खूप मोठी असल्यामुळे अन् अलंकारीक शब्दांमुळे वाचायला जरा वेळ लागतो. पण छान लिहिलेत.
"आदौ देवकी देवी गर्भ जननं गोपीगृहे वर्धनं,
मायापूतन जीवीताप हरणं गोवर्धनो धारणं,
कंसच्छेदन कौरवादी हननं कुंती _____
एतद्भागवतो पुराण कथितं, श्रीकृष्णलीलांमृतं"
या श्लोकाची आठवण झाली.
तिसरी ओळ पूर्ण आठवत नाहिये :( कुणी सांगू शकेल काय?
राघव
अहो व्यासंग वगैरे काही नाही...मला संस्कृतचा प्रांत पार अगम्य आहे अजून!!
फक्त अगोदर ऐकले/वाचलेले वेळेवर आठवले इतकेच. तेही अपूर्ण. उलट तुम्हीच आठवून पूर्ण केलेत ते... याचा अर्थ तुमचाच व्यासंग जास्त नाही काय? मीच तुमचा आदर करतो त्यासाठी. :)
राघव
>>>पहिल्या दोन तीन कडव्यातच साफ कंटाळलो बुवा! पुढे न वाचताच प्रतिसाद देत आहे!
हेच म्हणतो... ह्यात पण क्रमशः वापर करावयास हवा होता.. ;)
बाकी कवितेचा प्रांत आमच्या साठी अवकाशाप्रमाणेच अगम्य आहे ... @)
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
गोकुलाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! :)
नयनीदेवी, तुमच्या कवितेमुळे दरवर्ष्री कृष्णचरित्र वाचल्याच समाधान मिळते.
अजून काही नव्या कविता असतील तर लिहा... आम्हाला आवडेल. :)
ऐकून ती आकाशवाणी, चवताळला, संतापला कंस...
नवपरिणित दांपत्याला मग घडला बंदिवास..
होता काय मूर्ख एवढा तो कंस ?
नच कळले का त्याला, घडेल बंदिवासातही दांपत्याचा सहवास?
जर ठेवता वेगळाल्या खोल्यात दोघांस
न राहता पहिला वा आठवा गर्भ, सुखे जगता निर्भय होवुनी मग कंस.
त्याचं वैर आपल्या बहिणीशी आणि मेव्हण्याशी नव्हतं तर होणार्या आठव्या मुलाशी होतं. त्यामुळे त्यांना एकत्र ठेवून काय मजा मारायची ती मारू दिली आणि निपजणार्या मुलांना मारून टाकलं. आता आधीच्या सात मुलांना का मारलं? न जाणो आकाशवाणी ऐकण्यात आपली कांही चुक झाली असेल तर? उगाच रिस्क नको.
खरा प्रश्न असा आहे. बंदिवासात, रक्षकांच्या नजरेसमोर, शरीरसंबंध येतोच कसा? की जेलातही त्यांना वेगळी बेडरुम दिली होती? बरं, लायनीने ६-७ मुलं मारली तरी नवनविन अपत्ये जन्मास घातलीच का?
.... सोळा सहस्र नारी वरिसी, करवूनि नरकासुरदहना...
होता काय व्यवसाय तुझा सुदर्शना ?
सोळा सहस्त्र नारींस सुखें पाळण्या-पोसण्या?
कसे आणिले तू त्या नारींना प्राग्ज्योतिषपुराहुन?
पायी, अश्वांवरुनी, वा सहस्त्रावधी रथांतुन?
छान
असेच काहीसे म्हणतो
"आदौ देवकी
आदर
आदर व्यक्त
अहो
हो ना
धन्यवाद..
अप्रतिम
पहिल्या
>>>पहिल्या
गोकुळाष्ट
गोकुळाष्ट
फारच छान...!
गोकुलाष्टमीच्या हार्दिक
नयनी, तुझ्या या कवितेमुळे
गोपाळकृष्ण भगवान की जय...!!!
सर्वांना गोकुळाष्टमी'च्या
होता काय मूर्ख एवढा तो कंस ?
आगागागागागा...!
कंस एव्हढा का अडाणी होता?
कांही समजत नाही.
प्रश्न.
का नाही वधलेस तात्काळ