Skip to main content

डोकेफिरु सैनिकाचा धिंगाणा (शीर्षक संपादित)

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 06/11/2009 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
तथाकथित शांतताप्रेमी धर्माचा एक कट्टर अनुयायी कसे आत्ततायी कृत्य करता झाला आहे पहा. अमेरिकेत टेक्सस प्रांतात फोर्ट हूड ह्या सैनिकी तळावर काम करणारा निदाल मलिक नामक एक ज्येष्ट मुस्लिम सैनिकी अधिकारी. काल कुठल्याशा कारणाने त्याचे टाळके सरकले आणि अल्ला हु अकबर च्या आरोळ्या ठोकत त्याने गोळीबार सुरु केला आणि डझनभर लोकांना ठार केले आणि कित्येकांना जखमी केले. अजून सगळ्या का आणि कसे ह्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. पण गंमत अशी की इथली तमाम बातम्या देणारी चॅनले ह्यात इस्लामचा कसा काहीच दोष नाही हे दाखवण्यात मग्न आहेत. कुणी त्या नराधमाची माहिती फारशी देत नाही. एक बातमी ओझरती कळली की ह्या प्राण्याला लवकरच इराक किंवा अफगाणिस्तानला पाठवणार होते आणि अन्य मुस्लिमांना मारायचे ह्या कल्पनेने तो बिथरला होता. सदर मुस्लिमाच्या शिक्षणाकरता अमेरिकन सैन्यदलाने पाच एक लाख डॉलर खर्च केले होते आणि त्या बदल्यात तो भरती झाला होता. थोडक्यात ह्या हलकटाला त्याचे पालनपोषण करणारे सैन्य, आपले सैनिक सहकारी ह्यापेक्षा परदेशी, अनोळखी पण धर्माने मुस्लिम लोक जास्त जवळचे वाटतात असे दिसते आहे. सुदैवाने किंवा दुर्दैवाने हा इसम जिवंत आहे. आता त्याला लवकर फाशी देतात का डोके ठिकाणावर नाही म्हणून सरकारी इतमामाने जिवंत ठेवतात ते बघायचे. अमेरिकन सैन्यदल इतके ढिसाळ असेल असे वाटले नव्हते. असल्या नालायक माणसाला नोकरी देऊन आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घ्यायची काय गरज होती? सैनिकांच्या वागण्यावर, विचारांवर लक्ष ठेवत नाहीत का? म्हणजे ह्याच्या शिक्षणावर घालवलेले पैसे पाण्यात शिवाय मेलेल्या, जखमी सैनिकांची भरपाई, गुन्ह्याचा तपास ही विकतची डोकेदुखी आहेच. असे काही भारतातही होणे अशक्य नाही. उलट अशा बातम्यांनी कुठल्या डोकेफिरूला स्फूर्ती मिळणेही अशक्य नाही. एक विरोधाभास म्हणजे जेव्हा कुणी वर्णद्वेषी, ख्रिश्चन माणूस असा आततायीपणा करतो तेव्हा त्याची सगळी अंडीपिल्ली, कुंडली तमाम माध्यमे मोठ्या चवीने चघळतात. पण मुस्लिम धर्मीय अतिरेकी असले की ह्यांची दातखीळ बसलीच समजा.

वाचने 30931
प्रतिक्रिया 109

प्रतिक्रिया

In reply to by हुप्प्या

उत्तरेत जेव्हा १८५७ ची धामधूम सुरू होती त्याच सुमारास गोडसे भटजी वरसईकर उत्तरेच्या प्रवासात होते. परतल्यावर त्यांनी "माझा प्रवास" हे पुस्तक लिहिले. इतिहासाचे साधन म्हणून त्या पुस्तकाचे महत्त्व फारसे नसले तरी एक त्रयस्थ त्या सगळ्या उठावाकडे कुठल्या नजरेने पाहत होता हे पाहणे उद्बोधक ठरावे. भारत म्हणून एक राष्ट्र आहे आणि इंग्रज ह्या परकीय सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा पुकारला जात आहे, असा अभिर्भाव त्या पुस्तकात चुकुनही आढळत नाही. आजचे चष्मे वापरून दिडशे वर्षांपूर्वीच्या घटनांकडे पाहणे चुकीचे ठरू शकते.

In reply to by सुनील

दिडशे वर्षापुर्वीचा चष्मा कुठे मिळेल ते कृपया सांगावे. माझा प्रवास इतिहासाच्या दृष्टीने निरुपयोगी असुनही तो बघावा असे सांगता मग सावरकरांचे १८५७ चा उठाव का वाचु नये? की फक्त शेषराव मोरे वाचुन बाकी सगळे गुंडाळुन ठेवावे म्हणजे दिडशे वर्षापुर्वीचा इतिहास स्प्ष्टपणे वाचता येइल? दिड दोनशे पानी गोडसे भटजींच्या पुस्तकात नसलेल्या गोष्टींनी कपाटे भरतील. ते एक प्रवासवर्णनच होते आणि तसेच राहिले तर बरे होइल. त्यात इतिहासाची मीमांसाही नाही आणि तसा उद्देशही नाही. गोडसे भटजींना काही राजकीय पार्श्वभूमी लाभलेली होती असेही नाही. १८५७ मध्ये जो काही उठाव / बंड / क्रांती झाली त्याला कदाचित " स्वतंत्र भारत" असे वैचारिक व्यासपीठ नसेलही. पण तो एका सत्तेने किंवा अनेक सत्तांनी मिळुन एका परकीय सत्तेला केलेला विरोध होता हे नाकारता येणार नाही. त्याला इंग्रजांच्या सेवेत असलेल्या सैन्याचेही मोठा प्रमाणावर पाठबळा लाभले हे विसरता येणार नाही. इथे परत काही विशिष्ट समाज वैयक्तिक आकस अथवा हेव्यादाव्यांपोटी ब्रिटिशांच्या कच्छपी लागला हे विसरता येणार नाही. पण इथे मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश राजवटीविरुद्ध एकमत झाले होते. ब्रिटिश सत्ता उलथवल्यानंतर लोकशाही आणण्याचा कुठलाही विचार नव्हता या एकमेव कारणास्तव तो एका सत्तेविरुद्ध उठाव नव्हता असे म्हणता येणार नाही. केवळ विरोधासाठी विरोध आणि वैचारिक मैथुन नको असे वाटते. बाकी आपल्या वैयक्तिक वैचारिक स्वातंत्र्याचा आदर आहेच.

In reply to by सुनील

हे एक अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीचे एका सामान्य व्यक्तीने केलेले वर्णन माहितीपूर्ण आणि रोचक आहे. परंतु घरच्या गरीबीमुळे त्रासून गोडसे भटजी मोठी दक्षिणा मिळण्याच्या आशेने आजच्या मध्य प्रदेशाकडे निघाले. एक भिक्षुक मोठ्या दक्षिणेच्या आशेने प्रवासाला निघाला आणि त्याच वेळेस १८५७ चा उठाव झाला. गोडसे भटजींचा अनुभव १००% अस्सल असला तरी तो एक सामान्य व्यक्ती म्हणूनच. त्यांना राजकीय परिस्थितीची जाण असण्याची शक्यता नाही. लोकांकडून जे कळेल तितपतच. त्यांनी तसा दावाही केलेला नाही. तेव्हा त्यावरून १८५७ चा उठाव कितपत राजकीय दृष्ट्या संघटित होता हे कळण्याची शक्यता नाही.

In reply to by बाळ सप्रे

श्वान्=कुत्रा, युवान्=तरुण, मघवान्=इंद्र. या तीनही शब्दांचा एकमेकांशी अर्थदृष्ट्या काहीच संबंध नाही, पण फक्त त्या सर्वांचे एंडिंग -आन् प्रत्ययान्त असल्याने त्यांच्या विभक्तीची रूपे सारख्याच प्रकाराने होतात. एकमेकांशी अत्यंत विजोड, कशाचा काहीच संबंध नसलेल्या गोष्टींना एकाच सूत्रात बसवण्याचा कोणी प्रयत्न करू पाहत असेल तर त्यासाठी ही संज्ञा वापरतात. मूळ श्लोक असा: "काचं मणि: काञ्चनमेकसूत्रे मुग्धा निबध्नाति किमत्र चित्रम् | विचारवान् पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह ||" "काच, मणी आणि सोने या विजोड गोष्टींना एकाच सूत्रात (दोर्‍यात) ओवणार्‍या मुग्ध मुलीलाच दोष देऊन काय फायदा? इतका विचारवान पाणिनी, त्यानेही श्वान, युवान आणि मघवान यांना एकाच सूत्रात(नियमात) गोवले आहे."

In reply to by बॅटमॅन

मस्त ते शेर ऐकवायच्या आधी इर्शाद का काय म्हणतात तसे संस्क्रुत श्लोकाच्या बाबतीत काय म्हणता येईल? तोच शब्द मी म्हणालो असे समजावे ;)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

वाहवा, सुभानल्ला च्या जागी संस्कृतवाले "साधु!साधु!" करतात, पण इर्शाद ला पर्यायी शब्द माहिती नै बॉ.

अल्ला हू अकबर यातला अकबर म्हणजे तोच अकबर बादशहा का...?

संवेदनांच्या अस्सलतेची क्रमवारी लावायची पद्धत सापडली हो एकदाची. आता फक्त आणि फक्त विशिष्ट समाजातल्यांच्या संवेदनाच विचारात घेऊ. बाकीची काय माणसं होती? जातपात न पाहता कुणी त्यांना एकाच साच्यात बसवणार असेल तर त्याचा निषेध आजपासून केलाच पाहिजे. मिपाच्या पानावरती ज्ञानेश्वरांचा फोटो तरी का लावलाय कोण जाणे. तथाकथित उच्चवर्णीयच होते ना ते? त्यांना कसल्या आल्यात व्यथा आणि वेदना. काय तर म्हणे मुंज करून ब्राह्मण घ्या. इकडे दलितांच्या अमानुष जिण्याकडे बघावे की या साडेतीन टक्केवाल्यांच्या आपापसातील कुरबुरीकडे.

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? देव, देश* अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती॥ आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत बंदूकांशी लगीन लागलं जडली येडी प्रीत लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती देव, देश* अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती॥ जिंकावेवा व कटून मारावा हेच आम्हाला ठावं लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं देशा*पायी सारी इसरू माया ममता नाती देव, देश* अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती॥ *देश = दार-उल-अमुकतमुक

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

This is getting ridiculous. (or it always was) मराठे तुर्कस्थानात किंवा इंग्लंडात गेले नव्हते… ते लोक इथे येउन इथल्या जनतेला त्रास देत होते. अर्थात झोपेचं सोंग घ्यायचं असेल तर तो ज्याचा त्याचा निर्णय.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव* अमुक तमुक देवा अमुक तमुक सोडून धाव तुझ्या शिवारी जगले हसले** कडी कपारी अमृत प्याले*** आता परि हे सारे सरले उरले मागे नाव *गाव = मिसळपाव **अमृत= जाऊ द्या, आपला आपणच अर्थ ओळखा.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? मार्क्स, माओ अन् निधर्मापायी प्राण घेतलं हाती॥ लालांच्या अड्ड्यात उमगली कॉम्रेडाची रीत इंटुकांशी लगीन लागलं जडली येडी प्रीत लाख "उजवे" झेलून घेईल अशी पहाडी छाती सेकुलर लिब्रल होण्यापायी प्राण घेतलं हाती॥ ओरडावे वा ढुंकून न पहावं हेच आम्हाला ठावं नेहमी स्वतःची करणे लाल हेच आम्हाला ठावं हट्टापायी सारी इसरू माया ममता नाती वाद, वितंड अन् मौजेपायी प्राण घेतलं हाती॥

In reply to by बॅटमॅन

हट्टापायी सारी इसरू माया ममता नाती वाद, वितंड अन् मौजेपायी प्राण घेतलं हाती॥
हे ब्येष्टच

Samjawadi Party leader Kamaal Farooqi today kicked up a controversy over the arrest of Indian Mujahideen co-founder Yasin Bhatkal, asking whether it is based on the grounds of crime or religion. Congress and BJP slammed Farooqui for his comment calling it "ridiculous' and 'regrettable'. "If he is a terrorist then he should not be spared but if he has been arrested just because he is a Muslim, then caution should be exercised as we don't want to send a wrong message to an entire community that we are trying to malign the community's image without a thorough investigation," he said on the arrest of 30-year-old Bhatkal who is wanted in several blast cases. हे लोक सुधारणार नाहीत.

>> प्रसंगी आपल्याच देशातल्या इतरांवर गोळ्या झाडायला भाग पडेल अशा प्रकारची परक्यांच्या सैन्यातच नोकरी का केली असावी? हे एकच उदाहरण नाही. आझाद हिंद सेना, वा ब फडके अशी अनेक उदाहरणे आहेत.

