपणाने हायहुय करणारी जीभ गरम कॉफीने शेकून निघते व वेगळाच स्वाद तयार होतो. गूळ, शेंगा, ओले खोबरे व शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी मॅगीमध्ये, डोश्यावर घातली की पदार्थाचे टेक्शचर बदलते - मला असे पदार्थ आवडतात. ब्रेड+तेल+चटणी तव्यावर भाजून टोस्ट करायचे.
  • Log in or register to post comments

मी तिखटप्रिय इसम आहे.

पांथस्थ
Wed, 09/04/2013 - 15:05 नवीन
मी तिखटप्रिय इसम आहे. त्यामुळे पुर्वी वाटीत घेउन चमच्याने नुस्ती चटणी खायचो :) सध्या - १. डाळ् तांदळाची साधी खिचडी - चटणी २. शिळी पोळी / भाकरी - कच्चं तेल - चटणी ई.ई.
  • Log in or register to post comments

शेंगदाणा चटणी (तिखट)+ साय +

प्रणवजोशी
Fri, 02/19/2016 - 13:40 नवीन
शेंगदाणा चटणी (तिखट)+ साय + गरम तांदुळ भाकरी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा