नुकताच कास पठारावर फुलांचा बहर सुरु झाला . (त्यानिमित्ताने फोटो/ प्रवासवर्णनं येतीलच )
पण
ह्यानिमित्ताने वनविभागाने काढलेले दरपत्रक फेसबुक | सातारा ह्या पेज वर पाहण्यात आले . गाड्या प्रवेश फी , व्यक्तिगत प्रवेश फी , फोटोग्राफी फी , कचरा केल्यास दंड ,मागील वर्षीच्या वसुलीतुन आसपासच्या गावात केलेली कामे असे बरेच डिटेल्स आहेत त्यात . ( फेसबुक वरील फोटो इथे कसा शेयर करता येईल हे माहीत नसल्याने फोटो देता आलेला नाही)
ह्यातला "फोटो काढण्याची फी " हा प्रकार फार खटकला . प्रवेश फी वाहनांवर फी समजु शकतो , फुलाम्चे नुकसान अन प्रदुषण पसरवणे ह्यासाठी दंड असणे ही लॉजिकल आहे . पण फोटो काढण्यासाठी फी हे जरा जास्तच नाही का वाटत ? आता कास पठार ही जर अजिंठा लेण्यांसारखी डेलिकेट जागा असती किंव्वा अत्यंत कष्टाने जमवलेल्या वस्तुंचे संग्रहालय असते किंव्वा कोणा प्रसिध्द चित्रकाराची गॅलरी असती तर अशी फी समजु शकतो . पण कास ही कोणाची प्रॉपर्टी नव्हे... तो निसर्गाचा चमत्कार आहे. आणि अशा ठिकाणी फोटो काढण्याचे स्वातंत्र फुकट असले पाहिजे.
असे फोटो काढण्यावर फी लावणे तुम्हाला लॉजिकल वाटते का ? जगात इतरत्र कोठे नैसर्गिक पर्यटन स्थळांवर असे फोटो काढण्यावर फी आहे ?
अवांतर :
१)फी मोबाईल कॅमेराला १० रुपये , साध्या कॅमेराला ५० अन डिजीटल एसेलारला १०० रुपये , अर्थात फारच नॉमिनल आहे ...पण म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावतो ... आधी रस्ते सुधारणेच्या नावाखाली रस्त्यांवर लूट नाके झाले ... आता पर्यटन स्थळांवर फोटो काढायला फी ...पुढे मागे परत जीझीया कर यायला ही हरकत नाही .
२) ह्याच विषयाला अजुन एक कंगोरा आहे भुमिपुत्रांचा... सातारची लोकं गेली कित्येक वर्षे कोणतेही नुकसान न करता कासच्या निसर्ग सौदर्याचा आनंद लुटत होते , आता त्यांनाच प्रवेशासाठी अन फोटो काढण्यासाठीही फी लावणे जरासे अन्याय वाटते . ( लूट नाक्यांवर जसा बोर्ड दिसतो की " स्थानिक (की ज्यांच्याच जमीनी घेवुन रस्ते बनवले ) लोकांना टोल मधुन सुट नाही त्यांनी सवलतीचे मासिक पास घ्यावेत " तसाच बोर्ड कासवरही लावायला हवा आता .)
राहुन राहुन बोस्टन टी पार्टीची आठवण येत आहे .
वाचने
19675
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुर्खपणा आहे...
मी जुलै २०१३ ल गेलो होतो.
In reply to मुर्खपणा आहे... by जे.जे.
शेवटचा फोटो अतिशय सुंदर आला
In reply to मी जुलै २०१३ ल गेलो होतो. by विलासराव
संजय गांधी उद्यान.
पेठकर काका
In reply to संजय गांधी उद्यान. by प्रभाकर पेठकर
कास
+१ हेच लिहायला आले होते.....
In reply to कास by यशोधरा
ओके
In reply to +१ हेच लिहायला आले होते..... by आनन्दिता
हेच म्हणतो..
In reply to ओके by प्रसाद गोडबोले
बर्याच देवस्थानात देखील फोटो
In reply to हेच म्हणतो.. by चिगो
देवस्थान खाजगी असतात
In reply to बर्याच देवस्थानात देखील फोटो by विजुभाऊ
मान्य..
