शाळा? नूतन समर्थ विद्यालय, विजय मारुती चौक, सिटी पोस्टाजवळ, बुधवार पेठ, पुणे २.
विद्यार्थीवर्ग? आजूबाजूच्या वेश्यावस्तीतील आणि इतर कामकरी वर्गातील मुले.
दुसर्या एका संस्थळातर्फे चालवल्या जाणार्या काही चांगल्या उपक्रमांमध्ये मला सहभागी व्हायची संधी मिळाली आहे, त्यापैकी हा एक उपक्रम. ह्या उपक्रमातून गेली काही वर्षे ह्या छोट्यांना शिक्षणासाठी मदत करत आहोत आणि सातत्य राखण्याचाही प्रयत्न करत आहोत.सावली सेवा ट्रस्टच्या माध्यमातून ही मदत केली जाते. ह्याआधी ही मदत मुख्यत्वे आर्थिक वा वस्तूस्वरुपात अशी केली जात होती, पण ह्यावर्षी ट्रस्टने ह्या मुलांना शिकवण्यासाठी काही मदत करता येऊन शकेल का अशी विचारणा केली आणि आम्ही काही जणांनी त्यात सहभागी व्हायचे ठरवलेय आणि झालो आहोत. दर शनिवारी १ ते दीड तास ह्या शाळेत जाऊन आम्ही चौथी ते सातवीपर्यंतच्या मुलांना शिकवतो. जुलै/ऑगस्ट २०१३ ते मार्च २०१४ हा शिकवण्याचा पहिला टप्पा सद्ध्या ठरवून घेतला आहे.
तुमच्या आमच्या घरांतील मुलांच्या सुरक्षित आयुष्यापेक्षा ह्या मुलांचे जग फार वेगळे आणि आयुष्य खडतर. बरेचदा आपले वडील कोण हेसुद्धा या मुलांना माहित नसते, त्यांना पाहिलेलेही नसते, मग बापाची माया खूप दूरची बात! ह्या लहानग्यांच्या नशीबात आई वेश्या व्यवसायात असल्याने व्यवसायानुषंगाने येणारे इतर शोषण ओघाने येतेच. रात्री बेरात्री रस्त्यावर असणे, आईला होणारा त्रास लहानपणापासून पाहणे, कुपोषण, उपासमार, व्यसने, कुसंगती, शिवीगाळ, अत्याचार, संघर्ष आणि असुरक्षिततेचे दुष्टचक्र - हे कमी म्हणून की काय वेश्याव्यवसाय किंवा गुन्हेगारीच्या जगात शिरकाव... मग ह्यांना ह्या दुष्टचक्रातून बाहेर काढायचे तरी कसे? समाजात मिसळायची संधी ह्या मुलांना कशी मिळणार? एक मार्ग असा की ह्या मुलांना व्यवस्थित शिक्षण देणे, जेणेकरुन त्यांच्यासाठी अर्थाजनाची कवाडे उघडतील, पर्यायाने पुढील आयुष्यात समाजात मानाने जगता येईल. त्यासाठी आधी ह्या मुलांना शिक्षणात रुची वाटायला हवी. परिस्थितीच अशी असते की ह्या मुलांना घरी शिक्षणाला पूरक असे वातावरण अजिबात नसते. दोन वेळच्या खाण्याची बरेचदा भ्रांत, आई वडिलांच्या मायेची जिथे शाश्वती नाही, तिथे पूरक वातावरणाची अपेक्षा तरी काय करणार? फार फार कठीण आयुष्य ही मुले जगतात. प्रेम, माया ह्यासाठी भुकेली असतात.
सुरुवातीला जेव्हा तिथे जाऊन शिकवायला सुरुवात केली तेव्हा पहिली गोष्ट जाणवली ती, एवढ्या लहान मुलांच्या नजरेतला कोरडेपणा, संशय, अविश्वास! कधी कधी सहन होत नसे, पहावत नसे, इतक्या लहान वयातल्या मुलांची अशी कोरडी नजर, चेहर्यावरचे कोरडे अलिप्त भाव पाहून शिकवायचा तास, दीड तास संपला की मलाच एक प्रकारचे नैराश्य, उद्विग्नता येत असे.. पटकन ही मुले रुळत नाहीत वा तुम्हांला जवळ येऊ देत नाहीत, एक उसना बेदरकारपणाचा मुखवटा पांघरुनच वावरतात, पण फार चटकन दुखावतात, कोमेजतातही - ते मात्र समजून घ्यायचे. त्यांचे मन कधी दुखावले, तर ते दुखावलेले मन तुमच्यापुढे कधी उघडे होणार नसते, कारण इतके हळवे राहून त्यांच्या दुनियेत निभाव लागणार नाही, हे कटू सत्य अगदी लहानपणापासून ह्या मुलांनी पाहिलेले, अनुभवलेले आणि दुर्दैवाने पचवलेले असते. ह्या जाणीवेने सुरुवातीला तर फार त्रास दिला -आम्हांला त्यांच्या मनोवृत्तीची कल्पना देण्यात तर आलीच होती, पण प्रत्यक्ष अनुभवणे आणि नुसते ऐकणे/ वाचणे ह्यात फरक आहे ना? मग ह्या विचारानेच ते नैराश्य मागे टाकून पुन्हा एका नव्या हुरुपाने सुरुवात करायची..
