इंग्रजांच्या सैन्यातल्या नोकरीचा उल्लेख केला कारण हुप्प्या यांनी तो एक 'महत्त्वाचा फरक' म्हणून सांगितलं आहे. (बाकी त्या काळी आपला देश, इंग्रज परके वगैरे भावना फारशी प्रबळ नव्हती असं मला वाटतं.) डॉक्टरकीच्या निरर्थक मुद्द्याबद्दलही हेच, या फरकाला काही अर्थ नाही.
साम्य असं आहे की धार्मिक निष्ठा सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाच्या ठरून सैनिक बिथरला आणि त्याने गोळीबार केला. असं होणं योग्य की नाही हे सर्वांसाठी सारख्याच पद्धतीने ठरावं, म्हणून तुलना केली. तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तुमचं स्वतःचं मत राखण्याच्या अधिकाराचा मान आहेच.
मुळात तुम्ही बादरायणि सम्बन्ध जोडुन तुलना चुकिच्या व्यक्ति बरोबर केलिये - आणि हेच हुप्प्या यांनी वरती सान्गितलय.
आता तुम्ही मुद्दा सोडत नसाल तर मग आम्ही तुमचि तुलना अध्यात्म-महर्षीन्शी केली आणि तुम्हाला ते योग्य वाटत नसेल तर स्वतःचं मत राखण्याच्या अधिकाराचा मान तुम्हाला आहेच.
साम्य असं आहे की धार्मिक निष्ठा सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाच्या ठरून सैनिक बिथरला आणि त्याने गोळीबार केला. असं होणं योग्य की नाही हे सर्वांसाठी सारख्याच पद्धतीने ठरावं, म्हणून तुलना केली.
मला वाटते धार्मिक भावना दुखावलि जाउन एक भारतिय म्हणुन भोगाला आलेल्या सक्तिच्या जुलमी, गुलामि शुद्रतेविषयी तिरस्काराच्या उद्रेकाचे रुपांतर म्हणजे मंगल पांडे होय. अन्यथा बहुतांश प्रसंगि धर्मबांधवांच्या विरोधातही जाण्याचे काम स्विकारणे यातच त्याचि सैनिकी निष्ठा धार्मिक कर्तव्यापेक्षा जास्त तिव्र होती हे स्पश्ट होतेच. म्हणु ही तुलना अतिशय अप्रस्तुत व कमालिच्या असमंजसपणाची आहे.
एक भारतिय म्हणुन भोगाला आलेल्या सक्तिच्या जुलमी, गुलामि शुद्रतेविषयी तिरस्काराच्या उद्रेकाचे रुपांतर म्हणजे मंगल पांडे होय.
छे हो. पांडे नावावरून तथाकथित उच्चवर्णीय वाटतात. भारतीय म्हणून भोगाला आलेल्या सक्तीची जुलमी, गुलामी शूद्रता म्हणजे नक्की काय हे तथाकथित हिंदूंमधल्याच तथाकथित शूद्र जातीयांना विचारावं ही विनंती.
शूद्रांव्यतिरिक्त इतर भारतीय गुलामीत नव्हते असे काही तुमचे म्हणणे झाले असेल तर तुमच्या विनोदाची पातळी खुपच उच्च दर्जाची आहे असे नमूद करु इच्छितो.
कृपया दलित सवर्ण असा नविन वाद निर्माण करुन मूळ मुद्द्यावरुन विषय भरकटवु नका. सर्वच एतद्देशीय जनता पारतंत्र्यात होती. त्रास सर्वांनाच होत होता. दलितांना सवर्णांपेक्षा जास्त होत असेल कदाचित. पण तो या लेखाचा विषय नाही. दलितांना होत होता म्हणजे सवर्णांना होत नव्हता असे नाही. मुद्दे संपले की असे विषय भरकटवण्याचे खेळ सुरु होतात. असो. तुमच्या विचारस्वातंत्र्याचा आदर करायलाच हवा म्हणा.
शूद्र हा शब्द प्रथम मी वापरला नाही. शूद्रतेचा उल्लेख प्रतिसादात झाला म्हणून मी चूक दाखवून दिली इतकंच. बाकी एकंदरीतच कोणाला मी मंगल पांडेने धार्मिक निष्ठांना सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाचं मानलं हे पटलेलं किंवा आवडलेलं दिसत नाही. कदाचित मी माझा मुद्दा मांडण्यात कमी पडलो असेन. कदाचित 'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा' हेच खरं असेल. काही का असेना, आलेले युक्तिवाद हे भावनिक अधिक असल्यामुळे अजून प्रयत्न करूनही फरक पडेल असं वाटत नाही. तेव्हा इथेच थांबतो.
निव्वळ त्या निकषावर तुलना कितपत बरोबर आहे हे मांडण्यात तुम्ही नक्कीच कमी पडला आहात. तसे पाहिले तर आत्मसंरक्षण म्हणून कुणावर शस्त्र उगारणे आणि कॉन्सण्ट्रेशन कँपात किड्यामुंगीगत माणसे मारण्यात पण हिंसेपुरते साम्य आहेच की. तेवढ्यावरून त्यांची तुलना करणे हास्यास्पद आहे.
दोन्ही घटनांमागे नक्की काय कार्यकारणपरंपरा होती याची तुलनात्मक बैठक न करता एक शब्द आऊट ऑफ कॉण्टेक्स्ट उचलून विषय भरकटविला आहेच. हे करून त्यावरच्या प्रतिसादांना भावनिक म्हणण्याने तुमच्या प्रतिपादनातील तर्कदुष्टता कमी होत नाही.
त्यामुळे, "भावनिक झुंडहल्ल्यांपुढे माझे काही चालत नाही" असा फसवा युक्तिवाद करण्याऐवजी मूळ मुद्दा विस्तृतपणे मांडला तर बरे होईल. तुमच्या लौकिकाला ते अजून साजेसे होईल हे अलाहिदा. अर्थात परत, तुम्ही काय करावे हे सांगणारा मी कोण? पण तर्कविसंगती दाखवल्यास तिचे निराकरण करणे हे श्रेयस्कर असते अशी माझी समजूत आहे. असो.
३१ ऑगस्टच्या सुमाराला मी व्यस्त असणार आहे smiley फिर कभी.
वाह! ही लागण तुम्हाला झालि यातच तुमचे भाष्य सामावले आहे. असो,
मंगल पांडेना समान नियम लागु करण्यापुर्वी लक्षातघेण्याजोग्या महत्वाच्याबाबि या आहेत
१) तो अनिवासि हिंदु न्हवता.
२) धार्मिक जाच हे संतापाचे प्रमुख कारण न्हवे, तर बहुसंख्य भुमिपुत्रांच्या (जनतेच्या) मनातिल सामुदायिक रोषाची प्रकटता आहे.
३) हिंदुवर गोळ्या चालवाव्या लागतिल(लागतात) हे ही प्रमुख कारण न्हवे.
४) इंग्रजांकडून भारतिय व अभारतिय हा भेदाभेद पाळताना होणारी भारतियांची पध्दतशिर मुस्कटदाबी
यां गोष्टिंचि डोकेफिरु सैनिकाच्या वागणूकिसोबत तुलना कराविशी वाटणे हेच मुळात हेकेखोर प्रवृत्तिचे उद्दाम प्रदर्शन होय.
तेव्हां सर्व जाति धर्म लिंगाचे व्यक्ति जे भारतिय तर आहेत पण त्यांना आणि कुत्र्यांना प्रवेश नाही असा त्याचा अर्थ असायचा. म्हणूनच ना इंग्रजांची गुलामि धर्मा/वर्णाधिष्टित होती ना त्याच्या विरुध्दचा लढा तसा होता. म्हणूनच मंगल पांडे अन मलिक यांची तुलना होउ शकत नाही.
बाकी त्या काळी आपला देश, इंग्रज परके वगैरे भावना फारशी प्रबळ नव्हती असं आपल्याला जे वाटतं ते कशावर आधारित आहे याचे विस्त्रुत स्पश्टिकरण हवे आहे म्हणजे आपला मुद्दा जास्त व्यवस्थित्पणे समजुन घ्यायला मदत होइल.
इंग्रजांच्या सैन्यातल्या नोकरीचा उल्लेख केला कारण हुप्प्या यांनी तो एक 'महत्त्वाचा फरक' म्हणून सांगितलं आहे.
