Skip to main content

वेगळी आहे

लेखक कैलास गायकवाड यांनी शुक्रवार, 30/08/2013 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
पारदर्शक वागण्याची आंधळी स्थित्यंतरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे खोल गर्तेतील जाणिव उन्मळावी सारखी संपल्यावरती पुन्हा इच्छा बळावे आणखी सूर्य,तारे,चंद्र सारे टांगलेली झुंबरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे सुप्त इच्छा गुप्त होता लुप्त झाली वादळे लाट येते लाट जाते की किनारी आदळे वेदना,दु:खे ,निराशा माजली अवडंबरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे ओलसर अंतर्मनातिल पापणी तर कोरडी धडधडत शिरते उरी संवेदना माजोरडी पोट भरल्यावर कशाने वासरागत हंबरे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे वादळाने वादळागत वादळावे वादळा मी मला जपणार अन जपणार हा गोतावळा जीव गेला ,जावु दे त्याची कुणाला खंत रे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे -- डॉ.कैलास गायकवाड
लेखनविषय:

वाचने 1427
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सुरेख कविता डॉक्टर! फक्त सुरवातीचा शब्द पारदर्शक ऐवजी पारदर्शी होउ शकते अस वाटत.

व्व्व्व्वा. >>वादळाने वादळागत वादळावे वादळा मी मला जपणार अन जपणार हा गोतावळा जीव गेला , जावु दे त्याची कुणाला खंत रे वेगळी आहे धरित्री वेगळाली अंबरे .. हे तर उदाहरणार्थ खासच.

सर्व प्रतिसाद दात्यान्चा मनःपूर्वक आभारी आहे.