घासकडवींच्या युक्तिवादात चूक असं काहीच नाही. मात्र बर्‍याच लोकांना वाटू शकतं कि त्यांच्या चिमटीत 'मंगल पांडे'च कसा आला? हा प्रश्न मात्र सयुक्तिक आहे. अगदी इंद्र, राम, कृष्ण यांना पण धर्मायुद्धात सहभाग घेतल्याचे पातक लागले नसेल काय? उ.प्र.चा विरोध करणारे मनसेवादी मिसळपावकर आणि ते स्वतः अशी एक बहारदार जोडी त्यांना बनवायची असावी. पण राजकारण ते राजकारण आणि शेवटी ते एकटे पडले. एकटे पडले म्हणून काय झाले? काळाच्या पुढे असलेली सगळी माणसे एकटीच पडतात हा जगाचा अनुभव आहे. भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार, काळ जर खराच असेल तर, आणि आपण त्यापुढे गेला असाल तर, आपण ज्या दिशेने त्याच्यापुढे गेला आहात तिकडे आपण एकटेच गेले असण्याची शक्यता फारच जास्त असते असे मी ऐकले आहे. मी असंही ऐकलं आहे कि बिग बँगच्या त्या 'आपल्या*' विश्वाच्या पार्टीकलामधे मंगल पांडे आणि निदाल शेजारीच बसले होते. तेव्हा म्हणे कोणत्याही धर्माची आणि देशाची स्थापना झाली नव्हती. घासकडवी साहेबही तिथेच चार खुर्च्यांची जागा सोडून त्यांचे बोलणे ऐकत होते. हुप्प्या मात्र पाठमोरा बसलेला. त्यांचा विषय होता -'किती साम्य म्हणजे ओव्हरऑल साम्य?'. विषय रंगला पण निष्कर्श काही निघेना. दोन विद्वान आपल्या चर्चेत तिसर्‍याला 'खरे कि नाही?', 'काय म्हणता?' असे प्रश्न विचारून मान हलवायला लावतात. घासकडवींना चक्क ती भूमिका घ्यायला लागली. तितक्यात तिथे बिग बॅंगेच्या पार्टीकलाचा चालक आला आणि म्हणाला, "आपापले बेल्ट बांधा. आपल्यापैकी काहीजण मॅटर, काहीजण डार्क मॅटर, अँटीमॅटर, इ इ बनणार आहेत. सावधान." तो केबिनमधे परत गेल्यावर पार्टीकलाची शकले झाली आणि कितीतरी 'जण' irretrievably (कि कसे) दूर गेले. अगदी त्या नाजूक काळी पण घासकडवी काळाच्या थोडे पुढेच होते. त्यांना अचानक साक्षात्कार झाला. "श्रीसाम्यवैषम्य शिरोमणि:" असा ग्रंथ सुचला म्हणे! 'माता, गौ, त्यांचे दूध आणि त्यांची तुलनात्मक उपयुक्तता (दूधांची नव्हे)' हा त्यातील पहिला चरण म्हणे. * मी असे ऐकले आहे कि आपले जसे एक विश्व आहे तशी कितीतरी विश्वे या जगात उ़कळत्या पाण्याच्या भांड्यातून बुडबुडे निघावेत तसे निघतात. पण ते भांडे, त्याचा स्टोव्ह, किचन जिथे आहे ते विश्वही कोण्याना कोण्या बिग बँगेपासून आले असावे. म्हणून साम्य वैषम्य यांवर भाष्य करतात वरचा संदर्भ ग्रंथच वापरावा. ** सबब प्रतिसाद विनोदी बनण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आपले सर्व ज्ञान अगोदर मांडून नंतर असहमती दाखवणे योग्य नाही. आपण केव्हा सहमती दाखवणार आहोत हे अगोदर सांगून मग त्यादिशेने आपापले मुद्दे मांडावेत. *** समाजाची आदरस्थाने कशी परिक्षावी? त्यांना कुणाशी तोलावे? याची एक मर्यादा असते. दांडीयात्रेत महात्मा गांधींनी 'आयोडीन' नसलेले मीठ उचलले म्हणून त्यांना झाप झाप झापणे अप्रस्तुत आहे. सबब प्रतिसादाचा उद्देश 'बाब्या आणि कार्टं' मधील फरकांचे निकष आणि निकषांची मात्रा जाणणे असा तात्विक आणि तांत्रिक आहे. घासकडवींचे युक्तिवाद मला आवडतात पण त्यांनी इथे जो युक्तिवाद मांडला आहे त्याने माझी थेट आणि अप्रत्यक्ष सारीच आदरस्थाने पुसली आहेत.

पण राजकारण ते राजकारण आणि शेवटी ते एकटे पडले. एकटे पडले म्हणून काय झाले? काळाच्या पुढे असलेली सगळी माणसे एकटीच पडतात हा जगाचा अनुभव आहे ते एकटे नाहीत त्यांना काळाच्या पुढे असणार्‍या (प्रकाशाकणांपेक्षा वेगाने धावणार्‍या) देवतांचा आशीर्वाद आहे. असा अंदाज आहे.

In reply to by आशु जोग

माझ्या प्रतिसादात मी तसे व्हायला चान्स सोडलेला नाही. संपूर्ण ब्रह्मांड संपूर्णतः एकजीव असतानाची पार्श्वभूमी आहे. सबब वेळी प्रकाशाचा जन्म झालाच नव्हता. अशी पुरोगामी दृष्टी अशावेळीच प्राप्त होऊ शकते. बाय द वे आपण उपरोल्लिखित 'श्रीसाम्यवैषम्य शिरोमणि:' ग्रंथातील श्रीमती इदिरा गांधी आणि मोहम्मद गझनी यांची तुलनात्मक अभ्यास वाचला आहे काय? याच अध्यायात श्री लालकृष्ण आडवाणी, औरंगजेब आणि पुनर्बांधणीसाठी घर पाडणारा माझा दिल्लीतला शेजारी यांचेही रोचक साम्य वर्णिले आहे. अगदी घरातल्या दिमकाचे वारुळ पाडताना सामान्य माणसाला थरथरे कापावे इतक्या प्रभावीपणे सबब साम्य वर्णिले आहे.

In reply to by arunjoshi123

हा ग्रंथ अद्याप पूरता वाचलेला नाही. समजून घ्या आमचा वाचनाचा स्पीड जरा कमी आहे. प्रकाशकणांच्या खूप मागे आहोत.

In reply to by आशु जोग

आशुजी, मी ही काही कोणी दिग्गज लागून गेलो नाही. मला देखिल आजकालच्या प्रतिगाम्यांसारख्या बौद्धिक आणि वैचारिक मर्यादा आहेत. आता हेच पाहा ना, बिग बँगेच्या पार्टीकलातली ती घटना जेव्हा मी कळून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला ती कशी कळून घ्यावी आणि कशी मांडावी हेच कळेना. वास्तविक भौतिकशास्त्रात शिकवलेल्या काळाच्याही जन्माअगोदर (जसा प्रकाशाचा जन्म चर्चिला आहे) सबब लोक काळाच्या पुढे होते. आता हे कसे ते चमकेना. म्हणून माझ्या विषयाच्या आकलनाच्या मर्यादा आणि मांडणीच्या मर्यादा सबब वर्णनात चिकार आहेत.

मंगल पांडे : ह्याच्या धर्मभावना दुखावणारे, त्याला त्या गाईच्या चरबीत बुडलेल्या गोळ्या तोंडाने तोडायचे आदेश देणारे त्या सैनिकी तळावरचे अधिकारीच होते. त्यामुळे तो राग मंगल पांडेने त्या अधिकार्‍यांवर थेट व्यक्त केला तर समजण्यासारखे आहे. हसन निसारः त्या टेक्ससमधी फोर्ट हूडमधील किती लोकांनी अमेरिकेच्या युद्ध घोषित करण्याच्या निर्णयात भाग घेतला? शून्य. राष्ट्राध्यक्ष, संरक्षण मंत्री, सुरक्षा सल्लागार, सेनापती असा कुठलाही उच्चपदस्थ त्या सैनिकी तळावर उपस्थित नव्हता. अमेरिकेने मुस्लिम देशांविरुद्ध घोषित केलेले युद्ध हा असंतोषाचा विषय असता तर अशा लोकांवर हल्ला करून आपला राग व्यक्त करणे एक समजू शकतो. पण कुठल्याही अमेरिकनाला त्याकरता मारणे कशाबद्दल?

In reply to by हुप्प्या

पण त्या चरबी प्रकारावरुन हिंदु मुस्लिमानी भांडायचं कशाला? गोळ्या आपापसात बदलल्या असत्या तर चालणार नव्हते का? म्हणजे हिंदुना डुकराची चरबी, आणि त्याना गाईची चरबीची गोळी... म्हणजे भांडणाचे कारणच नव्हते नै का? उगाचच उठाव बिठाव कशाला? इंग्रजानी देश गिळला, मुघलानी गिळला वगैरे इतिहास रोजच काही लोक कोलकत असतात. पण मुघलानी पराक्रम करुन देश मिळवला. आणि इंग्रजानी व्यापारी मार्गाने. बहुतांश संस्थानिकानी इंग्रजांकडून कवायती सैन्य आउटसोर्स केले होते. त्याच्या मोबदल्यात इंग्रजाना क्याश, कर वसुली किंवा संस्थानिकाकडून कर्जवसुली असे अधिकार मिळालेले होते. खुद्द झाशी संस्थानचीही अवस्था तीच होती. काही कारणानी बोलं तटली, तर इंग्रजाना ते प्रदेश करारानुसार ताब्यात मिळाले. मग सगळा प्रांत गेल्यावर आता तसेही भुकेनं मरणारच होते, ते लागले पराक्रम करायला. एकंदर, कर्ज बुडवण्याची भारताला मोठी परंपरा आहे.