अमान्य. तुमचा प्रतिवास साफ फसला आहे. मलिक आणी मंगल पांडे यांचा संबंध तुम्ही प्रथम लावलात. त्यानंतर हुप्प्या यांनी त्याचा प्रतिवाद करताना मंगल पांडे यांच्या सैनिक असण्याबद्दल विधान केले. अर्थात हुप्प्या असा प्रतिवाद करणार असे तुम्हाला स्वप्न पडले असेल किंवा तुम्ही तुमच्या असामान्य बुद्धीसामर्थ्याच्या बळावर ते आधीच्च जाणले असेल तर गोष्ट वेगळी.
(बाकी त्या काळी आपला देश, इंग्रज परके वगैरे भावना फारशी प्रबळ नव्हती असं मला वाटतं.)
अपल्या वैचारिक स्वातंत्र्याचा आदर आहे. पण पारतंत्र्याची आणि इंग्रज परके असल्याची जाणीव त्याकाळीही होती असे मला वाटते.
डॉक्टरकीच्या निरर्थक मुद्द्याबद्दलही हेच, या फरकाला काही अर्थ नाही.
डॉक्टरकीच्या मुद्द्याला फारसा अर्थ नाही हे मान्य. पण तो डॉक्टर असल्यानेच शस्त्र त्याला फारसे उचलायला लागणार नव्हते हे ही खरेच. असे असतानाही त्याने असे माथेफिरुपणाचे कृत्य केले म्हणजे त्याची भावना किती प्रबळ होती ते बघा. शिवाय डॉक्टर तो अमेरिकेच्या पैशानेच झाला होता हे महत्वाचे आहेच.
साम्य असं आहे की धार्मिक निष्ठा सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाच्या ठरून सैनिक बिथरला आणि त्याने गोळीबार केला.
फरक आहे. मंगल पांडे साठी केवळ धार्मिक निष्ठा महत्वाची ठरली असे नाही तर उठावाची पर्श्वभूमीदेखील त्याला आहेच. शिवाय जबरदस्तीने अथवा फसवणुकीने गोमांसग्रहण करण्याचे धर्मबाह्य आणि निंद्य कृत्य करायला लावणे आणि देशासाठी आणि देशाच्या भल्यासाठी सैन्याची सेवा करण्या ऐवजी शत्रू केवळ स्वधर्मीय आहे म्हणुन निरपराध लोकाची हत्या करणे यात खुप फरक आहे. सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक आणि धार्मिक दहशतवादी यामध्ये जेवढा फरक आहे तेवढाच. स्वदेशीय जवानांची वैद्यकीय देखभाल करणे हे धर्मविरोधी कृत्य ठरत नाही.
असं होणं योग्य की नाही हे सर्वांसाठी सारख्याच पद्धतीने ठरावं, म्हणून तुलना केली. तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तुमचं स्वतःचं मत राखण्याच्या अधिकाराचा मान आहेच.
दगडांची तुलना आंब्यांशी करता येत नाही. पुढच्यावेळेस कृपया जरा बरे उदाहरण द्यावे. तुमचं स्वतःचं मत राखण्याच्या अधिकार तुम्हाला आहेच.
साम्य असं आहे की धार्मिक निष्ठा सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाच्या ठरून सैनिक बिथरला आणि त्याने गोळीबार केला.
इतर अनेकांनी मंगल पांडे आणि मलिकमध्ये नक्की काय फरक आहे हे स्पष्ट केले आहेच.या मुद्द्यांव्यतिरिक्त या दोघांमध्ये नक्की काय फरक आहे?
१. मंगल पांडेने इंग्रज अधिकाऱ्याला मारले त्यामागे केवळ धर्मभावनाच होती हे गृहितक आहे त्याला आधार काय?त्यावेळी इंग्रजांनी ज्या पध्दतीने राज्य चालविले होते त्यामुळे सामान्य लोकांमध्ये इंग्रज राज्याविरोधी असंतोष वाढत होता.गाय आणि डुकरांचे मास लावलेली काडतूसे हे फार तर तात्कालिक कारण म्हणता येईल पण तेच एक कारण होते या म्हणण्याला आधार काय? १८५७ च्या उठावाची तयारी आधीपासून चालू होती.उत्तर भारतात सैनिकी तुकड्यांमध्ये कमळाच्या फुलाचा वापर करून तर गावांमध्ये रोटीचा वापर करून नक्की किती सैनिक/सामान्य लोक उठावाच्या बाजूने आहेत याची चाचपणी केली जात होती.अगदी पेशावरपासून बंगालपर्यंत अक्षरश: हजारो ठिकाणी ही चाचपणी केली गेली.गावांमधल्या किती लोकांना या काडतूसांचा वापर करावा लागणार होता?तरीही या गावांमधील लोकही इंग्रजांच्या विरोधात होतेच ना? आणि सैनिक तरी वेगळे कोण होते?ते पण अशाच गावांमधील सामान्य घरांमधून पुढे आले होते ना?मग एकूण परिस्थिती जर इंग्रजांविरोधी होती तर ते या परिस्थितीपासून पूर्णपणे आलिप्त कसे राहतील?तेव्हा मंगल पांडेने इंग्रज अधिकाऱ्याला मारले ही गोष्ट या पार्श्वभूमीवर बघायला हवी.त्याने जे काही केले त्यामागे केवळ धर्मभावना होती की धर्मभावना हे एकूण कारणांपैकी एक होते?