सुरुवातीला वर्गात लक्षही न देणारी हीच मुलं आता दर शनिवारी आमची वाट पाहतात, पुढच्या शनिवारी येणार ना ताई, पुढच्या वर्गात काय शिकवणार म्हणून विचारतात, तेह्वा आम्ही योग्य मार्गावर आहोत, हळूह्ळू ह्या मुलांच्या मनातही आमच्याबद्दल काही स्थान निर्माण होत आहे, अभ्यासातही ती रुची घेत आहेत - हे लक्षात येऊन भारी बरे वाटते. हुरुप येतो. मनापासून आनंद होतो आणि उमेद वाढते. आम्ही काही व्यावसायिक शिक्षक नाही आहोत, शिकवायचे कसे ह्याचे रीतसर व्यावसायिक प्रशिक्षण आमच्यापाशी नाही, पण वेगवेगळी पुस्तके वाचून, त्यातल्या कल्पना अनुसरुन, झालंच तर खेळ, प्रश्नमंजुषा (क्विझ) वगैरेंसारखे प्रकार वापरुन ह्या मुलांच्या मनात वाचनाची, शिक्षणाची गोडी उत्पन्न व्हावी हा प्रयत्न आहे. तुम्हां कोणांकडे काही कल्पना असतील तर जरुर कळवा, वापरण्याजोग्या असतील तर आम्ही त्यांचा अंतर्भाव जरुर करु.
मागच्याच्या मागच्या शनिवारी मी जाऊ शकले नव्हते. मागच्या शनिवारी वर्ग घेतला. वर्ग संपताना एक विद्यार्थिनी हळूच जरा चाचरतच जवळ आली, आणि अचानक मला मिठी घालून म्हणाली, दीदी, लास्ट टाईम क्यूं नहीं आयी?... मोठया मोठ्या डोळ्यांत उत्सुकता, प्रश्न, चेहर्यावर निरागस हसू. हिचाच आधीचा प्रौढ भाव असलेला आणि थंड, अलिप्त नजरेचा चेहरा एका सेकंदासाठी आठवून, त्या मिठीचे मोल समजून मला झालेला आनंद आणि जे काही भरुन आलेय म्हणता! ह्याहून मोठी पावती काय मिळेल?
कधीतरी इथल्या अनुभवांबद्दलही लिहीन...
वाचने
10681
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन.
नक्की सांगेन काका, अगदी
In reply to अभिनंदन. by प्रभाकर पेठकर
>अत्यंत स्पृहणीय असे कार्य
यशोताई, तुमच्या कार्याला
शिकवायला अतिशय आवडले असते..
अजया, कधी गरज लागली तर मी
In reply to शिकवायला अतिशय आवडले असते.. by अजया
अत्यंत हृद्य उपक्रम आहे
स्तुत्य उपक्रम.
कुठल्याही प्रकारची मदत करायला
अत्यंत कौतुकास्पद काम आहे यशोधरा!
अत्यंत स्पृहणिय काम ! हार्दिक
कधीतरी इथल्या अनुभवांबद्दलही लिहीन...
खरच खूप चांगले काम करत आहात.
In reply to कधीतरी इथल्या अनुभवांबद्दलही लिहीन... by भ ट क्या खे ड वा ला
अत्यंत स्तुत्य उपक्रम!!!
जबरी उपक्रम!!
अतिशय कठीण काम करते आहेस
सगळ्यांच्या सहृदय
स्तुत्य उपक्रम !!
अत्यंत स्तुत्य उपक्रम ..
बरीच मराठी पुस्तके आहेत
फुलवा, मराठी नको आहेत पण साधी
In reply to बरीच मराठी पुस्तके आहेत by पद्मश्री चित्रे
कमी असतील . पण तरी बघते.
In reply to फुलवा, मराठी नको आहेत पण साधी by यशोधरा
शिकवायला आवडेल!!!!
आदर
फार मोठं काम करता आहात. काही
अत्यंत स्तुत्य उपक्रम.
उत्तम उपक्रम
शुभेच्छा..
आम्हि काही वर्षांपूर्वी
In reply to शुभेच्छा.. by उपास
यस्स..
In reply to आम्हि काही वर्षांपूर्वी by यशोधरा
सांगते मी.
In reply to यस्स.. by उपास
मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा..
शालेय नकोत. अवांतर, गोष्टींची
In reply to मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.. by नाखु
छान उपक्रम. विचार करतेय......
वा...
वा
स्त्युत्य उपक्रम.
अतिशय स्तुत्य उपक्रम...!
ंमास्तर
शुभेच्छा.
मुलांसाठी खजिना
खरेच खजिना आहे हो!
In reply to मुलांसाठी खजिना by शिवाजी नाठे
अभिनंदन!
_/\_
*****
सुंदर!
आपल्यासारख्या लोकांमुळेच जग
पुन्हा एकदा सुरुवात.
शुभेच्छा
धन्यवाद. जसे आणि जितके जमेल
In reply to शुभेच्छा by एस
हि शाळा अनुदानित आहे का ?
ज्या वातावरणामध्ये लेकरं
In reply to हि शाळा अनुदानित आहे का ? by म्हैस
+१
In reply to ज्या वातावरणामध्ये लेकरं by यशोधरा
OK . अभिनंदन आणी शुभेच्छा