In reply to बर्याच देवस्थानात देखील फोटो by विजुभाऊ
तुळजापूरला आम्हालाही
In reply to बर्याच देवस्थानात देखील फोटो by विजुभाऊ
प्रबोधनाची गरज.
In reply to कास by यशोधरा
+१
In reply to प्रबोधनाची गरज. by प्रभाकर पेठकर
काका, माझी निरीक्षणे.
In reply to प्रबोधनाची गरज. by प्रभाकर पेठकर
चांगले आहे.
In reply to काका, माझी निरीक्षणे. by यशोधरा
हेच लिहायला आलो होतो. कास
In reply to कास by यशोधरा
अगोचरपणा
In reply to हेच लिहायला आलो होतो. कास by विजुभाऊ
माझा अनुभव
जवळपास सगळीकडेच हा अनुभव
पूर्णपणे चूक
फी कुठल्या नावाखाली घेतली
.
कासला जाणे टाळावे.
धन्यवाद.
In reply to कासला जाणे टाळावे. by प्रचेतस
भोरहून आंबवडे गाठावे. तिथे
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
हम्म्म्म..!
In reply to भोरहून आंबवडे गाठावे. तिथे by प्रचेतस
सगळ्यात जवळचा हाच मार्ग आहे.
In reply to हम्म्म्म..! by प्रभाकर पेठकर
पेठकरकाका.. शिडी फार अवघड
In reply to हम्म्म्म..! by प्रभाकर पेठकर
धन्यवाद
In reply to भोरहून आंबवडे गाठावे. तिथे by प्रचेतस
फिदा !
In reply to कासला जाणे टाळावे. by प्रचेतस
ते फक्त गर्दी अन बंधनांमुळे.
In reply to फिदा ! by सुधीर मुतालीक
कॅमेरासाठीचे शुल्क चुकीचे
सहमत आहे
फोटोग्राफीला शुल्क वेडपटपणा
फोटो काढण्याचे दर शेकड्यानी वाढवायला हवी!
जे विरोध करणार आहेत त्यांना
In reply to फोटो काढण्याचे दर शेकड्यानी वाढवायला हवी! by दशानन
पर्यावरणाचे संरक्षण
कै च्या कै
In reply to पर्यावरणाचे संरक्षण by विजुभाऊ
नै पटले
In reply to पर्यावरणाचे संरक्षण by विजुभाऊ
नुकतेच वाचनात आले-
जिथे जिथे वनविभागाची ताकद कमी
तुम्ही म्हणता तसे येत्या काही
In reply to जिथे जिथे वनविभागाची ताकद कमी by मालोजीराव
उपद्रवशुल्क..
उपद्रवशुल्क परत देतात हो…
In reply to उपद्रवशुल्क.. by ब़जरबट्टू
काय?
In reply to उपद्रवशुल्क परत देतात हो… by मालोजीराव
खरे तर..
हे पहा
धन्यवाद
In reply to हे पहा by आशु जोग
आज
शुभेच्छा!
In reply to आज by प्रसाद गोडबोले
हे पहा
कुणी या महिन्यात जाऊन आलंय का
मी पण येउ का? (फ्यामिली वाली
In reply to कुणी या महिन्यात जाऊन आलंय का by नांदेडीअन
अजून काहीच नक्की नाही हो.
In reply to मी पण येउ का? (फ्यामिली वाली by टवाळ कार्टा
मागच्या आठवड्यात गेलो होतो...
In reply to कुणी या महिन्यात जाऊन आलंय का by नांदेडीअन
सध्या
In reply to मागच्या आठवड्यात गेलो होतो... by थॉर माणूस
नवरात्र गुरूवारपासून आहे. (२५
सौजन्यः सामना
मी ३-४ ऑक्टोबरला कास पठारावर
फुले ?
In reply to मी ३-४ ऑक्टोबरला कास पठारावर by पिलीयन रायडर
तेव्हातरी विशेष नव्हता..
In reply to फुले ? by कपिलमुनी
धन्यवाद
In reply to तेव्हातरी विशेष नव्हता.. by पिलीयन रायडर
डिसेंबर महिन्यात जाण्याच्या विचारात..
In reply to मी ३-४ ऑक्टोबरला कास पठारावर by पिलीयन रायडर
ठोसेघर मी आत्ता पाहुन आले..
In reply to डिसेंबर महिन्यात जाण्याच्या विचारात.. by Gayatri Muley