समजा इंग्रजांनी दडपशाही केलीच नसती किंवा इंग्रज राज्य अगदी रामराज्य असते तरीही मंगल पांडेने काडतूस या कारणावरून इंग्रज अधिकाऱ्याला मारले असते का? अर्थात ही जर-तरची गोष्ट झाली पण इंग्रज राज्य हे रामराज्य असते तर मुळात १८५७ चा उठाव झालाच नसता हे माझे मत झाले.जर कोणी म्हणत असेल की त्यावेळी आपण सगळे भारतीय आहोत ही भावना नव्हती आणि कदाचित त्यावेळी इंग्रज हे परके आहेत ही भावना तितकी प्रबळ नव्हती तर ते मला मान्य आहेच.क्रांतिकारक म्हटले की वाहवून जाणाऱ्यांपैकी मी नक्कीच नाही.पण तरीही त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करता आपण परक्यांच्या अंमलाखाली आहोत यापेक्षा आपण एका जुलमी राजवटीच्या अंमलाखाली आहोत ही भावना १८५७ च्या उठावामागे होती असे वाटते. यावर जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.
मलिकच्या प्रकरणात एकूणच अमेरिकन सरकार/सैन्याविरूध्दच्या असंतोषामागच्या कारणांमागे धर्मभावना हे एक कारण होते का?
२. जर कोणाही दोन घटनांशी संबंधित असलेल्या व्यक्तींची तुलना करायची असेल तर त्या व्यक्तींचा त्या कृतीमागे असलेला विचार, ती कृती करायची पध्दत आणि त्या कृतीचे परिणाम यात सारखेपणा असेल तरच अशा दोन व्यक्तींची तुलना करता येईल.या दोन घटनांमध्ये फार तर कृती करायची पध्दत सारखी होती हे एकवेळ म्हणता येईल कारण दोघांनीही गोळीबार केला.अर्थात मंगल पांडेने बेछूट गोळीबार केला नाही आणि उगीचच परिस्थितीशी घेणेदेणे नसलेल्या कोणालाही मारले नाही (जे मलिकने केले).जरी मंगल पांडेकडे आधुनिक रायफल असती तरी त्याने बेछूट गोळीबार केला असता आणि उगीच कोणालाही मारले असते असे मला तरी वाटत नाही.याविषयी इतरांचे मत वेगळे असू शकेल.
आता दोन घटनांशी संबंधित असलेल्या व्यक्तींची तुलना करायची असेल तर कर्झन वायलीला मारणारा मदनलाल धिंग्रा, गांधीजींना मारणारा नथुराम गोडसे, इंदिरा गांधींचे मारेकरी बियंतसिंह-सतवंतसिंह आणि इस्राएलचे पंतप्रधान यित्झॅक राबीन यांचा मारेकरी यिगाल आमीर यांची तुलना करता येऊ शकेल.या चारही हत्यांमागे असलेली समान सूत्रे म्हणजे मारेकऱ्याच्या मते समोरचा मनुष्य त्यांच्या "राष्ट्राचे" नुकसान करत होता आणि त्याला मारणे गरजेचे होते, मारेकऱ्यांनी उगीच बेछूट गोळीबार करून संबंध नसलेल्यांना मारले नाही आणि आपल्या कृत्याच्या परिणामांची त्यांना पूर्ण जाणीव होती आणि त्यांनी पळून जायचा प्रयत्न न करता दिलेली शिक्षा विनातक्रार भोगली.या घटनांमधील व्यक्ती दहशतवादी आहेत की क्रांतिकारक हे आपण नक्की कोणत्या बाजूला आहोत यावर अवलंबून असते हे मी पूर्वीच स्पष्ट केले आहे.
