Skip to main content

गणपती विसर्जन सोहळा - पुणे

लेखक मिंटी यांनी गुरुवार, 18/09/2008 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी..... आत्ताच काही दिवसांपुर्वी गणपती विसर्जन सोहळा पार पडला. आपण सर्वांनी आपल्या लाडक्या गणरायाला साश्रु नयनांनी भावपुर्ण निरोप दिला. पुण्यातला गणपती विसर्जन सोहळा हा सर्वश्रुत आहे तो त्याच्या भव्यतेमुळे. याच सोहळ्याची काही क्षणचित्रे मी आज इथे देत आहे. तुम्हाला ती आनंद देतील अशी आशा करते. मानाचा पहिला गणपती - कसबा गणपती मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालिम मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग मानाचा पाचवा गणपती - केसरी वाडा मानाच्या गणपतींसमोर काढलेली रांगोळी मानाच्या गणपतींसमोर पारंपारिक वाद्य वाजवणारे कलाकार - पुण्याचा प्रसिद्ध गणपती - श्रीमंत दगडु शेठ गणपती मंडईचा गणपती - पुण्यातील मिरवणूकीत सामिल झालेले काही गणपती - मंडईचा गणपती विसर्जन मिरवणुकीत येताना - दगडु शेठचा गणपती विसर्जन मिरवणुकीत सामिल होताना-

वाचने 22090
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

वा ! सर्व फोटो मस्त आले आहेत ! धन्यवाद तुमच्यामुळे येथे बसल्या बसल्या पुण्यातील महत्वाच्या गणेश मुर्तींचं देखील दर्शन झालं ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

वा ! सर्व फोटो मस्त आले आहेत ! धन्यवाद तुमच्यामुळे येथे बसल्या बसल्या पुण्यातील महत्वाच्या गणेश मुर्तींचं देखील दर्शन झालं !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिंटे मस्त आलेत ग फोटु!! बसल्या बसल्या दर्शन झाले :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

धन्यवाद मिंटे ..... दगडुशेट भाऊ फार फार फार सुरेख दिसताहेत :) क्लास ....फोटू -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मिंटी, मानाचे ५, मंडई आणि दगडूशेट ह्या गणपतींचे दर्शन घडवलेस..फार छान वाटले. फोटो सुंदरच आहेत, स्वाती

झकास फोटो! (अवांतरः मला गर्दीत जाण्याची गरजच नाही आता!)

सर्वच फोटो मस्त आहेत... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

मन प्रसन्न झाले फोटो पाहून. इथे चिकटवल्याबद्दल धन्यवाद.

फोटोग्राफर मिंटे .. सगळे फोटो छान आलेत ! :)

छान आहेत सगळेच फोटो.....

गणपतीचे सर्वच फोटो छान आहेत. घर बसल्या दर्शन झाले. धन्यवाद

फक्त कसबा आणि तांबडी जोगेश्वरी म्हणून सेम गणपतीचा फोटो दिलास बघ! :)

मस्तच! >मंडईचा गणपती विसर्जन मिरवणुकीत येताना - च्या वरचा "जिलब्या मारुती मंडळ" चा गणपती आहे. मनस्वी *उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .* आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).

सर्वच फोटो सुरेख. धन्यवाद मिंटी.

मस्तच गं! झकास फोटो आलेत. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन प्रसन्न करणारी चित्रे! धन्यवाद!

सर्व फोटो उत्तम आहेत....घरबसल्या सगळे मानाचे गणपती पाहायला मिळाले, हे आमचं भाग्यच!!! धन्यवाद, मिंटी!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

सर्व चित्रे अतिशय सुरेख...! लालबागच्या राजाचा विजय असो...! आपला, (गणेशभक्त) तात्या.

इथे परदेशात गणपती विसर्जन मिरवणूकीचे दर्शन घडवलेत... धन्यवाद.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चित्रे पाहून आनंद झाला. धन्यवाद मिंटी! रेवती

मिंटे....... मिंटे........ कुठे मिळवलंस हे पुण्य!!!!!!! खूप सुंदर आहेत गणपती, तू आनि तुझा कॅमेरा!!!!! मिंटे.... तू पुण्याची शान आहेस!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! एखादं परदेशातलं छाया-चित्रणाचं सम्मेलन असेल ना...... तेव्हा तिथे पाठव हे फोटो...... तिथले भारतीय..... खूप खुष होतील्.....स्पेषली तिथले "पुणेकर"!!!!!!!! भरुन पावले.......बाप्पाच्या दर्शनाने............:) :) गणपती बाप्पा मोरया! :) :) पुढच्या वर्षी लवकर या :) :) आणि मिंटीच्या कॅमेर्‍यात सामावुन आम्हाला वर्षभर दर्शन द्या! :)

मस्तच ! ! पण मानाचा दुसरा गणपती कुठाय ? फोटो चढवायचा राहिला की काय ?

Ganapati Bandobast 2008 003 कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांचे बिनतारी यंत्रणेचे जाळे तयार आहे. दिल्लीच्या बाँब स्फोटाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांवर जरा अधिक ताण आहेच. टिळक रोड ,स.प महाविद्यालय बिनतारी स्थानक तयार करुन वॉकीटॉकीवर सहा पो.उपनिरिक्षक बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) श्री विजय ललवाणी नियंत्रण कक्षाच्या संपर्कात. शहराची संपुर्ण मिरवणूक पार पाडल्या नंतर मगच स्थानक बंद करुन कर्तव्यावरुन घरी जाणार. मग कितीही काळ लागो. अशा अतिरिक्त व तात्पुरत्या बिनतारी स्थानकांची उभारणी शहरात मिरवणुकिंच्या मार्गावर ठिकठिकाणी होते. तसेव वाहनांनाही बिनतारि संच बसवले जातात. त्याचे एक स्वतंत्र नेटवर्क असते. प्रत्येकाला एक कॉलसाईन दिली असते. त्याला कॉल दिला कि त्याने ताबडतोब उत्तर दिलेच पाहिजे. [स्वे. नि. स.पो.उप निरिक्षक बिनतारी संदेश (अभियांत्रिकी)] प्रकाश घाटपांडे

मिंटी, सर्व फोटो मस्त आहेत. कसबागणपतीला पाहून आनंद झाला. मी आणि काही मित्र कसबा गणपती आला की त्या गर्दीत शिरुन त्याचे जवळून दर्शन घेत असु. त्या गर्दीत शिरुन दर्शन घेण्याची मजा वाटे. तुला इतके चांगले फोटो इअत्क्या धक्काबुक्कीत मिळाले याचे कौतूक वाटले. त्या पालेखी भोवती इतकी माणसे असतात आणि पालखी वेगाने पुढे नेत असतात की कॅमेर्‍यात योग्य क्षण टिपणे अवघडच आहे. फोटो पाहुन मजा आली. -- लिखाळ.

गणपती गेले गावाला !! चैन पडेना आम्हाला !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

वा! सगळेच फोटो मस्त आहेत. आणि माझ्यासारख्या आळश्याला खुर्चीत बसुन सगळे मानाचे गणपति पहायला मिळाले. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao