बऱ्याच दिवसात तुझ्यावर काही लिहिलं नाही
लिहावंसं वाटलं.
बऱ्याच दिवसात मनासारखं काही केलं नाही
करावंसं वाटलं.
तू पडतोच आहेस रे माझ्या लहानपणापासून
मीच खूप लांब आले तुला तिथेच सोडून
बऱ्याच दिवसात मनाची कवाडं उघडली नाहीत
उघडावीशी वाटली.
बाहेर सगळे चांगलेच आहेत पण माझे कुणीच नाहीत
खरंतर मी सुद्धा परकी झालेय माझी उरलेच नाही
बऱ्याच दिवसात आपलं कुणी भेटलं नाही
भेटावसं वाटलं.
मला वाटलं तू खोटा झालास माझा पैसा खरा केलास
पण तू अजूनी तसाच माझा पैसा खोटा केलास
बऱ्याच दिवसात बालपण जगलेच नाही
जगावसं वाटलं
आज तुला पाहिलं पूर्वीसारखंच निरखून
आज तुला पहिलं पूर्वीसारखंच हरखून
बऱ्याच दिवसात स्वत:ला विसरलेच नव्हते
विसरावंसं वाटलं
का येतोस अवेळी अन करतोस माझी धावपळ
माझ्याच मनी चलबिचल तू तसाच निश्चल
बऱ्याच दिवसात तुझ्यात कुणाला शोधलं नाही
शोधावसं वाटलं.
दाखवतो आहेस खरा की सगळ्यांसाठी पडतोयस
खरं खरं सांग तूही कुणाला तरी शोधतोयस
बऱ्याच दिवसात कुणाला छेडलं नाहीस?
छेडावसं वाटलं?
पुरे झाल्या गप्पा आता निघून जा बरं ढगात
मला बरीच कामं आहेत हे येतील घरात
बऱ्याच दिवसात खरंतर कधीच कुणाला टाळलं नाही
टाळावसं वाटलं.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !!!!!
मस्त !
दाखवतो आहेस खरा की सगळ्यांसाठी पडतोयस
खरं खरं सांग तूही कुणाला तरी शोधतोयस
बऱ्याच दिवसात कुणाला छेडलं नाहीस?
छेडावसं वाटलं?
हे खासंच !!!
आवडली.
:)
देवा!
देवा!
काय काय वाटल कस सांगु? उठुन झर्र्दीशी काहीतरी लिहावस वाटल.
मस्त :)
आवडली कविता!
आवडली कविता
आवडली कविता
मस्तच..
मस्तच..
कविता आवडली.
कविता आवडली.
पण शीर्षक थोडं गंमतीदार वाटलं...:-)
सुरेख
अगदी 'आगळी वेगळी पाऊस कविता'. साधे शब्द असल्यामुळे पावसाची केलेला थेट संवाद भावला.
.. हे कडवं तर १ नंबर
+११११
"बऱ्याच दिवसात खरंतर कधीच कुणाला टाळलं नाही
टाळावसं वाटलं."
हे मस्तच... बाकी सगलि कविताच उत्तम जमली आहे..
सुन्दर अति सुन्दर !
पुरे झाल्या गप्पा आता निघून जा बरं ढगात
मला बरीच कामं आहेत हे येतील घरात
बऱ्याच दिवसात खरंतर कधीच कुणाला टाळलं नाही
टाळावसं वाटलं.
हा कवितेचा उत्कर्ष बिन्दु ! अप्रतिम कविता ! एकदम आवडली !
आगळं वेगळं वाचावास वाटलं
आगळं वेगळं वाचावास वाटलं