मंगल पांडे आणि मलिकच्या कृत्यांमध्ये मला तरी अशी समान सुत्रे आढळली नाहीत की ज्या आधारावर त्यांची तुलना करता यावी.
आपले प्रतिसाद वाचून गाढ झोपलेल्याला उठवणे अवघड असते पण झोपेचे सोंग केलेल्याला उठवणे अशक्य असते ह्याची नव्याने प्रचिती आली. असो.
एका मंगल पांडेवरून तमाम धार्मिक हिंदूंवर उडी कशी घेतली ते जरा उलगडून तपशिलात सांगा.
निदाल हसनच्या डॉक्टरकीचा उल्लेख अशासाठी की मंगल पांडे प्रमाणे तो एक सामान्य शिपाई नव्हता. मंगल पांडे हा इंग्रजांच्या लेखी परक्या संस्कृतीचा तसाच निदाल हसन हाही अमेरिकनांच्या (ज्यात प्रामुख्याने श्वेतवर्णीय ख्रिस्ती असतात) लेखी परक्या संस्कृतीचा सदस्य परंतु काळाचा महिमा किंवा अन्य काही असेल, ह्या इसमाला तुच्छ वागणूक मिळाली नाही. उलट डॉक्टरीसारखे उच्च शिक्षण दिले गेले. त्यामुळे गोर्यांनी केलेल्या अपमानकारक वागणुकीचा राग खदखदत होता असे काही कारण समोर आलेले नाही. उलट इंग्रज देशी सैनिकांना तुच्छतेने वागवायचे ह्याचे अनेक मासले आहेत. आणि त्याचा राग हेही मंगल पांडेच्या उठावामागचे कारण असेल असे मानायला जागा आहे.
तर मग मंगल पांडे सैन्यात भरती का झाला वगैरे प्रश्न खरे तर अप्रस्तुत आहेत. पण कदाचित गरिबीमुळे असेल. तमाम देशी लोकांवर गोळ्या चालवणे वाईटच असेल असे का? लुटारू, ठग, पेंढारी हे लोक त्या काळी धुमाकूळ घालतच होते. वेळ पडल्यास अशा लोकांवर गोळ्या चालवणे इतके वेदनादायक नसेल. इंग्रज इतक्या राजेरोसपणे सामान्य, निरपराध, नि:शस्त्र भारतीयांना आपल्या भारतीय फौजफाट्याकरवी गोळ्या घालत नसावेत असे वाटते (जालियानवाला बाग हा एक अपवाद). नाहीतर त्यांचीही सुरक्षितता धोक्यात आली असती.
उत्तरेत जेव्हा १८५७ ची धामधूम सुरू होती त्याच सुमारास गोडसे भटजी वरसईकर उत्तरेच्या प्रवासात होते. परतल्यावर त्यांनी "माझा प्रवास" हे पुस्तक लिहिले. इतिहासाचे साधन म्हणून त्या पुस्तकाचे महत्त्व फारसे नसले तरी एक त्रयस्थ त्या सगळ्या उठावाकडे कुठल्या नजरेने पाहत होता हे पाहणे उद्बोधक ठरावे.
भारत म्हणून एक राष्ट्र आहे आणि इंग्रज ह्या परकीय सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा पुकारला जात आहे, असा अभिर्भाव त्या पुस्तकात चुकुनही आढळत नाही.
आजचे चष्मे वापरून दिडशे वर्षांपूर्वीच्या घटनांकडे पाहणे चुकीचे ठरू शकते.
दिडशे वर्षापुर्वीचा चष्मा कुठे मिळेल ते कृपया सांगावे.
माझा प्रवास इतिहासाच्या दृष्टीने निरुपयोगी असुनही तो बघावा असे सांगता मग सावरकरांचे १८५७ चा उठाव का वाचु नये? की फक्त शेषराव मोरे वाचुन बाकी सगळे गुंडाळुन ठेवावे म्हणजे दिडशे वर्षापुर्वीचा इतिहास स्प्ष्टपणे वाचता येइल? दिड दोनशे पानी गोडसे भटजींच्या पुस्तकात नसलेल्या गोष्टींनी कपाटे भरतील. ते एक प्रवासवर्णनच होते आणि तसेच राहिले तर बरे होइल. त्यात इतिहासाची मीमांसाही नाही आणि तसा उद्देशही नाही. गोडसे भटजींना काही राजकीय पार्श्वभूमी लाभलेली होती असेही नाही.
१८५७ मध्ये जो काही उठाव / बंड / क्रांती झाली त्याला कदाचित " स्वतंत्र भारत" असे वैचारिक व्यासपीठ नसेलही. पण तो एका सत्तेने किंवा अनेक सत्तांनी मिळुन एका परकीय सत्तेला केलेला विरोध होता हे नाकारता येणार नाही. त्याला इंग्रजांच्या सेवेत असलेल्या सैन्याचेही मोठा प्रमाणावर पाठबळा लाभले हे विसरता येणार नाही. इथे परत काही विशिष्ट समाज वैयक्तिक आकस अथवा हेव्यादाव्यांपोटी ब्रिटिशांच्या कच्छपी लागला हे विसरता येणार नाही. पण इथे मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश राजवटीविरुद्ध एकमत झाले होते. ब्रिटिश सत्ता उलथवल्यानंतर लोकशाही आणण्याचा कुठलाही विचार नव्हता या एकमेव कारणास्तव तो एका सत्तेविरुद्ध उठाव नव्हता असे म्हणता येणार नाही.
केवळ विरोधासाठी विरोध आणि वैचारिक मैथुन नको असे वाटते. बाकी आपल्या वैयक्तिक वैचारिक स्वातंत्र्याचा आदर आहेच.
हे एक अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीचे एका सामान्य व्यक्तीने केलेले वर्णन माहितीपूर्ण आणि रोचक आहे.
परंतु घरच्या गरीबीमुळे त्रासून गोडसे भटजी मोठी दक्षिणा मिळण्याच्या आशेने आजच्या मध्य प्रदेशाकडे निघाले. एक भिक्षुक मोठ्या दक्षिणेच्या आशेने प्रवासाला निघाला आणि त्याच वेळेस १८५७ चा उठाव झाला.
गोडसे भटजींचा अनुभव १००% अस्सल असला तरी तो एक सामान्य व्यक्ती म्हणूनच. त्यांना राजकीय परिस्थितीची जाण असण्याची शक्यता नाही. लोकांकडून जे कळेल तितपतच. त्यांनी तसा दावाही केलेला नाही. तेव्हा त्यावरून १८५७ चा उठाव कितपत राजकीय दृष्ट्या संघटित होता हे कळण्याची शक्यता नाही.
श्वान्=कुत्रा, युवान्=तरुण, मघवान्=इंद्र. या तीनही शब्दांचा एकमेकांशी अर्थदृष्ट्या काहीच संबंध नाही, पण फक्त त्या सर्वांचे एंडिंग -आन् प्रत्ययान्त असल्याने त्यांच्या विभक्तीची रूपे सारख्याच प्रकाराने होतात.
एकमेकांशी अत्यंत विजोड, कशाचा काहीच संबंध नसलेल्या गोष्टींना एकाच सूत्रात बसवण्याचा कोणी प्रयत्न करू पाहत असेल तर त्यासाठी ही संज्ञा वापरतात. मूळ श्लोक असा:
"काचं मणि: काञ्चनमेकसूत्रे मुग्धा निबध्नाति किमत्र चित्रम् |
विचारवान् पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह ||"
"काच, मणी आणि सोने या विजोड गोष्टींना एकाच सूत्रात (दोर्यात) ओवणार्या मुग्ध मुलीलाच दोष देऊन काय फायदा? इतका विचारवान पाणिनी, त्यानेही श्वान, युवान आणि मघवान यांना एकाच सूत्रात(नियमात) गोवले आहे."
संवेदनांच्या अस्सलतेची क्रमवारी लावायची पद्धत सापडली हो एकदाची. आता फक्त आणि फक्त विशिष्ट समाजातल्यांच्या संवेदनाच विचारात घेऊ. बाकीची काय माणसं होती? जातपात न पाहता कुणी त्यांना एकाच साच्यात बसवणार असेल तर त्याचा निषेध आजपासून केलाच पाहिजे. मिपाच्या पानावरती ज्ञानेश्वरांचा फोटो तरी का लावलाय कोण जाणे. तथाकथित उच्चवर्णीयच होते ना ते? त्यांना कसल्या आल्यात व्यथा आणि वेदना. काय तर म्हणे मुंज करून ब्राह्मण घ्या. इकडे दलितांच्या अमानुष जिण्याकडे बघावे की या साडेतीन टक्केवाल्यांच्या आपापसातील कुरबुरीकडे.
This is getting ridiculous. (or it always was)
मराठे तुर्कस्थानात किंवा इंग्लंडात गेले नव्हते… ते लोक इथे येउन इथल्या जनतेला त्रास देत होते. अर्थात झोपेचं सोंग घ्यायचं असेल तर तो ज्याचा त्याचा निर्णय.
अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव*
अमुक तमुक देवा अमुक तमुक सोडून धाव
तुझ्या शिवारी जगले हसले** कडी कपारी अमृत प्याले***
आता परि हे सारे सरले उरले मागे नाव
*गाव = मिसळपाव
**अमृत= जाऊ द्या, आपला आपणच अर्थ ओळखा.
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
मार्क्स, माओ अन् निधर्मापायी प्राण घेतलं हाती॥
लालांच्या अड्ड्यात उमगली कॉम्रेडाची रीत
इंटुकांशी लगीन लागलं जडली येडी प्रीत
लाख "उजवे" झेलून घेईल अशी पहाडी छाती
सेकुलर लिब्रल होण्यापायी प्राण घेतलं हाती॥
ओरडावे वा ढुंकून न पहावं हेच आम्हाला ठावं
नेहमी स्वतःची करणे लाल हेच आम्हाला ठावं
हट्टापायी सारी इसरू माया ममता नाती
वाद, वितंड अन् मौजेपायी प्राण घेतलं हाती॥
Samjawadi Party leader Kamaal Farooqi today kicked up a controversy over the arrest of Indian Mujahideen co-founder Yasin Bhatkal, asking whether it is based on the grounds of crime or religion.
Congress and BJP slammed Farooqui for his comment calling it "ridiculous' and 'regrettable'. "If he is a terrorist then he should not be spared but if he has been arrested just because he is a Muslim, then caution should be exercised as we don't want to send a wrong message to an entire community that we are trying to malign the community's image without a thorough investigation," he said on the arrest of 30-year-old Bhatkal who is wanted in several blast cases.
हे लोक सुधारणार नाहीत.
प्रतिक्रिया
+१
इंग्रजांच्या सैन्यातल्या
तुलना
साम्य असं आहे की धार्मिक
एक भारतिय म्हणुन भोगाला
शूद्रांव्यतिरिक्त इतर भारतीय
विषय भरकटवण्याचे एक उत्तम
विषय भरकटवण्याचे एक उत्तम
निव्वळ त्या निकषावर तुलना
सहमत!!
मूळ मुद्दा विस्तृतपणे मांडला
मुद्दा वेगळ्या धाग्यावर
३१ ऑगस्टच्या सुमाराला मी
वाह! ही लागण तुम्हाला झालि
जेव्हां इंडीयन्स अँड डोग्स आर नॉट अलाउड अशि पाटि असायची
छे हो. पांडे नावावरून तथाकथित
इंग्रजांच्या सैन्यातल्या
कसे काय?
संभाजी महाराज औरंगजेबाचे
उत्तर
स्थलकालसापेक्ष
दिडशे वर्षापुर्वीचा चष्मा
गोडसे गुरुजींचे प्रवासवर्णन
गुर्जी कधीकधी खुपच मजेशीर
अत्यंत मूर्खपणाचा प्रतिसाद.
सर्व मशिदी दहशतवादी संघटना
मलिक आणि मंगल पांडेची तुलना
श्वानं युवानं मघवानमाह
श्वान्=कुत्रा, युवान्=तरुण,
मस्त
वाहवा, सुभानल्ला च्या जागी
धन्यवाद!!
समांतर उदाहरण
अगदी अगदी!!!
अवांतर
नाही. अकबर म्हंजे "द ग्रेट".
संवेदनांच्या अस्सलतेची
बॅटमॅन
(अमका) तितुका मेळवावा
.
This is getting ridiculous.
हे गाणे जास्त प्रसंगोचित ठरले असते (त्याच चित्रपटात आहे)
डावा तितुका मेळवावा
ब्याम्या ब्याम्या.. जिकलंस रे
+ १००१
लोल...
हट्टापायी सारी इसरू माया ममता
आवडलं
Samjawadi Party leader Kamaal
रोचक धागा
Pagination